Without Peeling Fruits
|

Without Peeling Fruits: ‘हि’ फळं सोलून खाताय..? तर लगेच थांबा; जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Without Peeling Fruits मस्त आणि स्वस्थ जगायचे असेल तर तुम्ही काय करता…? डॉक्टर सांगतात तसे रोजच्या आहारात एक तरी फळ खाता का..? नाही..? मग खा. कारण रोजच्या आहारात फळांचे असणे अत्यंत आवश्यक आहे. जसे जेवणाचे ताट पुढ्यात आल्यावर पापड लोणचे चवीला लागते तसेच उत्तम आरोग्यासाठी आधार म्हणून फळांचे सेवन जरुरी आहे. यामध्ये सफरचंद, केळी, कलिंगड, काकडी, आंबा आणि अजून बऱ्याच फळांचा समावेश लाभदायी मानला जातो.

पण यातील काही फळे अशी आहेत जी सोलून खायची नसतात. आता तुम्ही म्हणाल आंबा न सोलता कसा खाणार..? तर मित्रांनो तज्ञ सांगतात कि, अशी फळे सोलून खाल्ल्याने यातील किमान ४० टक्के पोषक तत्त्व आपण कचऱ्याच्या डब्ब्यात टाकत असतो आणि उरलेली ६० टक्के पोषक तत्त्वे ग्रहण करतो. (Without Peeling Fruits)

Fruits

सुदृढ शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वांची पूर्तता करायची असेल तर आपल्याला रोजच्या आहारात काही विशेष फळे आणि भाज्यांचा प्रामुख्याने समावेश करायलाच लागतो. अशावेळी जर एखाद्या भाजीचे देठ किंवा एखाद्या फळाचे साल तुम्ही फेकून देत असाल तर आधी त्या पदार्थांविषयी पूर्ण जाणून घ्या. (Without Peeling Fruits) कारण तुम्ही जे साल फेकून देत आहात त्यामध्ये असे अनेक घटक समाविष्ट असतात, जे आपल्या शरीराची पूर्ण काळजी घेण्यास सक्षम असतात. त्यामुळे कोणताही पदार्थ खाताना त्याची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.

आता सफरचंद पहा ना.. हे असे फळ आहे जे खाण्याबाबत डॉक्टर नेहमीच आग्रही असतात. शिवाय कोणालाही कोणतेही आजारपण असले तरीही त्याला भेटायला जाताना आपण सुद्धा सफरचंद नेतो. हो का नाही..? एकंदरच काय कि, सफरचंद हे अतिशय लाभदायी फळांपैकी एक आहे. मग सफरचंद खाताना ते सोलून खाण्याचा हट्ट का..? विशेष करून हंगामी फळे अत्यंत पोषक घटकांनी समृद्ध असतात. ज्या त्या हंगामात हि फळे आरोग्याशी संबंधित अधिक लाभ देतात.

(Without Peeling Fruits) काही फळांमध्ये असलेले अँटि ऑक्सिडंट गुणधर्म हे सर्व प्रकारच्या गंभीर आजारांपासून सुरक्षित ठेवण्यास लाभदायी ठरतात. विशेष सांगायचे म्हणजे बहुतेक फळांचे मुख्य पोषक तत्त्व त्यांच्या त्वचेत असतात. यामुळे प्रत्येक फळ सोलून खाण्याचा हट्ट करू नये. पण सगळीच फळे सालीसकट खाऊ नये. जशी काही फळे सालीसकट पोषणदायी तसेच काही फळे सालीशिवाय. म्हणून आज आपण तज्ञांनी कोणती फळे सालीसकट खाण्याचा सल्ला दिला आहे ते जाणून घेऊ.

० सालीसकट ‘हि’ फळे खा
(Without Peeling Fruits)

१) सफरचंद –

सफरचंद असे फळ आहे जे कोणत्याही आजारपणात म्हणा किंवा अन्य रोजच्या दिवसातही खाण्याचा सल्ला दिला जातो. पण तुम्ही अनेकांना सफरचंद सोलून खाताना पाहिले असेल. या खाण्याच्या पद्धतीला तज्ञांकडून लाल मार्क दिलेला आहे. कारण सफरचंदाच्या मुख्य गराप्रमाणेच त्याच्या सालीमध्येही विविध प्रकारचे पोषक घटक असतात. जे आपल्या आरोग्यासाठी विशेष फायदेशीर ठरू शकतात. सफरचंदाच्या सालीतून व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि पोटॅशियम मिळते. (Without Peeling Fruits)

२) आंबा –

Mango

नुसतं नाव घेतलं तरीही तोंडाला पाणी आणणारा आंबा कच्चा असो वा पिकलेला तो कसाही खाल्ला तरी चवीलाही उत्तम आणि आरोग्यालाही उत्तम. सहसा आंबा खाताना त्याचा गर खाऊन साल फेकून दिली जाते. (Without Peeling Fruits) पण तज्ञ सांगतात कि, आंबा सालासह खाणे अधिक फायदेशीर आहे. तज्ञांच्या अभ्यासानुसार, आंब्याच्या सालीमध्ये मॅंगीफेरिन, नोरेथ्रिओल आणि रेझवेराट्रोल सारखे उत्तम अँटि ऑक्सिडेंट असतात. जे फुफ्फुस, कोलन, स्तन, मेंदू आणि पाठीच्या कण्यातील कर्करोग तसेच इतर अनेक गंभीर आजार होण्यापासून आपले रक्षण करू शकतात.

३) संत्री –

Orange

संत्री खाताना त्याचे साल काढून आतून गर खाल्ला जातो. पण व्हिटॅमिन सी’ने समृद्ध संत्र्यामूळे शरीराची प्रतिकारशक्ती उत्तम राखली जाते आणि यासाठी केवळ गर नव्हे तर संत्याची साळी फायदेशीर आहे. व्हिटॅमिन- सी हे अनेक प्रकारच्या संक्रमणांपासून आपल्याला सुरक्षा देते. तज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, व्हिटॅमिन- सी हे संत्र्याच्या गरापेक्षा दुप्पट मात्रेत या फळाच्या सालीमध्ये आढळते. शिवाय संत्र्याच्या सालीमध्ये रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन-बी 6, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम देखील असते. यामुळे सालीसह संत्रे अधिक फायदेशीर आहे. (Without Peeling Fruits)

४) जांभूळ –

जांभूळ हे दीपक, पाचक, यकृत उत्तेजक व स्तंभक असे फळ असते. पांडुरोग (अ‍ॅनिमिया), कावीळ, रक्तदोषाविकार या आजारांवर जांभूळ फायदेशीर आहे. हे फळ साल काढून खाऊ नये असे तज्ञ सांगतात. (Without Peeling Fruits) कारण, जांभळाच्या सालीत नैसर्गिकरित्या लोह तत्त्व समाविष्ट असतात. शिवाय जांभळामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, क जीवनसत्त्व यांचे प्रमाण अधिक असते. शिवाय प्रथिने, खनिजे, तंतूमय व पिष्टमय पदार्थ व थोडय़ा प्रमाणात मेद असते. याचा योग्य पद्धतीने शरीराला लाभ हवा असेल तर जांभूळ न सोलता खा.

५) स्ट्रॉबेरी –

strawberry

स्ट्राॅबेरीमध्ये व्हिटामीन सी, व्हिटॅमिन के, फाॅलीक अॅसीड, मॅग्नेशियम, मॅगनीज, आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. शिवाय या फळाच्या सालीमध्ये आणि गरामध्ये नैसर्गिक साखर समाविष्ट असते. त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या फळाची साल काढून खाणे आरोग्यासाठी नुकसानदायी आहे. डाएटरी फायबरचा उत्तम स्त्रोत असणारी स्ट्रॉबेरी फायटोन्यूट्रियंट आणि फ्लोवोनाइडने समृद्ध असल्यामुळे सालीसकट खाण्याचा प्रयत्न करावा.

६) काजू –

Cashew

काजू चवीने अतिशय गोड असतो. अनेकांना काजूचे फळ खाताना त्याची साल काढायची सवय असते. तर मित्रांनो हे फळ अतिशय बलकारक, वातशामक असतात. तर काही अंशी किंचित पित्त वाढवणारे असतात. काजूगराप्रमाणे त्याच्या सालीतही अनेक उपयुक्त व्हिटॅमिन्स, अँटी- ऑक्सिडंट आणि खनिज तत्वे असतात. यात प्रामुख्याने व्हिटॅमिन- इ, व्हिटॅमिन- के आणि व्हिटॅमिन- बी 6, तांबे, फॉस्फरस, झिंक, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी अनेक पोषकतत्वे समाविष्ट असतात. (Without Peeling Fruits)

७) काकडी –

Cucumber

काकडी अत्यंत थंड आणि संतुलित स्वभावाचे फळ आहे. जे उष्ण तापमानात अधिक फलदायी ठरतं. या फळाविषयी सांगताना तज्ञ सांगतात कि, काकडी सोलून न खाणे विशेष फायदेशीर आहे. कारण काकडीच्या गडद हिरव्या छटामध्ये बहुतेक अँटि ऑक्सिडंट्स, अघुलनशील फायबर आणि पोटॅशियमची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. यामध्ये व्हिटॅमिन- के’चे प्रमाणदेखील मोठे असते. त्यामुळे काकडी स्वच्छ धुतल्यानंतर सोलू नका तर सालीसकट खा. असे केल्याने शरीराचे हायड्रेशनदेखील उत्तमरीत्या राखले जाते.

‘हे’ पण वाचा :-

Wood Apple Benefits : ‘दुर्मिळ होतंय कवठाचं फळ, खाई त्याला येई बळ’; जाणून घ्या फायदे

Healthy Fruits : ‘हि’ फळे खालं तर, पोटाच्या तक्रारी राहतील दूर; जाणून घ्या