Wood Apple Benefits
| |

Wood Apple Benefits : ‘दुर्मिळ होतंय कवठाचं फळ, खाई त्याला येई बळ’; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। (Wood Apple Benefits) रोजच्या आहारात किमान एक पदार्थ तरी चटपटीत, जिभेवर चव रेंगाळेल असा असावा असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे पापड, लोणचे, भजी, कुरडया, चटणी आणि सॉस सारखे पदार्थ प्रत्येकाच्या घरात आढळतात. कितीतरी वेळा आज आणलं आणि उद्या संपलं असं या पदार्थांच्या बाबतीत घडतं.

पण मित्रांनो असे पदार्थ दीर्घ काळ टिकण्यासाठी विविध कृत्रिम रसायनांचा वा मानवी शरीरास घातक असणाऱ्या पदार्थांचा वापर केला जातो. अशावेळी आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता चवीने आंबट पण चविष्ट असणाऱ्या फळाची चटणी खाणे अधिक फायदेशीर आहे. आता हे फळ कुठलं..? असा प्रश्न पडणे फार साहजिक आहे. तर हे फळ आहे कवठ. जाणून घेऊया अधिक माहिती खालीलप्रमाणे Wood Apple Benefits :-

Wood Apple Benefits

० आरोग्यासह जीवनशैलीत कवठ 100% फायदेशीर

‘कवठ’ हे फळ आजकाल बाजारात फार मुश्कीलने उपलब्ध होते. त्यामुळे दैनंदिन आहारात या फळाचा वापर अतिशय दुर्मिळ झाला आहे. त्यात आजच्या पिढीतील फार कमी लोकांना कवठ फळाविषयी माहिती आहे. म्हणूनच आज आपण या फळाविषयी पूर्ण माहिती घेणार आहोत. (Wood Apple Benefits)

फेब्रुवारी ते एप्रिल या काळात कवठाच्या झाडांच्या फांद्यांच्या टोकावर फुले येतात. हि फुले विरळ परिमंजरीवर दिसून येतात. या फुलांचा आकार लहान आणि रंग फिकट लाल असून आखूड देठ असतात. पुढे मोहर आल्यानंतर साधारणत: २ ते ३ महिन्यांनी याची फळे तयार होतात. या फळाचे साल कठीण असते. तर रंग करडा असतो, या फळाच्या कवचात मृदू गर व लांबट बिया असतात. कवठाचे पिकलेले फळ हे चवीला आंबट, गोड आणि काहीसे तुरट असते.

(Wood Apple Benefits) कवठाच्या गरापासून चविष्ट चटणी, मुरंबा, जेली आणि बर्फी बनवली जाते. हे फळ पित्त शमन करण्यास मदत करते. शिवाय भूकसुद्धा वाढवते. कवठ कंठाची शुद्धी करते आणि यामुळे दमा, क्षयरोग, रक्‍तविकार, उलटी, वातदोष, श्रम, उचकी, विष, तृष्णा, ग्लानी वगैरे आरोग्यविषयक तक्रारीत हे फळ हितकारी असते. तसेच शौचासह आव, मूळव्याध वगैरे त्रासावर कवठाच्या बिया आणि धागे काढलेला गर ताकासह घेण्याचा विशेष लाभ होतो.

तर कवठ फळाची साल पित्तावर अतिशय उपयुक्त आणि प्रभावी उपाय मानली जाते. यासह वजन कमी करण्यासाठी आणि अंगावरील चरबी कमी करण्यासाठीही हे फळ फायदेशीर आहे. याची वाळलेली फुले उकळून त्यांपासून नितळ कांती मिळवता येईल.

शिवाय या फळाच्या बियांतील तेल खाजेवर लावल्यास खाजेच्या आणि त्वचा विकाराच्या समस्या दूर होतात. तर कवठाच्या झाडच्या सुवासिक पानांचा रस वात आणि अंगावर पित्त उठल्यास लावला असता आराम मिळतो. या झाडापासून डिंक ही मिळतो हा डिंक अर्धपारदर्शक, तांबूस भुरा असतो. (Wood Apple Benefits)
बाभळीच्या डिंकास पर्याय म्हणून याचा वापर केला जातो.

तसेच या झाडापासून मिळणारे लाकूड मजबूत आणि टिकाऊ स्वरूपाचे असल्यामुळे घरबांधणीसाठी व शेतीचे अवजारे बनवण्यासाठी उपयोग केला जातो. असे अनेक नानाप्रकारचे फायदे कवठ आपल्याला देते. मात्र आजकाल हे फळ फार कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे याची गरज काहीशी कमी झाल्याचे दिसून येत आहे.

० कवठ फळातील आरोग्यदायी गुणधर्म

(Wood Apple Benefits) कवठ फळात कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन नामक भरपूर पोषकतत्त्व समाविष्ट असतात. हे फळ बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, थायमिन आणि राइबोफ्लेविनने समृद्ध आहे. शिवाय विविध पौष्टिक पदार्थांनी हे फळ समृद्ध आहे. कवठ व्हिटॅमिन सी’चे समृद्ध स्रोत मानले जाते. शिवाय यातील पोषक तत्त्व शरीरात बलनिर्मिती करतात. यामुळे संपूर्ण दिवस उत्साही आणि ऊर्जादायी जातो.

० कवठ खाण्याचे फायदे (Wood Apple Benefits)

१) ऊर्जादायी फळ – कवठ या फळामध्ये जास्त प्रमाणात प्रथिने आढळतात. ज्यामुळे ते शरीरास ऊर्जा प्रदान करण्यात अव्वल आहे. या फळाचा उपयोग शरीरात उर्जा टिकवून ठेवण्यासाठी केला जातो. त्यामुळे कोणत्याही स्वरूपात या फळाचे सेवन केले तर आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.

२) रोग प्रतिकार शक्ती वाढते – कवठ फळातील अनेक पोषक तत्त्व शरीरातील पोषणाची कमतरता भरून काढतात. ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळाल्याने रोग किंवा आजार होण्याची शक्यता कमी होते. शिवाय कवठ फळाचे सेवन केल्याने शरीरातील पेशी सक्रिय राहतात. परिणामी रोग प्रतिकार शक्ती वाढते. (Wood Apple Benefits)

Wood Apple Benefits

३) रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते – कवठ झाडाच्या खोड व फांद्यांमध्ये फेरोनि नावाचा डिंक असतो. रक्तातील साखरेचा प्रवाह, स्राव आणि संतुलन व्यवस्थापित करण्यास मदत करतो.हे डिंक इन्सुलिन आणि रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास रोखतो.

४) डोळ्यांसाठी फायदेशीर – कमी वयात दृष्टिदोषाचा त्रास होण्यामागे अनेक कारणे असतात. जर तुम्हीही दृष्टिदोषाच्या त्रासाने ग्रासले असाल तर कवठाचे फळ तुमच्यासाठी आवश्यक आहे. कारण कवठ या फळामध्ये बीट केरोटीनची मात्रा मोठी असते. हे बीट केरोटीन शरीरात व्हिटॅमिन ए स्वरूपात कार्य करते. (Wood Apple Benefits)

५) पचन चांगले राहते – कवठाचा गर खाल्ल्याने पचन क्षमता चांगली राहते. शिवाय शरीराचे तापमान संतुलित आणि कोलेस्ट्रॉलसह रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते. पचन सुरळीत झाल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. शिवाय पोटात जंतदेखील होत नाहीत.

६) भूक वाढविण्यासाठी मदत करते – कवठ हे आम्लरसयुक्त फळ आहे. यामुळे पचनसंस्था व्यवस्थित होऊन भूक वाढण्यास मदत होते. म्हणून जर तुम्हाला भूक कमी लागणे किंवा जेवणावरून वासना उडणे अशा समस्या जाणवत असतील तर कवठ फळ दैनंदिन जीवनात खाणे फायदेशीर आहे.

Wood Apple Benefits

७) डोकंदुखी कमी होते – हृदय रोग आणि डोकेदुखीसाठी कवठ फायदेशीर फळ मानले जाते. त्यामुळे अचानक डोकेदुखी होणे वा डोक्यात कळ जाणे अशा समस्या जाणवत असतील तर कवठचे सेवन करावे. यामुळे हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत होते.

८) वात आणि पित्त नाशक – (Wood Apple Benefits) कवठाचे फळ जितके आरोग्यदायी तितकेच कवठाच्या झाडाची पानेसुद्धा फायदेशीर आहेत. कवठाच्या झाडाची पाने बी जीवनतत्वे आणि फायबरयुक्त असतात. यामूळे कवठाच्या पानांचे चूर्ण वा पेस्ट हि कोमट पाण्यात मिसळून त्याचे सेवन केल्यास वात आणि पित्त शमते.

‘हे’ पण वाचा :-

Healthy Fruits : ‘हि’ फळे खालं तर, पोटाच्या तक्रारी राहतील दूर; जाणून घ्या

मधुमेह नियंत्रणासाठी बिंधास्त हेल्दी स्मूदी प्या; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे