Healthy Fruits
|

Healthy Fruits : ‘हि’ फळे खालं तर, पोटाच्या तक्रारी राहतील दूर; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। (Healthy Fruits) आपल्यापैकी अनेक लोक असे असतील ज्यांना घरातली डाळ अळणी आणि बाहेरची डाळ पक्वान्न वाटत असेल. त्यामुळे बहुतेकांचा कल हा बाहेरच अरबट चरबट खाण्याकडे असतो. यातून एक फायदा होतो कि जिभेचे चोचले पुरेपूर पुरवले जातात. तर दुसरीकडे याचे मोठ्या प्रमाणात आरोग्यविषयक तोटे जाणवतात. कारण आपण जे काही अन्न खातो ते आपल्या पोटात जाते आणि मग त्यावर प्रक्रिया होऊन त्यातील पोषण मूल्य शरीरात टिकवली जातात. तर शरीरासाठी गरजेचे नसलेले अन्न विष्ठेवाटे शरीरातून उत्सर्जित होते. मात्र कितीतरीवेळा व्यवस्थित अन्न न पचल्यामुळे पोटदुखीसारखे त्रास होतात. म्हणूनच आहार उत्तम आणि सकस असण्यावर भर द्या असे तज्ञ सांगतात.

आता उत्तम, सकस आणि पौष्टिक आहार म्हणजे नक्की काय..? हिरव्या भाज्या, मोड आलेली कडधान्य, दुग्धजन्य पदार्थ, अंडी बस्स..? यामध्ये फळांचा समावेश नसेल तर हा कसला उत्तम आहार. तज्ञ सांगतात कि, दैनंदिन जीवनात निरोगी राहायचे असेल तर आपल्या आहारात फळांचा समावेश करा. त्यात जर तुम्हाला खाण्यावर ताबा ठेवता येत नसेल तर पोटाच्या आरोग्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असेल. हे नुकसान होऊ नये म्हणून तरी आहारात फळांचा समावेश कराच. (Healthy Fruits)

Fruits

त्याच काय आहे, कोणताही ऋतू असो. त्यामध्ये आपण आहारात काय खातो यावर पोटाचे आरोग्य कसे राहील हे अवलंबून असते. सर्वसाधारणपणे चुकीचा आहार, चुकीच्या आहाराचे संयोजन, खूप तेलकट पदार्थ, मसालेदार पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ तसेच अति मीठ, साखरेचा वापर केलेले पदार्थ खाल्ल्यामुळे पोटाचे गणित बिघडते.

परिणामी पोटदुखी, उलट्या होणे, आतड्यांवर ताण येणे, गॅस होणे, अॅसिडिटी, पोटात जळजळ होणे, चक्कर येणे, अशक्तपणा, महिलांमध्ये युरीन इन्फेक्शन, डायरिया आणि ताप अशा समस्या उदभवतात. अशावेळी (Healthy Fruits) फळांचे सेवन पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी मदतयुक्त भूमिका बजावते. पण यासाठी कोणती फळे खावी याबाबत अनेक लोकांना माहित नसते. चला तर जाणून घेऊयात पोटाच्या निरोगी आरोग्यासाठी कोणती फळे खावीत ते खालीलप्रमाणे:-

Stomach Pain

० पोटाच्या तक्रारींवर ‘हि’ फळे फायदेशीर
(Healthy Fruits)

1. केळी

फळांमध्ये अनेक लोकांसाठी केळीचे सेवन करणे पसंतीचे आहे. त्यामुळे बहुतेकांच्या आहारात केळी असतातच. या फळामध्ये फायबरचे प्रमाण अतिशय असते. यामुळे पोटाला केळ्याचा आधारच वाटतो. फायबरयुक्त केळीचे सेवन आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते.

Banana

तज्ञांच्या मते केळी शरीरात फायबरचे प्रमाण भरून गॅसची समस्या दूर करतात. यामुळे केळी रोजच्या आहारामध्ये खाल्ल्यास पोटाशी संबंधित कोणतीही आरोग्यविषयक तक्रार दूर होण्यास सहाय्य मिळते. (Healthy Fruits)

2. कलिंगड

शरीरात पाण्याची कमतरता असणे हे कोणत्याही आजाराला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यात पोटाशी संबंधित अनेक विकारांना डिहायड्रेशनची स्थिती कारणीभूत असू शकते. कारण यामुळे पोटात गॅस तयार होतो. तसेच अॅसिडिटीदेखील होऊ शकते.

Make use of these vegetables and fruits in summer days

अशा स्थितीत जर कलिंगडाच्या फळाचे काळे मीठ टाकून सेवन केले तर बराच फायदा होतो. एकतर शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि पोटात गॅस होत नाही. यामुळे उन्हाळ्यात दिवसातून किमान एकदा कलिंगडचे सेवन करण्याचा सल्ला तज्ञ देतात.

3. किवी

किवी हे असे फळ आहे जे शरीरातील पांढऱ्या पेशींची कमतरता भरून काढण्याचे सामर्थ्य ठेवते. त्यामुळे किवीतील अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांचा आरोग्यासाठी उत्तम लाभ होतो. (Healthy Fruits)

The importance of sour, sweet kiwi fruit

म्हणून किवीचे सेवन करण्याबाबत डॉक्टर सांगतात, पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी किवीतील अनेक गुणधर्म लाभदायी आहेत. यासाठी किवीचे नियमित सेवन करणे आवश्यक आहे.

4. स्ट्रॉबेरी

आहार तज्ञांच्या अभ्यासानुसार, थंडीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणारी स्ट्रॉबेरी पोटाच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. स्ट्रॉबेरीचे सेवन केल्याने पोटात गॅसची समस्या होत नाही. तसेच स्ट्रॉबेरीमध्ये नैसर्गिकरित्या मधुर साखरेचा समावेश असतो.

strawberry

यामुळे स्ट्रॉबेरी खाल्ल्याने रक्तातील साखरेवर मोठा परिणाम होत नाही. शिवाय यात असलेले फायबर हे पचनसंस्थेचे कार्य सुरळीत करण्यासाठी मदत करते. तसेच दिवसातून किमान एकदा याचे सेवन केल्यास अन्नपचन होण्यास मदत मिळते.

5. काकडी

सर्वसाधारणपणे काकडीमध्ये तब्बल ९६% पाण्याचे प्रमाण असते. यामुळे काकडीचे सेवन केल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी सहाय्य मिळते. (Healthy Fruits)

Cucumber

याशिवाय काकडीचे नियमित आहारात सेवन केल्याने पोटाशी संबंधित आजार दूर राहतात. कारण काकडी खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो आणि फायबरची कमतरताही दूर होते. परिणामी पोटाच्या आरोग्याशी संबंधित तक्रारींची उत्पत्ती होत नाही.

मित्रांनो, वरील माहितीनुसार पोटाशी संबंधित आरोग्याचे कोणत्याही कारणामुळे नुकसान होत असेल तर वर सांगितलेली फळे त्यात फायदेशीर ठरतात. त्यामुळे तुम्हीही पोटाच्या तक्रारींना वैतागले असाल तर या फळांचे (Healthy Fruits) सेवन जरूर करून पहा. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हि केवळ प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे जर तुमहाला पोटाशी संबंधित कोणताही त्रास असह्य होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका.

‘हे’ पण वाचा :-

भाग 2: मुलांच्या विकासासाठी ड्रॅगन फ्रुट आरोग्यदायी; जाणून घ्या फायदे