Eating Ice Cream In Summer
|

Eating Ice Cream In Summer उन्हाळ्यात आईस्क्रीम खाताय..? सावधान! होऊ शकतात गंभीर समस्या; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Eating Ice Cream In Summer बापरे! बाहेर उन्हाचा किती प्रचंड तडाखा आहे ना..? असं वाटतंय अख्खा दिवस घरातले पंखे, कुलर आणि अगदी एसी पण चालू ठेवावा. पण असं करू शकत नाही. अन्यथा वाढीव वीजबिलाने नंतर घाम फुटेल त्याचं काय..? मग अशावेळी अन्य पर्याय काय असू शकतो..? तर सर्वसामान्यांच्या लेखी उन्हाळा म्हणजे रोज थंडगार पदार्थ खाण्याचा आणि पिण्याचा हंगाम. तुमच्यापैकी किमान ७०% लोक असाच विचार करत असतील यात काही वादच नाही. म्हणजेच काय तुम्ही सुद्धा खूप गर्मीमध्ये वीजबील वाढवण्याऐवजी थंड पदार्थ खाण्यापिण्यावर भर देता.

बहुतेक करून कडाक्याच्या उन्हाळ्यात जेव्हढं कोल्डड्रिंक प्यायलं जातं त्याहून अधिक तर थंडगार आईस्क्रीम खाल्लं जात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मस्त थंडगार आणि कलरफुल आईस्क्रीम खायला आवडत. (Eating Ice Cream In Summer) त्यामुळे गर्मी आली कि घामोळे, घाम याव्हा इरिटेशनपेक्षा जास्त आईस्क्रीम खायला मिळणार याची औरच मजा वाटते. आता उन्हाळ्यात आईस्क्रीम खाऊ वाटण अत्यंत सामान्य बाब आहे पण त्यामुळे होणारे परिणाम सामान्य नव्हे तर गंभीर असू शकतात. या परिणामांबद्दल कुणीच विचार करत नाही. उलट चल काहीतरीच सांगू नको असे म्हटले जाते आणि सर्रास दुर्लक्ष केले जाते.

आता आईस्क्रीम खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि उष्णतेपासून आराम मिळतो हे आपण रुजवत आलोय. ज्यामुळे आईस्क्रीम खाणे आरोग्याला बाधा उत्पत्ती करणारे ठरू शकते याचा विचारच केला जात नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला आईसक्रीमविषयी तज्ञांनी सांगितलेल्या काही विशेष गोष्टी सांगणार आहोत. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांत आईस्क्रीम खाताना किमान एकदातरी तुम्ही विचार नक्की करालं. (Eating Ice Cream In Summer)

० उन्हाळ्यात आईस्क्रीम खाणे योग्य आहे का.. ? (Eating Ice Cream In Summer)

आता उन्हाळा म्हटलं कि उष्ण तापमान हे आलंच. यामुळे अंगाची नुसती लाहीलाही होते. ज्यामुळे घामाच्या धारा लागतात आणि अगदी नकोनको वाटत. इतकाच काय तर रात्रीची झोपही लागत नाही. यावर विशेष असा उपाय काय करणार म्हणून पर्यायी उपाय केले जातात. यामध्ये थंड पदार्थ खाणे हि अतिशय सामान्य बाब झाली आहे. यात विशेष करून आईस्क्रीम खाण्याकडे प्रत्येक वयोगटातील व्यक्तीचा कल दिसून येतो. हे आईस्क्रीम खाताना कितीही मजेशीर असले तरीही आरोग्यासाठी फारसे बरे नाही.

अन्य दिवस आईस्क्रीमचे सेवन केले जाते पण त्यामुळे तब्येत बिघडेलच असे नाही. कारण उन्हाळ्याच्या मानाने इतर ऋतूंमध्ये आईसक्रीम कमी खाल्ले जाते. आईसक्रीम स्वभावाने भले थंड असेल पण उन्हाळ्याच्या दिवसात त्याचे सेवन केल्यास शरीरावर उष्ण प्रभाव पडत असतो. याचे कारण म्हणजे आईस्क्रीममध्ये चरबीचे प्रमाण अतिशय जास्त असते. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते.

(Eating Ice Cream In Summer) कधीतरी आईस्क्रीम खाल्ल्यानंतर व्यवस्थित लक्ष द्या आणि पहा तुमच्या निदर्शनास येईल कि आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तुम्हाला खूप तहान लागते. असे का होते..? तर याचे कारण म्हणजे शरीराचे तापमान अचानक असंतुलित होते आणि आपण खाल्लेल्या आईस्क्रीममूळे शरीरातील उष्णता आणखीच वाढते. म्हणून उन्हाळ्यात आईस्क्रीम न खाण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. शिवाय असे केल्यास अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात असेही सांगितले आहे.

० उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ल्यास काय होईल..?

(Eating Ice Cream In Summer)

(Eating Ice Cream In Summer) उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ले तर तुम्हाला पोटाचा त्रास होऊ शकतो. याशिवाय आईस्क्रीम खाल्ल्याने घसा खवखवणं आणि सर्दीचा त्रास हे तर अतिशय सामान्य त्रास आहेत. याबाबत असणारा एक गैरसमज म्हणजे उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ल्याने शरीराचे तापमान कमी होते. उलट आईस्क्रीम खाल्ल्याने उष्णता वाढते आणि असे झाल्यामुळे आरोग्यविषयक इतर त्रासही होऊ शकतात. जसे कि, पित्ताचे त्रास, ऍसिडिटी, छातीत जळजळ, पोटदुखी आणि अंगावर डाग येऊ शकतात.

० आईस्क्रीम खाण्याचा योग्य ऋतु कोणता?

तज्ञ सांगतात कि, वर्षाचे १२ महिने आईस्क्रीम खाल्ले जाऊ शकते. (Eating Ice Cream In Summer) आईस्क्रीम खाल्ल्याने त्रास होईलच असे नाही. मात्र हल्की सर्दी आणि हलक्या गरमीमध्ये आईस्क्रीम खाल्ल्यास त्रास होणार नाही. मात्र जास्त उन्हाळ्यात आणि सर्दीमध्ये आईस्क्रीम खाणं प्रामुख्याने टाळावं. आईस्क्रीम खाणं कुणाचा छंद असू शकतो पण आरोग्याची गरज असू शकत नाही. त्यामुळे आईस्क्रीम खाताना एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानदायीच असतो. म्हणून कोणत्याही ऋतूत आईस्क्रीम खा पण त्याचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्या. अन्यथा क्षणिक आनंद आरोग्यासाठी डोकेदुखी होऊ शकते.

‘हे’ पण वाचा :-

Summer Skin Care Tips: घामोळ्याच्या समस्येवर कशी करालं मात..?; जाणून घ्या जालीम 7 उपाय

Summer Skin Care उन्हामुळे स्कीन ग्लो कमी झाला..? तर ‘या’ टीप्स जरूर वापरा; जाणून घ्या

Summer Care Tips For Babies उन्हाच्या तीव्रतेपासून बाळाचे करा रक्षण; जाणून घ्या टिप्स

Satu Pith Benefits : ‘या’ पिठाचे सेवन कराल तर 70% गरमीचे त्रास राहतील दूर; जाणून घ्या

खिशात कांदा ठेवल्यावर रखरखत्या उन्हातही थंड वाटतं? जाणून घ्या यामागचं खरं लॉजिक