Summer Skin Care Tips
| | |

Summer Skin Care Tips: घामोळ्याच्या समस्येवर कशी करालं मात..?; जाणून घ्या जालीम 7 उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन| उन्हाळा असा ऋतू आहे ज्यामध्ये तापमानातील आद्रता कमी होऊन हवामान कोरडे आणि शुष्क होते. (Summer Skin Care Tips) अशा दिवसात आरोग्यविषयक समस्या मोठ्या प्रमाणात जाणवतात. यामध्ये डोकेदुखी, उष्माघात, उष्णता वाढणे, डीहायड्रेशन आणि त्वचा रोग होण्याची शक्यता जास्त असते. यामध्ये प्रामुख्याने त्वचेवर बारीक बारीक पुरळ येते. ही पुरळ लालसर दिसते आणि यावर खाज येते.

उकाड्यामुळे उन्हाळ्यात जास्त घाम येऊन शरीरातील पाणी उत्सर्जित होत असते. ज्यामुळे आधीच शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे बॉडी डीहायड्रेट होऊ लागते. परिणामी त्वचेची हानी अधिक होते. यामध्ये विशेषतः अंगावर पुरळ आणि खाजेची समस्या वाढते. या स्थितीला ‘घामोेळ’ असे म्हंटले जाते. (Summer Skin Care Tips)

० घामोळ म्हणजे काय..?

आपल्या त्वचेतील घामाच्या ग्रंथीतून घाम बाहेर येत नसल्यास अंगावर पुरळ येऊ लागतात याला ‘घामोळे येणे’ असे म्हणतात.

Ghamori

Summer Skin Care Tips तसेच काहीवेळा त्वचेतून बाहेर पडणारा घाम हा कपड्यात शोषला न गेल्यास, अंगावर अधिक काळ राहतो. यामुळे त्वचेवर येणारी पुरळ आणि खाज म्हणजेच घामोळे येणे. घामोळ्यांचा त्रास प्रामुख्याने ज्यांना घाम जास्त येतो, अशा व्यक्तींना जास्त होतो. तसेच लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत हा त्रास कोणालाही होऊ शकतो.

० घामोळे येण्याची लक्षणे

1. घामोळ्यांमुळे त्वचेला खाज सुटते
2. अंगावर विविध जागी लाल रंगाचे बारीक पुरळ येतात

० घामोळे कुठे येते?

घामोळे प्रामुख्याने पाठीवर, मानेवर, छातीवर, खांद्यावर आणि कपाळावर येतात. यामुळे त्वचेचा मुलायमपणा जाऊन ती खरबरीत लागते.

० घामोळे आल्यास करावयाचे उपाय
Summer Skin Care Tips

Cucumber

१) काकडी – उन्हाळ्याच्या दिवसात येणाऱ्या घामोळ्यांमुळे प्रभावित भागावर खाज येऊ लागते. अशावेळी खाजवल्यामुळे जखमा होऊ शकतात. यासाठी प्रभावित भागावर काकडी लावा. कारण काकडी हि स्वभावाने थंड आहे. (Summer Skin Care Tips) घामोळ्याचे काटे बोचणारे आणि जळजळ निर्माण करणारे असतात. अशावेळी जर काकडी प्रभावित भागावर लावली तर त्याचा थंडपणा त्वचेसाठी फायदेशीर ठरतो. दरम्यान घामोळ्यांवर काकडी लावण्याआधी ती सोलून फ्रिजमध्ये ठेवा आणि थंड झाल्यावर प्रभावित भागावर लावा. यासाठी काकडीचा रस देखील वापरता येईल.

Aloevera

२) कोरफड जेल – कोरफड जेल कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर भूमिका निभावते. त्यामुळे त्वचा विकारांपासून सुटका हवी असेल तर कोरफड जेल बेस्ट पर्याय आहे. दरम्यान कोरफडमध्ये अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी सेप्टिक गुणधर्म असल्यामूळे उन्हाच्या त्रासातून संरक्षण होण्यास मदत मिळते. शिवाय सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे होणारा त्रासही शमतो. यासाठी कोरफड जेलचा घामोळ्यांवर योग्य पद्धतीने वापर केल्यास घामोळ्याच्या त्रासातुनही सुटका होईल. (Summer Skin Care Tips) यामुळे शरीरावरील रॅशेज कमी होतील आणि आराम मिळेल. यासाठी दिवसातून २ वेळा कोरफड जेलचा वापर करा.

३) बर्फ – घामोळ्यांमूळे त्वचा सोलपटणे, जळजळ होणे, त्वचेत तीव्र उष्णतेची भावना जाणवणे अश्या समस्या उदभवतात. यावर बर्फासारखा थंड राणी आरामदायी असा कोणताही पर्याय नाही. कारण बर्फामुळे आपल्या त्वचेला थंडावा मिळतो. पण घामोळ्यांवर उपाय करण्यासाठी बर्फाचा थेट त्वचेवर कधीही प्रयोग करू नये. यातही एका कॉटन कापडात २ ते ३ आइस क्युब घेऊन घामोळ्यांवर हलक्या हाताने लावा. यामुळे आराम मिळतो.

Multani soil benefits for the skin

४) मुलतानी माती – घामोळ्यांच्या त्रासातून सुटायचे असेल तर मुलतानी माती सर्वोत्तम उपाय आहे. कारण मुलतानी मातीमुळे बंद झालेले छिद्र उघडते आणि स्क्रीन जितकी ग्लो करते तितकीच रीफ्रेश होते. म्हणून मुल्तानी मातीचा वापर करा. पण यासाठी आधी गुलाब पाण्यात मुलतानी मिसळा आणि यानंतर प्रभावित भागावर लावा. पुढे २० मिनिटांनी थंड पाण्याने धुवून टाका. हा उपाय नियमित वा एक दिवस सोडून करावा. (Summer Skin Care Tips)

५) बेकिंग सोडा – (Summer Skin Care Tips) घामोळ्यांपासून सुटका हवी असेल तर बेकिंग पावडरदेखील एक उत्तम पर्याय आहे. कारण त्वचेवरील घाण हि खाज तसेच जळजळ निर्माण होण्याचे मुख्य कारण असते. यात बेकिंग पावडर घाण साफ करण्यात मुख्य भूमिका निभावते. यासाठी १ कप थंड पाण्यात १ चमचा बेकिंग सोडा घालून त्यात स्वच्छ कपडा भिजवून पिळून घ्या. यानंतर हे कापड घामोळ्याच्या ठिकाणी सदाहरण १० मिनिटे ठेवा. हा उपाय आठवड्यात नियमित ५ ते ६ वेळा करा.

Besan

६) बेसन – बेसन शरीरातील तेल शोषून घेते आणि यामुळे घामोळ्या लवकर सुकतात. परिणामी त्वचा स्वच्छ होते आणि जळजळीपासून आराम मिळतो. हा उपाय करण्यासाठी बेसन पाण्यात मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट घामोळ्या असलेल्या ठिकाणी लावा आणि साधारण १५ मिनिटे अशीच राहू द्या. हा उपाय रोज एकदा करा. यामुळे घामोळ्यांपासून लवकर आराम मिळेल. (Summer Skin Care Tips)

Papaya

७) पपई – घामोळ्यामुळे त्वचेची होणारी जळजळ आणि खाज या समस्या दूर करायच्या असतील तर पपईचा वापर करा. पपईतील औषधी गुणधर्मांमुळे या समस्यांवर मात करणे सोपे जाते. शिवाय पपईच्या गरामुळे त्वचा एक्सफोलिएट होते यामुळे फायदा होतो. यासाठी पपई मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या त्वचेवर जवळपास २० ते २५ मिनिटांसाठी लावून ठेवा. यानंतर थंड पाण्याने त्वचा स्वच्छ करा.

० इतर उपाय (Summer Skin Care Tips)

घामोळे आल्यास थंड पाण्याने अंघोळ करा. गरम पाण्याचा वापर टाळा.

घामोळे आलेल्या भागावर टॉवेल घासू नये.

जंतुनाशक साबणाने अंघोळ करावी.

संपूर्ण दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.

उन्हाळ्यात घाम शोषणारे सुती कपडे परिधान करावे.

घामोळ्यावर कडुनिंबाची पाने बारीक वाटून त्याचा लेप लावा.

घामोळ्यांवर मुलतानी माती, चंदन पावडर आणि कोरफडीचा गर असे थंड गुणधर्मयुक्त औषधी वापरावी.

आहारात तेलकट, मसालेदार पदार्थ खाऊ नयेत.

‘हे’ पण वाचा :-

Summer Skin Care उन्हामुळे स्कीन ग्लो कमी झाला..? तर ‘या’ टीप्स जरूर वापरा; जाणून घ्या

Argan Oil करते UV किरणांपासून त्वचेचे संरक्षण; जाणून घ्या 8 प्रमुख फायदे