Navratri Special
|

Navratri Special – उपवासाची मिसळ खा आणि साजरी करा चविष्ट नवरात्र; जाणून घ्या साहित्य आणि रेसिपी

हॅलो आरोग्य ऑनलाईन। (Navratri Special) शारदीय नवरात्र सुरु असल्यामुळे बऱ्याच लोकांचे उपवास असतील. तुमचाही आहे का..? नसेल तर ठीक आहे. पण असेल तर काळजी घ्या. कारण उपवासादरम्यान मनाची शुद्धी होते मात्र पोटात काहीच नसल्यामुळे कितीतरीवेळा मेंदू रिकामी झाला का काय..? असे वाटू लागते. आता साहजिक आहे. पोटात काही नसेल तर आतड्या दुखू लागतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, नेमकं उपवासाच्या दिवशीच काहीतरी चटकदार आणि चविष्ट खावं असं वाटत राहतं. तुम्हालाही वाटतंय का..? पण काय खाऊ सुचत नाही ना..? मग कशाला लोड घेताय. हा लेख वाचा तुमच्या प्रश्नाच उत्तर लगेच मिळेल.

Navratri Fasting Food

उपवास म्हटलं कि पोटाला उपाशी राहावं लागत आणि अनेकांना ते सहन होत नाही. मग पित्त वाढणे, करतात ढेकर, डोकेदुखी, अर्ध शिशी, मळमळ असे त्रास सुरु होतात. यामुळे काही लोक उपवास तर करतात पण अख्खा दिवस काही ना काही फराळ करत राहतात. अशा उपवासाला अर्थ काय..? (Navratri Special) एकीकडे आरोग्याची हानी आणि दुसरीकडे व्रतही धड होत नाही. मुळात उपवास करून पोटाला त्रास देणे आरोग्याच्या दृष्टीने चूकच आहे पण शेवटी उपवास हा श्रद्धेचा विषय.. त्यामुळे यावर बोट ठेवणे योग्य नाही.. म्हणूनच यंदाची नवरात्र चमचमीत आणि चविष्ट बनविण्याची जबाबदारी हॅलो आरोग्यने घेतली आहे. चला तर आज जाणून घेऊया चटपटीत आणि अगदी सोप्पी उपवासाची मिसळ…

उपवासाची बटाटा भाजी

० साहित्य

बटाटे मध्यम आकाराचे ४
बारीक केलेली हिरवी मिरची १/२ टीस्पून
साखर १/४ टीस्पून
खवलेलं खोबरं १ चमचा (Navratri Special)
आमचूर पावडर १/४ टीस्पून
शुद्ध तूप १ टीस्पून
जिरे १/२ टीस्पून
चवीनुसार मीठ
चिरलेली कोथिंबीर

० कृती

सर्वप्रथम बटाटे धुवा आणि त्याचे पातळ काप करा. इच्छा असल्याचे बटाटे सोलून घ्या किंवा न सोलता कापा. आता एका कढईत तूप गरम करा. ते तापल्यावर यात जिरे तडतडून घ्या. आता बारीक केलेल्या मिरच्या घाला. (Navratri Special) यानंतर बटाट्याचे तुकडे घालून चांगले परतून घ्या आणि यावर झाकण ठेवा. झाकणावर पाणी घाला आणि प्रत्येक २ मिनिटाने बटाटा ढवळून घ्या. बटाटा शिजल्याची खात्री करा आणि आता यावर मीठ, साखर, आमचूर पावडर घालून मिक्स करा. पुन्हा एक वाफ काढा आणि त्यानंतर ताजे खोबरे घालून परतून घ्या. आता तयार भाजीवर कोथिंबीर पेरा.

शेंगदाणा उसळ विथ ग्रेव्ही

० साहित्य

कच्चे शेंगदाणे १ कप
बारीक केलेली हिरवी मिरची १/२ टीस्पून
भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट २ टेबलस्पून
जिरं पावडर १/२ टीस्पून
खवलेलं खोबरं २ चमचे (Navratri Special)
साखर १/२ टीस्पून
आमचूर पावडर १/२ टीस्पून
चवीनुसार मीठ
शुद्ध तूप १ टीस्पून
जिरे १/२ टीस्पून
चिरलेली कोथिंबीर

० कृती

सगळ्यात आधी कच्चे शेंगदाणे ८ तास पाण्यात भिजवून घ्या. यानंतर शेंगदाणे मऊ होईपर्यंत शिजवा. (Navratri Special) आता भाजलेले शेंगदाणे पूड, खोवलेले खोबरे, ठेचलेल्या मिरच्या, जिरेपूड, साखर, मीठ, आमचूर पावडर एकत्र चांगली बारीक वाटून घ्या. यात आवश्यकतेनुसार पाणी घाला. जर तुमच्याकडे ताक असेल तर तुम्ही आमचूर पावडरऐवजी २ चमचे ताक घाला. यानंतर कढईत तूप गरम करा. जिरे घाला. आता यात शेंगदाण्याची पेस्ट घाला आणि उकडलेले शेंगदाणे घाला. यानंतर १ चमचा खोवलेला नारळ घाला. आता ग्रेव्ही तयार करण्यासाठी यात पाणी घाला. साधारण ५ मिनिटे उकळवा. आता तयार ग्रेव्हीवर चिरलेली कोथिंबीर घाला.

० अशी बनवा मिसळ (Navratri Special)

तयार मिसळ सर्व्ह करताना आधी वाटीमध्ये १ मोठा चमचा साबुदाणा खिचडी घाला. त्यावर अर्धा चमचा बटाटा भाजी आणि वरून शेंगदाण्याची तयार ग्रेव्ही उसळ घाला. यानंतर वरून तिखट बटाटा चिवडा किंवा बटाटा सळी घाला. तुमची चविष्ट मिसळ तयार.

टीप :- ही उसळ राजगिरा रोटी/ वरईचा भात/ साबुदाणा खिचडीसोबतदेखील खाऊ शकता. अन्नदाता सुखी भवः (Navratri Special)

वाचकहो जर तुम्ही नवरात्रीचे कठोर व्रत करत असाल तर तुमच्यासाठी काही सल्ले अत्यंत आवश्यक आहेत. एकतर संपूर्ण दिवसात अधिकाधिक पाणी प्या आणि दुसरे म्हणजे फलाहार करा. याव्यतिरिक्त काही चमचमीत खायची इच्छा झाली तर मग उपवासाची मिसळ आहेच.

‘हे’ पण वाचा :-

रिकाम्या पोटी चहा पिणं हानिकारक आहे; जाणून घ्या कारण आणि दुष्परिणाम

उत्तम आरोग्यासाठी मिश्र डाळींच्या हेल्दी रेसिपीजचा आस्वाद घ्या; जाणून घ्या साहित्य आणि कृती

रिकाम्यापोटी राहणे करू शकते आरोग्याचे नुकसान; जाणून घ्या

Navratri Fasting – नवरात्रीच्या उपवासाला तेच तेच काय खायचं..?; मग ‘या’ हटके रेसिपी ट्राय कराच

मिठाविना उपवास करताय मग या परिणामांना सामोरे जायला तयार व्हा; जाणून घ्या