Eating Mango During Pregnancy
|

Eating Mango During Pregnancy : गर्भारपणात आंबा खाणे सुरक्षित आहे का..?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Eating Mango During Pregnancy गर्भारपण हि स्थिती प्रत्येक बाईच्या आयुष्यातील दुसरा जन्म मानला जातो. कारण तिच्या गर्भात वाढणार बाळ हे स्वतः विकसित होताना त्या स्त्रीमधील आईपणाला जन्म देत असतं. या स्थितीत स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल होतात. यामुळे त्यांची शारीरिक आणि मानसिक स्थिती अतिशय नाजूक असते. म्हणूनच गर्भारपणात काय करावे..? काय करू नये..? काय खावे..? काय खाऊ नये..? याची विशेष काळजी घेतली जाते.

गर्भारपणात स्त्रियांच्या जिभेची चव बदललेली असते. यामुळे त्यांच्या मनात जो पदार्थ खाण्याची इच्छा असते ती पुरविण्याची एक रीत आहे. यानुसार गर्भवती महिला जे मागेल ते तिला खायला द्या असे सांगितले जाते. शिवाय अशा दिवसांमध्ये भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, ड्रायफ्रूट्स आणि फळे खाण्यावर विशेष भर देण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यामुळे अगदी सर्वसामान्य प्रश्न पडणे फार साहजिक आहे. (Eating Mango During Pregnancy) जसे कि, गर्भारपणात आंबा खाणे सुरक्षित आहे का..? तुम्हालाही पडलाय का प्रश्न तर लगेच याच उत्तर जाणून घ्या.

Mango

मित्रांनो., कैरी असो किंवा आंबा हे फळ फक्त फळांचा राजा नव्हे तर मनांचा सुद्धा राजा आहे. कारण आंबा चवीला इतका उत्कृष्ट असतो आणि रंग इतका आकर्षक कि तो खाल्ल्याशिवाय मनाला चैन पडत नाही. पण आंबा मुळातच स्वभावाने उष्ण असल्यामुळे तो खावा कि खाऊ नये याबाबत एक प्रश्न निर्माण होतो. त्यात तर एखादी स्त्री गर्भवती असेल तर तिने आंब्याचे सेवन करणे सुरक्षित आहे का..? अशी एक शंका मनाला बैचेन करते. तर याच शंकेचे निरसन आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. याबाबतीत तज्ञ काय सांगतात ते आपण जाणून घेणार आहोत.

१) गर्भारपणात आंब्याचे सेवन सुरक्षित आहे का..? (Eating Mango During Pregnancy)

आंबा सगळ्यांचा वीक पॉईंट असल्यामुळे एह तू खाऊ नको रे.. असं कसं म्हणणार..? त्यात आंबा अतिशय लाभदायी फळांपैकी एक आहे. त्यामुळे गर्भारपणात आंबा टाळून चालणार नाही. होय. अर्थातच तुम्ही गर्भारपणात आंबा खाऊ शकता असे तज्ञ सांगतात. कारण गर्भावस्थामध्ये आंब्याचे सेवन केल्यासदेखील भरपूर लाभ मिळतात. पण याचं अधिक प्रमाणात सेवन करणे बाळासाठी हानिकारक ठरू शकतं. म्हणून आंबा न खाण्यासाठी लोक आग्रही असतात.

Eating Mango During Pregnancy

(Eating Mango During Pregnancy) मुळात आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियमचं प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे आंब्याच्या सेवनाने गर्भवती महिलेला पोषकतत्त्वांचा पुरवठा होतो. शिवाय आंब्यामध्ये फॉलिक अ‍ॅसिड, पोटॅशिअम आणि लोह या घटकांचेही मुबलक प्रमाण आहे आणि आंबा हे फळ ऊर्जा तसेच अँटीऑक्सिडेंटचा उत्तम स्त्रोत आहे. पण रासायनिक प्रक्रिया केलेले आंबे खाऊ नका. यामुळे शरीराच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

२) डॉक्टर सांगतात, गर्भारपणात आंबा खाण्याचे फायदे

गर्भारपणामध्ये काही महिलांना मळमळ होण्याचा त्रास होतो. अशावेळी आंबा खाल्ल्यास मळमळ आणि उलटीसारखे वाटण्याची समस्या दूर होईल. तसेच लवकर आराम मिळेल. (Eating Mango During Pregnancy)

आंब्याचे सेवन केल्याने शरीरातील रक्तात असणाऱ्या लाल पेशींची संख्या वाढते आणि यामुळे अ‍ॅनिमियाचा त्रास होण्याचा धोका कमी होतो. शिवाय पेशींची सक्रियता देखील वाढते.

गर्भारपणाच्या पहिल्या ३ महिन्यांमध्ये गर्भाच्या मज्जासंस्थेच्या विकास होत असतो. दरम्यान आंब्यामध्ये फॉलिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. यामुळे गर्भावस्थेदरम्यान गर्भाचा विकास होण्यास मदत मिळते.

आंबा हा डाएटरी फायबरचा सर्वोत्कृष्ट स्त्रोत मानला जातो. ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत सुरू राहते. शिवाय गर्भारपणात बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर तो कमी होतो. (Eating Mango During Pregnancy)

आंब्यातील पोषक घटक बाळाचे दात आणि बाळाच्या हाडांचा विकास करतात.

आंबा खाल्ल्याने उच्च रक्तदाब तसेच प्रीक्लेम्पसियाचा धोका कमी होतो.

३) गर्भारपणात आंबा खाल्ल्याने काय होतं..? (Eating Mango During Pregnancy)

नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा खाल्ल्यास कोणताही अपाय होत नाही. मात्र रासायनिक प्रक्रिया केलेल्या आंब्यांचे सेवन हे धोकादायक ठरू शकते. कारण यामध्ये कॅल्शियम कार्बाइडचे घटक असू शकतात. जे आई आणि बाळाच्या आरोग्याचे नुकसान करू शकतात. (Eating Mango During Pregnancy) शिवाय रासायनिक प्रक्रिया करून पिकवलेल्या आंब्याचे सेवन केल्यास आईला जुलाब होणे, वारंवार मूड बदलणे, चक्कर येणे, डोके दुखी, झोप कमी येणे आणि हातापायांमध्ये मुंग्या येणे यांसारखे त्रास होऊ शकतात.

Mango

४) ​गर्भारपणात किती आंबे खाणे फायदेशीर..?

आंब्याचे सेवन चालेल म्हणून वाट्टेल तितके आंबे खाणे योग्य नाही. आंब्याच्या सेवनामुळे आपल्या शरीराला भरपूर कॅलरी आणि ऊर्जा मिळते. शिवाय गर्भारपणाच्या तिसऱ्या टप्प्यात महिलांच्या शरीराला ऊर्जेची प्रचंड आवश्यकता असते. डॉक्टरांनी आहारामध्ये कॅलरीजे प्रमाण वाढवण्याचा सल्ला दिल्यास त्यांच्या सल्ला आणि मार्गदर्शनानुसार आंब्याचे सेवन करावे वा करू नये. (Eating Mango During Pregnancy) गर्भावस्थेत आठवड्यातून एकच आंबा खाणे सुरक्षित आहे. तसेच मधुमेहाचा त्रास असल्यास वा अतिलठ्ठ असलास महिलांनी गर्भारपणात आंबा पूर्ण टाळावा. कारण आंब्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच गर्भावस्थेत आंबा खा पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच.

५) ​आंबा खाण्यापूर्वी काय काळजी घ्यावी..?

(Eating Mango During Pregnancy) गर्भारपणात आंबा अति खाण्याची चूक करू नये. यामुळे गर्भावर अपायकारक प्रभाव होऊ शकतो. तसेच खूप आंबा पचनास जड जातो. यामुळे जुलाब होण्याची शक्यता असते. म्हणून आंबा खायचा असेल तर आंब्याचा रस काढा. या एक वाटी रसामध्ये २- ३ चमचे घरगुती तूप, चिमूटभर सुंठ पावडर घाला. आंबा कोणत्याही स्वरुपात खाण्यापूर्वी २-३ तास थंड पाण्यामध्ये भिजत ठेवा. गर्भावस्थेत मँगो मिल्कशेक टाळा. स्वतःची आणि बाळाची पूर्ण काळजी घ्या. आंबा खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

‘हे’ पण वाचा :-

Foods To Avoid During Pregnancy: गर्भारपणात चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; जाणून घ्या

मोलार प्रेग्नेंसी? ते काय असतं? माहित नसेल तर लगेच जाणून घ्या