Ginger Benefits
| |

Ginger Benefits: पावसाळ्यात आल्याचे सेवन देई संसर्गापासून संरक्षण; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। (Ginger Benefits) सध्या राज्यात येत्या काही दिवसांमध्ये मान्सून येण्याची शक्यता आहे. काही भागात पावसाने आपली हजेरी लावली असली तरी काही भागात अजूनही पावसाच्या सरी कोसळलेल्या नाहीत. पण पावसाळा आला म्हटलं कि रोगराई, आजार, संसर्गजन्य विषाणूंचा फैलाव मोठ्या प्रमाणात होतो. शिवाय पावसाच्या दिवसात वातावरणही दमट असते. ज्यामुळे सर्दी, पडसं, खोकला, ताप असे सामान्य आजार बळावतात. मग अशावेळी घरगुती उपाय सर्वोत्तम पर्याय मानले जातात. या घरगुती उपायांमध्ये आल्याचे सेवन करणे अतिशय प्रभावी मानले जाते.

(Ginger Benefits) आलं मुळातच अतिशय उष्ण आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्मांनी युक्त असते. यामुळे पावसाळी आजारांवर ते प्रभावीरीत्या काम करते. यासाठी केवळ ताज आलंच नाही तर सुकं आलं म्हणजेच सुंठही गुणकारी आहे. आल्याच्या नैसर्गिक उष्णतेपासून ते कफयुक्त, दाहक-विरोधी, उत्तेजक, वेदना निवारक, मज्जातंतूंना उत्तेजित करणारे घटक आरोग्यदायी आहेत. याशिवाय आलं पचन, वायुवीजन, पोटशूळ-लढाई आणि अर्शोग्न आहे.

आल्याचा मुख्य फायदा हा त्याच्या उबदार स्वभावातून होतो. शिवाय आलं हृदय आणि रक्तवाहिन्या उत्तेजित तसेच सक्रिय करते. आले कफनाशक असल्यामुळे पित्त, आमवात अशा समस्यांवरही गुणकारी आहे. पावसाळ्यात आल्याचे सेवन एकतर आहारात त्याची मात्रा वाढवून करता येईल. याशिवाय आल्याचा कडक गरमागरम चहा वा काढ्यातूनही त्याचे सेवन करणे फायदेशीर राहील.

Dry Ginger

० आल्याचे आरोग्यदायी फायदे
(Ginger Benefits)

१) संसर्गापासून संरक्षण –

पावसाळ्याच्या दिवसात संसर्गजन्य रोगांची साथ येण्याची शक्यता जास्त असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्ती, लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती लवकर आजारी पडतात. यासाठी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्यांच्या आहारात आल्याचे प्रमाण वाढवावे. कारण शारिरीक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आणि संसर्गजन्य विषाणूंपासून संरक्षण करण्यासाठी आल्याचा वापर फायदेशीर आहे. (Ginger Benefits)

virus

तज्ञ सांगतात कि, आल्यामध्ये अँटी मायक्रोबियल म्हणजेच बॅक्टेरिया नष्ट करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे विविध प्रकारच्या जीवाणूंमुळे होणाऱ्या संसर्गापासून संरक्षण करण्यास आले मदतयुक्त भूमिका बजावते. यासाठी शक्यतो ताजे आले वापरावे.

२) रोग प्रतिकारक शक्तीत वाढ –

आल्याचे सेवन करणे शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यास सहाय्यक ठरते. कारण आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट म्हणजेच मुक्त रॅडिकल्स नष्ट करणारे आणि विरोधी दाहक म्हणजेच शरीराचा दाह कमी करणारे गुणधर्म समाविष्ट असतात. (Ginger Benefits)

Immunity

याशिवाय आल्यामध्ये रोग प्रतिकारक गुणधर्मदेखील मोठ्या मात्रेत असतात. त्यामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवायची असेल किंवा सक्रिय करायची असेल तर आल्याचे कोणत्याही स्वरूपातील सेवन फायदेशीर आहे.

३) निरोगी हृदय –

आपले हृदय निरोगी असेल तर आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते असे म्हणतात. पण हृदयाचे आरोग्य राखायचे कसे..? तर आल्याच्या सहाय्याने हृदयाचे आरोग्य राखता येते.

Heart Care

तज्ञांच्या मते, आल्यामध्ये बरेच औषधी गुणधर्म समाविष्ट आहेत. यामध्ये जळजळ, मुक्त रॅडिकल्सचा प्रभाव, गोठण्याची प्रक्रिया, वाढलेला रक्तदाब नियंत्रित करण्याची क्षमता आहे. या समस्या हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करतात. मात्र आल्याचे सेवन केल्यामुळे हृदयाचे या आरोग्य राखण्यास मदत होते. (Ginger Benefits)

४) कोलेस्टेरॉल आणि रक्तदाबावर नियंत्रण –

high BP

आल्यामध्ये हायपोटेन्सिव्ह (रक्तदाब कमी करणे) प्रभाव असतो. शिवाय आल्याचा रस लिपिड नियंत्रित करण्यास तसेच वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉल असो वा रक्तदाब अशा समस्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आल्याचा वापर फायदेशीर आहे.

५) मजबूत पचनशक्ती –

पचनप्रक्रिया सुरळीत राहावी यासाठी आपल्या आहारात आल्याचा समावेश असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण पोटाशी संबंधित कोणत्याही समस्यांवर आले परिणामकारक आहे.

Digestion

(Ginger Benefits) आल्याचे सेवन बद्धकोष्ठता, ओटीपोटात दुखणे, ओटीपोटात पेटके, मुरडा आणि गॅस यासारख्या अनेक समस्यांपासून मुक्त होण्यासाठी उपयुक्त आहे. शिवाय अपचनाच्या समस्येवर आले प्रभावीपणे काम करते. म्हणून आल्याचे फायदे पोटासाठी प्रभावी आहेत. याव्यतिरिक्त पचन प्रक्रिया मजबूत करण्यासाठी आलं फायदेशीर आहे.

६) संधिवातावर परिणामकारक –

Leg Pain

आल्यातील दाहक-विरोधी म्हणजेच दाह कमी करणारे गुणधर्म आणि वेदनशामक गुणधर्म दोन्हीही संधिवातावर प्रभावी आहेत. यामुळे आले सांध्यातील वेदना कमी करण्यास मदत करते. आल्याचे सेवन इतर शारीरिक समस्यांसह संधिवात आणि सांध्यांमधील वेदना दूर करते.

७) मधुमेहापासून आराम –

Diabetes

(Ginger Benefits) आल्यामध्ये शरीरातील रक्तात असणारी साखर संतुलित करणारे गुणधर्म आहेत. जे मधुमेहावर प्रभावीपणे काम करतात. अचानक वाढलेल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्याबरोबरच आले इन्सुलिनची क्रिया वाढवण्यासाठी देखील काम करते. त्यामुळे मधुमेहाच्या समस्येत आराम मिळवायचा असेल तर आल्याचे सेवन करणे गरजेचे आहे.

८) मळमळ आणि उलट्यांच्या समस्यांपासून सुटका –

मळमळ आणि उलट्यांच्या समस्येतही आलं फायदेशीर भूमिका निभावत.यासाठी आल्यातील अँटी मेटिक अर्थात मळमळ आणि उलट्यांचा प्रभाव कमी करणारे गुणधर्म मदत करतात. यामुळे गर्भधारणेनंतर आणि केमो थेरपीनंतर होणारी मळमळ आणि उलट्या या समस्यांपासून आराम मिळतो.

९) मासिक पाळीच्या समस्यांमध्ये फायदेशीर –

आल्यातील दाहक-विरोधी गुणधर्म स्नायूंचा ताण आणि तणाव दूर करण्यासाठी मदत करतात. शिवाय हेच गुणधर्म स्त्रियांच्या मासिक पाळीच्या दरम्यान येणाऱ्या असह्य वेदनांवर १००% गुणकारी आहेत. (Ginger Benefits)

Do this to get your menustration period ahead of time

अशा परिस्थितीत, मासिक पाळीच्या वेदना रोखण्यासाठी आल्याचा वापर करणे कधीही फायदेशीर आहे. यासाठी आल्याचा रस कोमट पाण्यातून प्यायल्याने फायदा होतो.

१०) वाढत्या वजनावर रोख –

आल्याचा वापर नियंत्रित प्रमाणात नियमित केल्यास झपाट्याने वाढणारे वा वाढलेले वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. याशिवाय आल्याला चरबी बर्नर म्हणून ओळखले जाते.

Weight gain

कारण पोट, कंबर आणि कूल्ह्यांवरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी आल्याचे सेवन उपयुक्त ठरते. शिवाय लठ्ठपणास कारणीभूत असलेल्या कारणांना दूर ठेवण्यासही आले मदत करते.

११) कर्करोगापासून बचाव –

आल्याचा वापर कर्करोगासारख्या भयंकर रोगास प्रतिबंध करू शकतो. आल्यामध्ये असणारे दाहक-विरोधी गुणधर्म, अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आणि कर्करोग विरोधी गुणधर्म या आजाराच्या विषाणूंची वाढ होऊ देत नाही. (Ginger Benefits)

यामुळे, आले स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि यकृताचा कर्करोग रोखण्यासाठी प्रभावी आहे. मात्र आले खाणे हा काही कर्करोगावरील उपाय नाही. त्यामुळे कर्करोगाचे निदान झाल्यास योग्य ते उपचार आणि डॉक्टरांचे सल्ले घ्या.

१२) अल्झायमर आणि मायग्रेनवर प्रभावी –

अल्झायमर हा मेंदूशी संबंधित विस्मरणाच्या एक आजार आहे. यात वाढत्या वयासह लोकांमध्ये विसरण्याची समस्या दिसून येते. तर मायग्रेन हा डोकेदुखीच्या भयंकर स्वरूपातील एक आजार आहे.

Memory Loss

(Ginger Benefits) हे दोन्ही आजार मेंदूशी संबंधित असून यावर आल्याचे सेवन फायदेशीर भूमिका निभावते. कारण आल्यामध्ये जिंजरॉल, शोगाओल आणि झिंगरोन सारखे अनेक फायटोकेमिकल्स असतात. ज्यामुळे मेंदूला संदेश पाठवणाऱ्या न्यूरॉन्सचे नैसर्गिक नुकसान टाळण्यास मदत होते.

१३) केसांसाठी फायदेशीर –

Beautiful Hairs

आल्यामध्ये सूक्ष्म जीवाणू नष्ट करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे ज्या बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे केस गळण्याची समस्या आणि इतर केसांचे आरोग्य बिघडवणाऱ्या समस्या निर्माण होतात त्यावर आले प्रभावीरीत्या काम करते. (Ginger Benefits)

‘हे’ पण वाचा :-

गोठवणाऱ्या थंडीत प्या गाजर आल्याचे आरोग्यदायी सूप; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे

Stomach Pain: पोटदुखी थांबत नाही? तर ‘हे’ 8 घरगुती उपाय करून पहाच; जाणून घ्या

Home Remedies For Headache डोकेदुखी थांबत नाही..? करा ‘हे’ घरगुती उपाय; जाणून घ्या

औषधी आल्याचा रस प्रत्येक संसर्गावर परिणामकारक; जाणून घ्या फायदे