Liver Damage Causes
| |

Liver Damage Causes : यकृत निकामी होण्यामागे ‘हि’ 8 कारणे जबाबदार; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Liver Damage Causes आपल्या मानवी शरीरातील अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे ‘यकृत‘ हा आहे. यकृत आपण खाल्लेले अन्न पचविणे, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणे आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त स्थानांतरित करणे अशी महत्वपूर्ण कामे करतो. मात्र जेव्हा यकृत आपले कार्य व्यवस्थित पार पडत नाही किंवा एखादे कार्य पूर्ण करणे यकृतासाठी कठीण होते तेव्हा यकृत निकामी झाले असे म्हटले जाते. या अवस्थेस यकृत रोग असे म्हणतात. आपण जे काही खातो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो हे आपण सारेच जाणतो. पण यकृताच्या कार्यावर परिणाम झाल्याने इतरही अनेक समस्या उदभवतात. ज्या भविष्यात गंभीर स्वरूप घेतात.

Liver

तुम्हाला काय वाटतं…? दारूचे सेवन केल्याने यकृत निकामी होते..? तर मित्रांनो नक्कीच दारूचे अति सेवन केल्यामुळे यकृतावर त्याचा वाईट परिणाम होतो पण दारू यकृत निकामी करत नाही. तुमचा विश्वास बसत नसेल तर आम्ही तुम्हाला या गैरसमजातून मुक्त करू इच्छितो. (Liver Damage Causes) तज्ञ सांगतात कि, जास्त दारू पिणे यकृताच्या आजारासाठी कारणीभूत नसल्याचे त्यांना अभ्यासात दिसून आले आहे. खरंतर, यकृताचा आजार असलेल्या अनेक रुग्णांपैकी कित्येक रुग्ण दारूच्या थेंबालाही शिवत नाहीत आणि तरीही त्यांचे यकृत निकामी झाले आहे. तर याचे कारण काय..? असा प्रश्न निर्माण होतो.

मित्रांनो, यकृत निकामी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. अगदी साध्या सुध्या सवयीदेखील तुमच्या यकृताचे पुरेपूर नुकसान करू शकतात. यकृत निकामी झाले असल्यास काही लक्षणे याचे संकेत देते. मात्र ती वेळीच समजली नाहीत तर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

(Liver Damage Causes) यकृत निकामी होण्याच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये त्वचा आणि डोळ्यांच्या बाहुलीचा रंग पिवळा होणे, उजव्या ओटीपोटात दुखणे, पोट फुगणे, मळमळ, उलट्या होणे, अस्वस्थ वाटणे, झोप येत राहणे वा गोंधळून जाणे, सतत गोड वास येणे अशा लक्षणांचा समावेश असू शकतो. दरम्यान यकृत निकामी होण्याची घटना सामान्य नसून जीवावर बेतू शकते त्यामुळे याचे गांभीर्य समजून घ्या आणि वेळीच उपाय करा. तर आज आपण कोणकोणत्या कारणांमुळे यकृत निकामी होऊ शकते हे जाणून घेणार आहोत .

Liver Transplant

० यकृत निकामी होण्याची कारणे (Liver Damage Causes)

१) अति शारीरिक श्रम – अति काम करण्यामुळे यकृतावर ताण येऊ शकतो. ज्यामुळे यकृत अकार्यक्षम होण्याची शक्यता असते. याशिवाय उष्ण हवामानात जर अति शारीरिक श्रमाचा वापर केला तर यकृतावर विपरीत परिणाम होतो. ज्यामुळे हेपॅटोसेल्युलरचे नुकसान दुरुस्त केले जाऊ शकत नाही. परिणामी यकृत निकामी होते.

२) संक्रमण – (Liver Damage Causes) कोणत्याही संसर्गामुळे यकृत रोग होऊ शकतो. त्यामुळे सकस आहार आणि उत्तम जीवनशैलीवर भर देणे आवश्यक आहे. बहुतेकदा खाण्यापिण्यातून झालेले संक्रमण हे थेट यकृताच्या कार्य प्रणालीवर परिणाम करीत असते. त्यामुळे संक्रमणापासून राहण्याचा प्रयत्न करा.

३) आनुवंशिक कारण – एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याला जर यकृत संबंधित आजार असेल तर त्या व्यक्तीस यकृताचा रोग होण्याची शक्यता असते.

४) नॉन-अल्कोहोलिक फॅटी यकृत रोग (NAFLD) – NAFLD हे अनेक लोकांमध्ये यकृताचे नुकसान होण्याचे प्रमुख कारण आहे. यामध्ये यकृताच्या पेशींमध्ये खूप चरबी जमा होते आणि यकृत अकार्यक्षम होते. NAFLD ची प्रमुख कारणे म्हणजे लठ्ठपणा, गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रिया, उच्च कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह प्रकार २.

५) विविध औषधे – अनेक लोकांना दुखलं डोकं खा औषध अशा सवयी असतात. या विविध औषधांचे सेवन यकृत निकामी होण्यास कारणीभूत ठरतात. हि औषध यकृताच्या नोकरी प्रणालीवर हळूहळू प्रभाव करतात. काही प्रकरणांमध्ये गोळ्यांचा ओव्हरडोस झाल्यामुळे देखील यकृत निकामी होऊ शकते. (Liver Damage Causes)

६) हर्बल सप्लिमेंट्स – अनेक लोक हर्बल सप्लिमेंट्स खातात. याचा यकृत निकामी करण्यात मोठा हात आहे. अशी प्रकरणे क्वचितच आढळत असली तरीही हर्बल सप्लिमेंट्स घेण्याबाबत जागरूकता नसल्यामुळे मोजके ज्ञान त्रासदायी ठरते. अशा औषधांच्या परिणामकारकता आणि सुरक्षिततेसाठी कठोर नियम आणि प्री-क्लिनिकल अभ्यास असणे आवश्यक आहे. याशिवाय त्यांचे सेवन करणे यकृतासाठी घातक आहे. (Liver Damage Causes)

७) पॅरासिटॅमॉलचा ओव्हरडोज – जास्त प्रमाणात पॅरासिटामॉल घेणे हे यकृत निकामी होण्याचे प्रमुख कारण मानले जाते. पॅरासिटामॉल हे भारतातील अॅसिटामिनोफेनचा सर्वात सामान्य प्रकार आहे. अभ्यासानुसार ऍसिटामिनोफेनचे जास्त सेवन केल्यामुळे यकृत निकामी होते.

८) अति प्रमाणात अल्कोहोलचे सेवन – जर एखादी व्यक्ती अति प्रमाणात दारू पिट असेल तर तिचे यकृत हळूहळू खराब होऊ शकते. दरम्यान एखादे संक्रमण लागल्यास यकृताचे निकामी होणे निश्चित आहे.(Liver Damage Causes)

‘हे’ पण वाचा :-

वयाची तिशी नंतर ‘या’ मेडिकल टेस्ट नक्की करा; कारण तुमच्या जीवापेक्षा मूल्यवान जगात दुसरे काहीच नाही