Sleeping On The Floor
| |

Sleeping On The Floor : जमिनीवर झोपण्याचे फायदे जाणालं तर गादी, बिछाने विसरून जालं; जाणून घ्या आश्चर्यकारक 10 फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। (Sleeping On The Floor) सकाळी सूर्य उगवल्यापासून ते रात्री घरचा दिवा बंद होईपर्यंत काम करणाऱ्यालाच अंथरुणाची किंमत माहित असते, असे बोलले जाते ते काही उगाच नाही बरं का. याचे कारण म्हणजे दिवसभर धावपळ, घरापासून ऑफिसपर्यंत सर्व कामांची जबाबदारी, बॉसची चिडचिड, लहान मुलांचे संगोपन, आर्थिक व्यवसाय, नातेवाईकांची मनधरणी, कधी बायकोचा रुसवा तर कधी नवऱ्याचा संताप अशा व्यस्त जीवनशैलीचा कुणाला होणार नाही मनस्ताप..?

एकंदरच काय..? तर आपण स्वतःच स्वतःच्या व्यस्त जीवनाला रोज किमान सेकंदभर तरी वैतागतोच. परिणामी रात्री अंथरूण किती व्यवस्थित आहे यापेक्षा ते मिळाल्याचा आनंद फार मोठा असतो. दिवसभर दमल्यानंतर एकदा का अंथरुणाला पाठ टेकवली कि मग काय.. जो चाहे कर लो.. हम नहीं उठनेवाले! तर काही लोकांसाठी झोपणे हि एकमेव आवडीची गोष्ट असते. असे लोक कुठेही, कधीही आणि कितीही झोपू शकतात. यासाठी त्यांना विशेष असे टाकण्याची गरजच मूळी नसते. तर काही नादिष्ट लोक त्यांच्या सोयीनुसार बेड तयार करतात. अगदीच असे नव्हे तर ज्यांना सांधे आणि पाठदुखीचे समस्या असते असे लोक तर आपल्या आरोग्याच्या सोयीप्रमाणे गाद्यांचे नियोजन करतात.

पण मित्रांनो, तुम्ही कधी अंथरूण वा गादीशिवाय झोपला आहात का..? अर्थात थेट जमिनीवर झोपण्याचा एखादा अनुभव आहे का..? नसेल तर हा अनुभव एकदा नक्कीच घ्या. कारण, तज्ञांच्या मते प्रत्येक माणसासाठी नियमितपणे किमान ८ तासांची झोप पूर्ण करणे अत्यंत आवश्यक असते. यात बेड आणि गादीवर झोपणे फायदेशीर आहे पण, कधीतरी जमिनीवर झोपणे जास्त आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्हीही कधी जमिनीवर झोपून पहा. चला तर जमिनीवर झोपण्याचे फायदे वेळ न घालवता लगेच जाणून घेऊया. Sleeping On The Floor

Sleeping On The Floor

० जमिनीवर झोपण्याचे फायदे
(Sleeping On The Floor)

१) संपूर्ण शरीराला थंडावा मिळतो –

सर्वसाधारणपणे उन्हाळ्याच्या दिवसात शरीराचे तापमान अतिशय वाढते. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता जाणवू लागते. अशावेळी घाम येण्याचे प्रमाण वाढते आणि झोप होत नाही. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तरीही तुम्ही आवडी आणि सवयीप्रमाणे गुबगुबीत गादीवर झोपता.

ज्यामुळे शरीर ओव्हर हिट होते आणि तुम्हाला शांत झोप येत नाही. अशा वेळी जर तुम्ही जमिनीवर साधं पांघरून टाकून झोपलात तर शरीराचे तापमान संतुलित होऊन. अतिरिक्त ताप जमीन शोषून घेते. ज्यामुळे शरीर थंड होऊन निवांत झोप लागते. (Sleeping On The Floor)

२) श्वासोच्छवास सुधारतो –

Breath

श्वासोच्छवास हि क्रिया सुरळीत चालू राहणे अत्यंत आवश्यक असते. मात्र हि क्रिया अडसर निर्माण झाल्यामुळे व्यवस्थित पूर्ण होऊ शकली नाही तर श्वसनासंबंधित विकार होऊ शकतात. अशावेळी जर सरळ जमिनीवर पाठ टेकून झोपलात तर श्वासोच्छवास सुधारणे सोपे जाते. कारण थेट पाठ टेकवून जमिनीवर पडल्याने प्राणवायू संपूर्ण शरीरात प्रवास करतो. यामुळे प्राणवायूची पातळी राखली जाते आणि फुफ्फुसांचे कार्य सुधारण्यास मदत होते.

३) रक्ताभिसरण –

Blood

(Sleeping On The Floor) शरीरातील रक्ताभिसरण योग्य असेल तर स्नायूंना आराम मिळतो. तज्ञ सांगतात कि, जमिनीवर झोपल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंना आराम मिळतो. म्हणूनच जमिनीवर झोपणे फायदेशीर आहे. आधीचे काही दिवस त्रास होतोच पण एकदा सवय झाली की बाकी सर्व आजार दूर होण्यास मदत होते.

४) ताणतणाव –

कमी झोप, खूप काम, अति विचार यामुळे ताणतणाव निर्माण होतो. या तणावामुळे मेंदूवर वाईट परिणाम होतो. दरम्यान मन शांत करण्यासाठी जमिनीवर झोपण्याचा उपाय प्रभावी आहे. कारण असे जमिनीवर झोपल्याने शांतता मिळते. ज्यामुळे मनातील तणाव दूर होतो.

५) शरीरयष्टी व्यवस्थित राहते –

जमिनीवर झोपल्याने स्नायूंवर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त दबाव पडत नाही. शिवाय आपली हाडे नैसर्गिक स्थितीमध्ये राहिल्यामुळे फायदाच होतो. दरम्यान बेडवर वा मुलायम गादीवर झोपल्याने कितीही चांगले वाटतं असले तरीही यामुळे बॉडी पोश्चर बिघडतो. पण तेच जर थेट जमिनीवर (Sleeping On The Floor) किंवा एका चादरीवर झोपलं तर बॉडी पोश्चर अर्थात शरीर यष्टी व्यवस्थित राहते.

६) हाडांची संरचना सुधारते –

Bones

सगळ्यात महत्वाचे म्हणजे जमिनीवर झोपल्याने वाकडी तिकडी झालेली हाडे नैसर्गिक स्थितीत येतात. शिवाय त्यांच्या संरचनेत सुधारणा होते. ही प्रक्रिया फार हळू होते. पण भविष्यात याचे फायदे दिसून येतात. तसेच जमिनीवर झोपल्याने हाडांच्या जॉइट्समध्ये कोणत्याही प्रकारची इजा झाली असेल तर ती बरी होऊ शकते.

७) पाठीचा कणा मजबूत होतो –

ऑफिसमध्ये एकाच जागी काम करत बसण्यामुळे अनेकांना मणक्याचे आजार होतात. मग महागडी औषधे आणि उपचार करावे लागतात. (Sleeping On The Floor) मात्र तरीही जर आराम मिळाला नाही तर मग मनस्ताप होतो. याचे कारण म्हणजे गादीवर झोपल्याने मणक्याला जड जाते आणि त्याचा परिणाम थेट मेंदूच्या नसांवर होतो. म्हणून ही समस्या दूर करण्यासाठी महागड्या गादीवर नव्हे तर जमिनीवर झोपा. यामुळे स्नायूंमधील वेदना कमी होऊन पाठीचा कणा मजबूत होतो.

८) पाठीच्या कण्याचे आरोग्य सुधारते –

पाठीचा कणा हा शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. कारण तो शरीराच्या पूर्ण नर्व्हस सिस्टीमला कंट्रोल करतो. याचा थेट संपर्क मेंदूशी असतो. (Sleeping On The Floor) जमिनीवर झोपल्याने पाठीचा कणा सरळ, ताठ होण्यास मदत होते. शिवाय त्यावर दबाव कमी पडतो. यामुळे पाठीच्या कण्यासंबंधी कोणत्याही आरोग्यविषयक समस्या जाणवत नाहीत.

९) पाठदुखीपासून आराम मिळतो –

जमिनीवर झोपल्याने पाठीचा कणा सरळ एका रेषेत राहतो. यामुळे शरीरात रक्तप्रवाह योग्य होतो. ज्यामुळे हळू हळू पाठदुखीचा त्रास कमी होतो. दरम्यान चुकीच्या पद्धतीने झोपल्यास वा जाड गादीवर झोपल्यामूळे अनेकांना पाठदुखीचा त्रास होतो. (Sleeping On The Floor) अशात खाली जमिनीवर झोपणे हा या समस्येवर सोप्पं आणि प्रभावी उपाय मानला जातो.

१०) हिप्स आणि खांद्यासाठी लाभदायी –

जमिनीवर पाठ टेकवून झोपल्याने हिप्स आणि खांद्यांचे अलायमेंट व्यवस्थित होते. यामुळे शरीरातील विविध भागांमधील दुखणे दूर होते. शिवाय तुमच्या खांद्यामध्ये मानेमध्ये सतत वेदना होत असतील तर जाड गादीवर नव्हे तर जमिनीवर पाठ टेकवून झोपा. अगदी काही दिवसांतच याचा फायदा तुम्हाला जाणवेल. (Sleeping On The Floor)

‘हे’ पण वाचा :-

उत्तम आरोग्यासाठी नक्की किती तास झोपावे? ‘हे’ आहेत पूर्ण झालेल्या झोपेचे फायदे

रात्रीची झोपच लवकर येत नाही ना? या गोष्टी करून पहा