Sleeping Pills Side Effect
|

Sleeping Pills Side Effect: झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेता..? सावधान! अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। (Sleeping Pills Side Effect) अनेकदा खूप दमूनही झोप लागत नाही. बर झोप लागलीच तर पूर्ण होत नाही. अधे मध्ये काही ना काही कारणांमुळे एकतर झोप मोड होते किंवा मग झोपेत वाईट स्वप्न पडायची भीती वाटते म्हणून झोपतच नाहीत. पण झोप आपल्या आरोग्याचा असा अविभाज्य भाग आहे जो अत्यंत आवश्यक आहे. कारण झोपेच्या गणितावर आरोग्याची आकडेमोड होत असते. सर्वसाधारणपणे आजकाल ७० ते ८० टक्के लोक झोपेच्या समस्यांनी ग्रासलेले आहेत. यामुळे स्लीपिंग पिल्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

पण दुसरीकडे स्लीपिंग पिल्स आरोग्यासाठी घातक असल्याचे सिद्ध झाले आहे. तज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार स्लीपिंग पिल्सचे सेवन आरोग्यास बाधा पोहचवणारे आहे हे सिद्ध झाल्यामुळे आज आपण स्लीपिंग पिल्सचे दुष्परिणाम जाणून घेऊया.

pills

(Sleeping Pills Side Effect) सर्व साधारणपणे झोप न लागणे हि समस्या अतिशय सामान्य आहे. कारण असे बरेच लोक आहेत ज्यांना सतत डिजिटल स्क्रीनचा वापर करण्याची घाणेरडी सवय आहे. एकतर जेवल्यावर लगेच झोपणे या सवयीमुळेदेखील झोपेचे गणित बिघडू शकते. अशा अनेक आपल्याच सवयी आपल्याला झोपेपासून दूर करत असतात. तर अशा सवयींवर वेळीच लगाम लावणे अत्यंत आवश्यक आहे.

मात्र लोक सोयीनुसार तात्काळ उपाय शोधून काढतात. हा उपाय म्हणजे स्लीपिंग पिल्सच्या सहाय्याने आवश्यक झोपेची पूर्तता करणे. पण यामुळे आपले इतर आरोग्य हळू हळू गंभीर परिणामांना सामोरे जात असते. मुख्य म्हणजे या गोळ्यांचा वापर जर चुकीच्या पद्धतीने केल्याने व्यक्ती कोमात जाऊ शकते वा तुमचा मृत्यूदेखील होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया स्लीपिंग पिल्स कसे काम करते आणि त्याचे दुष्परिणाम काय ते खालीलप्रमाणे:- (Sleeping Pills Side Effect)

Sleep

० स्लीपिंग पिल्स कशी काम करते?

मित्रांनो, स्लीपिंग पिल्स या २ प्रकारच्या असतात. एक ज्या आधी वापरात होत्या. यामध्ये बेन्जोडायजेपाम ज्यात लॉरमेट्राजेपाम, डायजेपाम, निट्राजेपाम किंवा लोप्राजोलाम इत्यादी घटकांचा समावेश असतो. हे मेंदूला झोपेची जागृती करून देतात. या गोळ्यांची शरीराला सवय लागते. तसेच नवीन गोळ्यांच्या प्रकारामध्ये आधीच्या स्लीपिंग पिल्सच्या तुलनेत या पिल्स जास्त प्रभावकारी असल्यामुळे याचेही दुष्परिणाम आहेत.

स्लीपिंग पिल्सचे दुष्परिणाम
(Sleeping Pills Side Effect)

1. दिवसभर सुस्तावणे –

काही लोकांना या स्लीपिंग पिल्सचा वापर केल्याने दिवसाच सुस्ती येऊ लागते आणि काही लोकांना त्याच्याही दुसऱ्या दिवशी सुस्ती येते कारण हे औषध तुमच्या शरीरात जास्त वेळ आपला प्रभाव ठेवतो.

Stress
2. रात्रीची वाईट स्वप्न पडणे –

(Sleeping Pills Side Effect) जालेप्लोन, जोपिक्लोन आणि जोल्पिडेम इत्यादी असे औषध आहे ज्यांना 2 ते 4 आठवड्यासाठी दिले जाते. काही लोकांना या गोळ्यांमुळे वाईट स्वप्न येतात.

Breath
3. झोपेत श्वास घेण्यास त्रास होणे –

जर तुम्हाला आधीपासूनच स्लीप एप्नियाचा त्रास असेल तर ह्या स्लीपिंग पिल्स याला अजून खराब करून देते. स्लीप एप्नियामध्ये तुम्हाला झोपताना श्वास घेण्यास त्रास होतो. यामुळे तुम्ही पूर्णपणे झोप घेऊ शकत नाही आणि जास्त वेळ व्यक्ती जागाच राहतो.

4. ड्रग्सची सवय लागणे –

(Sleeping Pills Side Effect) जर तुम्ही जास्त दिवसांपासून ह्या औषधांचा वापर करत असाल तर तुम्हाला या गोळ्यांची सवय लागते आणि याच्याशिवाय तुम्हाला झोप येत नाही. या औषधांना तुम्ही अचानक सोडू देखील शकत नाही कारण याने देखील त्रास होतो जसे मळमळ, ओकारी आणि बेचैनी होऊ लागते.

Leg Pain
5. अंगदुखीचा त्रास होणे –

मेलॅटोनिन आधारित झोपेच्या गोळ्या अनिद्रेला जास्त वाढवून देतात. याच्या सेवनामुळे तुम्हाला डोके दुखी, पाठ दुखी किंवा ज्वाइंट्समध्ये दुखायला लागते.

6. मेंदू अकार्यक्षम होणे –

जर तुम्ही स्लीपिंग पिल्सला तीन महिन्यापेक्षा जास्त दिवसांसाठी वापर करत असाल तर तुम्हाला डोक्याशी निगडित अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात. जसे तुम्हाला एलजीमर डिसीज होऊ शकतो ज्यात तुम्ही गोष्टी विसरू लागता. (Sleeping Pills Side Effect)

Heart Care
7. हृदयविकाराचा झटका येणे –

डॉक्टरांप्रमाणे झोपेच्या जास्त गोळ्या घेतल्याने हार्ट अटॅकचा धोका 50 टक्के वाढतो.

8. कर्करोगाचा धोका –

(Sleeping Pills Side Effect) एका शोधात असे आढळून आले आहे की जे लोक रोज या गोळ्यांवर अवलंबून असतात. त्यांना कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो.

9. मृत्यूची शक्यता –

जर तुम्ही स्लीपिंग पिल्ससोबत इतर दुसरे ड्रग जसे वेदनाशावक औषधी किंवा कफ संबंधित औषध घेत असाल तर यामुळे तुम्हाला बरेच त्रास होण्याची शक्यता आहे जसे तुम्ही कोमात जाऊ शकता किंवा तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो. (Sleeping Pills Side Effect)

‘ हे ‘ पण वाचा :-

रात्री झोप मोड झाली कि पुन्हा लागत नाही? करा ‘हे’ उपाय; जाणून घ्या

Sleeping Hours : तुम्हाला किती झोपेची गरज आहे..?; लगेच जाणून घ्या

मस्त आरोग्यासाठी सुस्थपणा सोडा आणि जेवणानंतर न विसरता चाला; जाणून घ्या फायदे

Sleeping On The Floor : जमिनीवर झोपण्याचे फायदे जाणालं तर गादी, बिछाने विसरून जालं; जाणून घ्या आश्चर्यकारक 10 फायदे