Stale Food
|

Stale Food: शिळं अन्न खाल्ल्याने काय होते..?; जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

हॅलो आरोग्य ऑनलाईन| Stale Food अन्न म्हणजे पूर्ण ब्रह्म. त्यामुळे अन्नाचा अपमान करायचा नाही. ताटात अर्ध अन्न सोडायचं नाही. उरलं म्हणून फेकायचं नाही. इतकंच काय तर अन्नाचे शीत सुद्धा काही लोक वाया जाऊ देत नाहीत. असे अनेक नियम आहेत जे अन्नाच्या बाबतीत प्रामुख्याने पाळले जातात. कारण या नियमांचा उल्लेख पुराण आणि ग्रंथांमध्ये केलेला आहे. कदाचित म्हणूनच घरात अन्न उरणार नाही आणि उरलं तर ते फेकल जाणार नाही याची काळजी घेण्यात महिला व्यस्त असतात.

Food

घरातली स्त्री घरातील प्रत्येकाच्या आरोग्याची योग्य रित्या काळजी घेत असते. त्यामुळे कुणाचं पोट रिकामी राहणार नाही म्हणून ती दोन घास जास्तच शिजवते. पण अनेकदा घरात अन्न उरत. (Stale Food) हे अन्न फेकू न कसं द्यायचं..? म्हणून तीच स्त्री हे अन्न स्वतःच खाते. पण घरातील अन्य कुणालाही ती हे अन्न खाऊ देत नाही. लहानपणी अनेकदा आईच शिळे अन्न का खाते..? असा प्रश्न पडायचा. पण जसजसे मोठे झालो या प्रश्नाचे उत्तर आपोआपच मिळाले. अन्न फेकून देणे वाईटच.. पण म्हणून शरीराच्या गरजेपेक्षा जास्त अन्न ग्रहण करणे किंवा उरलेले अन्न वारंवार गरम करून खाणे या दोन्ही गोष्टी चूकच आहेत.

Food In Fridge

आजकाल प्रगतशील विज्ञानाने दिलेल्या शीत कपाटाच्या सहाय्याने हे अन्न टिकवता येते. अर्थात फ्रिजचा वापर करून रात्री उरलेले अन्न सकाळी खाण्यायोग्य राखता येते. मात्र तज्ञांचा अभ्यास सांगतो की एकदा का रात्र उलटली की शिजवलेल्या अन्नातील पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात कमी होतात. त्यामुळे अनेकदा हे अन्न शरीरासाठी घातक ठरते. शिवाय फ्रिजमधील हानिकारक प्रकाश किरणांच्या मारामुळे या अन्नातील पोषक घटक मोठ्या प्रमाणात कमी होऊन यातील गुड बॅक्टेरियादेखील लोप पावतो. तर बॅड बॅक्टरियाचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढते. म्हणूनच (Stale Food) शिळे अन्न खाल्ल्याने अनेकदा पोटाचे त्रास आणि तक्रारी सुरू होतात. याविषयी तज्ञांनी काही मुख्य आणि महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. ही उत्तरे आज आपण संदर्भासहित समजून घेऊ.

Food Poison

० काय सांगतात तज्ञ..? (Stale Food)

घरोघरी उरलेलं शिळं अन्न घरातील महिलाच खाताना दिसतंय यातून त्यांच्या तब्येतीचे मोठे आणि गंभीर प्रश्न निर्माण होतात. मग सर्वसाधारण प्रश्न उपस्थित राहतो. तो म्हणजे… शिळं अन्न खाणं आरोग्याच्या दृष्टीने कितपत श्रेयस्कर आहे ..? कितीही प्रयत्न केले तरीही घरात शिजवलेलं अन्न रात्री उरतंच. मग स्त्रियांसमोर प्रश्न उपस्थित राहतो तो म्हणजे या शिळ्या अन्नाचं करायचं काय..?

Food Tips

(Stale Food) याबाबत बोलताना आहार तज्ञांनी सांगितलं की, हा काही एका घरातला प्रश्न नाही तर हा घराघरातला प्रश्न आहे. कारण हे अन्न धड खाताही येत नाही आणि टाकूनही देता येत नाही. त्यामुळे साहजिकच हे अन्न फेकुन देण्याऐवजी साठवून गरम करून वारंवार खाल्लं जातं. फ्रिज असेल तर त्यात साठवून पुन्हा खाल्ल जात. पण खाणार तर स्त्रियाच. कारण हे अन्न शरीराला त्रासदायक ठरू शकत हे स्त्रिया जाणतात आणि म्हणूनच मुलांना, नवऱ्याला, घरातल्या वृद्धांना अस शिळ अन्न कसं द्यायचं म्हणून त्या स्वतःच खातात. पण असे करणे म्हणजे स्वतःहून स्वतःच्या आरोग्याशी खेळणे आहे. कारण अन्न फेकणे किंवा वाया घालवणे चांगले नसले तरीही असे अन्न १००% आरोग्याचे नुकसान करतात. त्यामुळे शक्यतो अन्न बनवीत असतानाच उरणार नाही अशा पद्धतीने बनवा आणि जेव्हाचे तेव्हाच संपवा.

० फ्रीजमध्ये तर अन्न टिकत.. मग ते खाल्ल तर काय होतंय..?

अनेक लोक रात्री उरलेलं जेवण फ्रीजमध्ये साठवतात. मग सकाळी, दुपारी किंवा दुसऱ्या दिवशी अगदी रात्रीसुद्धा हे अन्न खाल्ले जाते. निश्चितच अन्न फ्रीजमध्ये साठवल्याने खाण्यायोग्य राहते. मात्र आरोग्यासाठी ते योग्य आहे याची खात्री कोण घेणार..? आहार तज्ञ सांगतात की, फ्रीजमध्ये साठवलेले अन्न एका विशिष्ट काळापर्यंत खाण्यायोग्य असते. पण एका रात्रीनंतर अन्नातील गुड bacteria वर फ्रिजमधील हानिकारक किरणांचा मारा झाल्यामुळे ते खाण्यायोग्य राहत नाही. कारण यामुळे अन्नातील पोषक घटक पूर्णपणे निघून जातात आणि उरत ते विनापोषक आहार असतो. त्यामुळे आरोग्याचा फायदा तर सोडाच धडे नुकसानही होत नाही. (Stale Food)

पण फ्रीजमध्ये एका रात्रीहून अधिक काळ अन्न साठवले तर ते अन्न खाऊच नये असे तज्ञ सांगतात. कारण असे अन्न आरोग्याची पूर्णपणे वाट लावतात. हे अन्न फ्रिजमधून काढून गरम करून खाल्ल्यास फूड पॉयझन होण्याची शक्यता असते.

शिळे अन्न खाण्याचे दुष्परिणाम काय..?

तज्ञ सांगतात की एकदा अन्न शिजवून रात्र उलटली तर त्या अन्नाला ‘पर्युषित आहार’ असे म्हंटले जाते. आयुर्वेदातही या अन्नाचा असाच उल्लेख आहे. याचा साध्या भाषेत अन्न शिजवल्यानंतर एक रात्र उलटून गेली आहे असे अन्न असा होतो. मग ते अन्न सकाळी शिजवलेले असो किंवा मग रात्री.

तज्ञ सांगतात की, पाणी आणि अग्नी यांचे संस्कार करून काहीही पदार्थ तयार केला की त्याचे ४ ते ५ तासात गुणधर्म बदलू लागतात. त्यात रासायनिक विघटन होऊ लागते आणि अन्न गरम राहील असे डबे , कॅसेरोल वगैरे वापरणं या सगळ्या सोयी असल्या तरीही व्हायच्या त्या प्रक्रिया होतातच. त्यामुळे असे पदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारकच..

Stomach Worm

होणारे परिणाम :-
फूड पॉईझन
पोटदुखी
पोटाचे अन्य विकार
आतड्यांचे नुकसान
हृदय रोग
किडनी रोग
गुप्तांगात त्रास
असे विविध आणि गंभीर आरोग्यविषयक समस्या केवळ शिळे अन्न खाल्ल्याने होऊ शकतात. त्यामुळे तज्ञ सांगतात शक्यतो शिळे अन्न खाऊचं नये अन्यथा या सर्व आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा.

‘हे’ पण वाचा:-

Food Tips: लग्नातलं जेवण अंगावर आलंय..? तर ‘या’ 5 टिप्स फॉलो कराच; जाणून घ्या

Bad Food For Lungs: तुमच्या आहारात ‘हे’ पदार्थ असतील तर, तुमची फुफ्फुसे धोक्यात आहेत; जाणून घ्या

Tips To Reduce Salt In Food दैनंदिन जीवनात मिठाचा वापर कमी करण्यासाठी सोप्या टिप्स; जाणून घ्या

‘Black Food’ म्हणजे काय? आणि त्याचा आरोग्यासाठी कसा फायदा होतो?; जाणून घ्या

Daily Protein Requirements: आपल्या शरीराला नियमित किती प्रथिने आवश्यक आहेत..?; जाणून घ्या