|

Food Tips: लग्नातलं जेवण अंगावर आलंय..? तर ‘या’ 5 टिप्स फॉलो कराच; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Food Tips एखादा सोहळा, कार्यक्रम किंवा मग लग्न असलं कि जेवण कसं अगदी जिभेला हवंहवंसं असतं न्हाई..? मग पनीर, वाटाणा, हराभरा कबाब, पुऱ्या, गुलाबजाम आहाहा.. नुसती म्हणजे नुसती चंगळच. हे खाऊ का ते खाऊ..? ते खाऊ का हे खाऊ..? अशा प्रश्नांनीच भूक आणखी वाढते. कधी एकदा लग्न लागतंय आणि आपण जेवणाच्या पंक्तीत जातो असं अनेकांचं होतं. काहींना तर मंडपात येणारा पदार्थांचा सुवासच ओढून नेतो. एकदा का हातात जेवणाचं ताट आलं कि खवैय्ये मंडळी काही सूट देत नाहीत. तुम्हीही अशाच खवैयांपैकी आहात का..? तर हि माहिती वाचा. म्हणजे पुढच्यावेळी बेताने आणि आरोग्याचा विचार करून खालं!

विशेष म्हणजे अशा लग्न सोहळ्यामध्ये मित्र मंडळी आणि परिवाराचा मोठाच्या मोठा लोट असतो त्यामुळे घरातील स्त्रियांना मुलांच्या किंवा पतीच्या आरोग्याची कितीही काळजी असली तरीही बोलता येत नाही. बरं दिसत नाही ना..! म्हणून. मग काय लहान मुलं स्टार्टर्स आणि आईस्क्रीमवर ताव मारतात. (Food Tips) तर घरातील ज्येष्ठ मंडळी आणि नवरे गॅंग गोडधोडावर धन्य होतात. पण इतकं सगळं खाल्ल्यानंतर पोटाचे जे हाल होतात ते कोण निस्तरणार..? खूप तेलकट, तिखट, गॉड आणि मुख्य म्हणजे सोडायुक्त पदार्थ आपल्या आरोग्यासाठी बऱ्यापैकी हानिकारक असतात. त्यामुळे कोणताही समारंभ असो जेवताना थोडं बेताचंच जेवावं.

अशा पदार्थांचे वास आणि चव माणसाला अधीर करते. शिवाय मनावरील नियंत्रण सुटलं कि मग जिभेला आवरणार तरी कोण..? आधीच्या काळात लग्नात जेवणाच्या पंगती बसायच्या आणि जेवण फार साग्र संगीत नव्हे तर मोजकं पण चविष्ट असायचं. जस कि, पुरी- वांग बटाटा भाजी, जिरा राईस; डाळ आणि एखादा गोडाचा लाडू किंवा जिलेबी. पण आताच लग्नाचं जेवण म्हणजे अगदी महाराजा थाळीचं वाटते.

(Food Tips) सुरुवातीला स्टार्टर्स काय.. मग डाळीचे दोन प्रकार, भाताचे दोन प्रकार, पुरी, चपाती, फुलके, रोट्या यातही विविधता. चार प्रकारच्या ओल्या सुक्या भाज्या, विविध भजीचे प्रकार, कटलेट तर ठरलेलेच आणि ताटात गोडाच्या पदार्थांचाही सुळसुळाट. बापरे बाप..! नुसतं वाचूनही दमायला झालं. यात भरीस भर म्हणजे विविध सरबतं, आईस्क्रीम आणि पान तसेच इतर हलके फुलके स्नॅक्स आहेतच. म्हणजे एकाच दिवशी पोटाची पूर्ण मंडई करायची.

(Food Tips) आता एका वेळी एव्हढ सगळं खाल्लं तर पोटाचा कोटा संपल्यामुळे त्रास तर होणारच ना. शिवाय वऱ्हांड्यानी खाल्लं नाही म्हणून मानकरी रुसायचे तो वेगळाच ताप. मग अशावेळी करायचं तर करायचं काय..? आपलं आरोग्य राखायचं तरी कसं..? जिभेवर ताबा कसा मिळवायचा..? अशा विविध प्रश्नांची उत्तरे आम्ही घेऊन आलो आहोत. शिवाय या जेवणामुळे आरोग्यावर कसा विपरीत परिणाम होतो ते देशील आपण जाणून घेणार आहोत.

‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा आणि पोटाचे आरोग्य राखा (Food Tips)

1. सर्वात आधी मेनू पहा –

Food Tips

लग्नात गेल्यानंतर जेवायची वेळ आली तर आधी मेनू पहा. मेनूमध्ये असलेल्या भाज्या, सलाड, डाळ, भात, चायनीज, इटालियन असे अनेक प्रकार असतात जे आपण सोयीप्रमाणे आणि चवीप्रमाणे खातो. पण हे सगळे पदार्थ एकाच वेळी खाणे टाळा. अनेकदा आपण सगळे काही टेस्ट करुन बघू असे म्हणत संपूर्ण ताट कधी भरलं याकडे दुर्लक्ष करतो. (Food Tips) आता वेगवेगळे पदार्थ पाहून खाण्याची इच्छा होणार नाही असे होऊच शकत नाही हे मान्य असलं तरीही आरोग्याला झेपेल तेव्हढंच खाणं योग्य. त्यामुळे थेट जेवण घेण्यापेक्षा आधी मेनू पहा आणि आपल्या स्वास्थ्यासाठी जेव्हढे योग्य आहे तेव्हढेच ताटात घ्या म्हणजे खाणे पुरेसे आणि योग्य प्रमाणात होईल.

2. द्रव पदार्थांचे सेवन अधिक करा –

लग्नात गेल्यानंतर आजकाल विविध प्रकारची सरबते हमखास मिळतात. काहीच नाही तर किमान पाणी मिळतच. त्यामुळे समारंभात असतेवेळी जास्तीत जास्त पाणी प्या. यामुळे जेवण कितीही जास्त खाण्याची इच्छा असली तरीही जाणार नाही. कारण पोटातील बरीच जागा पाण्याने व्यापलेली असेल. त्यामुळे तुम्ही जबरदस्ती खाण्याचा प्रयत्न केलात तरीही तुम्हाला अन्न जाणार नाही. (Food Tips)

3. जेवणात ठेवा अंतर –

समजा तुम्ही लग्नाला गेलात आणि मान्यवरांपैकी एक असाल तर अगदी पहिल्या विधीपासून तुमचे उपस्थित असणे साहजिक आहे. अशावेळी तुम्हाला लग्नाचा मेनू आधीपासूनच माहित असेल. आता इच्छा मारायची नाही आणि आरोग्यही राखायचे आहे तर एका उत्तम पर्याय आहे. दिवसभरातुन थोडे थोडे वेगवेगळे पदार्थ खा. अगदी शेवटची पंगत उठेपर्यंत थोडं थोडं खा. असे केल्यामुळे एकतर मेन्यूतील प्रत्येक पदार्थाची चव चाखता येईल आणि पुरेसे अन्न पोटाला थोड्या थोड्या वेळाने मिळाल्यामुळे पोटाचे आरोग्यही राखले जाईल.

4. घरातूनच भरपेट खाऊन जा –

Full Plate Of Food

लग्नाला उपस्थित राहण्याआधी घरातून निघताना भरपेट नाश्ता वा जेवण करून जा. अर्थातच तुम्हाला पोहचेपर्यंत काही काळ मधला निघून जाईल. (Food Tips) जर पुन्हा लग्नात जेवायची वेळ आलीच तर तुमचे पोट आधीच भरलेले असल्यामुळे फारसे जेवण तुम्हाला जाणार नाही. शिवाय आग्रहाने जेवावे लागलेच तरी मोजके खाण्याची सवय ठेवावी. यामुळे पोटाला बराचसा आराम मिळेल.

5. आता जाणून घ्या काय खालं..? आणि काय टाळालं..?

लग्नाचा मेनू एकदा पहिला कि काय खायचे आणि काय खायचे नाही हे ठरवणे तुमच्यासाठी आधीच सोपे होईल. यानंतर आपल्या पोटाच्या स्वास्थ्याची फिकीर करत जेवण जेवावे. आता मेनू पाहिल्यानंतर त्यातील कोणत्या गोष्टी तुम्ही आहारात घ्यायला हव्यात आणि कोणत्या नको याचा विचार करायला हवा. (Food Tips)
लग्नाचे जेवण कितीही खास असले तरी पोटासाठी योग्य असेलच असे नाही. त्यामुळे पूर्ण विचारानिशी आहार निवडावा.

Roti

अ) काही लोकांच्या आरोग्यासाठी मैदा पूर्ण वर्ज्य करणे बंधनकारक असते. तर अशा रुग्णांनी जाणीवपूर्वक मैद्याचे पदार्थ टाळावे.

ब) तसेच काही लोकांच्या आरोग्यावर तेलकट आणि मसालेदार पदार्थ विपरीत परिणाम करतात. त्यामुळे असे पदार्थ डॉक्टरांनी त्यांच्या आहारातून वगळण्याची सक्ती केलेली असते. तर अशा रुग्णांनी हे पदार्थ खाऊ नयेत. अन्य लोकांनी प्रमाणात याचे सेवन करावे. (Food Tips)

क) शक्यतो आहारात पोटाला थंडावा देणारे पदार्थ खावे. यासाठी मठ्ठा, दही तसेच जास्तीत जास्त सलाडवर भर द्या.

ड) याशिवाय इतरवेळी आपण घरात जसे जेवण करतो. अगदी त्याच पद्धतीने डाळ – भात, भाजी -पोळी घ्या. म्हणजे पोट खूप तुडुंब भरल्यासारखे वाटणार नाही.

० लग्नाच्या जेवणामुळे पोटाचे आरोग्य कसे बिघडते..?

एकतर लग्नाच्या जेवणात सोड्याचा वापर केलेला असतो . काही बोटावर मोजण्याइतकेच कॅटरर्स आहेत जे जेवणात सोडा वापरत नाहीत. पण सोडायुक्त आहार घेतल्यामुळे काही काळ काहीही खाण्याची इच्छा होत नाही. काही वेळ पोट फुगल्यासारखे वाटते. शिवाय असे जेवण जेवल्यानंतर पोटात सतत कळ येत राहते. शौचाला पातळ होते. तसेच पोटदुखी चालू होते. याचे कारण म्हणजे लग्नातील वेगवेगळ्या पद्धतीचे जेवण जेवणे. (Food Tips) ज्या पदार्थांची आपल्याला नियमित दिवसांत सवय नसते असे पदार्थ खाल्ल्याने हमखास पोटाचे आरोग्य बिघडू शकते. कारण लग्नाच्या जेवणातील पदार्थ पचायला जड असतात.

० लग्नातील जेवणाचा त्रास झाल्यास काय करालं..?

असे जेवण जेवल्यानंतर पोटाचे आरोग्य बिघडले तर आहार हलका घेण्यावर भर द्या. तसेच आपल्या आहारात थंड पदार्थांचे सेवन करा. ज्यामुळे पोटाला आराम मिळेल. यात तुम्ही हमखास खिचडी, सूप, तूप असे काही पदार्थ खा. (Food Tips)

‘हे’ पण वाचा :-

Bad Food For Lungs: तुमच्या आहारात ‘हे’ पदार्थ असतील तर, तुमची फुफ्फुसे धोक्यात आहेत; जाणून घ्या

‘Black Food’ म्हणजे काय? आणि त्याचा आरोग्यासाठी कसा फायदा होतो?; जाणून घ्या

Tips To Reduce Salt In Food दैनंदिन जीवनात मिठाचा वापर कमी करण्यासाठी सोप्या टिप्स; जाणून घ्या

Foods To Avoid During Pregnancy: गर्भारपणात चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; जाणून घ्या

Bad Health Habits: उत्तम स्वास्थ्यासाठी ‘या’ 25 वाईट सवयींची संगत आत्ताच सोडा; जाणून घ्या