Urinary Infection
| |

Urinary Infection: स्त्रियांमध्ये युरीन इंफेक्शनचे प्रमाण जास्त का आहे?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Urinary Infection घरातील प्रत्येकाची काळजी घेणारी स्त्री स्वतःची काळजी घ्यायला नेहमी विसरते. परिणामी अनेकदा स्त्रियांना विविध आजारांना तोंड द्यावे लागते. त्यातही तब्येतीच्या तक्रारींना लहान सहान कुरबुरी समजून त्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय स्त्रियांना नेहमीच त्रासदायी ठरते. जसे कि गुप्तांगाबाबत योग्य काळजी न घेतल्यास गुप्तांगासाठी हि बाब खूप धोकादायक ठरू शकते.

रिसर्चनुसार लघवी करताना झालेल्या काही चुकांमुळे युरिन संबंधित संसर्गाच्या समस्या (Urinary Infection) वाढतात आणि या समस्या होण्यात महिलांची संख्या अधिक आहे.

० स्त्रियांमध्ये युरीन इंफेक्शनचे (Urinary Infection In Women’s) प्रमाण जास्त का आहे?

स्त्री रोग तज्ञांच्या मते, महिलांच्या शारीरिक रचनेमुळे त्यांना अनेक आरोग्यविषयक समस्या संभवतात. याचे मुख्य कारण म्हणजे महिलांचे मूत्रमार्ग लहान असते. ज्यामुळे बॅक्टेरिया सहज युरिन पाइपमध्ये प्रवेश करतो आणि आरोग्यविषयक समस्या वाढवतो.

परिणामी महिलांना युरिन इंफेक्शन (Urinary Infection) होते. महिलांच्या शरीरात मासिक पाळी, गर्भधारणा आणि मेनोपोज या स्थितींमुळे अनेक बदल होत असतात. या सर्व गोष्टींचा मूत्रमार्गावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत महिलांनी लघवी करताना काळजी घेणे आवश्यक आहे.

० स्त्रियांमध्ये युरीन इंफेक्शनचे प्रकार कसे ओळखाल? (Urinary Infection)

स्त्रियांमध्ये असो वा पुरुषांमध्ये युरीन इन्फेक्शनचे प्रकार ओळखणे अतिशय कठीण आहे. कारण याची लक्षणे शक्यतो सर्वसाधारण स्थिती आणि इतर दिवसांतील आरोग्यविषयक समस्यांप्रमाणे जाणवतात. ज्यामुळे आपल्याला युरीन इंफेक्शन झाले आहे हे समजणे कठीण जाते. त्यात स्त्रियांच्या बाबतीत युरीन इंफेक्शन ओळखणे फारच कठीण आहे.

कारण मासिक पाळीच्या दिवसात स्त्रियांच्या शारीरिक समस्यांमध्ये आधीच वाढ झालेली असते. ज्यामध्ये युरीन इंफेक्शन होण्याची शक्यता अधिक आहे. त्यातल्या त्यात जी प्रमुख ठळक लक्षणे दिसतात ती जाणून घेऊ.

१) मुत्रोत्सर्जन करतेवेळी असहाय वेदना होणे, दाह होणे, सतत लघवीला होणे, मुत्राशय सतत भरल्यासारखे वाटणे तसेच, लघवीला गेल्यास न होणे.

२) ओटीपोटात दुखणे (Urinary Infection)

३) लघवीचा उग्र वास, रंग गडद आणि दुधासारखी घट्ट होणे

४) लघवीमध्ये रक्ताचे प्रमाण दिसणे.

वरीलपैकी कोणतेही लक्षणे आढळल्यास, तसेच ताप आणि थंडी येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

० अशी घ्या काळजी (Urinary Infection Care)

१) गुप्तांग साफ करताना काळजी घ्या
स्त्री रोग तज्ञ सांगतात कि, गुप्तांग साफ करताना मागच्या बाजूने पुढे पुसू नका. कारण आपल्या गुद्द्वारात बरेच बॅक्टेरिया असतात. ज्यावेळी गुप्तांग मागून पुढे पुसले जाते तेव्हा हे बॅक्टेरिया पुढे येतात आणि मूत्रमार्गात प्रवेश करतात. यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका वाढतो. यामुळे गुप्तांगात जळजळ आणि वेदना होतात. त्यामुळे गुप्तांग साफ करताना काळजी घ्यावी.

२) गुप्तांग जास्त पुसणे
गुप्तांग कोरडे ठेवण्यासाठी लघवी केल्यानंतर ते पुसणे आवश्यक असते. पण जास्त पुसणे नाही. कारण असे केल्याने गुप्तांगाची त्वचा दुखावू शकते. शिवाय त्वचेत जळजळ आणि खाज येऊ शकते. यामुळे मूत्र मार्गाच्या त्वचेचे नुकसान होते.

३) लघवी करण्यासाठी टाईमटेबल आखणे
लघवी करण्यासाठी कोणतीही एक विशेष वेळ ठरवणे मूर्खपणा आहे. कारण असे केल्याने मूत्राशय योग्य प्रकारे लघवी जमा करू शकत नाही. सामान्यत: ४५० ते ५०० मिली मूत्र मूत्राशयात जमा होते. पण जर तुम्ही दर अर्ध्या तासाने लघवी केली तर मूत्राशयात खूप कमी प्रमाणात लघवी जमा होईल. यामुळे मूत्राशयाचे काम व्यवस्थित होणार नाही आणि वेदना जाणवतील.

४) लघवी धरून ठेवणे
मूत्राशय पूर्ण भरलेले नसतानाही लघवी करणे जितके वाईट तितकेच वाईट लघवी येऊनही दाबणे हे आहे. यामुळे मूत्रपिंडाच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

५) दिवसभरात खूप पाणी पिणे
दिवसभरात २-३ लीटर पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले आहे. पण दिवसभरात शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी पित असाल तर याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. द्रवपदार्थाच्या जास्त सेवनामुळे मूत्राशय जास्त प्रमाणात लघवी तयार करते. परिणामी पोटदुखी, ओलसरपणा आणि दुर्गंध या समस्या जाणवतात.

Drinking Water

६) अधिक व्यक्तींसोबत समागम टाळा
या संदर्भात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकापेक्षा अधिक व्यक्तींबरोबर समागम टाळणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला इतर शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. ज्यामध्ये साहजिकच सेक्श्युअली ट्रान्समिटेड डिसीझीज (STD) आणि UTIs चा समावेश आहे.

० अत्यंत महत्वाचे :-

मित्रांनो युरिन इंफेक्शनबाबत सगळ्यात महत्वाची बाब अशी कि, यावर वारंवार उपचार करूनदेखील हा संसर्ग परत परत होत असेल तर वेळीच काळजी घेणे जरुरीचे आहे. यात जर एखादी महिला गरोदर असेल किंवा घरात आपल्या समस्या व्यक्त न करता येऊ शकणारे लहान मुलं असेल, वृद्ध तसेच दुर्धर आजारी व्यक्ती असेल तर काळजी घेणे जास्त गरजेचे आहे.

दरम्यान अशा व्यक्तींना जर वारंवार ताप, चक्कर, उलटी येणे, थंडी लागणे, किडनीजवळ दुखणे अशा कोणत्याही आरोग्यविषयक समस्या जाणवत असतील तर तर लगेचच डॉक्टरांकडे जा. कारण दुर्लक्ष केल्याने या समस्या वाढू शकतात.

मुख्य म्हणजे अशा त्रासदायक विषाणूंकडे दुर्लक्ष केल्यामुळे तुमचे मुत्राशय आणि किडनीसहित तुमच्या मुत्र मार्गालादेखील गंभीर स्वरूपाचा आजार होऊ शकतो. त्यामुळे वेळेत उपचार करा नाहीतर तुमच्या हलगर्जीमुळे तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता बळावते.

‘हे’ पण वाचा :-

महिन्याचे ते 5 दिवस अत्यंत वेदनादायी..; जाणून घ्या कारण आणि उपाय

उत्तम आरोग्यासाठी ‘या’ नियमांचे पालन अत्यावश्यक; जाणून घ्या