Bad Health Habits
| | |

Bad Health Habits: उत्तम स्वास्थ्यासाठी ‘या’ 25 वाईट सवयींची संगत आत्ताच सोडा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Bad Health Habits जर तुम्ही नेहमी आजारी असाल आणि तुम्हाला सतत झोपावे लागले तर..? म्हणजे खोटं खोटं नाही बरं का.. पिक्चर सिनेमांत दाखवतात तस खोटं खोटं आजारी पडणं वेगळं आणि खरंखुरं आजारी पडणं वेगळं असत. आम्ही खऱ्याखुऱ्या आजारपणाबद्दल बोलत आहोत. आता तुम्हीच सांगा तुम्हाला हे असं आजारपण काढायला आवडेल कि मस्त जगायला आवडेल…? आम्हाला तर बुवा स्वतःलाही मस्तच रहायला आवडेल आणि तुम्हालाही स्वस्थच पहायला आवडेल.

Smoking

म्हणून आज आम्ही तुम्हाला तुमच्याच अशा काही सवयींबद्दल सांगणार आहोत. ज्या सवयी तुमच्या आरोग्याची पूर्ण वाट लावत आहेत. आता आजारी पडायचे नसेल आणि भारी जगायचे असेल तर या सवयी आताच सोडणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या अभ्यासातून निकषांद्वारे हे सिद्ध झाले आहे कि, खालील दैनंदिन आरोग्यातील सवयी या स्वस्थ आरोग्याला बाधा निर्माण करतात. जर तुमचा विश्वास बसत नसेल.. तर हरकत नाही. आधी या टिप्स जाणून घ्या आणि मग त्या सुधारून पहा. बघा आयुष्यात किती चमत्कारिक बदल होतात ते. (Bad Health Habits)

strong men

सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी कि,
सकाळी पाणी,
दुपारी ताक,
संध्याकाळी दुधाचा घोट अशी दिनचर्या असणे अतिशय महत्वाचे आहे. याशिवाय संपूर्ण दिनचर्येत कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊया.

० निरोगी आरोग्यासाठी ‘या’ सवयी सोडा
(Bad Health Habits)

१) सकाळचे भोजन राजासारखे म्हणजे पोटभर तर दुपारचे भोजन राजकुमारासारखे म्हणजे लहान मुलासारखे आणि रात्रीचे भोजन भिकाऱ्यासारखे म्हणजे खूप कमी असावे. हा अतिशय मोलाचा सल्ला आहे जो लक्षात ठेवा म्हणजे जगणे सोप्पे जाईल.

२) सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरीराला आवश्यक तितकं पाणी त्याला द्या. यासाठी दिवसभरात किमान ७ ते ८ ग्लास पाणी आवश्यक आहे. (Bad Health Habits)

Eating Disorder

३) उभ्याने पाणी पिण्याची सवय असेल तर आताच सुधारा. यामुळे सांधेदुखी आणि मुख्य म्हणजे टाच कायमची दुखु लागते.

४) स्वयंपाक बनविल्यास ४८ मिनिटांच्या आत खा. अन्यथा यातील पोषक तत्वे नाहीशी होतील आणि त्याचा योग्य फायदा मिळणार नाही.

The benefits of eating in different types of pots

५) तज्ञांच्या अभ्यासानुसार ५० प्रकारचे रोग ॲल्युमिनियमची भांडी वापरल्याने होतात. त्यामुळे अल्युमिनियमच्या भांडयात शिजवलेले अन्न खाऊ नये. उलट मातीची भांडी वा तांब्याची भांडी वापरणे अधिक फायदेशीर असल्याचे सांगितले आहे.
मातीची भांडी – १००% पोषकतत्वं,
काशाची भांडी – ९७% पोषकतत्वं,
पितळाची भांडी – ९३% पोषकतत्वं,
अल्युमिनियमची भांडी – ७ ते १३% पोषकतत्वं
(Bad Health Habits)

६) चहा पिण्यामुळे साधारण ८० प्रकारचे आजार होतात. त्यामुळे चहा पिणे स्वास्थ्यासाठी हानिकारक असल्याचे वारंवार डॉक्टर सांगत असतात.

Tea

७) (Bad Health Habits) आहार तज्ञांच्या अभ्यासानुसार, मॅगी, गुटका, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे आतड्यांच्या समस्या वाढतात. मोठ्या आतड्याला हे पदार्थ अशी काही हानी पोहचवतात कि आतडे अकार्यक्षम होते. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळा.

८) जितकी दारू आरोग्यासाठी घातक तितकेच कोल्ड्रिंक, चहा यांचे अति सेवन करणेसुद्धा आरोग्याची हानी करू शकते. या पोंदार्थांचे सेवन केल्याने हदय रोग होऊ शकतो.

Drinking Water

९) नियमित ताजे पाणी प्या. यासाठी बाटलीबंद पाण्यापेक्षा विहीरीचे पाणी फार चांगले मानले जाते. बाटलीबंद पाणी प्यायल्याने नसांचे दुखणे वाढणे. (Bad Health Habits)

१०) गव्हाचा चीक, गव्हाचे कोंब आहारात खा. यामुळे आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढते. मात्र गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.

११) मित्रांनो, १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे कोणतेही पदार्थ देऊ नका. अन्यथा मुलांच्या पोटाचे आरोग्य बिघडते. यामध्ये बिस्किटं, समोसा असे पदार्थ येतात. (Bad Health Habits)

Side effects of salt in the diet

१२) खाण्यास सैंधव मीठ सर्वश्रेष्ठ मानले जाते. कारण साधे मीठ आरोग्यासाठी फार विषारी असल्याचे सिद्ध झाले आहे.

१३) आरोग्य तज्ञांच्या अभ्यासानुसार, १०० हुन अधिक रोग हे फक्त मांसाहाराच्या सेवनाने होतात. त्यामुळे अधिक मांसाहार करणे टाळा.

१४) माहितीनुसार, ९०% आजार हे पोटातूनच होत असतात. त्यामुळे पोट स्वच्छ राहील याकडे लक्ष द्या.

Bath

१५) अनेकांना रात्रीचे जेवण उरकल्यानंतर अंघोळ करायची सवय असते. जेवण झाल्यावर लगेच अंघोळ केल्याने शरीराचे तापमान अचानक मंदावते. ज्यामुळे पचनशक्ती मंद होते आणि आपले शरीर कमजोर होते. त्यामुळे हि सवय आताच तोडा. (Bad Health Habits)

१६) जेवताना वरुन मीठ घेण्याची सवय सोडा. यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.

१७) रोज सकाळी तुळशीचे पाने खा. असे केल्यास तुळशीतील अँटी बॅक्टरीअल गुणधर्म सर्दी, ताप, मलेरिया अशा संसर्गजन्य आजरांपासून दूर ठेवतील.

१८) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि बडिशेप खा. यामुळे व्यवस्थित अन्नपचन होईल. शिवाय चांगले चयापचय झाल्यामुळे ॲसिडिटीसारखे त्रास होत नाही.

१९) वारंवार कफ होण्याची समस्या असेल तर मुलेठी चघळा. यामुळे कफ बाहेर पडेल. छातीला आराम मिळेल आणि घास स्वच्छ होईल.

२०) अगदी कडक गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा. यामुळे शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. शिवाय डोळे आणि त्वचेची हानी होते. (Bad Health Habits)

२१) अंघोळ करताना थेट डोक्यावरून पाणी घेऊ नका. यामुळे, पॅरालिसिस तसेच हृदय रोग होऊ शकतो. त्यामुळे आधी पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर पाणी टाकत अंघोळीला सुरुवात करा म्ह डोक्यावर पाणी घ्या. यामुळे डोक्यातून रक्तसंचार पायाकडे होईल आणि याचा त्रास होणार नाही.

२२) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासा. असे केल्यास दात स्वच्छ आणि सफेद होतात. शिवाय दाताचे सर्व आजार बरे होतात. याशिवाय डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात न घासण्याचा सल्ला फायदेशीर आहे.

२३) मानवी आरोग्यासाठी जागरण नुकसानदायी ठरते. कारण फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे विविध रोग होतात.

Sleepless

२४) केस कलर करायची सवय असेल तर डोळ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते. या कलरमधील काही घटक डोळ्यांचे आरोग्य खराब करतात. त्यामुळे केसांना कलर नाही केलात तरीही चालेल.

२५) सगळ्यात महत्वाचे म्हणजे या सर्व गोष्टींचे पालन करण्यासाठी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य समजा आणि स्वतःसाठी वेळ काढा. तरच फायदा होईल. (Bad Health Habits)

‘हे’ पण वाचा :-

निरोगी आरोग्यासाठी केसरचे पाणी पिणे उत्तम; जाणून घ्या फायदे

आयुर्वेदानुसार थंड आणि गरम पदार्थ एकत्र खाण्याने शरीराचे होते नुकसान; जाणून घ्या दुष्परिणाम

अहो काय सांगता? पोटाला पण सर्दी होते?; जाणून घ्या उपाय

वाढत्या वजनाचा कशाला विचार..? डाएट फॉलो करा ब्लड ग्रुपनुसार; जाणून घ्या

जेवताना अन्न चघळून आणि पाणी सांभाळून प्या; जाणून घ्या काय सांगतात तज्ञ