Leech Bite: जळू चावल्यावर काय करावं..? जळू दिसतो कसा आणि करतो काय..? लगेच जाणुन घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। पावसाळ्याच्या दिवसात माती चिखल हे सगळं फार साहजिक आहे. (Leech Bite) पण यासोबत येते ती रोगराई, संसर्गाची लाट आणि विविध किडे, कीटक. पावसाळ्याच्या दिवसात प्रामुख्याने पाणी साचल्यामुळे विविध प्रकारचा संसर्ग पसरविणाऱ्या माशा आणि डास निर्माण होतात. याशिवाय चिखल आणि दलदल सारख्या भागातून काही दुर्मिळ प्रजातीचे कीटक वा किडे यांची पैदास वाढते. यामध्ये जळू या किड्याचा समावेश आहे.
आपल्यापैकी बऱ्याच लोकांना जळू हा किडा दिसतो कसा..? करतो काय..? आणि मुख्य म्हणजे चावला तर काय होत..? काय करावं..? याबाबत काहीही माहिती नसते. अशा प्रत्येकासाठी आजचा लेख समर्पित. कारण आज आपण जळू या किड्याविषयी सर्व माहिती घेणार आहोत.
० जळू म्हणजे काय..? तो दिसतो कसा..? आणि कुठे सापडतो..?
जळू हा एक किडा प्रजातीतील प्राणी आहे. जो अपृष्ठवंशी बाह्य परजीवी प्राण्यांपैकी एक आहे. जळूचा समावेश हा प्रामुख्याने ॲनेलिडा (वलयांकित) संघाच्या हिरुडिनिया वर्गात केला जातो. जळूच्या शरीराची लांबी १ ते २० सेंटीमीटर इतकी असते. तर ताणल्यावर त्याच्या शरीराची लांबी काही प्रमाणात वाढते. त्याच्या शरीराच्या अग्र टोकाला एक लहान चूषक असते. ज्यामध्ये त्याचं तोंड असतं. तसेच जळूच्या पश्च टोकाला मोठे चूषक असते. (Leech Bite)
संशोधनानुसार, संपूर्ण जगभरात या किड्याच्या सुमारे ३०० जाती आहेत. तसेच त्याच्या शरीरात एकूण ३३ खंड असतात. प्रामुख्याने हा किडा गोड्या पाण्यात वा जमिनीवर राहतो. तर तळी, डबकी, तलाव, दलदल याशिवाय संथ वाहणाऱ्या पाण्यातदेखील तो सापडतो. इतकेच नव्हे तर काही जळू हे मासे, बेडूक, गाय, म्हैस वा कवचधारी प्राण्यांच्या शरीरावर जगतात. तर काही जळू हे कुजलेल्या पदार्थांवर जगतात. याशिवाय काही जळूचे प्रकार हे समुद्रात किंवा जमिनीवरील दमट जागीदेखील सापडतात.
० मानवी शरीरावर जळू कसा प्रभाव करतो..? (Leech Bite)
पावसाळ्याच्या दिवसात जळूसारखे प्राणी आढळून येतात. दरम्यान हा किडा अगदी नकळत आपल्या शरीरावर चढतो किंवा आपल्या शरीराच्या एखाद्या भागाला चिकटतो. प्रामुख्याने याचे वास्तव्य पाण्यात असल्यामुळे तो पायाला चिकटण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी नकळत जळू पायाला चिटकतो आणि पायातून वाहणाऱ्या कुठल्याही नसेला एकदम घट्ट पकडतो. यानंतर आपल्या जबड्यांनी तो त्वचेवर ‘Y’ आकाराची चीर तयार करतो.
(Leech Bite) जळूच्या अन्ननलिकेत असणाऱ्या ग्रसनीभोवती असंख्य एकपेशीय लालोत्पादक ग्रंथी असतात. ज्या हिरुडिन स्रवतात. यामुळे जखम झालेला शरीराचा तो भाग काही काळासाठी बधिर होतो आणि आपल्याला कळतही नाही. यानंतर तेथील रक्तप्रवाह वाढतो आणि रक्त गोठण्याला प्रतिबंध होते. ज्यामुळे जळू आपल्या शरीरातील रक्त नकळत शोषून घेतो.
हे शोषलेले रक्त त्याच्या ग्रसनीमधून अन्नमार्गाद्वारे अन्नपुटात जाते. जळूच्या अन्नपुटाचे १० ते ११ कप्पे असतात. ज्यामध्ये त्याने शोषलेले रक्त साठविले जाते. तसेच रक्तपेशींचे विलयन होते. ज्यामुळे हीमोग्लोबिनचे द्रवात रूपांतर होऊ लागते. दरम्यान रक्तातील पाणी पूर्णपणे शोषल्यामुळे हे रक्त जेलीसारखे घट्ट तसेच काळसर रंगाचे होते. ज्यामुळे जळूचा रंगही बदलतो. जळू एकावेळी त्याच्या वजनाच्या तीनपट रक्त शोषून घेतो.
० जळू चावल्याने काय होतं..? (Leech Bite Effect)
समजा तुम्हाला जळू चावलाच तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्याचा दंश हा नकळत असतो. ज्यामुळे तो चावल्याची अनुभूती होत नाही. मात्र जळू चावलेल्या ठिकाणी बधिरता आणतो. यामुळे काहीच आणि कोणताच स्पर्श जाणवत नाही. (Leech Bite) जळू चावताना रक्त पातळ करणारे केमिकल सोडतो आणि काही वेळ तो भाग सुन्न करतो. यानंतर तो त्याच पोट भरेपर्यंत रक्त पीतो. हि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जळू फुगतो आणि मग तो भाग सोडतो. यानंतर बाधित भागातून रक्तस्त्राव होतो. शिवाय त्या जागेवर खाजदेखील येते.
० जळू चिकटल्यास काय करावे..? (Leech Bite Remedies)
मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या शरीरावर कोणत्याही भागाला जळू चिकटल्याचे निदर्शनास आले तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे, त्याला हाताने ओढून काढून टाकण्याचा प्रयत्न करू नका. असा प्रयत्न निष्फळ ठरू शकतो. कारण असे केल्याने जळू निघत नाही. शिवाय तो काढताना फार त्रासदेखील होतो. कारण जळूने त्याचे अतिशय छोटे छोटे दात त्या भागावर आत रोवलेले असतात. म्हणून अशावेळी जळूने स्वतः सोडावे असा उपाय करणे कधीही फायदेशीर ठरतो. मग जळूने स्वतःहून सोडावे यासाठी काय करायचे..? ते जाणून घ्या खालीलप्रमाणे (Leech Bite):-
१) मीठ – जर तुम्हाला तुमच्या शरीरावर कुठेही जळू चिकटल्याचे दिसून आले तर त्यावर मीठ टाका. यामुळे जळू बाधित जागा सोडेल आणि तुम्हाला जखम होणार नाही. शिवाय २ सेकंदातच तो आपली जागा सोडतो आणि खाली पडतो.
२) व्हिनेगर – व्हिनेगरचे काही थेंब जर जळूने पकडल्यास त्यावर टाकले तर जळू लगेच तो भाग सोडतो आणि तुम्हाला मुक्त करतो. (Leech Bite)
३) साबणाचे पाणी – साबणाचे पाणी हा देखील अतिशय सोप्पा आणि जलद प्रभाव करणारा उपाय आहे. जर जळूने पकडले तर त्यावर साबणाचे पाणी टाका म्हणजे तो लगेच तुम्हाला मुक्त करेल.
४) लिंबू पाणी – (Leech Bite) लिंबातील सायट्रिक ऍसिड अशावेळी प्रभावी काम करते. जळूने एखादा भाग बाधित करताना दंश केला तर त्यावर लिंबाचे पाणी ओता. ज्यामुळे काही क्षणातच जळू गळून खाली पडेल.
५) कोल्ड ड्रिंक – कोल्डड्रिंकमधील रासायनिक घटक जळूची पकड सैल करून त्याला खाली पाडतात. यामुळे जळू चिकटल्यास त्यावर कोल्डड्रिंकचा वापर करावा.
६) अल्कहोल – जळू चिकटल्यास अल्कहोलचादेखील प्रयोग करता येईल.
० जळू पडल्यानंतर प्राथमिक उपचार म्हणून काय करालं..?
आपल्या शरीराच्या कोणत्याही भागाला जळू चिकटून पडल्यानंतर त्याने केलेला ‘Y’ आकारातील छेद तसाच राहतो. ज्यामुळे त्या भागावर जखम होते. या जखमेतून भळाभळा रक्त येते आणि जळू त्याची रक्त शोषण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याआधी पडला तर हा रक्तस्त्राव लगेच थांबत नाही. (Leech Bite) जळू पडल्यानंतर हि जखम २ तास ते ३ दिवस ओली राहते. यामुळे त्यातून रक्तस्राव होत राहतो. कारण जळू ने Anti – Coaglulant सारखे रसायन शरीरात सोडून त्या जागेवरील रक्त पातळ केलेले असते. त्यामुळे रक्तस्राव सतत होतो. अशा जखमेवर हळद लाऊनदेखील फायदा होत नाही असे वाटते.
पण तरीही तज्ञ सांगतात कि, अशा जखमेवर अँटी बॅक्टेरियल गुणधर्मयुक्त हळद लावणे आवश्यक आहे.
(Leech Bite) याशिवाय हि जखम स्वच्छ करून त्यावर जखम भरून काढणारे मलम लावा.
हे मलम लावून झाल्यानंतर त्यावर कापूस लावून जखम घट्ट बांधा.
० लक्षात ठेवा :-
मलम पट्टी केलेली हि जखम पुन्हा पुन्हा उघडून पाहू नका.
तसेच या जखमेला कितीही खाज आली तरी चुकूनही खाजवू नका.
याशिवाय येत्या दिवसात कधीही शरीरावर कुठेही लाल रंगाचे विचित्र चटटे दिसले तर क्षणाचाही विलंब न करता त्वरीत डॉक्टरांना संपर्क साधा. (Leech Bite)
‘हे’ पण वाचा :-
Rainy Diseases: पावसाळ्यात संसर्गाची भीती वाटते..?; तर तज्ञांचे सल्ले फॉलो कराच
Immunity System – भाग 1: पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्ती कमकुवत का होते..?; जाणून घ्या कारणे
Healthy Vegetables: औषधी रानभाजी तांदुळजा खा आणि स्वस्थ रहा; जाणून घ्या आरोग्यवर्धक फायदे