Rainy Diseases
| | |

Rainy Diseases: पावसाळ्यात संसर्गाची भीती वाटते..?; तर तज्ञांचे सल्ले फॉलो कराच

हॅलो आरोग्य ऑनलाईन| पावसाळा म्हटलं की ताप, सर्दी, खोकला यासारखे संसर्गजन्य आजार होणं फारच साहजिक आहे. कारण पावसाळ्यामध्ये संसर्ग पसरविणाऱ्या विषाणूंना सक्रिय करणारे वातावरण असते. (Rainy Diseases) अशा वातावरणाचा सगळ्यात जास्त प्रभाव हा लहान मूल, म्हातारी माणसं आणि ज्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी असते त्यांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे पावसाळ्यात अशा व्यक्ती वारंवार आजारी पडताना दिसतात. मग त्यांच्या आरोग्याची नुसती काळजी करून कसं चालेल..? यासाठी काहीतरी ठोस उपाय करणे आवश्यक आहे. म्हणूनच आहार तज्ञांचे मोलाचे सल्ले पावसाळी दिवसात आत्मसाद करणे कधीही चांगले.

Immunity System

मित्रांनो पावसाच्या दिवसात जसे बेडूक बाहेर येऊन डराव डराव करतात तसेच पावसाच्या दिवसात आजारपण बाहेर येऊन घाबरवू लागते. त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घेणे हि प्राधान्याची बाब आहे. म्हणूनच आजचा लेख हा अतिशय महत्वाचा आहे. चला तर जाणून घेऊ पावसाळ्यात आजारपण येण्याची मुख्य कारणे आणि त्यावर प्रतिबंध करणारे सोप्पे उपाय.

० पावसाळ्यात आजारपण का येते..? (Rainy Diseases)

पावसाळा सुरू झाला की, साहजिकच आपल्याला घरातील लहान मूल आणि वृद्ध व्यक्तींची आपल्याला काळजी वाटू लागते. कारण पावसाच्या सरी कितीही हव्याहव्याशा असल्या तरीही बदलणारं वातावरण सहन होईलच अस नाही. (Rainy Diseases) दरम्यान पावसाळी हवेत असणारा गारवा, दमटपणा आणि ओलाव्यामुळे विविध आजार पसरविणाऱ्या डासांची पैदास होत असते. हे डास चावल्याने डेंग्यू, मलेरीया, फ्ल्यू सारखे आजार होतात. याशिवाय पावसाच्या दिवसात हवेशिवाय पाण्यातूनदेखील संसर्ग होतो. कारण पाण्यातही होणारा बदल हा शरीरावर प्रभाव करतो.

These are the things that cause illness

खराब पाण्यामुळे पोटाचे आरोग्य बिघडते. घशाचे विकार होतात. याशिवाय कावीळ, आतड्यांचे आजार अशा समस्या निर्माण होतात. या सगळ्यापासून सुरक्षित राहायचे असेल तर, आपली रोग प्रतिकारशक्ती ही उत्तम आणि चांगली असणे अत्यंत आवश्यक आहे. पण पावसाळी हवामान शरीरात सुस्तपणा आणते. शिवाय रोगांशी सामना करण्याची क्षमता देखील या दिवसात कमी असते. पावसामुळे अनेक प्रकारचे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते आणि म्हणून अशा दिवसात आरोग्याची काळजी घेणे जास्त गरजेचे असते. (Rainy Diseases)

तुम्हाला काय वाटतं…?

आजारपणाचं कारण काय फक्त डासांचे चावणे, खराब पाणी, दमट हवामान हे एव्हढंच आहे..? तर नाही. तुम्ही समजताय ते अतिशय चुकीचं आहे. तुमची खराब जीवनशैली तुमच्या आरोग्यावर परिणाम करत असते, असे तज्ञ सांगतात. उत्तम आहार, नियमित व्यायाम आणि चांगली जीवनशैली यामुळे तुमची रोग प्रतिकार मजबूत होऊ शकते. (Rainy Diseases)

तसेच पावसाच्या काळात रोग प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी आहारात काही बदल आवश्यक आहेत. हे बदल आपल्याला माहीतच असतील असे काही नाही. म्हणून आज आपण आहार तज्ञांनी नमूद करून दिलेल्या पदार्थांविषयी जाणुन घेणार आहोत. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून हे पदार्थ आपल्या आहारात असायला हवेत असे तज्ञांनी सांगितले आहे तर हे पदार्थ कोणते आहेत ते लगेच जाणून घेऊया.

Home Remedies For Rainy Disease

पावसाळ्याच्या दिवसात ‘हे’ पदार्थ खा

१) कोमट पाणी – पावसाळ्यातील हवामान शरीराला बऱ्यापैकी कमकुवत बनवीत असते. त्यामुळे अशा दिवसात आजारी पडल्यावर लवकर आजारपण सुटत नाही. म्हणून आपण आजारी पडणार नाही यासाठी दक्षता घायवी असे तज्ञ सांगतात. पावसाळ्यात पाण्यातून संसर्ग होण्याची शक्यता असते. म्हणून पाणी नेहमी गरम करून प्या. गरम केलेले पाणी मठात भरून कोमट वा झाल्यानंतर ते पिणे लाभदायी ठरेल. (Rainy Diseases)

Drinking Water

आजारी पडल्यावर भरपूर पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय उत्तम असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. कारण भरपूर पाणी प्यायल्याने लघवीचे प्रमाण चांगले राहते. याचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. आपली तब्येत लवकर बरी होण्यास मदत होते. दरम्यान आजारपणात लघवीचा रंग पांढरा स्वच्छ असेल याची काळजी घ्या. जास्त पाणी प्यायल्यास लघवी चांगली होण्यास मदत होतेच पण लघवीचा रंग काहीसा पिवळट वा गडद पिवळा असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 
२) घरगुती काढा – आजारपणात प्रत्येक वेळी डॉक्टरांची कडू औषधे, इंजेक्शन किंवा सलाईनच लावायला हवी असे काही नाही. याऐवजी नैसर्गिक औषधींचा वापर करून घरगुती पद्धतीने बनविलेला काढा घेणेही लाभदायी आहे. यासाठी,
१ ग्लास पाणी,
१ ग्लास दूध,
चिमूटभर हळद
२ ते  ३ काड्या केशर
जायफळ,
गूळ हे जिन्नस घ्या. (Rainy Diseases)

Tulsi-Ginger Kadha

आता हे सर्व पदार्थ गॅसच्या मंद आचेवर चांगले उकळून घ्या. हे उकळल्यावर यामध्ये जायफळ पावडर आणि चवीपुरता गूळ घाला. आता हे मिश्रण गार झाल्यावर किंवा गरम असतानाच त्याचे सेवन करा. यामुळे शरीराचा दाह होत असेल तर तो कमी होण्यास मदत होईल. शिवाय संसर्ग दूर होण्यासही मदत होईल.

३) तांदळाची पेज – आजारपणात आपला आहार हलका, सकस आणि पौष्टिक असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तज्ञ सांगतात कि, आजारपणात तांदळाच्या कण्यांपासून केलेली पेज किंवा कांजी खा. पावसाळ्याच्या दिवसात हा आहार अतिशय फायदेशीर आहे. भरपूर पाणी घालून केलेली ही पातळसर पेज सैंधव मीठ, हिंग आणि तूप घालून गरमागरम प्या. (Rainy Diseases)

Rice Water

यामुळे जुलाब तसेच डिहायड्रेशनचा त्रास होत नाही आणि झाल्यास त्याचा त्रास कमी होतो. इतकेच काय तर तांदळाची पेज पचनशक्ती सुधारण्यासदेखील चांगली मदत करते. तसेच इलेक्ट्रोलाइटस कमी झाले असतील तर शाररिक ताकद वाढवण्यासाठी मदत करते.

४) गुलकंद – गुलकंद हा गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केला जाणारा एक गोड पदार्थ आहे. प्रामुख्याने गुलकंद सेवन करण्यासाठी उन्हाळ्याचे दिवस योग्य मानले जातात. त्यामुळे उन्हाळ्यातच गुलकंद आवर्जून खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण गुलकंद खाल्ल्याने शरीर थंड राहते आणि शरीराचा दाह कमी होतो. (Rainy Diseases)

Gulkand

शिवाय गुलकंद चवीला गोड असल्याने अॅसिडीटी, अपचन आणि अशक्तपणा कमी करण्यास मदत करतो. यासाठी नियमित १ चमचा गुलकंद खाणे फायदेशीर आहे. याशिवाय पावसाळ्याच्या दिवसांत होणाऱ्या डेंग्यू, मलेरीया यांसारख्या आजारांपासून गुलकंद खाणे फायदेशीर आहे.

५) आले पाक – आल्याचे सेवन हे पावसाळ्याच्या दिवसात आवर्जून करण्याचा सल्ला तज्ञ देतात. कारण आल्यातील अँटी बॅक्टरीअल गुणधर्म हे शरीराला संसर्गापासून वाचवतात. विषाणू शरीरावर मारा करण्याआधीच आल्याचे सेवन केल्यामुळे आपली रोग प्रतिकार शक्ती विषाणूंशी दोन हात करायला सक्षम झालेली असते.

Aalepak

त्यामुळे पावसाळ्यात आल्याचा चहा, आल्याचा काढा आणि आलेपाक खाणे लाभकारी मानले जाते. आलेपाक हा एक गोडाचा पदार्थ असून यामध्ये गुळाचाही तितकाच वापर केलेला असते. ज्यामुळे रोग प्रतिकार शक्तीसोबतच अशक्तपणा दूर करण्यास आलेपाक सहाय्यक आहे. (Rainy Diseases)

‘हे’ पण वाचा:-

Home Remedies For Rainy Disease: पावसाळ्याचं आगमन सोबत आणतं आजारपण; जाणून घ्या पावसाळी आजारांवर घरगुती उपाय

Healthy Vegetables: औषधी रानभाजी तांदुळजा खा आणि स्वस्थ रहा; जाणून घ्या आरोग्यवर्धक फायदे

Ginger Benefits: पावसाळ्यात आल्याचे सेवन देई संसर्गापासून संरक्षण; जाणून घ्या फायदे

Home Remedies For Cough: कफामुळे छाती लागली दुखू..? करा घरगुती उपाय आणि मिळवा आराम; जाणून घ्या