Immunity System

Immunity System – भाग 1: पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्ती कमकुवत का होते..?; जाणून घ्या कारणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। (Immunity System) सध्या पावसाळ्याचा मौसम सुरु आहे. पावसाळा म्हटलं कि ओलेचिंब होणे, मनसोक्त भिजणे आणि बहारदार मौसमाचा अनुभव घेणे. पण पावसाळा म्हणजे एव्हढंच का.? तर नाही. पावसाळा म्हणजे संसर्गाची भीती. संसर्ग कसा होतो..? साहजिकच तुमची जर रोगांशी लढण्याची क्षमता कमी असेल किंवा कमकुवत असेल तर तुम्ही आजारी पडता. यालाच रोग प्रतिकार शक्ती कमकुवत असणे असे म्हणतात.

पावसाळा हा उन्हाळ्यातील उष्णतेपासून सुटका देणारा एक सुखद बदल असला तरीही तो सोबत येताना विविध प्रकारचे आजार घेऊन येतो. (Immunity System) कुणालाही कितीही पाऊस आवडत असला तरीही तो तापमानातील बदल, बॅक्टेरिया आणि विषाणूंसह येतो. याचा रोग प्रतिकार शक्तीवर गंभीर परिणाम होतो. ज्यामुळे सर्दी, ताप, फूड पॉइझन असे आरोग्यविषयक त्रास होतात.

Immunity

प्रत्येक घरातील स्त्री पावसाळ्याकडे भीतीने पाहते. कारण या दिवसात आजारपण अतिशय वेगाने पसरते. यामुळे घरातील लहान मुले, वृद्ध व्यक्ती लवकर आजारी पडतात. तर आज आपण भाग १ मध्ये पावसाळ्याच्या दिवसात रोग प्रतिकारशक्ती कमकुवत का होते..? हे जाणून घेणार आहोत. यानंतर भाग २ मध्ये आपण रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यास त्यावरील उपाय जाणून घेऊ.

० रोग प्रतिकारशक्ती म्हणजे काय?

रोग प्रतिकार शक्ती हि एक जटिल, बहुस्तरीय यंत्रणा आहे. जी सक्रिय झाल्यावर, शरीर मजबूत आणि विविध बाह्य प्रभावांना प्रतिरोधक बनते. (Immunity System) यामुळे व्हायरस आणि विविध उत्पत्तीच्या संसर्गापासून शरीराचे संरक्षण होते. शिवाय ऑपरेशन आणि गंभीर आजारांनंतर शरीराला पुनर्प्राप्तीसाठी रोग प्रतिकार शक्तीच मदत करते.

Immunity

० रोग प्रतिकार शक्ती महत्त्वाची का आहे?

वातावरणातील हवा ही प्रदूषणयुक्त घटक आणि कार्बन डायऑक्साइडने भरलेली असते. यात पाऊस पडला की हवेतील विषारी घटक खाली येतात. शिवाय, पावसामुळे हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे थंडी निर्माण होते. (Immunity System) अशा हवामानात हानिकारक विषाणू आणि जीवाणूंची वेगाने वाढ होते. यामुळे आजारी पडण्याची शक्यता वाढते. शिवाय, पावसामुळे अस्वच्छता देखील निर्माण होते. ज्यामुळे मलेरिया आणि डेंग्यू होऊ शकतो.

हे आजार इतके त्रासदायी असतात कि यामध्ये अनेकदा रुग्ण दगावू शकतो. त्यामुळे हवेत बॅक्टेरिया आणि विषाणूंचे प्रमाण जास्त असेल तर स्वतःची काळजी घ्यावी लागते. अन्यथा विविध आजार होऊ शकतात.

Rainy Diseases

० पावसाळ्यात रोग प्रतिकार शक्ती कमकुवत होण्याची कारणे
(Immunity System)

१) खराब पाणी – पावसाळ्यात पाण्याची गुणवत्ता खालावते. ज्यामुळे विविध संसर्गाचा फैलाव होतो. मानवी शरीराचा अधिकतम भाग हा पाण्याने भरलेला असल्यामुळे खराब पाणी रोग प्रतिकार शक्तीवर लगेच गंभीर परिणाम करते.

Food Poison

२) चूकीचा आहार – रोगप्रतिकारशक्ती उत्तम ठेवण्यासाठी चांगला आहार महत्वाचा आहे. त्यात पावसाळी दिवसात आहाराची अधिक काळजी घ्यावी लागते. कारण जर आहार चुकला तर १००% रोग प्रतिकार शक्तीवर परिणाम होतो.

३) पोटांचे विकार – (Immunity System) काही लोकांना पोटाच्या समस्या खूप असतात. जसे कि, वारंवार जुलाब होणे, बद्धकोष्ठता, गॅस, अपचन. यामुळे पावसाळ्यात पोटाच्या समस्या आणखीच वाढतात. याचा परिणाम थेट रोग प्रतिकार शक्तीवर होतो.

Stomach Pain

कारण तुमची पचनक्रिया जेवढी चांगली असेल तेवढी तुमची रोग प्रतिकारशक्ती अधिक चांगली असते. पण ज्यांना पोटाचे विकार असतात त्यांची मुळातच रोग प्रतिकार शक्ती कमकुवत असल्यामुळे पावसाळ्यात आणखीच त्रास होतो.

Weakness

४) मरगळ किंवा थकवा – काही लोकांच्या शरीरात व्हिटॅमिनची कमतरता असते. ज्यामुळे शारीरिक थकवा आणि मरगळ अशा लोकांच्या शरीरात कायम असते. (Immunity System) व्हिटॅमिनची कमतरता हळूहळू रोग प्रतिकार शक्तीवर घात करते आणि ज्यामुळे शरीराची उर्जा पातळी संघर्ष करते. त्यात पावसाळ्यातील हवामान शरीरात मरगळ तयार करते. ज्यामुळे साहजिकच रोग प्रतिकार शक्ती कमकुवत होते.

५) जखमा – शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्यामागे शरीरावरील जखमा देखील कारणीभूत असतात. कारण शरीरावरील जखमा या विविध कारणांमुळे झालेल्या असू शकतात. त्या जखमा बऱ्या होण्याची प्रक्रिया निरोगी रोगप्रतिकार पेशींवर अवलंबून असते. कानात जंतु संसर्ग, न्युमोनिया, क्रोनिक सायनुसायटिस अशा आरोग्य समस्या झाल्यास अशा पेशींना जास्त कार्य करावे लागते. परिणामी त्यांची क्षमता हळूहळू कमी होते. (Immunity System)

‘हे’ पण वाचा :-

Rainy Diseases: पावसाळ्यात संसर्गाची भीती वाटते..?; तर तज्ञांचे सल्ले फॉलो कराच

लहान मुलांच्या आहारात असतील ‘हे’ पदार्थ तर रोगप्रतिकारक शक्ती सहज वाढेल; जाणून घ्या

झोपण्यापूर्वी या सवयी असतील तर रोगप्रतिकार शक्ती होईल कमकुवत; जाणून घ्या

कल्पवृक्ष शेवगा!!! शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच आणखी  ‘हे’ आहेत औषधी गुणधर्म

Copper Ring Benefits: तांब्याची अंगठी ‘या’ बोटात घालाल, तर अशांत मन होईल शांत; जाणून घ्या फायदे

वयाच्या ४० शी नंतर रोगप्रतिकार वाढवण्यासाठी ‘हे’ करा