Healthy Vegetables
|

Healthy Vegetables: औषधी रानभाजी तांदुळजा खा आणि स्वस्थ रहा; जाणून घ्या आरोग्यवर्धक फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। (Healthy Vegetables) मस्त आणि स्वस्थ जगण्यासाठी काय करायचं.? हा अतिशय सामान्य प्रश्न आहे जो प्रत्येकाला पडलेला असतो. कारण स्वस्थ आणि निरोगी रहायला कुणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडत. त्यामूळे निरोगी राहण्यासाठी सतत आपण काही ना काही धडपड करतच असतो. यासाठी उत्तम जीवनशैली, सकस आहार आणि निरोगी सवयी असणे गरजेचे आहे. पण आजकालची जीवनशैली पाहता स्वस्थ जगणे फार कठीण झाले आहे असेच भासते. म्हणूनच आज आपण आहाराच्या माध्यमातून शरीराची काळजी घेणाऱ्या एका भाजीबद्दल माहिती घेणार आहोत. जिचे नाव तांदुळजा असे आहे.

मित्रांनो त्याच काय आहे माहितेय, आपला आहार हा आपल्या शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर प्रभाव करीत असतो. म्हणून तज्ञ सांगतात कि शक्यतो घरगुती आहाराचेच सेवन करा. बाहेरचे खाद्य पदार्थ प्रत्येक वेळी आरोग्यासाठी चांगलेच असतील याची शाश्वती कधीच नसते. याशिवाय आपला आहार हा आरोग्यासाठी लाभकारी असावा असे नेहमीच तज्ज्ञ सांगतात. सध्या पावसाळी हंगाम सुरु आहे. अशा हंगामात विविध प्रकारच्या भाज्या मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होत असतात. मोसमी भाज्या खाण्याची मजा आणि लज्जत काही औरच असते. त्यामुळे पावसाळ्यात पावसाळी भाज्या जरूर खा. अशा भाज्यांपैकी एक औषधी भाजी आहे तांदुळजा. (Healthy Vegetables)

तांदुळजा या भाजीबद्दल तुम्हाला माहीतच असेल असे नाही. मात्र हि भाजी खाण्यासाठी जितकी चविष्ट तितकीच आरोग्यासाठी उत्तम आहे हे जाणून घ्या. तांदुळजा ही भारतातील वातावरणात उगवणारी एक अशी भाजी आहे जिचे गुणधर्म आयुर्वेदीक औषधीसारखे आहेत. या भाजीचे सेवन केल्यास शरीरात सी जीवनसत्त्व वाढीस लागते. तसेच ही भाजी मधुर गुणांनी समृद्ध असते. त्यामुळे चवीलाही उत्तम. शिवाय उष्णतेच्या तापात विशेषतः गोवर कांजण्या व तीव्र ताप हा आजारात हि भाजी फारच प्रभावीपणे काम करते.

Healthy Vegetables

(Healthy Vegetables) तांदुळजा विष विकारी, नेत्र विकारी, पित्त विकारी, मूळव्याध, यकृत व पाथारी वाढणे अशा विविध विकारांत पथ्यकर आहे. शिवाय उपदंश, महारोग, त्वचेचे विकार यामध्ये दाह कमी करणे, उष्णता कमी करणे यामध्ये तांदुळजा फार उपयुक्त आहे. इतकेच नाही तर अगदी नाजूक प्रकृतीच्या व्यक्ती तसेच बाळंतीण, गरोदर स्त्रीया यांच्यासाठी हि भाजी वरदान आहे. म्हणूनच तांदुळजा या भाजीचा उल्लेख आहार तज्ञांकडून औषधी भाजी म्हणून केला जातो. जर तुम्हाला तांदुळजा भाजीचे फायदे माहित नसतील आणि म्हणून तुम्ही हि भाजी खात नसाल तर आताच या भाजीचे गुणधर्म जाणून घ्या आणि हि भाजी आहारात समाविष्ट करा.

० तांदुळजाविषयी खास माहिती (Healthy Vegetables)

तांदुळजा भाजीला काही ठिकाणी चवळई वा चवळीची पाले भाजी म्हणून ओळखले जाते. विविध रोगांवरील प्रभावी औषधात तांदुळजा ही भाजी वापरली जाते. मुख्य म्हणजे पावसाळ्यात या भाजीचे उत्पादन अधिक असले तरीही तांदुळजा विविध ठिकाणी बाराही महिने उगवते. (Healthy Vegetables) या भाजीची पाने मध्यम आकारातील लहान असतात आणि उंचीने ती दोन-तीन वीत इतकीच वाढतात. तांदुळजा भाजी हि पचायला हलकी, थंड व रुचकर असते. यामुळे पित्तदोष, कफदोष आणि रक्त दोषात हि भाजी हितकर आहे.

Healthy Vegetables

० तांदुळजा खाण्याचे फायदे

(Healthy Vegetables)

१) दाह कमी करते – तांदुळजा भाजी म्हणजे ताप कमी करणारी भाजी आहे. तसेच अग्नी प्रदीप्त करणारीही आहे. त्यामुळे ताप आलेला असताना तांदुळजाची भाजी खाण्याने ताप कमी होतो, भूक सुधारते, तोंडाला चव येण्यास मदत मिळते.

(Healthy Vegetables) तांदुळजाची भाजी आहारात असल्यास तिचा थंडपणा हातापायांची जळजळ, लघवीला दाह, डोळे लाल होणे वगैरे तक्रारींवर फायदेशीर आहे. यासाठी तांदुळजाचा २-३ चमचे रस, खडीसाखर व तूप मिसळून घ्या किंवा कापलेली भाजी परतून वरून सैंधव, मिरे, आले वगैरे घालून भाजी खा. असे केल्यास यातील गुणधर्म द्विगुणित होतील.

२) पोटासाठी हितकारी – तांदुळजा पोट साफ होण्यास मदत करते आणि अतिसारनाशक असल्यामुळे जुलाबदेखील थांबवते. थोडक्यात पोट साफ व्हावे त्यासाठी तांदुळजाची भाजी उत्तम आहे.

३) पित्ताच्या त्रासावर प्रभावी – अंगावर पित्ताच्या गांधी उठत असल्या, पित्तामुळे पुळ्या येत असल्या, खाज येत असली तर त्यावर मसुराचे पीठ, ज्येष्ठमध, अनंतमूळ, वाळा यापैकी मिळतील ती द्रव्ये समभाग एकत्र करून ठेवावीत. स्नानाच्या वेळी मिश्रणातील दोन चमचे चूर्ण तांदुळजाच्या रसात मिसळावे व साबणाच्या ऐवजी वापरावे. (Healthy Vegetables)

Healthy Vegetables

४) वातावरणातील बदलांवर परिणामकारक – पावसाळयात हवेतील प्रदूषण, पाण्यातील दोष यामुळे शरीरात जाणाऱ्या विष तत्त्वांचा वेळीच निचरा होण्यासाठी तांदुळजा आहारात समाविष्ट करणे वा तांदुळजाच्या पानांचा रस काढून तो तुपासह घेणे चांगले असते.

५) लघवी साफ होते – तांदुळजा भाजीचे सेवन लघवी साफ होण्यास मदत करते. जर लघवी कमी होत असेल वा अडखळत असेल तर तांदुळजाची भाजी आणि भाकरी खाण्याचा सल्ला तज्ञ देतात.

६) भाजलेल्या जखमांवर आरामदायी – भाजल्याने होणाऱ्या जखमेवर तांदुळजाचा रस वा तांदुळजाच्या रसात हळकुंड उगाळून लावल्यास दाह शांत होतो. तसेच जखम लवकर भरते. (Healthy Vegetables)

Healthy Vegetables

७) गर्भासाठी फायदेशीर – तांदुळजाचे मूळ गर्भाशयावर औषधाप्रमाणे उपयोगी असते. विशेषतः गर्भाशयातील उष्णता कमी होण्यासाठी तांदुळजाचे मूळ तांदुळजाच्या धुवणात उगाळून तयार केलेली पेस्ट रोज १ चमचा या प्रमाणात घेण्याचा उत्तम फायदा होतो. गर्भारपणात रक्तस्त्राव होतो त्यावरही तांदुळजाचे मूळ वाटून तयार केलेली चटणी एक-एक चमचा प्रमाणात दिवसातून दोन-तीन वेळा घेता येते.

८) बाळंत महिलेसाठी फायदेशीर – बाळंतीणीला दूध वाढवण्यास तांदुळजा ही भाजी उपयोगी असते.

९) मासिक पाळीच्या त्रासात आराम – मासिक पाळी न येणे, लवकर येणे, अंगावरून जास्त प्रमाणात व जास्त दिवस जाणे, अधून मधून काळपट जाणे या सर्व तक्रारींवरही ही तांदुळजाची पेस्ट फायदेशीर आहे. (Healthy Vegetables)

Healthy Vegetables

१०) विषनाशक औषधी – तांदुळजाचा सर्वांत महत्त्वाचा गुण म्हणजे ती विषनाशक आहे. कोणतेही सौम्य विष पोटात गेले तर तांदुळजाची भाजी खाणे हितावह असते. तसेच विषारी प्राणी चावल्यास त्याचे विष शरीराबाहेर निघून जावे यासाठी तांदुळजा उपयोगी असतो. म्हणून विंचू, उंदीर, गांधीलमाशी, मधमाशी वगैरेंच्या दंशावर तांदुळजाच्या मुळाचा रस काढून तो तूप-साखरेसह काही दिवस घेणे चांगले असते.

११) अँटिबायॉटिक तांदुळजा – अँटिबायॉटिक, स्टिरॉइडस्, वेदनाशामक गोळ्या घेण्याची गरज न पडणे सर्वोत्तम, मात्र काही अपरिहार्य कारणाने अशी तीव्र औषधे घ्यावी लागली असतील तर ती घेताना तांदुळजाच्या भाजीचा आहारात समावेश करणे आणि औषध घेऊन झाल्यावर रोज दोन-तीन चमचे प्रमाणात तांदुळजाच्या पानांचा रस त्यात खडीसाखर मिसळून घेणे उत्तम होय. जितके दिवस औषधे घेतली असतील त्याच्या दुप्पट दिवसांपर्यंत हा रस घेणे चांगले होय.

१२) मलविरोधापासून आराम – तांदुळजा भाजीचे सेवन केल्याने कितीही जुनाट मलावरोध विकार असला तरीही दूर होतो. कारण या भाजीचे सेवन आतड्यात चिकटून राहिलेला मळ सुटा व्हायला मदत करते. यामुळे मलनिस्सारण व्यवस्थित होते आणि आराम मिळतो. (Healthy Vegetables)

‘हे’ पण वाचा:-

Vegetarian Protein Sources : प्रथिनांची कमतरता भरून काढतील ‘हे’ 10 व्हेज पदार्थ; जाणून घ्या

Home Remedies For Rainy Disease: पावसाळ्याचं आगमन सोबत आणतं आजारपण; जाणून घ्या पावसाळी आजारांवर घरगुती उपाय

7 Day Healthy Meal Plan: हेल्दी रहायचंय..? तर हेल्दी डाएट करा ना; जाणून घ्या आठवड्याचा मिल प्लॅन

Healthy Fruits : ‘हि’ फळे खालं तर, पोटाच्या तक्रारी राहतील दूर; जाणून घ्या