Clay Pot Water Benefits
|

Clay Pot Water Benefits: उकाड्यात माठातले पाणी पिताय..? तर ‘हि’ माहिती जरूर वाचा

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Clay Pot Water Benefits राज्यात सूर्याची तीव्रता पाहता अंगाची नुसती लाही लाही होतेय. एकीकडे हवामान खाते रोज मान्सूनचा अंदाज वर्तवित असूनही सूर्याचा कोप काही केल्या कमी होईना. उलट गरमी आणखीच वाढली आहे आणि यामुळे शरीराचे तापमानही अतिशय वाढले आहे. खरतर काही भागांमध्ये अवकाळी पाऊस कायम आहे तर काही भागात सूर्याची उष्णता कायम आहे. अशा दिवसात आरोग्याला कितीही जपा नुकसान होतेच. अशा जीवघेण्या उकाड्यात शरीराला थंडावा मिळावा म्हणून सतत पाणी प्यावे वाटते. कारण उन्हामुळे शरीराचे तापमान वाढते आणि परिणामी घाम येतो. या घामावाटे शरीरातील पाणी उत्सर्जित होते आणि कमीकमी होऊ लागते.

Clay Pot Water Benefits

मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसात घरात पाय टाकल्याक्षणी पाणी प्यावेसे वाटणं साहजिक आहे. (Clay Pot Water Benefits) पण म्हणून फ्रिजमधील पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले नाही. म्हणूनच अशा दिवसांमध्ये घरात मातीचा माठ आणला जातो. रोज रात्री माठात पाणी गरम करून भरून ठेवले कि सकाळी माठातील पाणी अगदी फ्रिजसारखे थंडगार होते. त्यामुळे सतत तहान लागली आणि पाणी प्यायलो तरीही काही त्रास होत नाही. असे तज्ञ स्वतः सांगतात.

तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, माठातील पाणी हे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. फ्रिजमधील पाणी प्यायल्याने अनेकदा सर्दी आणि घश्याचे त्रास होतात. पण माठातले थंडगार पाणी प्यायल्याने अशा कोणत्याही समस्या होत नाहीत. शिवाय लहान मुलांना तर फ्रिजमधील थंड पाणी सहनच होत नाही. मग अशावेळी माठ हा उत्तम पर्याय आहे.

अतिशय पूर्वीच्या काळात कोणत्याही प्रकारचे फ्रिज नव्हते. पण तरीही थंडगार सरबत प्यायले जायचेच ना. ते कसे..? तर याचेही उत्तर माठ असे आहे. याशिवाय आरोग्यदायी फायद्यांसाठीसुद्धा मातीच्या माठातले पाणी प्यायले जायचे. आजही अनेक भागात अजूनही मातीच्या माठात पाणी साठवू प्यायले जाते. कारण हे पाणी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत योग्य आणि फायदेशीर समजले जाते. नैसर्गिकरित्या थंड झालेल्या या पाण्याची एक वेगळी चवसुद्धा असते. मातीच्या भांड्यातून पाण्याला लाभलेले हे पोषण आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. आज आपण तज्ञांनी माठातील पाण्याविषयी सांगितलेल्या काही महत्वाच्या गोष्टींविषयी जाणून घेणार आहोत. (Clay Pot Water Benefits)

Drinking Water

० माठातले पाणी का प्यावे..?

आधी जुन्या काळात मातीच्या भांड्यांचा वापर अन्न शिजवण्यासाठीदेखील केला जायचा. पण आजकाल मातीची भांडी फारशी कुणी वापरात नाही. आजकाल नॉनस्टिक आणि अल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर सर्रास झाला आहे. पण तज्ज्ञ सांगतात कि, तांब्याची किंवा मातीची भांडी हि अन्न शिजवण्यासाठी अधिक लाभदायी आहेत. याशिवाय पाणी प्यायचे असेल तर ते माठातलेच प्यावे. याचे कारण सांगताना तज्ञांनी केलेल्या अभ्यासातून उत्पन्न झालेल्या माहितीच्या आधारे सांगितले कि, मातीच्या भान्ड्यात साठवलेले पाणी प्यायल्याने शरीराला फायदा मिळतो. (Clay Pot Water Benefits)

Clay Pot Water Benefits

मातीमध्ये अनेक रोगांशी लढण्याची पूर्ण क्षमता असते. यामुळे एकतर शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते आणि मातीच्या माठातून बाहेर आलेल्या पाण्याच्या थेंबाच्या बाष्पीभवनाची प्रक्रिया होत असते. ज्यामुळे आपोआपच पाण्याचे तापमान हे थंड राहते. जितके बाष्पीभवन अधिक तितके पाणी थंड. त्यामुळेच माठाच्या तळाशी पाणी नेहमी झिरपत असल्याचे तुमच्या निदर्शनास येईल. याशिवाय माठातील पाणी अधिक थंड हवे असल्याचं कॉटनचे कापड ओले करून ते माठावर लावून ठेवावे. असे केल्याने माठातील पाणी नैसर्गिकरित्या अधिक थंड होते. ज्याचा शरीराला अधिक फायदा होतो. म्हणून उन्हाळ्यात माठाचे पाणी पिणे चांगले असते.

(Clay Pot Water Benefits) याशिवाय मातीच्या भांड्यामध्ये विशेष गुणधर्म समाविष्ट असतात. शिवाय माती मुळातच थंड प्रवृत्तीची आणि मुख्य म्हणजे पाणी शोषून घेण्यात सक्रिय असते. ज्यामुळे मातीचे भांडे मुळातच अतिशय थंड असते. ज्यामुळे मातीच्या भांड्यात साठवलेले पाणी कोणत्याही यंत्रणेशिवाय आणि मुख्य म्हणजे विजेच्या वापराशिवाय नैसर्गिकरित्या थंड होते.

० माठातील पाणी उकाड्यात प्यायल्याने काय फायदे होतात..? (Clay Pot Water Benefits)

मातीचे भांडे घावताना त्यामध्ये ८० ते ८५ टक्के पाण्याचा वपोर केलेला असतो. ज्यामुळे माती थंड आणि पक्की होते. त्यामुळॆ अशा मातीच्या भांड्यात पाणी साठवल्यास त्यात नैसर्गिक गुणांची मुळातच उपस्थिती असते. जी पाण्याला विशेष गूण पुरविते. ज्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य आणि आरोग्यदायी ठरते. तर माठातील पाणी पिण्याचे अनेक असे फायदे आहेत. तज्ज्ञ कोणकोणते फायदे सांगतात ते पाहूया:-

१) माठातील पाणी शरीराला थंडावा देण्यासाठी उपयुक्त ठरते.
२) माठातील पाणी प्यायल्याने पोट थंड राहते आणि तहानही भागते. ज्यामुळे पोटात गरमी साठत नाही.
३) माठातील पाणी नियमित प्यायल्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते कारण यातील नैसर्गिक पोषण तत्त्व अनेक रोगांपासून दूर राहण्यास मदत करतात.
(Clay Pot Water Benefits)
४) माठातील पाण्याचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया अधिक मजूबत होते. शिवाय चयापचय क्रिया सुधारते. यामुळे शरीरात अन्नातील आवश्यक तत्त्वे साठवून अतिरिक्त वाईट घटक शरीराबाहेर उत्सर्जित होण्यास मदत होते.


५) अनेकदा तुम्ही ऐकले असाल कि, फ्रिजमधील पाणी प्यायल्याने वजन वाढते. मात्र माठातील पाणी नैसर्गिक थंडावा देत असल्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
६) माठातील पाणी शरीरात साठलेले विषारी पदार्थ तसेच बॅड कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी खूपच मदत करते.
(Clay Pot Water Benefits)
७) माठातील पाणी पिण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पोटाशी संबंधित सर्व आजार दूर होतात. शिवाय पित्त वा पोटात मुरड येत असेल तर ते दूर करण्यासाठी हे पाणी नियमित पिणे फायदेशीर आहे.
८) माठातील पाण्याचे सेवन करणे सन स्ट्रोकपासूनही बचाव करते. यामुळे उन्हाळ्यात कोणतेही त्रास होत असतील तर माठातील पाण्याचे सेवन करावे.
(Clay Pot Water Benefits)

‘हे’ पण वाचा:-

Eating Ice Cream In Summer उन्हाळ्यात आईस्क्रीम खाताय..? सावधान! होऊ शकतात गंभीर समस्या; जाणून घ्या

Summer Care Tips For Babies उन्हाच्या तीव्रतेपासून बाळाचे करा रक्षण; जाणून घ्या टिप्स

Satu Pith Benefits : ‘या’ पिठाचे सेवन कराल तर 70% गरमीचे त्रास राहतील दूर; जाणून घ्या

Sugarcane Juice Benefits: फक्त 1 ग्लास उसाचा रस प्यायल्याने होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या

Summer Skin Care उन्हामुळे स्कीन ग्लो कमी झाला..? तर ‘या’ टीप्स जरूर वापरा; जाणून घ्या