Cold Milk Benefits : थंड दुध प्यायल्याने गरमीचा त्रास होईल छू मंतर; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। Cold Milk Benefits बहुतेक लोकांना दूध पिणे अजिबात आवडत नाही. त्यामुळे अगदी सहजपणे दुधाकडे दुर्लक्ष केलं जात. तर काही लोकांना दुधावरची साय फार आवडते पण दूध प्यायचं म्हटलं कि हे बिलंदर गायब होतात. याशिवाय अशीही काही लोक असतात ज्यांना दुधाचा चहा आवडतो पण नुसतं दूध.. छे! या सवयींमूळे होत काय कि, दूध विविध आहाराच्या संयोजनासह पोटात जात. यामुळे दुधाचा फारसा लाभ होत नाही. अशा संयोजनामुळे दुधामध्ये समाविष्ट असलेले अनेक घटक जे आरोग्यासाठी फायदेशीर भूमिका निभावतात ते प्रभावीरीत्या काम करु शकत नाहीत.
मैत्रिणींनो तुमच्या मुलांच्या आहारातील अत्यंत महत्वाचा घटक म्हणून दुधाकडे पाहिले जात असूनही जर दुधाचा फायदा होत नसेल तर कसे चालेल बरं..? (Cold Milk Benefits) शिवाय दूध जितके लहान मुलांसाठी फायदेशीर तितकेच वृद्ध व्यक्तींसाठीसुद्धा फायदेशीर असते. यामध्ये प्रथिने, मॅग्नेशियम, कॅल्शियम, जस्त, व्हिटॅमिन डी आणि पोटॅशियमने असे अनेक आरोग्यदायी घटक समाविष्ट असतात. एकंदरच काय तर दूध हे पोषक तत्वांचे भांडार मानले जाते. अनेकांचं असा समज आहे कि, दूध हे गरम करून पिणे फायदेशीर असते तर उन्हाळ्याच्या दिवसात दूध पिऊच नये. यामुळे शरीरातील गरमी वाढते. तर या सगळ्या अफवा आहेत हे आधी समजून घ्या.
कारण दुधामध्ये असे अनेक घटक समाविष्ट आहेत जे शारीरिक ऊर्जा वाढविण्यास मदत करतात. पण याचा अर्थ असा नव्हे कि, दूध प्यायल्याने शरीरातील गरमी वाढते. यासाठी दूध पिण्याचे एकही नियम पाळणे गरजेचे आहे. आता तुम्ही अनेकदा पाहिले असेल कि, काही लोक सकाळी नाश्त्यादरम्यान किंवा रात्री झोपण्याआधी गरम दूध पितात. (Cold Milk Benefits) तर हि सवय शरीरासाठी घातक ठरू शकते बरं का.. याचे कारण म्हणजे प्रत्येक ऋतूत गरम दूध पिण्याची आवश्यकता आहेच असे नाही. पावसाळा आणि हिवाळ्याच्या दिवसात थंड दुधावर बॅक्टरीया जमा होण्याची शक्यता असल्यामुळे ते गरम करून पिण्याचा सल्ला देतात. पण उन्हाळ्यात असं नसतं. उन्हाळ्यात गरम दुध शरीराला हानी पोहचवू शकते.
(Cold Milk Benefits) उन्हाळ्याच्या दिवसात आधीच शरीराचे तापमान वाढलेले असते. त्यात जर गरम दूध प्यायलो तर हे तापमान आणखी तीव्र होऊन गरमीचा त्रास होतो. त्यामुळे अशा दिवसात थंड दूध पिण्याची सवय करून घ्या. कारण थंड दुधातील कॅल्शियमची उपस्थिती आपल्या शरीरातील चयापचय सुधारते आणि त्यामुळे अधिक कॅलरीज बर्न होतात. शिवाय थंड दूध आवश्यक सूक्ष्म पोषक आणि इलेक्ट्रोलाइट्सने भरलेले असते.
जे आपले शरीर सुपरचार्ज ठेवते म्हणजे कमकुवतपणाची शक्यताच नाही. याशिवाय थंड दुधातील इलेक्ट्रोलाइट्स शरीरातील निर्जलीकरण रोखते. (Cold Milk Benefits) या थंड दुधाचे अनेक फायदे आहेत. फक्त शरीरासाठी नाही तर त्वचेसाठी सुद्धा. त्यामुळे शक्यतो कोणत्याही ऋतूत पूर्ण थंड नाही पण कोमट दूध पिण्यावर भर द्या. पण उन्हाळ्यात थंड दूधच प्या.
० उन्हाळ्यात थंड दूध पिण्याचे फायदे (Cold Milk Benefits)
१) शरीर थंड राहते – दूध हे पूर्ण अन्न आहे. कारण यात शरीराच्या गरजेनुसार कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, पोटॅशियम यांसारख्या अनेक पोषक तत्त्वांची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. यामुळे निरोगी राहण्यासाठी दुध पिणे आवश्यक आहे. पण उन्हाळ्यात (Cold Milk Benefits) थंड दूध पिणे जास्त फायदेशीर आहे. कारण याचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि शरीर आतून थंड होते. मुख्य म्हणजे दूध नैसर्गिकरित्या थंडगार असल्यामुळे ते प्यायल्याने शरीर थंड राहते.
२) शरीर हायड्रेट राहते – शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी थंड दूध उत्तम मानले जाते. कारण चहा, कॉफी आणि साखरयुक्त पेय किंवा मग अल्कोहोल हि पेय शरीराला निर्जल करतात. यामुळे मूत्रपिंडातून जास्त लघवी निर्माण केली जाते आणि अतिरिक्त पाणी शरीराबाहेर फेकले जाते. यामुळे एकतर मूत्रपिंडाची कार्यप्रणाली देखील खराब होते आणि शरीर डिहायड्रेट झाल्यामुळे इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. (Cold Milk Benefits)
३) पोटातील जळजळ थांबते – उन्हाळ्यात अनेकदा पोटात जळजळ निर्माण होते. यामुळे आम्लपित्त आणि अल्सरचा त्रास होऊ शकतो. यावर थंड दूध अतिशय उत्तम पर्याय आहे. यासाठी जर तुम्हाला पचनाच्या समस्या होत असल्याचे निदर्शनास आले तर लगेच १ ग्लास थंड दुधात १ चमचा इसाबगोल मिसळून प्या. असे केल्यास एकतर पोटातील जळजळ थांबेल आणि दुसरे म्हणजे बद्धकोष्ठतेसारखे त्रास दूर होतील.
४) अॅसिडिटी कमी करते – खूप उष्ण वातावरणात अॅसिडीटीसारखे त्रास जाणतात. यामुळे उलटी आणि मळमळदेखील होते. यावर सर्वात उत्तम उपाय म्हणजे एक ग्लास थंड दूध पिणे. तसेच शारीरिक अस्वस्थतेसाठी एक उत्तम उपाय म्हणून १ ग्लास थंड दूध पिण्यावर भर द्या. थंड दूध प्यायल्याने छातीतील जळजळदेखील कमी होते. (Cold Milk Benefits)
५) त्वचा तेजस्वी होईल – थंड दूध हे इलेक्ट्रोलाइट्सने भरलेले असते. यामुळे हे दूध तुमच्या शरीराला निर्जलीकरणाशी लढण्यास मदत करते. शिवाय थंड दुधामुळे शरीर हायड्रेटेड राहते. ज्यामुळे त्वचेचे नुकसान होत नाही. याशिवाय त्वचा तजेलदार आणि चमकदारसुद्धा होते. यासाठी थंड दुधाचे सेवन सकाळच्या वेळी करावे आणि इतकेच नाही तर असे थंड दूध तुम्ही डागाळलेल्या त्वचेवरसुद्धा लावू शकता. असे केल्याने त्वचेवरील डाग हळूहळू कमी होतात आणि त्वचा तेजस्वी होते.
६) स्किन मॉइश्चरायझर – दूध हे नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून कार्य करते. त्यामुळे जर तुमची त्वचा कोरडी असेल तर मग थंड दुधाचे सेवन करणे फायदेशीर ठरेल. याशिवाय थंड दूध त्वचेची पीएच पातळी राखण्यास मदत करते. यासाठी थंड दुधात लिंबाचा रस आणि गुलाबपाणी मिसळून यात कापूस भिजवा आणि चेहऱ्याला लावा. हे असेच १० मिनिटे ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. असे केल्यास त्वचेला नक्कीच फायदा होईल आणि सन टॅन सुद्धा निघून जाईल. (Cold Milk Benefits)
७) वजन कमी होईल – थंड दूध वजन कमी करायला मदत करते. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करायचा विचार करत असाल तर थंड दुधाचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर आहे. थंड दूध शरीरातील चयापचय सुधारते. ज्यामुळे कॅलरीज जास्त बर्न होतात. यासाठी १ ग्लास दूध प्या म्हणजे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि अति खाण्याची इच्छा दूर राहते.
‘हे’ पण वाचा :-
Vegetarian Protein Sources : प्रथिनांची कमतरता भरून काढतील ‘हे’ 10 व्हेज पदार्थ; जाणून घ्या
चाळिशीतही मजबूत शरीर हवे असेल तर, ‘हे’ दूध जरूर प्या; जाणून घ्या कृती आणि फायदे
फक्त १ ग्लास गरम दूध स्त्रियांसाठी आरोग्यदायक; जाणून घ्या फायदे
दूध, दही, ताक पिण्याच्या वेळा पाळाल तर मिळतील आरोग्यवर्धक लाभ; जाणून घ्या
दररोज रात्री चेहऱ्याला कच्चे दूध लावालं तर त्वचा राहील सॉफ्ट सॉफ्ट; जाणून घ्या