Vegetarian Protein Sources
|

Vegetarian Protein Sources : प्रथिनांची कमतरता भरून काढतील ‘हे’ 10 व्हेज पदार्थ; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Vegetarian Protein Sources आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी त्याला आवश्यक असणाऱ्या प्रत्येक पोषक तत्त्वाची पूर्तता करणे आवश्यक आहे. जसे कि, आपला कॉम्प्युटर योग्य रित्या वापरण्यासाठी किंवा सोशल मीडिया स्क्रोल करण्यासाठी वायफायची गरज असते. अगदी तसंच निरोगी राहण्यासाठी शरीराला प्रथिनांची गरज असते. याबाबत एक सार्वजनिक समज असा आहे कि प्रथिनांची कमतरता फक्त आणि फक्त मांसाहारातून भरून निघते. तर असं काहीही नाही हे आम्ही येथे नमूद करू इच्छितो. पण मग शाकाहारातून प्रथिने कशी आणि कोणत्या पदार्थातून मिळतील असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर याचे उत्तर लगेच जाणून घ्या. फक्त यासाठी हा लेख तुम्हाला पूर्ण वाचावा लागेल.

पृथ्वी तलावरील कोणत्याही सजीव घटकासाठी प्रथिने अत्यंत महत्वाची आहेत. कारण शरीरातील तंतू आणि पेशी सक्रिय राहण्यासाठी प्रथिने अत्यंत आवश्यक आहेत. तसेच आपल्या शरीरामधील स्नायू आणि इतर घटकांमध्येसुद्धा प्रथिने खूप महत्वपूर्ण भूमिका बजावतात. आपल्या शरीरामध्ये जे काही द्रव पदार्थ तयार होते आणि आपल्या शरीरात जे कोणते हार्मोन असतात त्यांच्या सक्रियतेशी देखील प्रथिनांचा संबंध आहे. (Vegetarian Protein Sources)

शिवाय प्रथिने आपल्या शरीराच्या विकासासाठी आणि जडणघडणीसाठी खूप मदत करतात आणि त्यामुळे शरीरातील स्नायू मजबूत होण्यासही आपोआप मदत होते. प्रथिने हे अँटीबॉडीजचे कार्य करते. यामुळे शरीराचा संसर्ग आणि संक्रमणापासून बचाव होतो. एकंदरच काय तर प्रथिने हि सजीव घटकांसाठी जीवनावश्यक आहेत. म्हणूनच आपल्या शरीराला लागणारी प्रथिने हि आहारातून ग्रहण करणे गरजचे आहे.

प्रथिने शरीराला ऊर्जा देतात आणि दिवसभर उत्साही राहण्यास मदत करतात. त्यामुळे रोजच्या आहारात प्रथिने असतील तर माणसाचा मूड उत्साही राहू शकतो. शिवाय तणावमुक्त राहिल्याने निरोगी राहणेदेखील सोपे जाते. सामान्यतः मांसाहार हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. त्यामुळे शाकाहारी लोक प्रथिनांपासून वंचित राहतात. निश्चितच हे खरे आहे की, मांसामध्ये प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त आहे. पण याचा अर्थ असा नाही की, शाकाहार केल्याने प्रथिने मिळत नाहीत. (Vegetarian Protein Sources)

आता ज्या लोकांसाठी मांसाहार वर्ज्यच आहे त्या लोकांनी प्रथिने कशी मिळवावी..? हा विचार सर्वसामान्यांच्या मनात येऊच शकतो. तर शाकाहारी वर्गातही असे काही पदार्थ आहेत, जे मांसाहाराइतकीच प्रथिनांची पूर्तता करतात. तर हे पदार्थ कोणते..? आपण जाणून घेणार आहोत.

० प्रथिनयुक्त शाकाहारी पदार्थ (Vegetarian Protein Sources)

१) दूध –
दूध कॅल्शियमचा उत्तम स्रोत मानला जातो. पण कॅल्शियमसोबत दुधामध्ये प्रथिनेदेखील मोठ्या प्रमाणात मिळतात. यामुळेच दूध शरीरातील स्नायूंना मजबूत करण्यास फायदेशीर भूमिका बजावते. म्हणूनच प्रथिनांच्या पूर्ततेसाठी दूध हा एक उत्तम पर्याय आहे.

Curd

२) दही –
ज्या लोकांना दूध प्यायला आवडत नाही, त्या लोकांनी रोजच्या दिवसात किमान १ वाटी दही खावे. शक्यतो दुपारच्या वेळी दही खाणे फायदेशीर आहे. यामुळे दह्याच्या माध्यमातून शरीराला उच्च प्रथिने मिळतात आणि पोटात गारवाही येतो. (Vegetarian Protein Sources)

३) ताक किंवा लस्सी –
दूध आणि दही दोन्ही आवडत नसेल तर प्रथिने मिळवण्यासाठी ताक वा लस्सी हे दोन्ही चविष्ट पर्याय आहेत. सकाळची न्याहारी किंवा दुपारचे जेवण झाल्यानंतर याचे सेवन केल्यास उच्च प्रथिने मिळवता येतील.

roti

४) मिश्र धान्यांची चपाती –
(Vegetarian Protein Sources) मिश्र धान्यांची चपाती भरपूर कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने पुरवते. याशिवाय व्हिटॅमिन-बी, झिंक, लोह आणि मॅग्नेशियम इत्यादी अनेक प्रकारची पोषक तत्वे या चपातीतून मिळतात. ज्यामुळे त्याचे पचन आणि पोषण अनेक पटींनी वाढते. शिवाय शरीरातील प्रथिनांची कमतरता भरून निघते.

Vegetables

५) भाज्या –
शरीरात प्रथिनांची पूर्तता करायची असल्यास फुलकोबी, हिरवे वाटाणे, पालक, मशरूम, शेवग्याच्या शेंगा अशा काही भाज्यांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. या सर्व भाज्यांमध्ये उच्च प्रथिनांसह इतर पोषक तत्त्वांचा मोठा साठा असतो ज्यामुळे यांचे सेवन केल्यास प्रथिने मिळतात.

DryFruits

६) सुका मेवा –
नियमित आहारात सुका मेव्यातील काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आणि मखाना असेल तर तुमच्या शरीराला प्रथिनांची कमतरता जाणवणारसुद्धा नाही. या सर्व सुका मेव्याचे मूठभर मिश्रण नियमित खाल्ले किंवा दुधात मिसळून सेवन केले तर मांसाहारापेक्षाही उच्च प्रथिने तुम्हाला मिळतील. (Vegetarian Protein Sources)

Chana

७) चणे –
नियमित दिवसाच्या सुरूवातीला नाश्त्यात जर शिजवलेले चणे खाल्ले तर दिवसभर काम करण्यासाठी आवश्यक ऊर्जा तुम्हाला मिळेल. कारण चण्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात.

Sprouts

८) कडधान्ये –
(Vegetarian Protein Sources) तूर, उडीद, मूग, मसूर, हरभरा, चणे इत्यादी कडधान्यां भरपूर प्रथिने असतात. त्यामुळे दिवसभरात कोणत्याही एका जेवणामध्ये किमान २ वेळा वेगवेगळ्या कडधान्यांचे सेवन करा. असे केल्या अन्य कोणत्याही पदार्थाचे सेवन करण्याची गरज भासणार नाही.

RAjma

९) राजमा –
राजमाचे सेवन केले असता दिवसभरात शरीराला आवश्यक असणारी प्रथिने आरामात मिळतात. त्यामुळे आठवड्यातील किमान २ दिवस संपूर्ण दिवसातील एका आहारात राजमाचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. शिवाय राजमाचे सेवन वाढत्या वजनावर नियंत्रणही ठेवते.

Soyabeans

१०) सोयाबीन –
सोयाबीन प्रथिनांचा नैसर्गिक आणि उत्तम स्रोत मानला जातो. त्यामुळे आठवड्यातून किमान २ वेळा वेगवेगळ्या प्रकारे सोयाबीन खा आणि प्रथिने मिळवा. (Vegetarian Protein Sources).

‘हे’ पण वाचा :-

शरीरातील प्रोटीन वाढविण्यासाठी ‘या’ भाज्या अत्यंत सहाय्यक; जाणून घ्या

या रंगाच्या भाज्यांचा आपल्या आहारात करा समावेश