Dark Circles Home Remedies:
| |

Dark Circles Home Remedies: हट्टी डार्क सर्कल्सचं करायचं तरी काय..?; जाणून घ्या घरगुती टिप्स

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Dark Circles Home Remedies आय लायनर, मस्कारा, काजळ अशा ब्युटी प्रोडक्ट्सच्या वापराने सुंदर आय मेकअप केला कि डोळे अतिशय रेखीव आणि लक्षवेधी दिसतात. पण याचा अति वापर केला तर डोळ्यांचे सौंदर्य लोप पावते. याशिवाय आणखी अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे डोळ्यांचे निरागस सौंदर्य हळूहळू कमी होऊ लागते. अनेकदा आरशात पाहिल्यानंतर डोळ्याखाली गोल काळी वर्तुळे दिसून येतात. हि काळी वर्तुळे काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीत. ज्यामुळे एक न्यूनगंडाची भावना मनात उत्पन्न होते. ज्यामुळे कुठेही बाहेर जाताना जाऊ कि नको असा विचार मनात येतो.

सुंदर दिसायला सर्वांनाच आवडत. पण डोळ्याखाली येणारी काळी वर्तुळे अर्थातच डार्क सर्कल्स कुणालाही आवडत नाहीत. कारण हि काळी वर्तुळे डोळ्यांचे सौंदर्य हिरावून घेत असतात. आजकालची जीवनशैली पाहता महिलांबरोबर पुरुषांमध्येही डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसण्याची समस्या दिसून येतेय. यामागे अनेक कारणे आहेत. (Dark Circles Home Remedies) यातील मूळ कारण म्हणजे, धावपळ आणि अति जागरण. ज्यांना आराम मिळत नाही, जे तणावग्रस्त असतात, त्यांना डार्क सर्कल्सची समस्या सहज होते. मग अशावेळी न्हाई न्हाई ते उपाय करण्यावर भर दिला जातो. विविध औषधे, विविध केमिकल ट्रीटमेंट आणि नको नको ते मास्क. बापरे.. डोळ्याखालील काळी वर्तुळे नकोत म्हणून चेहऱ्यासाठी एव्हढं काय काय करायची गरज काय..?

आता अनेक महिलांना एक सर्वसाधारण प्रश्न पडलेलाच असतो कि, चित्रपटातील हिरो हिरोईन त्यांच्या शूटिंगमध्ये इतके व्यस्त असतात तर त्यांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं का येत नाहीत..? आणि आलीच तर ती कशी लपवतात… ? यावर अनेकांचे तर्क सांगतात कि ते खूप वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट करतात. यामुळे सर्वात जास्त महिला वर्ग ब्युटी पार्लरमध्ये विविध ट्रीटमेंट करून घेण्यावर भर देताना दिसतात. पण यामुळे खूप वेळ आणि खूप पैसे वाया जातो. शिवाय कालांतराने येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती होते. (Dark Circles Home Remedies)

म्हणजेच एखादी ब्युटी ट्रीटमेंट केल्यानंतर काही काळासाठी हे डार्क सर्कल्स जातात पण पुन्हा येतात आणि तीव्रपणे दिसूनही येतात. तर मैत्रिणींनो असं करण्याची काहीही गरज नाही. काही साध्या आणि सोप्प्या घरगुती टिप्सच्या सहाय्याने तुम्ही या डार्क सर्कल्सचा टाटा बायबाय करू शकता.आता हे डार्क सर्कल्स घालवायचे असतील तर आधी ते का आले असतील याचा विचार केलात तर उपचारांना योग्य दिशा मिळेल. म्हणून चला तर जाणून घेऊया डार्क सर्कल्स येण्याची कारणे, उपाय आणि घरगुती टिप्स.

० डार्क सर्कल्स येण्याची मुख्य कारणे आणि उपाय (Dark Circles Home Remedies)

Drinking Water

१) शरीरातील पाण्याची कमतरता – योग्य प्रमाणात पाणी प्यायलं नाही तर मग शरीरातील विषारी घटक बाहेर पडत नाही. याचा परिणाम म्हणजे डोळ्याखाली काळी वर्तुळं आकार घेतात. त्यामुळे रोज १०- १२ ग्लास पाणी प्या.

Blood

२) रक्तात हिमोग्लोबिनची कमतरता – (Dark Circles Home Remedies) आपल्या शरीरातील रक्तात जर हिमोग्लोबीनची कमतरता असेल तरीही डोळ्याखाली आणि डोळ्याच्या भोवतालीसुद्धा काळी वर्तुळ येऊ शकतात. त्यामुळे हिमोग्लोबीन चेक करून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपाय करावेत. आहारात पालेभाज्या आणि कंदमुळांचा समावेश करावा.

Sleepless

३) अपुरी झोप – संपूर्ण दिवसाचा ताण हा शरीरावर आलेला असतो. ज्यामुळे रात्री अंथरुणाला पाठ ठेवली कि लगेच झोप लागते. दरम्यान खूप दमूनही तुम्हाला झोप लागत नसेल किंवा अती विचारामुळे तणाव निर्मित होत असेल तर डोळ्याखाली काळी वर्तुळ येतात. कारण झोप पूर्ण न झाल्यामुळे डोळ्याच्या नसांवर ताण येतो आणि परिणामी डोळ्याच्या सभोवतालच्या पेशींचे नुकसान होते. ज्यामुळे डार्क सर्कल्स येतात. (Dark Circles Home Remedies)

Food

४) अनियमित आहार – अनेकांना घरगुती जेवणापेक्षा बाहेरचे तेलकट आणि मसालेदार जेवण जास्त प्रिय असते. मग कधीही फास्ट फूड खा किंवा मग कोल्ड्रिंक पी हि अगदी दिनचर्या होऊन जाते. अशाप्रकारे नीट जेवण न करणं, संपूर्ण आणि पोषक आहार न घेणं यामुळे शरीरात जीवनसत्त्वं क्षार आणि खनिजांची कमतरता निर्माण होवून डोळ्याखाली काळी वर्तुळं जमा होऊ लागतात.

What to do if you always get up in the morning and suffer from cold

५) दीर्घकालीन आजारपण – एखादा मोठा आजार झाला असेल किंवा गेल्या अनेक काळापासून जर कोणते आजारपण असेल तर शरीरातील अशक्तपणा आणि गोळ्यांच्या प्रभावामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळ येतात. पण जसजसा शरीरातील अशक्तपणा कमी होतो तसतशी ही काळी वर्तुळ कमी होतात. यासाठी योग्य आहार, आराम आणि व्यायामाची गरज असते.(Dark Circles Home Remedies)

Digital Screen

६) डिजिटल स्क्रीनचा अति वापर – ऑफिस असो वा घर खूप काळ कॉम्पुटरचा वापर करणे, मोबाईल पाहत राहते किंवा टीव्ही बघणे यामुळे डोळ्यांच्या नसांवर ताण येतो. परिणामी डोळे थकतात आणि त्याचा परिणाम म्हणजे डोळ्याखाली काळी वर्तुळ येतात. त्यामुळे डिजिटल स्क्रीनचा वापर कमी करा.

७) अनुवांशिकता – अनेकदा कोणतीही आरोग्यविषयक समस्या नसते. मात्र तरीही डोळ्याखाली वर्तुळे येतात. याचे कारण अनुवांशिकता असू शकते. काळी वर्तुळं ही अनुवांशिकतेमुळेही येतात. हे कारण असेल तर उपचारांमध्ये प्रचंड सातत्य ठेवावे लागते. अशा केसेसमध्ये काळी वर्तुळ जात नाहीत पण त्यांची तीवता मात्र कमी होते.

० डार्क सर्कल्ससाठी घरगुती टिप्स (Dark Circles Home Remedies)

१) ऑइल मसाज –

(Dark Circles Home Remedies)

खोब-याचं आणि बदामाचं तेल एकत्र करून घ्या. या तेलाने डोळ्याखालील काळ्या वर्तुळावर हलक्या हाताने मसाज करा. साधारण १ तास हे तेल चेहे-यावर राहू द्या. तासाभराने आपला चेहेरा कोमट पाण्याने पुसा आणि नंतर धुवा.

२) कांती लेप –

Facepack

यासाठी ओलं खोबरं, लिंबाचा रस, २ चमचे किसलेली काकडी, १ चमचा एलोवेरा, ३ चमचे मुलतानी माती घेवून त्याचं मिश्रण तयार करा. हे मिश्रण थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा. आता कापसाच्या बोळ्याने ते डोळ्याभोवती लावा. हा लेप २० मीनिट ठेवून एकदा सुकला कि मग पाणी आणि दूध एकत्र करून त्याने लेप स्वच्छ करा. (Dark Circles Home Remedies)

३) लिंबू आणि टोमॅटो –

यासाठी अर्ध्या लिंबाचा रस आणि १ वाटी टोमॅटोचा रस एकत्र करा आणि या मिश्रणाने डोळ्याभोवतीच्या काळ्या वर्तुळावर मसाज करा. यानंतर २० मिनिटांनी थोडं नारळ पाणी घेवून हे टोनर पुसून काढा.

४) बटाटा –

Potato

यासाठी बटाटा किसून त्याचा रस काढा आणि डोळ्याखालील काळ्या वर्तुळाभोवती लावा किंवा बटाटाच्या चकत्या डोळ्यावर ठेवा. त्याचाही फायदा होतो. (Dark Circles Home Remedies)

५) हर्बल टी –

Green Tea

हर्बल टी बनवल्यानंतर त्याच्या टी बॅग्ज टाकून देऊ नका. तर त्या फ्रीजमध्ये ठेवा आणि आवश्यकता असेल तेव्हा त्याचा वापर डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळावर मसाज करण्यासाठी करा. या टी बॅग्ज डोळ्यांभोवती फिरवल्यास नसणं आराम मिळतो आणि काळी वर्तुळे कमी होण्यास मदत मिळते.

‘हे’ पण वाचा :-

अपूर्ण झोपेमुळे डोळ्यांना सूज येत असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय; जाणून घ्या

चेहऱ्यावर हवा नैसर्गिक ग्लो? तर मग या गोष्टी जरूर खा; जाणून घ्या