Detox Drinks For Skin
| |

Detox Drinks For Skin: ‘हि’ 5 पेय प्यालं, तर संतूर मॉम दिसालं; जाणून घ्या कसे बनवालं..?

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Detox Drinks For Skin तुम्ही अनेक जाहिराती पाहिल्या असतील. या जाहिरातींमधील हिरोईन सुद्धा पाहिल्या असतील. त्यांची त्वचा किती तेजस्वी आणि चमकदार असते नाही..? त्यात एक संतूर मॉमची जाहिरात अगदी स्वप्नासारखी वाटते. म्हणजे सर्वसाधारणपणे मुलं झाली कि स्त्रिया आपल्याकडे लक्ष द्यायला जणू विसरूनच जातात. ना त्वचेची काळजी ना आरोग्याची. पण मनातून कुठे तरी वाटतं असतं कि त्या जाहिरातीतील हिरोईनसारखं आपणही दिसलो तर हरकत काय आहे..? हो ना..? म्हणून आज आम्ही तुम्हाला काही अशा पेयांबद्दल सांगणार आहोत. ज्यांच्या सेवनाने तुम्ही कार्य प्रणालीदेखील उत्तम राहील आणि त्वचा अतिशय सुंदर तेजस्वी आणि लक्षवेधी होईल.

Benefits Of Detox Water

मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला डिटॉक्स ड्रिंक्सविषयी माहित असेलच. हे डिटॉक्स ड्रिंक्स आपल्या शरीरातील वाईट आणि अपायकारक घटकांना उत्सर्जित करतात. ज्यामुळे संपूर्ण शरीराची योग्य पद्धतीने निगा राखण्यास मदत होते. (Detox Drinks For Skin) ज्याप्रमाणे आपल्या शरीराला बाहेरून स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली असते तशीच शरीराला आतूनही स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपलीच असते. पण शरीराच्या आतील भागाची स्वच्छता करणे अत्यंत जोखमीचे काम आहे. दरम्यान एक चूकदेखील महागात पडू शकते. म्हणूनच बॉडी डिटॉक्स ड्रिंक्सचा वापर यासाठी केला जातो. आपल्या शरीरातील घाण शरीराला अपाय पोहचवण्याआधी बाहेर काढायची असेल तर डिटॉक्स ड्रिंकचे सेवन आवश्यक आहे.

आता आपल्यापैकी प्रत्येकाला डिटॉक्स ड्रिंकविषयी माहिती असेलच असे गृहीत धरता येणार नाही. म्हणून आज आपण या लेखाच्या माध्यमातून डिटॉक्स ड्रिंक घरगुती पद्धतीने कसे बनवायचे ते शिकून घेणार आहोत. शिवाय ते फळांपासून बनवायचे असल्यामुळे फार अवघड वा किचकट तसेच वेळखाऊ देखील नाही. त्यामुळे बिंधास्तपणे हे डिटॉक्स ड्रिंक्स घरी ट्राय करा आणि निर्धास्त जगायला तयार व्हा.

Detox Water
Detox Drinks For Skin

विविध डिटॉक्स ड्रिंक्स बनविण्याची पद्धत जाणून घ्या खालीलप्रमाणे (Detox Drinks For Skin) :-

१) लेमन मिंट डिटॉक्स वॉटर (लिंबू आणि पुदिनाचे पाणी)

लिंबाच्या फळात मोठ्या मात्रेत विटामिन सी समाविष्ट असतं. ज्यातील अँटि ऑक्सिडंट गुण त्वचेवरील तेजस्विता वाढवते आणि तुम्हाला अधिक सुंदर बनवते. शिवाय हे घटक हवेतील प्रदूषणासोबत लढतात आणि त्वचेतील पोर्सचे संरक्षण करतात. त्यामुळे शरीर डिटॉक्स करण्यासाठी हा अतिशय सोपा आणि प्रभावी असा घरगुती उपाय मानला जातो.

० कसे बनवालं..?

सर्वात आधी एका लिंबाचे दोन तुकडे करा. यानंतर पाण्याच्या एका हे पूर्ण पिळून त्याचा रस काढून घ्या. यात आवडीप्रमाणे पाण्याच्या ग्लाासत पुदीन्याची पानं घालता येतील. यामुळे पिंपल्स कमी होतील. इतकेच नाही तर रोज हे पाणी प्यायल्यास शरीरातील टॉक्झिन्स दूर होतील. शिवाय यामुळे दिवसभर उत्साही वाटेल. फक्त याचे सेवन करताना मीठ वा साखरेचा वापर करू नये. (Detox Drinks For Skin)

२) रोझ फेनेल डिटॉक्स वॉटर (बडिशेप आणि गुलाबाचे पाणी)

खूप स्ट्रेसमुळे चिडचिड होते आणि चीड्चीडमुळे अख्खा दिवस खराब जातो. अशा स्थितीपासून सुटका हवी असेल तर हे डिटॉक्स ड्रिंक अत्यंत फायदेशीर आहे. तसेच हे पेय प्यायल्याने पचनक्रियादेखील सुरळीत होते. यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा उपयोग करता येईल. तसेच बडीशेप वापरल्यास पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते. याशिवाय डीएनए अत्परिवर्तन रोखण्यासाठीही याची मदत होते. यामध्ये असणारे अँटि इन्फ्लेमेटरी, कार्डिओ प्रोटेक्टिव्ह आणि अँटिकॅन्सर गुण त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. (Detox Drinks For Skin)

० कसे बनवालं..?

(Detox Drinks For Skin) यासाठी गुलाबाच्या २० पाकळ्या आणि २ चमचे बडिशेप १ लीटर पाण्यात मिसळून हे मिश्रण ४ तास फ्रिजमध्ये ठेऊन द्या. यानंतर हे मिश्रण व्यवस्थित गार झालं की, दिवसभरात याचे थोडेथोडे सेवन करा.

३) ऑरेंज जिंजर डिटॉक्स वॉटर (संत्र आणि आल्याचे पाणी)

आपण दैनंदिन जीवनशैलीत अनेकदा संत्र्याचे सेवन करत असतो. या फळामध्ये अँटि ऑक्सिडंट आणि विटामिन सी भरपूर असतात. हे घटक आपल्या हृदयाची आणि हार्मोन्सची काळजी घेतात. शिवाय यातील व्हिटॅमिन सी आणि डिटॉक्सिफिकेशनचे घटक आपल्या त्वचेची काळजी घेण्यास सक्षम आहेत. यामुळे त्वचेचे विविध आजारांपासून आणि रोगांपासून रक्षण होते.

० कसे बनवालं..?

यासाठी आल्याचा १ मोठा तुकडा घेऊन तो व्यवस्थित किसून घ्या. आता संत्र्याचे सालासकट साधारण १५ तुकडे करून हे दोन्ही पदार्थ १ लीटर पाण्यात एकत्रित करून घाला. हे मिश्रण किमान २ तास फ्रिजमध्ये ठेवा. यानंतर हे पेय व्यवस्थित गार झालं कि ढवळून घ्या आणि दिवसभर थोडं थोडं पित रहा. (Detox Drinks For Skin)

४) ग्रेप्स लेमन डिटॉक्स वॉटर (द्राक्ष आणि लिंबाचे पाणी)

लिंबातील व्हिटॅमिन सी आणि द्राक्षातील अँटी बॅक्टेरियल घटक आरोग्यासाठी उत्तम आहेत. त्यामुळे या दोन्ही घटकांचे सेवन एकत्र केले तर अधिक फायदेशीर ठरते. साधारणपणे या डिटॉक्स ड्रिंक साठी काळ्या द्राक्षांचा वापर करा. कारण यामध्ये कॅन्सर रोखण्याची क्षमता आहे. तसेच अधिक कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण आणणे आणि पेशींची सक्रियता वाढवणे यासाठी हे पेय फायदेशीर आहे. या पेयाचे सेवन त्वचेतील पेशींचे योग्य पद्धतीने रक्षण करते आणि यामुळे त्वचेचा पोत सुरक्षित राहतो.

० कसे बनवालं..?

(Detox Drinks For Skin) यासाठी १० ते १५ काळी द्राक्ष बारीक कापून घ्या. तसेच लिंबूदेखील सालासकट पातळ कापून घ्या. आता १ लीटर पाण्यात हे दोन्ही एकत्र घालून २० मिनिटे असेच ठेवून द्या किंवा फ्रिजमध्ये ठेवा. यानंतर या डिटॉक्स ड्रिंकचे सेवन करा.

५) मँगो बेसिल डिटॉक्स वॉटर (आंबा आणि तुळशीचे पाणी)

फळांचा राजा आंबा हा योग्य मात्रेत खाल्ला तर आपली पचनक्रिया चांगली राखण्यासाठी मदत होते. तसेच रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आंबा फायदेशीर असतो. यासह तुळशीच्या पानामध्ये भरपूर प्रमाणात अँटि ऑक्सिडंट्स असतात. जे आपल्या शरीरातील टॉक्झिक पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. तसेच कॅन्सरच्या पेशींनाही रोखतात. तसेच हे घटक त्वचेच्या प्रत्येक थराचे योग्य पद्धतीने रक्षण करतात. ज्यामुळे त्वचेचे नुकसान होत नाही आणि त्वचा तेजस्वी राहण्यास मदत होते.

Detox Water

० कसे बनवालं..?

यासाठी पिकलेल्या आंब्याचे १० पातळ तुकडे करा आणि १० तुळशीची पानं पाण्याने धुवून हाताने तोडून घ्या. आता हे दोन्ही पदार्थ १ लीटर पाण्यात घालून साधारण १ तास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. यानंतर थोड्याथोड्या वेळाच्या अंतराने हे पाणी पित रहा. (Detox Drinks For Skin)

‘हे’ पण वाचा :-

Tomato Benefits For Skin लाल लाल टोमॅटो देतो नैसर्गिक सौंदर्य; कसे..? ते जाणून घ्या

Argan Oil करते UV किरणांपासून त्वचेचे संरक्षण; जाणून घ्या 8 प्रमुख फायदे

Benefits Of Detox Water: डिटॉक्स वॉटरचे ‘असे’ सेवन कराल तर होतील भरपूर फायदे; जाणून घ्या

Health Tips: पाणी आणि दुधाचे ‘असे’ सेवन कराल तर 100% आजारी पडालं; जाणून घ्या

मनुक्याचे पाणी प्या आणि नैराश्यापासून मुक्ती मिळवा; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे