Game Addiction

Game Addiction: भाग 1- तुमचीही मुलं PUBG सारखे गेम खेळतात..? तर आताच सावध व्हा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। (Game Addiction) आजकाल अतिशय कमी वयातील मुलं संगणकाच्या दुनियेत तज्ञ असल्यासारखी वावरतात. गेमिंगचे कोणतेही प्रशिक्षण न घेता यावर मुलांचा अतिशय दृढ अभ्यास असतो. ते कसं काय…? तर खूप कमी वयातच मुलांच्या हातात मोबाईल, डिजीटल गेम्स, व्हिडीओ गेम्स आणि मुख्य म्हणजे इंटरनेट मिळालं आहे. त्यामुळॆ त्याचा नक्की काय आणि कश्यासाठी वापर करायचा आहे हे समजण्याआधीच मुलं आपल्या सोयीने त्याचा वापर करतात. आजकाल गेमिंगचा नाद इतका वाढला आहे कि, मुलं या नादात नको नको त्या गोष्टी करू लागली आहेत.

सध्या देशात PUBG, Call of Duty: Blackout, Fractured Lands, Totally Accurate Battlegrounds, H1Z1: King of The Hill असे अनेक गेम मुलं खेळताना दिसतात. (Game Addiction) इंटरनेटच्या सहाय्याने मुलांनी डिजिटलायझेशनचा असा काही दुरुपयोग केला आहे कि बस्स्स्स.. गेमिंगच्या या सवयींनी अनेक कुटुंब उध्वस्त होताना दिसत आहेत. इंटरनेटसोबत आता गेमिंग मुलांसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे. कारण मुलांना या विविध गेम्सचं व्यसन लागल्याचे दिसून आले आहे.

विशेषतः कुमारवयीन वा तरुण मुलांना ऑनलाइन गेमिंगचे भारी वेड लागले आहे. ज्यामुळे पिढ्याच्या पिढ्या बरबाद होतात का काय..? अशी भीती वाटू लागली आहे. आजपर्यंत दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा यामुळे अनेकांनी आरोग्यविषयक समस्यांना तोंड दिल्याचे ऐकले असेल. पण गेल्या काही काळापासून गेमिंगचे व्यसन याहीपेक्षा घातक स्वरूपात समोर आले आहे.

अलीकडेच मीडिया रिपोर्टनुसार, काही वृत्त अशी होती ज्यामध्ये गेमिंगचे व्यसन अनेक कुटुंबाना नडले आहे. (Game Addiction) यात काहींचा जीव गेला तर काहींचे मानसिक स्थैर्य. अलीकडे उत्तर प्रदेशात लखनौमध्ये एका मुलानं गेमिंगच्या व्यसनापायी आपल्याच जन्मदात्या आईवर गोळी झाडली. कारण त्याची आई त्याला पबजी (PUBG) खेळू नको असे वारंवार सांगत होती. शिवाय खेळण्यासाठी त्याने घरातून १० हजार रुपये देखील लंपास केले होते. ज्यासाठी त्याच्या आईने त्याला मार दिला होता. परिणामी संतापाच्या भरात या मुलाने आपल्याच आईचा जीव घेतला.

याशिवाय मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका व्यक्तीने ऑनलाईन लुडो गेम खेळताना त्यात १७ हजार रुपये गुंतवले होते. गेम गारल्यामुळे साहजिकच त्याचे १७ हजार रुपयेसुद्धा ती हरला आणि यामुळे त्यानं गळफास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून अशाच हादरवणाऱ्या घटना एकामागे एक घडताना दिसत आहेत आणि याच कारण आहे गेमिंगच व्यसन. (Game Addiction) यामुळे अनेक घरात लहान मुलांच्या हातात मोबाईल दिसला आणि मुलं त्यावर खेळत असली कि मनात धस्स होत. तर पालकहो..! तुमचीही मुलं जर गेमिंगच्या व्यसनाधीन झाली असतील तर हा लेख तुमच्याचसाठी आहे असं समजा.

आज आपण तज्ञांकडून गेमिंगच्या व्यसनाबाबत काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. ज्यांच्या सहाय्याने एकतर तुम्ही तुमच्या मुलांना गेमिंगच्या व्यसनापासून दूर ठेऊ शकाल आणि या व्यसनाचे मूळ कारणही शोधू शकाल.

काय सांगतात तज्ञ..?

गेल्या बऱ्याच महिन्यांपासून मुलांमध्ये गेमिंगचं क्रेझ वाढत असल्याचे दिसून आले आहे. तज्ञांनी केलेल्या रिसर्चनुसार त्यांचा रिपोर्ट सांगतो कि, गेल्या काही दशकांमध्ये, भारतीय गेमिंग उद्योग १९९०च्या दशकात जो अस्तित्वात नव्हता तो २०१०च्या उत्तरार्धात जागतिक स्तरावरील शीर्ष बाजारपेठांपैकी एक बनला आहे. (Game Addiction)

तर २०१९ मध्ये, भारतातील ऑनलाइन गेमिंग बाजार अंदाजे ३०० दशलक्ष गेमर्ससह ₹६,२०० कोटी (US$८१० दशलक्ष) इतका होता, जो २०१८ च्या तुलनेत ४१.६% वाढला होता. यानंतर आता २०२० – २०२१ च्या रिपोर्टनुसार आता चालू २०२२ सालात भारतातील गेमिंग उद्योग विस्तार हा १४३ अब्ज रुपये इतका अपेक्षित आहे.

एकंदरच पाहिले असता, भारतात गेमिंगच्या व्यवसायाचा विस्तार पाहता पाहता एखाद्या व्हायरसारखा जगभर पसरतो आहे. आपण आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर एखाद्या व्हायरसची उपमा गेमिंगला नक्कीच देऊ शकतो असे तज्ञ सांगतात. गेमिंगमुळे नेमका मुलांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो हे जाणून घेऊया.

० गेमिंगमुळे होणारे दुष्परिणाम
(Game Addiction)

मुख्य म्हणजे गेमिंग असा विषय आहे ज्यामध्ये वापरले जाणारे VFX, Animation मुलांना आकर्षित करतात. याचे आकर्षण इतके तीव्र असते कि मुलांना आजूबाजूचे ज्ञान संपादन करण्याची आवडच राहत नाही. याशिवाय मुलांच्या मेंदूवर याचा दुष्परिणाम होऊ लागतो. तर याविषयी बोलताना तज्ञांनी काही मुख्य परिणामांचा यात आवर्जून उल्लेख केला आहे. ते जाणून घ्या खालीलप्रमाणे :-

1. गेमिंगच्या सवयीमुळे मुलांचा सर्वांगीण विकास होत नाही. शिवाय मुलांची आकलन क्षमता (एखादी गोष्ट समजून घेण्याची क्षमता) लोप पावते. (Game Addiction)

2. यामुळे मुलं उग्र आणि हट्टी स्वभावाची होऊ शकतात. याचे कारण म्हणजे गेमिंगमध्ये ते ज्या कॅरेक्टरच्या माध्यमातून खेळत असतात त्याची आक्रमकता मुलांना भावलेली असते.

3. गेमिंगमुळे मुलं विद्रोही होतात. अनेकदा मुलांमध्ये नकारात्मकतेचा प्रभाव इतका तीव्र जाणवतो कि ते अचानक चिडतात, हातपाय आपटतात, लहान मोठ्या व्यक्तीचा अनादर करतानाही ते बाचकत नाहीत. ज्याचा पुढे भविष्यात मोठा त्रास होऊ शकतो.

4. गेमिंगची सवय लागल्यास मुलांना अचानक त्यापासून दूर करायला गेलात तर मुलं आक्रमक होऊ शकतात किंवा अबोल होऊ शकतात. (Game Addiction) या दोन्ही प्रकरणात मुलांच्या मानसिक आरोग्याची हानी निश्चित आहे.

5. गेमिंगच्या प्रभावामुळे मुलांच्या डोळ्यांसह, मेंदू तसेच हृदयाच्या ठोक्यांचे आरोग्य धोक्यात येते.

6. अनेकदा मुले आहारापेक्षा अधिक गेमिंगमध्ये व्यस्त असतात. ज्यामुळे त्यांच्या शरीराला आवश्यक आहाराची पूर्तता होत नाही. परिणामी मुलं कमकुवत आणि अशक्त होऊ लागतात.

7. गेमिंगच्या सवयीमुळे मुलं शारीरिक हालचाल होईल असे खेळ खेळणं टाळतात. ज्यामुळे मुलांच्या शरीराची हालचाल न झाल्यामुळे इतर आरोग्यविषयक समस्या होऊ शकतात. (Game Addiction)

8. गेम खेळण्यासाठी मुलं डोळे आणि हाताची बोटं यांचा अधिक वापर करतात. एकतर मुलांचे अवयव नाजूक असतात आणि जर कमी वयात मुलांना गेमिंगची सवय लागली तर मुलांना अपंगत्व येऊ शकते.

आज भाग १ मध्ये आपण गेमिंगच्या व्यसनाविषयी काही ठळक मुद्दे आणि त्याचे दुष्परिणाम जाणून घेतले. यानंतर गेमिंगचं व्यसन मुलांनाच का होत याविषयी देखील तज्ञांनी आपलं मत आणि काही मुद्दे सांगितले आहेत. ते आपण भाग २ मध्ये जाणून घेऊ. (Game Addiction)

‘हे’ पण वाचा :-

Child Care : ‘या’ 10 टिप्सच्या सहाय्याने मुलांचा सर्वांगीण विकास होईल हमखास; जाणून घ्या

मुलांमध्ये एकाग्रता वाढविण्यासाठी सजग आसने शिकवा; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

ओंकार’चा करतील नियमित उच्चार, तर तुमची मुलं होतील हुश्शार; जाणून घ्या

Nutritious Food For Kids: मुलांचा लंच बॉक्स हेल्दी-टेस्टी कसा बनवालं..?; जाणून घ्या चटकदार पौष्टिक रेसिपी