Nutritious Food For Kids
|

Nutritious Food For Kids: मुलांचा लंच बॉक्स हेल्दी-टेस्टी कसा बनवालं..?; जाणून घ्या चटकदार पौष्टिक रेसिपी

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Nutritious Food For Kids शाळेत जाताना मुलं इतकी गडबड आणि गोंधळ घालतात कि अख्ख घर डोक्यावर घेतील का काय असच वाटत. त्यात जर डब्यात एखादी नावडती भाजी असली तर मग काय बघायलाच नको. मुलांचा पारा आवरता आवरता आईच्या नाकी नऊ येतात. पण रोज रोज वेगळं आणि त्यातही पौष्टिक कसं काय द्यायचं..? असा सामान्य प्रश्न प्रत्येक आईला सतावत असतो.

दुसरीकडे पोळी आणि भाजीशिवाय आणखी उत्तम पौष्टिक पदार्थ काय असू शकतात..? असही वाटत. त्यामुळे साहजिकच रोजच्या डब्यात पोळी भाजीच असते आणि यालाच मुलं कंटाळतात. त्यात आजची मुलं सतत सोशल मीडिया आणि टीव्हीशी कनेक्ट आहेत. त्यामुळे बाजारात येणारं प्रत्येक नवं प्रोडक्ट आपल्या आधी मुलांना ठाऊक असत. मग मार्केटमध्ये जर मुलांना घेऊन गेलोच तर मग आई हे घे.. बाबा ते घ्या.. आजी घे ना गं.. अशी लाडीगोडी तर कधी हट्ट मुल करतात. (Nutritious Food For Kids)

पण मॅगी, मेयो, नूडल्स, सौसेस, फ्रोजन फूड यामुळे मुलांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक असणारे पोषण तत्त्व मिळणे अतिशय कठीण असते. म्हणून मुलं लाख हट्ट करतील पण पालक त्यांना असे पदार्थ न खाण्याचा सल्ला देतात. काही मुलं शाळेत जाताना डब्यातही वेफर आणि चॉकलेट मागतात. मग काय…? दे धपाटा. पण असं किती दिवस चालणार.? अनेकदा मुलं नावडती भाजी किंवा नावडता डबा म्हणून मधल्या सुट्टीत डब्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. तर खायचं सोडाच. पण यामुळे मुलांच्याच आरोग्यावर परिणाम होतो.

साहजिक आहे कि, शाळेत जाणा-या मुला-मुलींसाठी दररोज डब्यात काय असेल..? याबाबत कुतूहल असते. याचे कारण म्हणजे वर्गातील अन्य मित्र आणि मैत्रिणींच्या डब्यात दिसणारे विविध पदार्थ मुलांना आकर्षित करत असतात. मग समोरच्या डब्यात जर मेयो सॅन्डविच असेल तर मुलांना शेपूची भाजी आणि पोळी आवडेल तरी कशी..? (Nutritious Food For Kids)

यामुळे रोज सकाळी मुलांचा डबा बनविताना आईला आधीच या गोष्टींचा ताण आलेला असतो. मुलांनी डबा उघडताच आनंद व्यक्त करीत तो फस्त करावा असे प्रत्येक आईला वाटते. पण डब्यात असं काय देता येईल जे दिसायला आकर्षक, खायला चविष्ट आणि आरोग्यासाठी उत्तम असेल…? तुम्हालाही हा प्रश्न पडलाय का..? मग आता चिंताच नको. कारण आज आपण याच प्रश्नाचे चटपटीत उत्तर जाणून घेणार आहोत.

(Nutritious Food For Kids) आज आपण अशा काही टिफिन रेसिपी जाणून घेणार आहोत ज्या रुचकर जितक्या पौष्टिक तितक्याच असतील. मुलांच्या डब्यात पोषण असणे गरजेचे असते त्यामुळे मुलांचा डबा बनविणे जबाबदारीचे काम आहे. शाळकरी मुलांचे वय हे वाढते आणि भूकही वाढणारी असते. या वयात मुलं जे काही खात असतात त्याचा त्यांच्या विकासावर परिणाम होत असतो.

त्यामुळे अशा वयात मुलांना सकस आहाराची अधिक गरज असते. पण टीव्ही, खेळ, व्हीडिओ गेम यामुळे आधीच मुलं व्यवस्थित खातपित नाहीत आणि शाळेच्या डब्यात वेफर्स, चॉकलेट, बिस्कीट याशिवाय दुसरं त्यांना काही नकोच असत. मग अशावेळी मुलांच्या आहाराची आणि आरोग्याची काळजी वाटणे साहजिक आहे. त्यामुळे त्यांना संतुलित, चविष्ट, पौष्टीक आहार द्यायचा असेल तर त्यांची आवड जपा आणि फ्युजन करा. (Nutritious Food For Kids)

आज डब्यात काय आहे…?

मुलांना त्यांच्या रोजच्या डब्यात काहीतरी वेगळं आणि हटके द्या. म्हणजे काय..? तर याच उत्तर आहे रोजची चपाती-भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने समोर आणा. (Nutritious Food For Kids) म्हणजे पदार्थांमध्ये कधी आंबट गोड चवीच्या चटण्या वापरा, कधी फ्रेश क्रीम, कधी तूप साखर तर कधी घरगुती सॉस, लोणची. असे पदार्थ डब्यात असतील तर डब्यातील पदार्थ दिसायला कलरफुल आणि चवीला थोडे वेगळे लागतात.

शिवाय यासोबत कधीतरी उकडलेली कडधान्य आणि फळांचं कस्टर्डदेखील द्या. त्यामुळे रोज काहीतरी वेगळं, कधीतरी क्रिमी आणि कधीतरी ज्युसी खायला मिळालं तर मुलंही खुश..मुलांचा टमीही खुश आणि मुलांची आईसुद्धा खुश. चला तर जाणून घेऊयात काही हटके आणि पौष्टिक रेसिपी.

पौष्टिक खाऊचा डब्बा रेसिपीज
(Nutritious Food For Kids)

१. चटक मटक चपाती रोल

रोज रोज तीच तीच चपाती खाऊन मुलं अक्षरशः विटतात. अहो मुलंच काय..? एका मर्यादेनंतर आपल्यालाही चपाती-भाजीचा कंटाळा येतोच ना. मग अशावेळी चपातीचा रोल बनवा. हा रोल पोषणाचा अतिशय उत्तम आणि चविष्ट पर्याय आहे. यासाठी शक्यतो मिश्र धान्यांची चपाती तयार करा. यामुळे वेगळ्या अशा पोषणाची काळजी वाटणार नाही.

चपातीचा रोल बनवण्यासाठी मस्त गरम तव्यावर थोडं तूप लावा आणि यावर चपाती दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. (Nutritious Food For Kids) यानंतर तुम्ही बनविलेल्या भाजीत थोडासा चाट मसाला मिसळा आणि चपातीला टोमॅटो सॉस लावून हि भाजी मधोमध ठेवून त्यावर थोडा कोबी तसेच किसलेले पनीर व चिज घाला. आता हि तयार चपाती सिल्वर फॉईलमध्ये गुंडाळून डब्यात ठेवा. अख्खा रोल डब्यात ठेवण्याऐवजी त्याचे काप करून ठेवा. सोबत टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटो सॉस द्या. बघा डबा रिकामाच परत येईल.

याशिवाय तुम्ही चपाती खरपूस केल्यानंतर त्यावर व्यवस्थित हिरवी लाल चटणी आणि सोबत हलकी गोड चटणी लावून घ्या. दुसरीकडे कांदा, कोबी, हिरवे वाटणे, फरसबी आणि एखादी मिरची परतून यात लाल मसाला पावडर, गरम मसाला आणि चाट मसाला थोडस मीठ घाला. सोबत काही कॉर्नचे दाणे मिसळा आणि हे मिश्रण चपातीवर व्यवस्थित लावा. यासाठी चपाती मध्यापर्यंत एका बाजूने कापा आणि त्यात हे मिश्रण एकाच बाजूने भरून चपाती त्रिकोणी दुमडा. यानंतर हि चपाती पुन्हा एकदा तव्यावर खरपूस कुरकुरीत करून घ्या आणि डब्यात कोट्याही सॉससोबत सर्व्ह करा.

२. घरगुती आकर्षक पिझ्झा

आजकाल बाजारात पिझ्झा पिझ्झा बेस अगदी सहज मिळतात. पण मुलांच्या डब्यासाठी तुम्हाला तयार पिझ्झा बेस वापरायचा नाही हे लक्षात घ्या. कारण पिझ्झा बेस शक्यतो मैद्याचा असतो आणि तो पचण्यास जड असल्याने मुलांना पोटदुखी होऊ शकते. त्यामुळे शक्यतो गव्हाच्या पिठाचे पिझ्झा बेस मिळाले तर ते वापरा किंवा घरच्या घरी असा पिझ्झा बेस तयार करा. (Nutritious Food For Kids)

pizza

यावर मुलांच्या आवडीचे टॉपिंग्स घाला. यात प्रामुख्याने टोमॅटो सॉस तर हवाच. सोबत बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, सिमला मिरची, कोबी, कॉर्नचा वापर करत टॉपिंग्स तयार करा. हा पिझ्झा बेक किंवा टॉस करता येईल. यासाठी बेसवर सॉस पसरवा आणि मग त्यावर भाजीचे टॉपिंग्स पेरा. त्यावर चिझ घालून पॅनवर ११ ते १२ मिनिटांसाठी ठेवा. पिझ्झा तय्यार टिफिन तय्यार..

३. क्रिमी सँडविच

घरच्याघरी व्हाईट सॉस बनवा आणि त्याचा वापर सॅन्डविच बनविताना करा. मिक्स ग्रेन ब्रेड टोस्ट करून त्यावर व्हाईट सॉस लावून त्यावर मिक्स व्हेजचं टॉपिंग करा आणि पुन्हा एकदा बटर लावून हे सॅन्डविच टॉस करून घ्या आणि डब्यात भरताना सिल्वर फॉईलमध्ये भरून द्या. सोबत चिली सॉस किंवा टोमॅटो सॉस द्या. (Nutritious Food For Kids)

sandwich

सँडविच म्हणजे फक्त दोन ब्रेड स्लाइस नाही बरं का. कारण मुलांच्या डब्यात सॅन्डविच द्यायचं असेल तर त्यासाठी ब्राऊन ब्रेड म्हणजेच गव्हाचा ब्रेड हवा. त्यावर छानशी कोथिंबीर पुदिन्याची चटणी, टोमॅटो सॉस आणि सोबत गोलाकार आकारात चिरलेला कांदा, टोमॅटो, बटाटा, गाजर, बीट, चवीसाठी मीठ आणि सॅन्डविच टोस्ट करण्यासाठी बटरचा वापर करा.

याशिवाय हे सँडविच अधिक हेल्दी बनविण्यासाठी कांदा, बटाटा, टोमॅटोऐवजी सँडविचमध्ये उकडलेली कडधान्य वापरा. मोड आलेले उकडलेले कडधान्य एकत्र करून त्यात चवीसाठी मीठ टाकावे. मुलांच्या आवडीनुसार चाट मसाला घाला. त्यानंतर हे कडधान्य सॅन्डविचमध्ये भरा. (Nutritious Food For Kids)

४. व्हेज नॉनव्हेज पराठे

पराठे कितीतरी प्रकारचे असूच शकतात. यामध्ये व्हेज किंवा नॉनव्हेज पदार्थांचा वापर करता येईल. तुम्ही पालक, मेथी, बटाटा, मुळा, गाजर, कोबी, बीट, पनीर अशा भाज्यांच्या मदतीने पराठा बनवू शकता. त्यामुळे मुलं न खाणाऱ्या भाज्याही अगदी आवडीने खातील. या पराठ्यासोबत लोणचे किंवा दही डब्यात द्या.

paratha

(Nutritious Food For Kids) याशिवाय मुलांना एग पराठा, चिकन पराठा असेही पर्याय तुम्ही डब्यात देऊ शकता. यासाठी चपातीच्या गोळ्यात उकडलेल्या चिकनचे विविध भाज्यांसोबत आणि मसाल्यांसोबत टॉपिंग तयार करून भरा आणि पराठा खरपूस भाजा. या पराठ्यासोबत मेयो किंवा व्हाईट सॉस, टोमॅटो सॉस देता येईल.

५. अंड्याचे पदार्थ

Egg

(Nutritious Food For Kids) अंड्यातून भरपूर कॅल्शिअम मिळते. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी उकडलेल्या अंड्याचा वापर करून पराठा, भाजी, ऑम्लेट, कबाब, एग सॅलड असे पदार्थ बनवून मुलांना डब्यात द्या. अंडे एक परिपूर्ण आहार असल्यामुळे ते कोणत्याही पद्धतीने खाल्ल्यास मुलांच्या आरोग्याला फायदा होईल.

६. फळांचे पदार्थ

अनेकदा मुलांना अख्ख फळ खाण्याचा कंटाळा येतो. कितीतरी फळांच्या साली मुलांना खायला आवडत नाहीत. पण फळांचे खरे सत्त्व या सालीतच तर असतं. म्हणून जर मुलांना फळं खायला आवडत नसतील तर त्याचे काप करा. हे काप साखर वा मध मिश्रित दुधात भिजवा. हे खायला अतिशय गोड लागतात. या फळांना स्टिक लावून मुलांच्या डब्यात दिलात तर मुलं एखादी कँडी खावी त्याप्रमाणे फळे खातील. (Nutritious Food For Kids)

याशिवाय फळांचा वापर करून शिरा बनवा. यासाठी सफरचंद, केळ, स्ट्रॉबेरी, आंबा या फळांचा वापर करा. यासोबत बदाम, काजू, बेदाणे, केसर यांचा वापर केल्यास सुक्यामेव्यातील सत्त्वही मुलांच्या पोटात जातील.

तसेच तुम्ही मिक्स फ्रुट जॅम रोल किंवा मिक्स फ्रुट कस्टर्डही मुलांना डब्यात देऊ शकता.

वर सांगितलेले पदार्थ जर तुम्ही मुलांना डब्यात दिलात तर मुलं, मुलांची दोस्त मंडळी इतकी खुश होतील कि तुमचा लंच बॉक्स अख्ख्या शाळेत फेमस होईल. (Nutritious Food For Kids)

‘हे’ पण वाचा:-

Child Care : ‘या’ 10 टिप्सच्या सहाय्याने मुलांचा सर्वांगीण विकास होईल हमखास; जाणून घ्या

आपली मुले चिडखोर असतील तर त्यांना कसे हाताळावे

काहीही खाल्लं तरी मुलांचं वजन वाढत नसेल तर ‘हे’ पदार्थ मुलांना जरूर द्या; जाणून घ्या

ताप आला म्हणून लहान मुलांना ‘पॅरॅसिटॅमोल’ देता? मग या गोष्टी जरूर जाणून घ्या