Gaming Addiction Causes
|

Gaming Addiction Causes: भाग2 : मुलांना गेमिंगचं व्यसन का लागतं..?; जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

हॅलो आरोग्य ऑनलाईन। (Gaming Addiction Causes) आपण भाग १ मध्ये गेमिंगच्या व्यसनाविषयी तज्ञ काय सांगतात ते जाणून घेतलं. शिवाय गेमिंगचे दुष्परिणामदेखील जाणून घेतले. यानंतर आता आपण गेमिंगचं व्यसन मुलांना का लागतं ..? याविषयी तज्ञ काय सांगतात ते जाणून घेणार आहोत.

Gaming Addiction Causes

० मुलांना गेमिंगचं व्यसन का लागतं..? (Gaming Addiction Causes)

तज्ञ सांगतात कि कोणतही व्यसन आपणहून लागत नाही. तर व्यसनांची आधी सवय होते आणि मग ते आपल्या जीवनशैलीचा भाग होतात. लहान मुलांविषयी बोलायचे म्हटले तर त्यांना किशोर वयात योग्य सल्ल्याची आणि मार्गदर्शनाची आवश्यकता असते. नेमकी तिथे कमतरता असेल तर मुलं कोणत्याही व्यसनाच्या मार्गावर जाऊ शकतात. यासाठी आणखी अनेक कारणे आहेत. ती आपण जाणून घेऊ.

१) एकटेपणा –

कोणत्याही माणसाच्या आयुष्यात सगळ्यात वाईट परिस्थिती एकटेपणामुळे येते. एकटा माणूस स्वतःशी किती तास बोलू शकतो…? मन रमण्यासाठी कुणाचीतरी गरज हि प्रत्येकाला असते. आपले मत मांडण्यासाठी, आपल्याला काय वाटते ते बोलण्यासाठी कुणीतरी असणे आवश्यक आहे आणि हीच कमतरता जर तुमच्या मुलांच्या आयुष्यात असेल तर मुलं आपण मन रमविण्यासाठी गेमिंगमध्ये तासनतास गुंतून राहतात. (Gaming Addiction Causes)

Game Addiction

या गेमिंगची त्यांना इतकी सवय होते कि तुमच्याहूनही अधिक त्यांना गेमिंग आवश्यक वाटत. त्यात पालकांनी मुलांना योग्य आणि पुरेसा वेळ न देण्यामुळेही मुलं गेमिंगच्या आहारी जातात.

२) न्यूनगंड –

प्रत्येक माणसात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या काही ना काही कमी असतेच. जगात कुणीही व्यक्ती सर्वगुण संपन्न नाही असे तज्ञांनी ठाम मत व्यक्त केले आहे. मात्र अनेकांना आपल्यातील कमी असणारी गोष्टच जास्त त्रासदायी वाटते. याला न्यूनगंड असे म्हणतात. लहान मुलांच्या बाबतीत याचा प्रभाव मोठा असतो.

(Gaming Addiction Causes) शाळेत किंवा मित्र मैत्रिणींमध्ये कुणी त्यांना त्यांचा कमीपणा दाखवून त्याची टिंगल केली तर मुलं त्या विषयी न्यूनगंड बाळगू लागतात. लोकांनी आपल्यावर हसण्यापेक्षा आपण लोकांपासून दूर राहावे अशी मुलांची मनोवृत्ती होते. अश्यावेळी मित्र मैत्रिणींसोबत खेळण्यापेक्षा ऑनलाईन गेम खेळणे मुलांना अति प्रिय वाटते आणि आपोच हे गेम मुलांच्या जीवनशैलीचा भाग होतात.

३) वाईट संगती –

कोणत्याही व्यसनामागे संगतीचा दोष असूच शकतो. कारण लहान मुलांच्या आयुष्यात त्यांचे मित्र आणि मैत्रिणीच जग असतात. आपला मित्र काय करतोय..? कसं करतोय..? याकडे मुलांचं नेहमीच बारीक लक्ष असत.

जर मित्राकडे कोणती नवीन गोष्ट दिसली तर आपल्यालाही पालकांनी ती द्यावीच असा मुलांचा हट्ट असतो. त्यामुळे जर तुमच्या मुलांचे मित्र ऑनलाईन गेम खेळण्यात पटाईत असतील तर साहजिकच तुमची मुलंदेखील अशा गेमकडे आकर्षित होतात.

४) नैराश्य –

अनेकदा अभ्यास, घरातील कुरबुरी यांचा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो. पण कितीतरीवेळा आपण मुलांच्या शांत असण्याला छोटं मोठं कारण असेल म्हणून दुर्लक्षित करतो. मात्र हसणारी खिदळणारी मुलं अचानक शांत झाली तर ती नैराश्याच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत हे समजून घ्या. (Gaming Addiction Causes)

Gaming Addiction Causes

मात्र आजकालचे पालक मुलं शांत झाली तर त्यांना मोठमोठ्या वस्तू आणि गेम्सचे आमिष देतात. ज्यामुळे मुलांना नैराश्यातही गेमिंगचे व्यसन लागू शकते. ज्याचा मानसिकतेवर मोठा परिणाम होऊ शकतो.

५) आधुनिक तंत्रज्ञानाचा अट्टाहास –

आपल्या मुलांनी नेहमीच एक पाऊल पुढे असावे असे प्रत्येक पालकांना वाटते. म्हणून मुलांना आधुनिकतेच्या तोंडी देऊ नका. इतर मुले कबड्डी, खो खो खेळत असतील तर मुलांनाही मैदानात उतरवा.

घरात बसवून कॉम्प्युटर आणि इतर डिजिटल स्क्रीनकडे आकर्षित करू नका. यामुळे मुलांच्या शरीराला हालचाल नकोशी वाटते. शिवाय मुलं आपोआपच गेमिंगकडे वळतात.

६) सोशल मीडियाचा अधिक वापर –

आजकाल अगदी चौथी पाचवीतली मुलंसुद्धा सोशल मीडिया युजर असतात. याला आधुनिकता म्हणायचं का आणखी काय तेच कळत नाही. सोशल मीडिया आता केवळ आकर्षणाचा भाग राहिलेला नाही तर लोकांची गरज झाली आहे. (Gaming Addiction Causes)

शिवाय यावर अधून मधून विविध ऑनलाईन गेम्सच्या जाहिराती येत असतात. यामुळे साहजिकच मुले त्या गेम्सकडे आकर्षित होतात.

७) अति लाड आणि कौतुक –

आधी आज्जी- आजोबा, आई- वडिलांकडून बक्षीस म्हणून मिळणारा एक रुपया फार मोलाचा वाटायचा. पण आजकाल मुलं त्या एका रुपयापेक्षा जास्त इतर गोष्टींचा हट्ट करतात आणि मुख्य म्हणजे पालक हे हट्ट पुरवतातसुद्धा. जेवताना हातात मोबाईल, टीव्हीचा रिमोट हवा का..? तर हवाच.

(Gaming Addiction Causes) मैदानी खेळ खेळायचा कंटाळा येतो.. मुलांचे कपडे, त्वचा खराब होते म्हणून घरातच गेमिंग हब तयार करणे, व्हिडीओ गेम्स उपलब्ध करून देणे अशी पालकांची कौतुक मुलांना गेमिंगचे व्यसन लावतात.

वरील मुद्द्यांवरून एक गोष्ट तुम्ही लक्षात घेणे अपेक्षित आहे कि, मुलांना लागणारे गेमिंगचे व्यसन हे अतिशय भयंकर आहे. यामुळे मुलांना मानसिक विकास खुंटतो. शिवाय त्यांची आकलन क्षमता कमी होते आणि मुख्य म्हणजे त्यांचे मेंदूवर नियंत्रण राहत नाही. गेमिंगच्या आहारी गेलेल्या मुलांना समुपदेशनाच्या माध्यमातून सोडवता येऊ शकेल. म्हणूनच वर सांगितलेले मुद्दे वेळीच लक्षात घ्या आणि आपल्या मुलांना गेमिंगच्या आहारी जाण्यापासून वाचवा. (Gaming Addiction Causes)

‘हे’ पण वाचा :-

Game Addiction: भाग 1- तुमचीही मुलं PUBG सारखे गेम खेळतात..? तर आताच सावध व्हा; जाणून घ्या

Nutritious Food For Kids: मुलांचा लंच बॉक्स हेल्दी-टेस्टी कसा बनवालं..?; जाणून घ्या चटकदार पौष्टिक रेसिपी

मुलांमध्ये एकाग्रता वाढविण्यासाठी सजग आसने शिकवा; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

घरगुती काढ्यांच्या सहाय्याने मुलांना ठेवा संसर्गापासून दूर; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे