Haemorrhoids
| |

Haemorrhoids: मूळव्याध म्हणजे अवघड जागेचं दुखणं; आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Haemorrhoids मुळव्याध हा असा आजार आहे जो धड सांगताही येत नाही आणि धड दाखवताही येत नाही. पण हा आजार अत्यंत त्रासदायक आजार आहे. मूळव्याध आजार दोन प्रकारचा असतो. गुदद्वाराच्या आतून आणि गुदद्वाराच्या बाहेरून अशा दोन प्रकारे हि व्याधी त्रास देते.

यामध्ये मलाशयात वा त्याबाहेरील नसांमध्ये सुज येते. यामुळे गुदद्वारजवळ रक्त येणे, गुदाक्षेत्रात दुखणे व संडासच्या जागेवर आग होणे अश्या समस्या निर्माण होतात. अनेकदा आपल्याला हा आजार झाला आहे का नाही हे ओळखणे कठीण होऊन बसते. पण एकदा दुखू लागलं कि बरोबर अंदाज येतो. मूळव्याध होण्याची अनेक कारणे आहेत. यातील काही मुख्य कारणे जाणून घेऊयात.

० मूळव्याध होण्याची कारणे (Haemorrhoids)

  1. मुळव्याध होण्याचे प्रमुख कारण म्हणजे असंतुलित खानपान. अति तिखट व तेलयुक्त पदार्थांचे सेवन वा मांसाहाराचा अतिरेक यामुळे व्यक्तीला मूळव्याध होण्याची शक्यता असते.
  2. याशिवाय दीर्घकाळ उभे राहून वा बसून काम करणे यामुळेदेखील हा त्रास होतो.
  3. तसेच अत्याधिक वजन उचलण्याची कामे करणे. (Haemorrhoids)
  4. अस्वच्छ पोटाची समस्या अर्थात पोट साफ न होणे म्हणजेच बद्धकोष्ठता.
  5. अधिक तळलेले व मिरचीचे आणि मसालेदार अन्नपदार्थ खाणे.
  6. अति उष्ण पदार्थ खाणे.
  7. महिलांमध्ये प्रसूती दरम्यान गुदाक्षेत्रावर अधिक दबाव येणे. पडल्याने देखील मुळव्याध उद्भवू शकते.
  8. शारीरिक हालचाल कमी असणे.
  9. धूम्रपान आणि मद्यपान करणे.
  10. टॉयलेट सीटवर १० मिनिटांपेक्षा जास्त बसून राहणे. अशा विविध कारणांमुळे मूळव्याध होऊ शकतो. (Haemorrhoids)

० मूळव्याध झाला तर कसे ओळखालं..?

बहुतेक लोकांना मूळव्याध झाल्यास तो कसा ओळखावा हे लक्षात येत नाही. त्यामुळे हा आजार मोठा आणि गंभीर होऊ शकतो. सर्वसाधारणपणे मूळव्याध कसा ओळखावा याबाबत तज्ञांनी काही टिप्स सांगितल्या आहेत त्या आपण जाणून घेऊ.

गुदद्वार आणि त्याच्या आजूबाजूला कठोर गाठ वाटणे. ही गाठ दुखणे आणि शौच करतेवेळी रक्त येणे. (Haemorrhoids)

शौच केल्यानंतर पोट फुगल्यासारखे वाटणे. तसेच पोट जड वाटणे आणि साफ न झाल्यासारखे वाटणे.

शौचादरम्यान त्या जागेत जळजळ वाटणे, झोंबणे आणि रक्त येणे.

बद्धकोष्ठतेची समस्या जाणवणे.

० मूळव्याध झाल्यास त्यावर प्रभावी उपाय कोणते..? (Remedies For Haemorrhoids)

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मूळव्याध झालाच तर त्यावर कोणत्याही प्रभावी उपायांचा अवलंब करण्यापेक्षा आधी आहारात बदल करावा. कारण आपला आहार आणि विहारच मूळव्याधीची समस्या सामान्य किंवा गंभीर करू शकतो. त्यामुळे आहारात काय खाल..? तर तज्ञ सांगतात कि,

मूळव्याध असलेल्या व्यक्तीने जास्तीत जास्त फायबरयुक्त आहार घ्यावा. उदा. फळे, हिरव्या भाज्या.

याशिवाय जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. साधारण दररोज किमान ७ ते ८ ग्लास पाणी प्या. तसेच दैनंदिन आहारात मठ्ठा आणि ताक यासारखे थंड पदार्थ समाविष्ट करा. (Haemorrhoids)

इतकेच नव्हे तर नियमित व्यायाम व प्राणायाम करा. तसेच अधिक वेळ एका जागी बसू नका वा उभे राहू नका.

मूळव्याध असल्यास जंक फूड, फास्ट फूड, तळलेले आणि मिरची – मसालेयुक्त पदार्थ खाणे टाळा.

अशा बारीक सारीक गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष दिले तर मूळव्याध होणारच नाही आणि झालाच तर त्रास कमी होईल.

याशिवाय काही घरगुती उपायांचा वापर करता येईल. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) जिरे –

Cumin Water

मूळव्याधी अतिशय त्रासदायक आजार आहे. पण या आजारावर देखील काही प्रभावी घरगुती उपाय आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे जिरे. तर मूळव्याध झाल्यास जिऱ्याचे सेवन कसे कराल..? यासाठी भाजलेल्या जिऱ्याची पूड १ ग्लास पाण्यात टाका. यानंतर हे पाणी प्या. असे केल्यास मूळव्याधीच्या त्रासापासून अगदी सहज आराम मिळतो.

२) मुळा –

या उपायासाठी मुळ्याच्या पानांचाही वापर करता येईल. यासाठी मुळ्याची पूर्ण भाजी व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. आता हि भाजी हलके मीठ घालून चुरून घ्या. यातून येणारे पाणी हे मूळव्याधीवर उत्तम उपाय मानले जाते. आता हे तयार पाणी गाळणीने गाळून घ्या आणि प्या . असे केल्यास मूळव्याधीची सुरुवात असेल तर मूळव्याध दूर होईल.

३) डाळिंब –

डाळिंब हे एक असे फळ आहे जे विविध गुणांनी परिपूर्ण आहे. तर मूळव्याधीवर उपचार म्हणून डाळिंबाच्या सालींचाही वापर केला जातो आणि याबाबत आयुर्वेदात लिहिले आहे. यासाठी डाळिंबाच्या सुकवलेल्या साली अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. आता या पाण्यात एक चमचा जिरे, पाऊण कप ताक आणि मीठ घाला. तयार मिश्रण प्या म्हणजे मूळव्याधीचा त्रास दूर होईल. (Haemorrhoids)

४) गुलाबाच्या पाकळ्या –

मूळव्याधीचा त्रास होत असेल आणि वेदना थांबतच नसतील तर यावर गुलाब गुणकारी आहे. यासाठी १० ते १२ गावठी गुलाबाच्या पाकळ्या घ्या. या पाकळ्या ५० मिली पाण्यात टाकून ठेवा. आता सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. असे केल्यास मूळव्याधीचा त्रास कमी होतो.

५) दूर्वा –

Durva

पुजेमध्ये विशेष स्थान असलेल्या दूर्वा मूळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. या उपायासाठी २ चमचे दुर्वा कुटून कपभर गायीच्या दुधात उकळून घ्या. तयार मिश्रण गाळून घ्या आणि प्या. मूळव्याधीच्या त्रासापासून आराम मिळेल. (Haemorrhoids)

‘हे’ पण वाचा :-

मूळव्याध(पाइल्स) पासून मुक्ती!!! वैद्यकीय/घरगुती उपचार आणि आहार (उत्तरार्ध)

मूळव्याध/पाइल्स पासून मुक्ती!!! प्रथम जाणून घ्या लक्षणे आणि कारणे (पूर्वार्ध)

बोचणारा मूळव्याध का होतो आणि तो कसा ओळखावा?; जाणून घ्या लक्षणे आणि कारणे

शौचालयात जास्त वेळ बसू नका; जाणून घ्या कारण

धोत्र्याचे फुल प्रत्येक समस्येवर गुणकारी; जाणून घ्या फायदे