Home Remedies For Cough
|

Home Remedies For Cough: कफामुळे छाती लागली दुखू..? करा घरगुती उपाय आणि मिळवा आराम; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Home Remedies For Cough अनेकदा सर्दी पडसं झालं कि छातीत कफ जमा होतो. हा कफ सहजा सहजी जात नाही. कफ छातीत जमा झाल्यामुळे छातीतून घर्रर्रर्रर्र घर्रर्रर्र असे आवाज येतात. तसेच छातीत असह्य वेदनादेखील जाणवतात. शरीरात कफ जमा झाल्यामुळे श्वसन इंद्रियांवर त्याचा गंभीर परिणाम होतो. कफ जमा झाल्यामुळे श्वासोच्छवासात अडसर निर्माण होतो. मुळात धूळीचे कण, बॅक्टेरिया, तेलकट – अतितिखट पदार्थ आणि सर्दी पडसे यामुळे कफ हि समस्या उदभवते. त्यामुळे वेळीच या समस्येवर उपाय करणे आवश्यक आहे.

जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कफ वाढीस लागला, तर त्याला अनेक समस्या येतात. यामध्ये, (Home Remedies For Cough)
कफ झालेल्या व्यक्तीला श्वास घेण्यास अतिशय त्रास होतो.
काहींना धाप लागते,
शारीरिक कमकुवतपणा जाणवतो
सतत खोकला आणि नाक वाहण्याची समस्या देखील उद्भवते.
इतकेच नव्हे तर,
अर्धशिशी आणि पूर्ण डोकेदुखी,
डोळे दुखणे अशा समस्या देखील जाणवतात. यामुळे अस्वस्थ व्हायला होत. म्हणून शरीराची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे.

(Home Remedies For Cough) यासाठी आपल्या रोजच्या आहारात असणारे काही पदार्थ वगळण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तर कोणतेही औषध घेण्याआधी घरगुती उपायांचा वापर करण्याचाही सल्ला दिला जातो. पण असे कोणते घरगुती उपाय आहेत ज्यांच्या सहाय्याने कफाची समस्या दूर होऊ शकेल..? तर हेच उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

० कफ झालाय..? तर करा ‘हे’ घरगुती उपाय (Home Remedies For Cough)

1. तुळशीचा काढा –

कितीही कफ झाला तरीही तुळशीचा काढा यावर उत्तम घरगुती उपाय आहे. कारण तुळस अँटी बॅक्टरीअल गुणधर्मांनी परिपूर्ण असते. (Home Remedies For Cough) अधिक आणि प्रभावी फायद्यांसाठी काळ्या तुळशीची पाने, सुंठ पावडर वा किसलेले आले, जेष्ठमध, भाजून कुटलेली अळशी (जवस) चहाच्या पातीचे तुकडे घालून पाणी अर्धे आटेपर्यंत उकळा. आता यात गुळ घालून व्यवस्थित ढवळा आणि तयार काढा गाळून प्या. यामुळे छातीत साचलेला कफ मोकळा होण्यास मदत होते.

2. आल्याचा रस प्या –

Tulsi-Ginger Kadha
Home Remedies For Cough

मुलाच्या आलं सर्दी आणि पडसं यांसारख्या समस्यांवर प्रभावी आहे. त्यामुळे छातीत कफ साठला असेल तर तो पातळ करण्यासाठी ताज्या आल्याचा रस पिणे फायदेशीर आहे. हा आल्याचा रस कफ पातळ करतो आणि छाती मोकळी होण्यास मदत करतो. इतकेच नव्हे तर आल्याचा रस रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करतो. याशिवाय सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी अशा प्रत्येक संसर्गजन्य आजारावर आल्याचा रस परिणामकारक आहे. (Home Remedies For Cough)

3. पत्री खडी साखर –

कोणताही ऋतू असो. जर सतत कफ आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर खडीसाखर वा पत्री खडीसाखर अतिशय प्रभावी घरगुती उपाय आहे. यासाठी पत्री साखरेचा तुकडा तोंडात ठेवलं आणि चघळालं. एक लक्षात ठेवा कि कफ झाल्यामुळे जर सतत खोकला येत असेल आणि छाती दुखत असेल तर खोकला येताच तोंडात खडीसाखरेचा तुकडा ठेवून चघळा. असे केल्यास आराम मिळेल.

Caster Sugar

(Home Remedies For Cough) दरम्यान फक्त खडीसाखर चावून खाऊ नका. तर ती तोंडात ठेवा आणि चघळा. याशिवाय खडीसाखर आणि आल्याचा रस एकत्र करून घेतल्यानेदेखील जुनाट खोकला, सर्दी आणि मुख्य म्हणजे कफ दूर होईल.

4. ओव्याचा काढा –

ओव्याचा काढा सर्दीसारख्या आजारांवर अतिशय प्रभावी आहे. याशिवाय जर छातीत कफ जमा झाला असेल तर यावर ओव्याचा अतिशय फायदा होतो. एकतर ओवा तव्य्वर भाजून एका सुटू कापडात बांधून छातीला शेक द्या किंवा मग बेस्ट उपाय म्हणून ओव्याचा काढा प्या. यासाठी प्रथम एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा. पाण्याला उकळी येताच त्यात ओवा हातावर चुरून घाला. यानंतर पाण्यात गूळ घाला आणि १० मिनिटे व्यवस्थित उकळी येऊ द्या. (Home Remedies For Cough)

Ajwain

दिवसातून किमान दोनवेळा हा काढा प्या. यामुळे काही दिवसातच कफच्या समस्येपासून आराम मिळेल. मुळात ओव्याचा प्रभाव खूप गरम असल्यामुळे याचा काढा प्यायल्याने सर्दी आणि खोकला लवकर बरा होण्यास मदत होते. शिवाय याच्या वापराने छातीत जमा झालेला खोकला आणि कफदेखील दूर होतो आणि रोग प्रतिकार शक्ती देखील मजबूत होते.

5. लवंग पाणी –

लवंगेचा प्रभाव अतिशय उष्ण असतो. त्यामुळे छातीत जमा झालेला कफ दूर होण्यासाठी लवंग वापरणे फायदेशीर आहे. लवंगेचे पाणी किंवा काढा दोन्हीही सर्दी आणि घश्यात झालेले संक्रमण, सूज यासह कफ कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी एक ग्लास गरम पाण्यात एक लहान चमचा लवंग चूर्ण मिसळून गुळण्या करा. असे केल्याने सगळ्यात आधी घश्यात साठलेला कफ दूर होण्यास मदत होईल.

6. ब्लॅक टी –

Black Tea

सर्वसाधारणपणे कफ झाल्यास दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पिण्यास मज्जाव केला जातो. परंतु ब्लॅक टी पिणे कफावर प्रभावी ठरते. यासाठी १ लवंग टाकून ब्लॅक टीचे सेवन करावे. असे केल्यास सर्दी असो वा खोकला दूर होईल. यासह कफ साठल्यास तो पातळ होतो आणि हळूहळू कफाची समस्या देखील दूर होते. (Home Remedies For Cough)

‘हे’ पण वाचा :-

भाग 2 : लवंग खाल्ल्याने मोठे मोठे आजार जातील पळून; जाणून घ्या फायदे

औषधी आल्याचा रस प्रत्येक संसर्गावर परिणामकारक; जाणून घ्या फायदे

खोकून खोकून छातीत दुखू लागलं?; जाणून घ्या खोकला पळवणारे घरगुती उपाय

कोणत्याही संसर्गावर ‘हा’ घरगुती काढा 100% गुणकारी; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे

Bad Health Habits: उत्तम स्वास्थ्यासाठी ‘या’ 25 वाईट सवयींची संगत आत्ताच सोडा; जाणून घ्या