Monsoon Health Care

Monsoon Health Care: पावसाळ्यात तुम्ही अंघोळ करत नाही..? मग परिणामांना व्हा तयार; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। (Monsoon Health Care) पावसाळ्यात बाहेर पडायचं म्हणून ए पावसा पडू नको रे.. असं म्हणणारे भरपूर लोक आहेत. कदाचित तुम्हीही त्यापैकी असालं. पण पडू नको म्हणून थोडीच पाऊस ऐकतोय. तो तर पडतोच आणि भिजवून जातो. मग अशावेळी अनेक लोक भिजलोय म्हणून अंघोळ करणं टाळतात. पण मित्रांनो हि सवय काही फारशी बरी नाही बरं का.. या सवयीमुळे तुमच्या आरोग्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. आज आपण याच नुकसानीबाबत जाणून घेणार आहोत.

Monsoon

पावसाळ्यात बहुतांश लोकांना अंघोळ करायचा कंटाळा येतो. परिणामी दिवसाआड अंघोळीला दांडी मारली जाते. (Monsoon Health Care) पावसाळ्याची पहिली सर प्रत्येकालाच हवीहवीशी वाटते पण तो मुसळधार सुरु आला कि अगदी वीट आणतो. पावसाळ्याच्या दिवसात वातावरण बऱ्यापैकी थंडच असतं. कारण सूर्य ढगाआड लपलेला असतो. यामुळे शरीरातून घाम उत्सर्जित होत नाही आणि यामुळे अनेकांना तहान सुध्दा लागत नाही. त्यामुळे लोक पाणीसुद्धा कमीच पितात. यामुळे पोटाशी संबंधित समस्या उदभवतात.

(Monsoon Health Care) शिवाय या दिवसात अंघोळ टाळणाऱ्यांना तर कोटी कोटी प्रणाम.. कारण पाऊस आहे म्हणून अंघोळीला सुट्टी मारणे चांगलेच महागात पडू शकते, हे आम्ही नाही तर स्वतः आरोग्य तज्ञ सांगतात. चला तर जाणून घेऊया, पावसाळ्यात अंघोळ टाळल्याने नेमकं होत तरी काय..?

पावसाळ्यात अंघोळ टाळण्याचे दुष्परिणाम
(Monsoon Health Care)

Bath

१) शरीराची दुर्गंधी – साहजिकच अंघोळ न केल्यामुळे तुमच्या शरीराला विशिष्ट प्रकारची दुर्गंधी येणे सुरू होते. कारण पावसाळ्याच्या दिवसात हवेत मोठ्या प्रमाणात आर्द्रता असते. तुम्ही घरात असा, किंवा घराबाहेर प्रत्येक ठिकाणी बाष्प साठण्याचं प्रमाण जास्त असते. यामुळे धुवून वाळवलेले कपडेसुद्धा थोडे ओलसर जाणवतात. (Monsoon Health Care) याच आद्रतेच्या कारणामुळे आपल्या शरीराला दुर्गंधी येते. यामुळे लोक आसपास भटकणं सुद्धा टाळतात.

Immunity

२) रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम – अंघोळीमुळे शरीर स्वच्छ आणि मन शुद्ध झाल्याची अनुभूती येते. शिवाय कंटाळाही निघून जातो. पण अंघोळ टाळली तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. कारण अंघोळ न केल्यामुळे शरीरावर व्हायरस आणि बॅक्टेरियाचं प्रमाण वाढतं. त्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती गरजेच्या वेळी काम करत नाही. (Monsoon Health Care)

virus

३) संसर्गाची शक्यता –.पावसाळ्यात आपल्या शरीरावर मोठ्या प्रमाणात जीवजंतू बसतात आणि त्यामुळे नियमितपणे अंघोळ महत्वाची. पण अंघोळ केलीच नाही तर या जंतूंचे प्रमाण वाढते आणि ते त्वचेचे संक्रमण करू शकतात. (Monsoon Health Care) हे टाळण्यासाठी जीवजंतू गरम पाण्याने धुऊन टाकणे महत्वाचे आहे. तसेच त्वचेवर असणाऱ्या अनेक मृत पेशींची यामुळे सफाई होते. पण जर तुम्ही अंघोळ टाळत असाल तर मृत पेशी त्वचेवरच साठून राहतात आणि कालांतराने त्वचेला संसर्गाचा त्रास होतो.

४) खाज खरुजची समस्या – (Monsoon Health Care) अंघोळ न केल्यामुळे मृतपेशी संसर्ग निर्माण करतात. शिवाय त्वचेवर बसणारे जीवजंतू आपले साम्राज्य वाढवतात आणि यामुळे त्वचेला इन्फेक्शनची समस्या होते. यामध्ये अंगाला सूज येणे, त्वचेला खाज येणे, खरूज निर्माण होणे अशा समस्यांचा समावेश आहे. मात्र अंघोळ नियमित केली तर शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत आणि नियंत्रित राहतो ज्यामुळे हे त्रास होत नाहीत.

५) आजारपण आणि अस्वस्थपणा – पावसाळ्यात अंघोळ न केल्याने शरीराचे काही ठराविक भाग काळे पडू शकतात. हा संकेत म्हणजे त्वचारोगाची सुरुवात आहे. यामूळे आपण वारंवार आजारी पडू शकतो. याशिवाय पावसाळ्यात दररोज अंघोळ न केल्याने शरीर घामामुळे ओले होते आणि त्यामुळे मग चिडचिड होते. परिणामी अस्वस्थता जाणवते. (Monsoon Health Care)

‘हे’ पण वाचा :-

Rainy Diseases: पावसाळ्यात संसर्गाची भीती वाटते..?; तर तज्ञांचे सल्ले फॉलो कराच

Home Remedies For Rainy Disease: पावसाळ्याचं आगमन सोबत आणतं आजारपण; जाणून घ्या पावसाळी आजारांवर घरगुती उपाय

Immunity Booster Food: पावसाळ्यात इम्युनिटी लॉस भरून काढायचा असेल तर ‘हे’ पदार्थ खा; जाणून घ्या

Leech Bite: जळू चावल्यावर काय करावं..? जळू दिसतो कसा आणि करतो काय..? लगेच जाणुन घ्या