हॅलो आरोग्य ऑनलाईन। पावसाळ्याचा मौसम म्हणजे संसर्गाची भीती. त्यात जर तुमची रोगांशी लढण्याची क्षमता कमी असेल किंवा कमकुवत असेल तर तुम्ही आजारी पडता. यालाच रोग प्रतिकार शक्ती कमकुवत असणे असे म्हणतात. (Immunity) पावसाळा हा उन्हाळ्यातील उष्णतेपासून सुटका देणारा एक सुखद बदल असला तरीही तो विविध प्रकारचे आजार घेऊन येतो. यामुळे पाऊस आवडत असला तरीही भिजायची भीती वाटतेच. कारण यामुळे तापमानात होणारे बदल, वाढत बॅक्टेरिया आणि विषाणू आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होतो. याचा रोग प्रतिकार शक्तीवर म्हणजेच इम्युनिटीवर गंभीर परिणाम होतो. ज्यामुळे सर्दी, ताप, फूड पॉइझन असे आरोग्यविषयक त्रास होतात.

आता इम्युनिटी म्हणजे काय तर इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिकार शक्ती. ती काय असते हे आपण सारेच जाणतो. इम्युनिटी हि एक जटिल, बहुस्तरीय यंत्रणा आहे. जी सक्रिय झाल्यावर, शरीर मजबूत आणि विविध बाह्य प्रभावांना प्रतिरोधक बनते. यामुळे व्हायरस आणि विविध उत्पत्तीच्या संसर्गापासून शरीराचे संरक्षण होते. शिवाय ऑपरेशन आणि गंभीर आजारांनंतर शरीराला पुनर्प्राप्तीसाठी (Immunity) रोग प्रतिकार शक्तीच मदत करते. त्यामुळे पावसाळ्यात रोग प्रतिकार शक्ती कमी झाली किंवा कमकुवत झाली तर सगळ्यात आधी आपला आहार बदला. यासाठी आपल्या आहारात खालील पदार्थांचा समावेश जरूर करा.
इम्युनिटी वाढविणारे पदार्थ
(Immunity)

१) कोमट पाणी – पावसाळ्याच्या दिवसात कोमट पाणी पिणे हा सर्वोत्तम उपाय आहे. कारण यामुळे पाण्यातून संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. (Immunity)पाणी गरम करून प्यायल्याने विविध जीवाणू आणि विषाणू नष्ट करण्यात आणि शरीराचे तापमान उबदार ठेवण्यास मदत होते. दररोज किमान १ ते २ लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा असे तज्ञ सांगतात.

२) हळदीचे दूध – सर्दी किंवा कफ पावसाळ्यात होणारे सामान्य आजार आहेत. यावर हळदीयुक्त दूध अतिशय फायदेशीर आहे. गरम दूध प्यायल्याने कफ निघून जातो आणि आराम मिळतो.

३) आले – आले आणि तुळस एकत्र करून त्याचा काढा प्यायल्यास अतिशय फायदा होतो. यामुळे सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखीवर यापासून सुटका मिळते. (Immunity)

४) रानभाज्या – पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्यांमध्ये असणारी तत्त्वे हि शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. यामुळे पावसाळी भाज्या खाणे रोग प्रतिकार शक्तीसाठी लाभदायक ठरतात.

५) आवळा – (Immunity) आवळा व्हिटॅमिन C चा उत्तम स्त्रोत असून यात कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस, फायबर, कार्बोहायड्रेट, ऍन्टी- ऑक्सिडेंट्सही असतात. त्यामुळे आवळा रोग प्रतिकार शक्तीसाठी फायदेशीर मानला जातो.
६) दालचीनी – रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दालचीनी फायदेशीर ठरते. कारण यामध्ये ऍन्टी-ऑक्सिडेंट्स आणि ऍन्टी-बॅक्टिरीअल गुणधर्म समाविष्ट असतात. जे शरीरासाठी उपयुक्त आहेत.

७) लवंग – रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लवंग फायदेशीर आहे. कारण यामुळे संसर्गजन्य आजार दूर राहतात. परिणामी इम्युनीटीचा ऱ्हास देखील होत नाही. (Immunity)

८) सुकामेवा – सुकामेव्यातील कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन्स शरीराला रोगांपासून दूर ठेवतात. ज्यामुळे सुकामेवा खाणे इम्यूनिटीसाठी फायदेशीर मानले जाते. (Immunity)
‘हे’ पण वाचा :-
Immunity System – भाग 1: पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्ती कमकुवत का होते..?; जाणून घ्या कारणे
Moth Bean Benefits – पोषणदायी मठाची डाळ निरोगी जगण्याचा स्वस्त पर्याय; जाणुन घ्या फायदे
लहान मुलांच्या आहारात असतील ‘हे’ पदार्थ तर रोगप्रतिकारक शक्ती सहज वाढेल; जाणून घ्या
घरगुती काढ्यांच्या सहाय्याने मुलांना ठेवा संसर्गापासून दूर; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे