Papaya In Periods
|

Papaya In Periods: मासिक पाळी आणि पपईचा संबंध काय..?; जाणून घ्या 5 प्रश्नांची थेट उत्तरे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Papaya In Periods रोजच्या आहारात कोणतेही एक फळ असावे, असे आहार तज्ञ सांगतात. का सांगतात बरं..? कारण फळांच्या माध्यमातून आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक असणारे अनेक घटक मिळत असतात. दिवसभरातील आहाराची पूर्तता होण्यासाठी आहारात फळांचा समावेश असणे गरजेचे असते. यापैकी अनेक फळे मोठमोठ्या आजारांवर प्रभावी ठरतात. यांपैकी एक फळ म्हणजे पपई.

Papaya

पपईचा सर्वाधिक लाभ हा महिलांच्या आरोग्यासाठी होतो. कारण मासिक पाळीचा थेट पपईशी संबंध जोडण्यात आला आहे. पण तरीही महिलांच्या मनात याविषयी अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात. साहजिक आहे. जिथे आरोग्याचा संबंध येतो तिथे प्रश्न पडणारच. तर याच प्रश्नांची उत्तरे आज आम्ही घेऊन आलो आहोत. तज्ञांनी काही विशेष माहिती देत तुमच्या समस्यांचे समाधान सांगितले आहे. तेच आज आपण जाणून घेऊ. (Papaya In Periods)

चेहऱ्यावर ग्लो आणण्यापासून ते पोटाचे विकार दूर करण्यापर्यंत अनेक प्रकारे पपई खाणे फायदेशीर आहे. हृदयालाही पपईचा अत्यंत फायदा होतो. तर महिलांमध्ये मासिक पाळीच्या त्रासातून आराम देण्यासाठी पपई फायदेशीर आहे. त्यामुळे पपई खाण्याचा सल्ला दिला जातो. हे फळ पिकल्यावर अतिशय चविष्ट लागते.

पपई मासिक पाळीसंबंधित अनेक त्रासांमध्ये फायदेशीर भूमिका निभावत असली तरीही याची खात्री कशी होणार..? (Papaya In Periods) शेवटी मासिक पाळी हा स्त्रियांच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत नाजूक विषय आहे. म्हणून तज्ञांनीही याबाबत अतिशय खोल अभ्यास करत विशेष माहिती पुरविली आहे. ती जाणून घेण्याआधी आपण पपई का खाल्ली जाते आणि त्यातील विशेष औषधी गुणधर्म कोणते ते जाणून घेऊया.

० पपईचे गुणधर्म

पपई हे फळ आरोग्यदायी असून उष्ण कटिबंधीय फळ आहे. यामध्ये फायटो केमिकल्स, जीवनसत्त्वे, खनिजे, कार्बोहायड्रेट्स (पॉलि सॅकेराइड्स), प्रथिने, फायबर, एन्झाईम्स, ग्लायकोसाइड्स आणि फ्लेव्होनॉइड्सचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. शिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी ९ (फोलेट), व्हिटॅमिन बी १, व्हिटॅमिन बी ३, व्हिटॅमिन बी ५, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के सारखी अनेक जीवनसत्त्वेसुद्धा असतात. (Papaya In Periods)

यामुळे अगदी हृदयापासून त्वचेपर्यंत शरीराच्या प्रत्येक भागाची काळजी घेण्यास पपई सक्षम आहे. शिवाय पपई मुळातच स्वभावाने अतिशय उष्ण असते. त्यामुळे मासिक पाळी येत नसेल तर पपई खाण्याचा सल्ला दिला जातो. पण तरीही महिलांच्या मनात घोळणारे प्रश्न संपत नाहीत. यासाठीच तज्ञांनी दिलेली विशेष माहिती आम्ही देत आहोत.

1. मासिक पाळी आणि पपईचा काय संबंध..? (Papaya In Periods)

आजकाल अनेक तरुण मुलींमध्ये PCOS आणि PCOD या समस्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे चुकीची जीवनशैली आणि चुकीच्या सवयी. यामुळे शरीरात रक्ताचे प्रमाण कमी होणे, अशक्तपणा येणे, अंडाशयाला सूज येणे अशा समस्या निर्माण होतात. परिणामी मासिक पाळी अनियमित होते तर काही मुलींना येतच नाही. यामुळे भविष्यात मोठमोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

PCOD

मात्र नियमितपणे पपई हे फळ खाल्ले तर गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावण्यास मदत होते. सोबतच शरीरात उष्णता निर्माण होते. (Papaya In Periods) याशिवाय पपई या फळामध्ये कॅरोटीन असते आणि हा पदार्थ शरीरातील इस्ट्रोजेन संप्रेरक पातळीला उत्तेजित करतो वा नियंत्रित करतो. साहजिकच यामुळे मासिक पाळी येण्यात नियमितता येते. त्यामुळे तज्ञ मासिक पाळीशी संबंधित आजारात पपई खाण्याचा सल्ला देतात.

2. अनियमित पाळी पपई खाल्ल्याने खरंच नियमित होते का..?

irregular menstruation

तज्ञ सांगतात तुम्ही कोणती आणि किती पपई खाता यावर पाळीचे नियमन आधारित आहे. जर तुम्ही अनियमित मासिक पाळीचे रुग्ण असाल तर पपईचा रस हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असेल. (Papaya In Periods) मुख्य म्हणजे कच्च्या पपईचा रस असे योग्य उत्तर आहे. कारण कच्ची पपई शरीरात उष्णता निर्माण करत असल्याने, ते इस्ट्रोजेन संप्रेरक उत्तेजित करते. यामुळे स्त्रियांच्या शरीरात आवश्यक बदल होऊन मासिक पाळी येते. त्यामुळे मासिक पाळी नियमित करण्यासाठी कच्ची पपई खाणे फायदेशीर आहे.

3. मासिक पाळी दरम्यान पपई खाणे योग्य आहे का?

या प्रश्नाचे सरळ उत्तर नाही असे आहे. मैत्रिणींनो तुम्हाला हे माहित असणे नक्कीच गरजेचे आहे कि, पपईचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे पिकलेली पपई आणि दुसरी म्हणजे कच्ची वा अर्ध-पिकलेली पपई. यात पिकलेली पपई केशरी रंगाची असते आणि न पिकलेली वा अर्ध पिकलेली पपई बाहेरून हिरवी आणि आतून पांढरी असते. यातील तुम्ही कोणत्या प्रकारची पपई खाताय यावर उत्तर होय किंवा नाही असे ठरते. पण शक्यतो मासिक पाळी दरम्यान स्त्रियांच्या शरीरातील उष्णता वाढलेली असते त्यामुळे अशा दिवसात पपई न खाणेच उत्तम राहील असे तज्ञ सांगतात. (Papaya In Periods)

4. मासिक पाळीत पिकलेली पपई खाऊ शकतो का..?

तर मैत्रिणींनो मासिक पाळी दरम्यान तुम्ही पिकलेली पपई खाऊ शकता पण मर्यादित स्वरूपात असे तज्ञ सांगतात. अगदी मासिक पाळी आणि गर्भधारणेदरम्यानसुद्धा पपई खाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे असे तज्ञांचा अभ्यास सांगतो. कारण पपई पचनास मदत करते आणि बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते. पण जर तुम्ही मासिक पाळीत वा गर्भधारणेदरम्यान कच्ची पपई खाल्लीत तर मात्र त्रास होऊ शकतो.

(Papaya In Periods) कारण मासिक पाळी दरम्यान पिकलेली पपई खाल्ल्यास शरीराला जितके चांगले पोषण, जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात तितकाच तोटा कच्ची पपई खाल्ल्याने होतो. कच्ची पपई खाल्ल्यास मासिक पाळी दरम्यान वेदना वाढतात. कारण कच्ची पपई गर्भाशयाचे आकुंचन वाढवते ज्यामुळे मासिक पाळीच्या वेदना वाढतात शिवाय गर्भपाताची शक्यता वाढते

5. गर्भावस्थेत पपई खाणे सुरक्षित आहे का..?

थेट आणि स्पष्टपाने याचे उत्तर नाही असे आहे. कारण तज्ञांच्या संशोधनानुसार, कच्ची किंवा अर्ध- पिकलेली पपई गर्भधारणेदरम्यान आणि मासिक पाळीत खाण्यास सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कच्च्या किंवा अर्ध-पिकलेल्या पपईचे सेवन केल्याने गर्भाशयाचे स्पस्मोडिक आकुंचन होते. दरम्यान ऑक्सिटोसिन संप्रेरकाने तयार केलेल्या आकुंचनाप्रमाणेच गर्भाशयाचे आकुंचन होते.

मुख्य म्हणजे कच्च्या पपईच्या रसामध्ये (लेटेक्स) पॅपेन नावाचे एन्झाइम असते. ज्याचे सेवन केल्याने स्त्रियांमध्ये गर्भपात किंवा नैसर्गिक गर्भपात होतो. म्हणूनच कच्ची किंवा अर्ध-पिकलेली पपई गरोदरपणात खाणे सुरक्षित नाही. या भीतीपोटी अनेकदा पिकलेली पपई खाणे देखील टाळले जाते. मात्र पपई खाताना भीती वाटत असेल तर ती खाऊच नये. कारण यामुळे तणाव येऊ शकतो आणि याचा बाळावर विपरीत परिणाम होतो. (Papaya In Periods)

‘हे’ पण वाचा :-

(अ) PCOD म्हणजे काय?; जाणून घ्या कारणे आणि लक्षणे

Foods To Avoid During Pregnancy: गर्भारपणात चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; जाणून घ्या

भाग 1: मासिक पाळीच्या काळात वजन का वाढतं..?; जाणून घ्या कारणे

वेळेआधी मासिक पाळी यावी म्हणून काय कराल?; जाणून घ्या सोप्पे घरगुती उपाय

व्हिटामिनचा खजिना!!! जाणून घ्या पपई खाण्याचे ‘हे’ फायदे