Teeth Pain
|

Teeth Pain – भाग 1: अचानक होणाऱ्या दातदुखीची असू शकतात ‘हि’ कारणे; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन| (Teeth Pain) आजकाल सर्रास सांधेदुखी, गुडघेदुखी, अंगदुखी, दातदुखी अशा वेदनादायी समस्यांनी हैराण लोक आढळून येतात. याचे कारण म्हणजे बदलती जीवनशैली. होय. आपण काय खातो..? काय करतो..? याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.

दातांच्या तशा विविध समस्या असतात. पण दातदुखी ही असह्य वेदना देणारी समस्या विविध कारणांमुळे होऊ शकते. हि कारणे माहित असतील उपाय करणे सोपे जाते. शिवाय विविध कारणांवर विविध घरगुती उपाय देखील आहेत. ज्यांच्या सहाय्याने या वेदनांपासून आराम मिळवता येतो.

आपले दात आपल्या सौंदर्यासह आपण घेत असलेला आहार योग्य पद्धतीने ग्रहण करण्यास मदत करतात. (Teeth Pain) त्यामुळे दातांची निगा राखणे अत्यंत आवश्यक आहे. लहानपणी आपली आई आपल्याला दात कसे घासायचे याचे प्रशिक्षण देते. एका वयानंतर आपणच आपले दात घासायला लागतो. कधी कधी तर लहान वयात दात घासायचा इतका कंटाळा येतो की साहजिकच मुल पालकांची नजर चुकवून दात घासणे टाळतात. पण याचे परिणाम त्यांच्या किशोर वयात भोगावे लागतात.

(Teeth Pain) दात नीट स्वच्छ न केल्याने आपण खाल्लेल्या अन्नाचे कण हे दातांच्या फटीत अडकून राहतात. काही काळ हे कण असेच राहिल्याने कुजतात आणि याचा परिणाम दातांवर होतो. याशिवाय दातांची अस्वच्छता विषाणूंना आमंत्रण देते. ज्यामुळे दात किडणे, हिरड्या दुखणे आणि प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात.

तर आज भाग १ मध्ये आपण दातदुखीची विविध कारणे जाणून घेणार आहोत. यानंतर भाग २ मध्ये आपण दातदुखीवरील उपाय जाणून घेऊ.

दातदुखीची कारणे
(Teeth Pain)

दातदुखी ही आबालवृद्धांमध्ये आढळणारी अत्यंत त्रासदायक आरोग्यविषयक समस्या आहे. बर्‍याच जणांना दात किडल्यामुळे दातदुखीचा त्रास होतो. पण दात किडण्यासोबतच अन्य अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे दातदुखी होते. चला तर जाणून घेऊया दातदुखीची करणे पुढीलप्रमाणे –

१) हिरड्यांमध्ये संसर्ग – हिरड्यांमध्ये संसर्ग होणे यामुळे दातदुखी होते. यात हिरड्या लाल होणे, त्यातून रक्तस्त्राव होणे अशी लक्षणं दिसतात. हिरड्यांचे आजार गंभीर झाल्यास दातांनाही इजा होते. शिवाय गालाजवळील भागाला, हाडांच्या टिशूला सूज येते.

२) कॅव्हिटी – दातांवर कॅव्हीटीजचा मारा झाल्यामुळे इनॅमलचे नुकसान होते. ज्यामुळे दात वेदनारहीत होतात. मात्र ही दातांवरील छिद्र इनॅमलचा स्तर भेदून आत प्रवेश करतात. ज्यामुळे दात सेंसिटिव्ह होऊ लागतात. यामुळे वेदना तीव्र होतात आणि दातांच्या आजुबाजूला संसर्ग झाल्याने पू तयार होतो. (Teeth Pain)

३) अपघात – एखाद्या अपघातात तोंडाला इजा झाली असेल तर दातदुखीची समस्या होऊ शकते. शिवाय अशा अपघातात जर एखादा दात तुटला वा फ्रॅक्चर झाले तर दातांच्या समस्या वाढतात. मुख्य म्हणजे यात फ्रॅक्चरची तीव्रता अधिक असेल तर नर्व्हमध्ये फ्रॅक्चर असण्याची शक्यता असते. ज्यामुळे वेदना अधिक प्रमाणात जाणवतात. याशिवाय दातांवर चिरा पडल्यास त्यात प्लाग आणि बॅक्टेरिया वाढल्यानेही दातदुखी होऊ शकते.

४) फ्रॅक्चर – दातदुखीला हिरड्यांचे विकार, कॅव्हीटीज या समस्यांव्यतिरिक्तही तर समस्या कारणीभूत असू शकतात. यात दातांच्या आतील भागात छुप्या स्वरुपाचे फ्रॅक्चर असेल तर तीव्र दातदुखी संभवते. अशाप्रकारचे फ्रॅक्चर एक्सरेमध्ये सहज दिसत नाही. पण हे फ्रॅक्चर त्रासदायी असते. या समस्येला ‘क्रॅक्ड टुथ सिंड्रोम’ असे म्हणतात. या प्रकारात दातदुखी असह्य होते.

५) चावण्याची चुकीची पद्धत – याशिवाय एखादा पदार्थ कडक असेल किंवा आपण खात असलेले पदार्थ चावण्याची पद्धत चुकली तर दातदुखी होऊ शकते. या वेदना अतिशय त्रासदायी असतात. (Teeth Pain)

६) दात चावण्याची सवय – अनेकांना रात्री झोपेत दात चावण्याची सवय असते. अशी झोपेत दात चावण्याची सवय दातांमध्ये मोठं मोठ्या पोकळ्या तयार करते. ज्यामुळे समस्या उद्भवू शकते. जसे कि कडक पदार्थ खाताना किंवा चावताना तीव्र वेदना होऊ शकतात. तसेच दातांमध्ये फटी निर्माण होतात आणि त्यामुळे वेदनादेखील होतात.

७) कमकुवत टिश्यू – अनेकदा दातदुखीची समस्या उद्भवण्यामागे दातातील टिश्यू कारणीभूत हातात. दात चावताना तोंडातील टिशूवर अतिभार आला तर दातदुखी होते. या दुखण्यासोबतच, जबड्यातील सांधे व स्नायू दुखावतात.

८) दात घासण्याची चुकीची पद्धत – याशिवाय चुकीच्या पद्धतीने दात घासणेदेखील वेदनादायी ठरू शकते. कारण यामुळे हिरड्या कमी होतात. तसेच दातांजवळील सुरक्षाकवच कमी होते. ज्यामुळे अति गरम व अति थंड पदार्थ त्रासदायी ठरतात. तसेच अ‍ॅसिडचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ खाल्ल्याने सेंसिटिव्हीटी वाढते आणि साहजिकच दात कमकुवत होतात. (Teeth Pain)

९) अक्कल दाढ येणे – अक्कलदाढ येत असेल तर दातांमध्ये वेदना होतात. ही दाढ काहीशा वा पूर्ण हिरड्यातून येते. मात्र पुरेशी जागा नसल्यास आजूबाजूच्या हिरड्यांसोबतच आजूबाजूच्या दातांवरही परिणाम करते. यामुळे भयंकर वेदना होतात. मात्र अक्कलदाढ आल्यानंतर तिची योग्य पद्धतीने स्वच्छता न केल्यास ती संसर्गाचे कारण ठरू शकते. शिवाय वेदनांचेही मुख्य कारण होऊ शकते.

१०) वाकडे दात – वाकडे-तिकडे दात भार सहन करू शकत नाहीत. त्यामुकले दातांना समान रेषेत आणण्यासाठी, दोन दातांमधील फ़ट कमी करण्यासाठी ब्रेसेस लावले जातात. मात्र यामुळेदेखील असह्य दातदुखी होऊ शकते. (Teeth Pain)

‘हे’ पण वाचा :-

थंडीमुळे दातखिळी बसली? तर गरमागरम कॉफी ‘या’ पदार्थांसह बनवा आणि फील करा हॉट हॉट; जाणून घ्या

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी काय आहेत उपाय

मुलांचे दात किडण्यापाठीमागची कारणे

तुमचे दात सुदंर आहेत , पण पांढरे नसतील तर …

दररोज दात घासणे का आहे योग्य?