Thyroid Disease
|

Thyroid Disease: भाग 1 – थायरॉईड म्हणजे काय..?; जाणून घ्या त्याचे प्रकार आणि कारणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। (Thyroid Disease) आजकालची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या पद्धती, आवड निवड सगळंच कसं हळूहळू आधुनिक होत चाललं आहे. घरगुती डाळभाताची जागा मॅगी पास्ताने घेतली आणि सगळं काही बदलून गेलं. यामुळे झालं काय कि माणूस आधुनिक तर झाला पण आरोग्याच्या समस्या झपाट्याने वाढत गेल्या. जगभरातील प्रत्येक एका माणसामागे एक व्यक्ती काही ना काही आजाराने त्रासलेली आहेच. सध्या जगभरात वेगाने पसरणारा थायरॉईड हा आजार देखील यांपैकी एक आहे. हा आजार अत्यंत चिंतेचा विषय होत चालला आहे.

मुख्य म्हणजे थायरॉईडची (Thyroid Disease) समस्या महिलांमध्ये अधिक दिसून येते. हि समस्या थायरॉईड ग्रंथीच्या असंतुल होण्यामुळे निर्माण होते. पण अनेकांमध्ये आजही या आजाराविषयी फारशी योग्य माहिती नाही आणि त्यामुळे यावर योग्यवेळी उपचार केले जात नाहीत. परिणामी तुमचं आरोग्य धोक्यात पडते. म्हणूनच आज आपण या आजाराविषयी पूर्ण माहिती घेणार आहोत.

थायरॉईड म्हणजे काय..?
(Thyroid Disease)

थायरॉईड ही गळ्याच्या पुढील भागात असणारी एक अतिशय लहान आणि फुलपाखरासारखा आकार असणारी एक ग्रंथी असते. हि ग्रंथी मानवी शरीरात आढळणाऱ्या सर्वात मोठ्या अंतःस्रावी ग्रंथींपैकी एक आहे. या ग्रंथीचे कार्य आपल्या शरीरातील अनेक महत्त्वाच्या कार्यांवर नियंत्रण ठेवणे आणि शरीराला आवश्यक हार्मोन्सची निर्मिती करणे हे आहे.

(Thyroid Disease) शिवाय ही ग्रंथी आपण ग्रहण करीत असलेल्या अन्नाचे रूपांतर ऊर्जेत करते. या सोबतच श्वास, हृदय, पचन संस्था आणि शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवण्यासही हि ग्रंथी मदत करते. मात्र जेव्हा या ग्रंथीचे हार्मोन्स असंतुलित होतात तेव्हा ‘थायरॉईड’ची समस्या निर्माण झाली असे हटले जाते. आयुर्वेदात थायरॉईडशी संबंधित आजाराचा उल्लेख ‘अवटू ग्रंथीचा विकार’ म्हणून केलेला आहे.

‘थायरॉईड’चे प्रकार

थायरॉईड’चे मुख्य २ प्रकार आहेत आणि उप ४ प्रकार आहेत. असे एकूण ६ थायरॉईडचे प्रकार आहेत.

hypothyroid

प्रकार 1 :- हायपोथायरॉईडीझम (Hypothyroidism)

यामध्ये थायरॉईड ग्रंथी कमी प्रमाणात हार्मोन्स निर्माण करते आणि तिचे कार्य मंदावते. यामध्ये हृदयाची गती कमी होणे, उच्च रक्तदाब, स्त्रियांमध्ये मासिक पाळी असामान्य होणे, चेहऱ्यावर सुज येणे असे त्रास जाणवतात. (Thyroid Disease)

प्रकार 2 :- हाइपरथायरॉइडज्म (Hyperthyroidism)

यामध्ये थायरॉईड ग्रंथी गरजेपेक्षा जास्त हार्मोन्स तयार करू लागते. ज्यामुळे हार्मोन्स प्रमाणापेक्षा अधिक निर्मित झाल्याने त्यामध्ये असंतुलन होते.

Thyroid

प्रकार 3 :- गोइटर (Goiter/ Enlarged Thyroid)

यामध्ये जेव्हा आपण ग्रहण करीत असलेल्या अन्नामध्ये आयोडीनची मात्रा कमी असते तेव्हा शरीरात आयोडीनची कमतरता जाणवते. यामुळे घशात सूज आणि गुठळ्या निर्माण होतात. ज्याला गोइटर थायरॉईड म्हणतात.

प्रकार 4 :- थायरॉईडायटीस (Thyroiditis)

(Thyroid Disease) हा थायरॉईड ग्रंथीतील दाहक प्रक्रियेमुळे होणारा एक आजार आहे.

प्रकार 5 :- थायरॉईड नोड्यूल (Thyroid Nodule)

यामध्ये थायरॉईड ग्रंथीमध्ये एक ढेकूळ तयार होऊ लागते. थायरॉईड नोड्यूल ही थायरॉईड ग्रंथीमधील एक अशी समस्या आहे जी गाठीच्या स्वरूपात तयार होते.

प्रकार 6 :- थायरॉईड कर्करोग (Thyroid Cancer)

यामध्ये थायरॉईड ग्रंथी गळ्याच्या पुढच्या भागामध्ये लॅरेन्क्स खाली असते. या ग्रंथीच्या पेशींची अनियंत्रित वाढ झाल्याने परिणामी गाठ वा ट्यूमर तयार होतो. ज्यामुळे थायरॉईडचा कॅन्सर होतो.

थायरॉईड होण्याची कारणे

1. आयोडीनची कमतरता –

आपल्या आहारात आयोडीनची कमतरता असणे हे थायरॉईच्या समस्यांची निर्मिती होण्यामागील मुख्य कारण आहे. (Thyroid Disease)

2. व्हिटॅमिन A’ची कमतरता –

Vitamin A

व्हिटॅमिन A आपल्या शारीसाठी अत्यंत आवश्यक असते. जर या व्हिटॅमिनची शरीरात कमतरता असेल तर हार्मोन्स असंतुलित होतात आणि परिणामी थायरॉईडची समस्या निर्माण होते.

3. मानसिक ताण तणाव –

Stress

अनेकदा मानसिक तणावाचे प्रमाण इतके जास्त असते कि हा ताण तणावदेखील आपल्या हार्मोन्सना अनियंत्रित करतो. परिणामी थायरॉइडची समस्या जाणवते.

4. अनुवांशिक कारणे –

Harmones

याशिवाय आनुवंशिक त्रास वा आजारदेखील यामागील एक मुख्य कारण असू शकते. अनेकदा अनुवांशिक कारणांमुळे हार्मोन्स कमी जास्त होतात आणि याचा परिणाम थायरॉईड ग्रंथीवर होतो.

(Thyroid Disease) थायरॉईड हा आजार खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी आणि ताण तणावाने व्यापलेले आयुष्य यामुळे होणार आजार आहे. मानसिक तणाव आणि हार्मोन्सचे असंतुलन यामुळे थायरॉईड ग्रंथीसंबंधीत रोग होतात. आयुर्वेदानुसार थायरॉईड संबंधी रोग हे वात, पित्त आणि कफ या दोषांमुळेही होतात. जेव्हा वात आणि कफ दोष शरीरात होतात, तेव्हा त्या व्यक्तीला थायरॉईड होतो. म्हणूनच थायरॉईडवर उपचार करण्यासाठी आपण अगदी आयुर्वेदिक पद्धतीचाही अवलंब करू शकतो असे तज्ञ सांगतात.

आज भाग १ मध्ये आपण थायरॉईड म्हणजे काय…? त्याचे प्रकार किती आणि कोणते..? शिवाय थायरॉईडची समस्या होण्यामागील कारणे काय..? हे जाणून घेतले. यानंतर आपण भाग २ मध्ये थायरॉईड आजाराची लक्षणे, आहार आणि घरगुती उपाय जाणून घेऊ. (Thyroid Disease)

‘हे’ पण वाचा :-

थायरॉईड आहे ना मग खाऊ नका हे पदार्थ

‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे वाढतोय कॅन्सरचा धोका; माहित नसतील तर जाणून घ्या

थायरॉईड असेल तर असा करा कंट्रोल; जाणून घ्या आयुर्वेदिक उपाय

अनियमित पाळीची कारणे दुर्लक्षित करू नका; जाणून घ्या