Thyroid Symptoms
| | |

Thyroid Symptoms & Remedies: भाग 2 – ‘थायरॉईड’ची समस्या कशी ओळखालं..?; जाणून घ्या लक्षणे आणि घरगुती उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। (Thyroid Symptoms) मित्रांनो याआधी आपण भाग १ मध्ये थायरॉईड आजाराची माहिती घेताना नक्की हा आजार काय आहे..? तो कसा आणि का होतो..? याशिवाय थायरॉईडचे प्रकार किती..? हे जाणून घेतले. यानंतर आज आपण भाग २ मध्ये थायरॉईड झालाय हे कसे ओळखता येईल..? त्याची लक्षणे काय..? आणि झालाच तर त्यावर प्रभावी असे घरगुती उपाय कोणते..? या प्रश्नांची उत्तरे प्रामुख्याने जाणून घेणार आहोत. इतकेच नव्हे तर या दरम्यान आहार कसा असावा आणि काळजी कशी घ्यावी..? हे देखील आपण जाणून घेणार आहोत.

Thyroid

‘थायरॉईड’ची लक्षणे
(Thyroid Symptoms)

‘थायरॉईड हा असा आजार आहे जो त्याच्या लक्षणांवरून ओळखता येतो. पण यासाठी त्याची लक्षणे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. तर आज आपण थायरॉईडची प्रमुख लक्षणे जाणून घेऊया.

जर शरीरात खाली सांगितलेल्या लक्षणांपैकी काही लक्षणे दिसत असतील तर ही थायरॉईडची सुरुवात आहे हे समजून घ्या. बऱ्याचदा ही लक्षणे अतिशय सामान्य आजारासारखी दिसतात. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. विशेष म्हणजे स्रियांनी गरोदरपणात थायरॉईडची लक्षणे दिसली तर लगेच डॉक्टरांशी संपर्क करा.

Heart Care

प्रामुख्याने ‘थायरॉईड’ची विशेष आणि गंभीर लक्षणे अशी कि,
हृदयाची गती कमी होणे,
उच्च रक्तदाब,
स्त्रियांमध्ये मासिक पाळी असामान्य होणे,
चेहऱ्यावर सुज येणे
इत्यादि. (Thyroid Symptoms) मात्र याआधी थायरॉईडची सुरवातीची लक्षणे अतिशय सामान्य असतात जी प्रत्येकाला माहित असणे गरजेचे आहे. जाणून घेऊ सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे:-

शारीरिक थकवा जाणवणे
घट्ट कफ होणे आणि छातीत दुखणे
सतत चिडचिड होणे

Anger

घाबरल्यासारखे वाटणे
मानसिक ताण तणाव
(Thyroid Symptoms)
एसीतही घाम येणे

Sweat

हृदयाच्या ठोक्यांची गती कमी होणे
उच्च रक्तदाबाची समस्या जाणवणे
स्नायू आणि सांध्यांमध्ये सुज येणे

high BP

(Thyroid Symptoms) स्मरणशक्ती कमी होणे
स्त्रियांमध्ये मासिक पाळी अनियमित होणे
प्रजनन क्षमतेत असंतुलन

Memory Loss

हात थरथरणे
चेहरा सुजणे
अचानक वजन वाढणे

Weight gain

कोरडी आणि शुष्क त्वचा
डोक्यावरील केस कोरडे होणे आणि वाढ खुंटणे
अकाली केस पांढरे होणे
झोप मोड होणे किंवा झोप न येणे
(Thyroid Symptoms)

थायरॉईडवर प्रभावी घरगुती उपाय
(Home Remedies For Thyroid)

मुख्य म्हणजे ‘थायरॉईड’वर उत्तम असे आयुर्वेदिक उपाय करणे फायदेशीर आहे. यासाठी फक्त डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. जर थायरॉइडची अगदी सुरुवात असेल तर घरगुती आयुर्वेदिक उपाय (आजीचा बटवा) देखील करू शकता. जाणून घेऊया थायरॉईडवर प्रभावी घरगुती उपाय खालीलप्रमाणे:-

१) अश्वगंधा –

(Thyroid Symptoms & Remedies) ‘अश्वगंधा’ ही एक अशी आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे जिच्या सहाय्याने विविध आजारांवर मात करता येते. यामुळे आयुर्वेदात अश्वगंधा औषधीला विशेष महत्व आहे. लैंगिक समस्या ते अल्झायमरसारख्या विस्मरणाच्या आजरांवर अश्वगंधा फायदेशीर आहे. अगदी थायरॉईड कमी करण्यासाठीही अश्वगंधा फायदेशीर भूमिका बजावते.

Ashwagandha

यामुळे थायरॉईडवर नियंत्रण मिळविण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण दररोज १ अश्वगंधा कॅप्सूल खाऊ शकता किंवा रात्री झोपण्याआधी १ चमचा अश्वगंधा चूर्ण गाईच्या दुधात मिसळून त्याचे सेवन करू शकता. याचा मुख्य फायदा म्हणजे अश्वगंधा हार्मोन्सचे असंतुलन दूर करते. परिणामी थायरॉईडसारखा गंभीर आजार आपोआपच नियंत्रणात येतो.

२) ज्येष्ठमध –

ज्येष्ठमधदेखील आयुर्वेदातील अतिशय प्रभावी औषध आहे. याचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत. ज्येष्ठमधमध्ये प्रामुख्याने आढळणारा आवश्यक घटक म्हणजे ट्रीटरपेनोइड ग्लाइसेरीथेनिक एसिड.

Liquorice

संशोधनानुसार, हा घटक थायरॉईड कॅन्सर पेशींची रोख थांबवतो. मुळातच शरीरातील आयोडिनचं प्रमाण नियंत्रित करण्याची क्षमता यात असते. त्यामुळे थायरॉइड अधिक वाढू नये यासाठी ज्येष्ठमधाचे सेवन करता येईल. (Thyroid Symptoms & Remedies)

३) काळी मिरी –

black pepper

काळीमिरीचा वापर प्रामुख्याने प्रत्येक घरात स्वयंपाकात केला जातो. काळीमिरी विविध पदार्थांमध्ये वापरल्यास जशी पदार्थाची चव वाढते तसाच याचा वापर आरोग्यासाठी केल्यास आरोग्यास फायदा होतो. मुख्य म्हणजे थायरॉईडवर घरगुती उपचार म्हणून दररोजच्या जेवणात काळीमिरी वापरली तर चांगला फायदा मिळतो.

४) त्रिफळा चूर्ण –

Trifala

त्रिफळा चूर्ण विविध आजारांवर प्रभावीपणे काम करते. पण दररोज १ चमचा त्रिफळा चूर्णाचे सेवन कराल तर थायरॉईडमध्ये आराम मिळतो.

० थायरॉईडच्या रुग्णांचा आहार कसा असावा..?

(Thyroid Symptoms & Remedies) थायरॉईडच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपला आहार निश्चित करावा. कारण थायरॉईडच्या रोगामध्ये तुमचे नियमित जेवण संतुलित असायला हवे. यासाठी तुमच्या आहारात काय घ्याल आणि काय नाही ते जाणून घ्या पुढीलप्रमाणे:-

Food

१) सगळ्यात महत्वाचे म्हणजे थायरॉईडच्या रुग्णांचा आहार सकस, पौष्टिक आणि मुख्य म्हणजे संतुलित असायला हवा.

२) थायरॉईडच्या रुग्णांनी नियमित दोन वेळचे जेवण हे हलके करणे आवश्यक आहे.

३) आहारात अधिकाधिक फळं आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. याचे कारण म्हणजे हिरव्या भाज्यांमध्ये पुरेसे आयर्न असते. जे थायरॉईडच्या रुग्णांना आवश्यक आहे. (Thyroid Symptoms & Remedies)

Fruits

४) थायरॉईडच्या रुग्णांचा आहार पोषक घटकांनी परिपूर्ण असावा. ज्यामध्ये प्रामुख्याने मिनरल्स आणि विटामिनयुक्त आहाराचा समावेश असेल.

५) या रुग्णांनी आपल्या आहारात प्रामुख्याने गहू आणि ज्वारीसारख्या पोषण धान्यांचा वापर अधिक करावा.

६) अशा रुग्णांनी त्यांच्या आहारात सुखामेवा खाणे फायदेशीर आहे. यामध्ये बदाम, काजू, अक्रोड अशा मेव्याचा समावेश आहे. (Thyroid Symptoms & Remedies)

DryFruits

७) थायराईडच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात नियमितपणे दूध आणि दह्याचे सेवन दिवसभरातून किमान एकदा करावे.

८) या रुग्णांनी त्यांच्या आहारात ‘विटॅमिन ए’चे अधिक सेवन करावे. यासाठी आहारात गाजराचा समावेश करावा.

Vitamin A

९) थायरॉईडच्या रुग्णांनी जंक फूड, तळलेले पदार्थ आणि फास्ट फूड खाणे पूर्णपणे बंद करावे. अन्यथा याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

१०) या रुग्णांनी धूम्रपान, अल्कोहोल आणि इतर नशेच्या कोणत्याही पदार्थांपासून पूर्णपणे दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. (Thyroid Symptoms & Remedies)

० थायरॉईड जर मुळापासून दूर करायचा असेल तर काय करालं..?

थायरॉईडची समस्या जर मुळापासून दूर करायची असेल तर तुमच्या डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पूर्ण पालन करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, वर सांगितलेल्या काही घरगुती औषधी उपचारांचा वापर केल्यास थायरॉईडपासून मुक्ती मिळवता येईल. हार्मोन्सचे असंतुलन दूर करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या डाएट आणि औषधांचे रुटीन व्यवस्थित फॉलो केल्यास थायरॉईड मुळापासून दूर करता येईल. (Thyroid Symptoms & Remedies) 

‘हे’ पण वाचा :-

Thyroid Disease: भाग 1 – थायरॉईड म्हणजे काय..?; जाणून घ्या त्याचे प्रकार आणि कारणे

Haemorrhoids: मूळव्याध म्हणजे अवघड जागेचं दुखणं; आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

7 Day Healthy Meal Plan: हेल्दी रहायचंय..? तर हेल्दी डाएट करा ना; जाणून घ्या आठवड्याचा मिल प्लॅन

Stale Food: शिळं अन्न खाल्ल्याने काय होते..?; जाणून घ्या काय सांगतात तज्ञ