Weight Loss Tips
| | |

Weight Loss Tips वेटलॉस करताना ‘या’ चुका कराल तर पोटाची ढेरी आणखीच वाढेल; जाणुन घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन| (Weight Loss Tips) लठ्ठपणा ही समस्या कमी आणि आजार जास्त वाटू लागला आहे. कारण दर २ माणसांमागे एका माणसाचं एकतर पोट सुटलेलं असतंच. हळूहळू हा लठ्ठपणा एव्हढा वाढतो की अगदी जिवावर सुध्दा बेततो. ही समस्या आजच्या काळातील सामान्य समस्यांपैकी एक आहे. या समस्येचं मूळ कारण आहे ते असंतुलित जीवनशैली. पण काही प्रकरणांमध्ये, लठ्ठपणा हा मेडिकल कंडीशन मूळे असू शकतो.

Weight gain

आपल्या शरीरात गरजेपेक्षा जास्त चरबी जमा झाली की आरोग्याची वाट लागली म्हणून समजाच. म्हणून आजकाल लोक बारीक सारीक राहण्यकडे जास्त लक्ष देतात. (Weight Loss Tips) पण त्यातही चुका करतात आणि मग काय..? मग आहे त्याहून अधिक लठ्ठपणाचा सामना करावा लागतो. कधी कधी कमी वयातच हा लठ्ठपणा जडतो आणि वयाप्रमाणे वाढत जातो. जणू काही वर्गमित्रच. त्यामूळे एकतर योग्य वयात लठ्ठपणावर नियंत्रण मिळवा आणि वजन कमी करताना चुका करू नका.

Weight gain

वजन जितकं झपाट्याने वाढत तितक्या झपाट्याने कमी होत नाही हे एक सार्वजनिक दुःख आहे. (Weight Loss Tips) वजन कमी होण्यासाठी बराच काळ मेहनत करावी लागते. त्यात जर मेडिकल कंडीशन मूळे लठ्ठपणा असेल तर आणखी कठीण परिश्रम घ्यावे लागतात. अशावेळी मुख्य करून फिटनेस ट्रेनरच्या टीप्स वर पूर्ण फोकस ठेवा. अन्यथा दुप्पटीचे वजन घेऊन फिरण्यास तयार व्हा. अनेकदा फिटनेस टीप्स वगळल्यामुळे किंवा मुद्दाम दुर्लक्ष केल्यामुळे वजन कमी होत नाही आणि वाढतं जात. शिवाय काही लोकांसाठी इंटरनेट फिटनेस गुरु असतो. पण सगळ्या फिटनेस टीप्स तुमच्या प्रकृतीसाठी योग्य असतीलच असे नाही.

Weight Loss

तज्ञांच्या सांगण्यानुसार, वजन कमी करण्याच्या काही टिप्स (Weight Loss Tips) तुमच्या शरीराचे वय लवकर वाढवतात. अशा परिस्थितीत वजन कमी करण्यासाठी कोणत्याही टिप्स फॉलो करण्यापूर्वी त्यांची वास्तविकता पडताळून घ्या आणि सतर्क रहा. मग अशावेळी नेमकी जीवनशैली काय असावी आणि कोणत्या चुका करू नये हे माहीत असणे गरजेचे असते. तेच आपण जाणून घेऊया खालीलप्रमाणे:-

1. कितीही खा, काहीही खा पण कॅलरी वाढू देऊ नका (Weight Loss Tips) –

बहुतेक लोकांना वाटतं की आपण काहीही नाही सगळं काही खाऊ शकतो. या नादात ते अनेकदा कॅलरीची मर्यादा पार करतात आणि त्यांना कळतही नाही. तर मित्रांनो, असं कसं चालेल बरं..? जोपर्यंत तुम्ही कॅलरीची मर्यादा ओलांडणे बंद करत नाही तोपर्यंत तुमचं वजन आटोक्यात येणं अशक्य आहे. त्यामुळे पॅक्ड फूड्स, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि कमी पौष्टिक पदार्थ आपल्या आहारातून वगळणे आवश्यक आहे.

Eating Disorder

संशोधनानुसार, (Weight Loss Tips) अधिक प्रक्रिया केलेले पदार्थ पेशींचे वय गतीने वाढवतात. कारण यामध्ये हायड्रोजनेटेड तेल जास्त प्रमाणात असतात. हे ट्रान्स फॅट्सने भरलेले असल्यामुळे शरीरातील सूज वाढवतात. यामुळे पेशी खराब होण्याची शक्यता वाढते.

2. नुसतं प्रोटिन खाऊ नका –

Protein Food

साधारणपणे वाढते वजन रोखण्यासाठी प्रामुख्याने आहारात अधिक प्रोटीन खाल्ले जाते. जे अत्यंत चुकीचे आहे. वाढत्या वजनाचा संबंध हा तुम्ही खात असलेल्या कॅलरीजशी असतो. त्यामुळे पुरेसे प्रोटिन घेत घेतल्याची खात्री करणे आवश्यक असते. शिवाय आपले वजन कमी करण्यासोबतच प्रथिनांची कमतरता हे वय वाढण्याचेही मुख्य कारण ठरते. (Weight Loss Tips) जास्त प्रमाणात प्रोटिनचे सेवन केल्याने शरीर बारीक राहण्यास मदत होते. पण प्रथिनांच्या कमतरतेमुळे स्नायूंचे नुकसान होते आणि परिणामी चयापचय शक्ती लोप पावते. यामुळे हाडांचे नुकसान होते. त्यामुळे बारीक होण्यासाठी फक्त प्रोटीन खाऊ नका.

3. खाण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करा –

Fruits

आपल्या आहारात नुसतं प्रोटीन किंवा नुसतं कॅल्शिअम असेल तर कसं चालेल..? अनेक लोक बारीक होण्यासाठी फक्त फळं किंवा फळांचा ज्यूस एव्हढाच आहार घेतात. (Weight Loss Tips) याशिवाय शेक किंवा प्रोटीन बारसारखे खाद्यपदार्थदेखील आहारात समाविष्ट करतात. तर असे पदार्थ कधीतरी खाण्यावर भर द्या. याचे कारण म्हणजे, अनेक उत्पादने अत्यंत प्रक्रिया केलेली असतात आणि त्यात साखर भरपूर असते. जास्त साखर दीर्घकालीन रोगाच्या विकासास कारणीभूत ठरते आणि म्हातारपणाकडे वेगाने नेते.

4. कार्ब्स आहारातून काढून टाकू नका –

Rice

आपल्या आहारातील कार्ब्स आपल्या लठ्ठपणाला विशेष कारणीभूत असतात त्यामुळे कार्ब्स वाईट आहेत असे लोक मानतात. यामुळे आहारातून भात आणि चपाती असे पदार्थ वगळले जातात. (Weight Loss Tips) जे चूक आहे. सत्य असे आहे कि, पिष्टमय भाज्या आणि संपूर्ण धान्य यांसारखे कार्ब्सयुक्त पदार्थ कमी केल्याने वजन कमी होण्याचा वेग कमी होतो. तसेच अकाली वृद्धत्व येऊ लागते. कारण हे खाद्यपदार्थ फायबरचे समृद्ध वा मुख्य स्त्रोत असतात. यामुळे आहारात त्यांचे असणे अत्यंत गरजेचे आहे.

5. फॅट्सयुक्त पदार्थांना टाटा बायबाय करा –

Food Tips

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर हेल्दी फॅट आवश्यक आहेत. कारण शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यासाठी ते आवश्यक असतात. मात्र चरबीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आरोग्य निरोगी राखण्यासाठी अनहेल्दी पॅकेज्ड फॅटयुक्त पदार्थ खाऊ नका. अशा फॅटयुक्त पदार्थांमुळे तुमचे वजन कमी होत नाही. उलट वाढते. शिवाय हृदय आणि मेंदूसाठी हे फॅट्स हानिकारक ठरतात. त्यामुळे हेल्दी फॅट्स खाताना अनहेल्दी फॅट्स खाणार नाही याची काळजी घ्या. हेल्दी फॅट्ससाठी नट्स, बिया, अॅवाकॅडो, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल वा सॅल्मनचे सेवन करा. (Weight Loss Tips)

‘हे’ पण वाचा :-

Cumin Water For Weight Loss जिऱ्याच्या पाण्याने वेटलॉस करताय..? तर ‘या’ गोष्टींचे पालन जरूर करा; जाणून घ्या

Vegan Diet Benefits – भाग 2 : व्हेगन डाएटचे प्रकार किती व कोणते..?; जाणून घ्या फायदे

Benefits Of Lemon Water: कोमट पाण्यातून लिंबाचे सेवन करा आणि अमृतासमान फायदे मिळवा; जाणून घ्या

Walking After Meals Benefits : नियमित जेवणानंतर ‘हे’ काम करा आणि लठ्ठपणा दूर करा; जाणून घ्या

Chia Seeds Benefits : सब्जाचे बी मधुमेहापासून त्वचा विकारापर्यंत अनेक आजारांवर प्रभावी; जाणून घ्या फायदे