Chia Seeds Benefits
|

Chia Seeds Benefits : सब्जाचे बी मधुमेहापासून त्वचा विकारापर्यंत अनेक आजारांवर प्रभावी; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Chia Seeds Benefits सब्जाच्या बियांचा मानवी आहारात वापर करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. सब्जाला चिया सीड्स म्हणून भारतीय बाजार पेठेत मोठी मागणी आहे. सेलिब्रिटी पार्टी असो किंवा मग लग्न समारंभ अशा ठिकाणी वेलकम ड्रिंक्समध्ये सब्जाच्या बियांचा वापर केला जातो. त्यामुळे सब्जा खाण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहेत.

त्यात गरमीच्या दिवसात घराघरात सब्जाचे बी खाल्ले जाते. कारण सब्जा स्वभावाने थंड असल्यामुळे शरीराचा दाह कमी होतो आणि आराम मिळतो. सब्जा केवळ यासाठीच नव्हे तर अगदी वजन नियंत्रित करण्यापासून ते रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यापर्यंत आणि त्वचेच्या गंभीर विकारांवर प्रभावी मानला जातो.

(Chia Seeds Benefits) सब्जाचे बी आपल्या हृद्याशी संबंधित आजार, रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण, कर्करोग, पचन क्रियेचे आजार अशा विविध आजारांवरदेखील उपयोगी ठरते. शिवाय सब्जामध्ये प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची अमिनो आम्लेही भरपूर प्रमाणात आहेत. यामुळे सब्जा आरोग्याच्या अनेक समस्यांवर गुणकारी आहे.

सब्जाचे शास्त्रीय नाव सॅल्विया हिस्पॅनिका असे आहे. सब्जाचे उत्पादन जगभरात विविध ठिकाणी घेतले जाते. सब्जाच्या बिया या गडद काळ्या रंगाच्या असतात. या काही तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवल्यास त्यापासून डिंकासारखा एक चिकट पदार्थ तयार होतो. ज्याला म्युसिलेज म्हणतात.

सब्जाच्या बियांमध्ये असलेले स्निग्ध आम्ल, तंतुमय पदार्थ, प्रथिने, आवश्यक अमिनो आम्ल, अॅन्टी ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि मिनरल्सचे प्रमाण आरोग्यदायी आहे. सब्जामधील प्रथिनांचे प्रमाण हे गहू, मका, तांदूळ, ओट यांच्या तुलनेत खूप अधिक असते. यामुळे आपल्या आहारात या बियांचा वापर केला जाऊ शकतो. (Chia Seeds Benefits) सब्जाचा विविध अन्नपदार्थांमध्ये वापर करून त्याच्या चवीमध्ये सुधारणा केली जाऊ शकते. असे केल्याने सब्जा अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कुणालाही खाऊ घालणे सोपे जाते.

Chia Seeds Benefits

० सब्जा आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का..?

तज्ञ सांगतात कि, सब्जाचे सेवन हे अतिशय गुणकारी आहे. म्हणजेच आपल्या आरोग्यासाठी सब्जाचे बी खाणे फायदेशीर आहे. सब्जाच्या बियांमध्ये असलेले ओमेगा- ३ आम्ल यांमुळे रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी राखण्यास मदत होते. आहारामध्ये जर रोज ३० ग्रॅम (१५-१५ ग्रॅम दोन वेळा) एवढे सेवन केले तर याचा नक्कीच फायदा होईल असेही तज्ञ सांगतात. (Chia Seeds Benefits)

सब्जाच्या बियांमध्ये अल्फा लिनोलेनिक आम्ल असते. ज्यामुळे रक्तदाब आटोक्यात राहतो. शिवाय सब्जामध्ये असलेली प्रथिने, तंतुमय पदार्थ यांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. परिणामी इन्शुलिनचे कार्य सुरळीत चालण्यासाठी मदत होते. तसेच सब्जामध्ये अॅन्टी ऑक्सिडंट्स भरपूर असतात. जे शरीरातून फ्री रॅडिकल्स काढण्यास मदत करते. सब्जामध्ये असणारे कॅलरीज, प्रोटिन, कार्बोहायड्रेट, विटॅमिन ए, के, ई, बी, मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम हे सर्वच घटक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. म्हणूनच आपल्या आहारात सब्जाचा समावेश जरूर करा.

० सब्जाचे सेवन कसे करावे..? (Chia Seeds Benefits)

पाण्यामध्ये सब्जा मिक्स करून त्याचे नियमित स्वरुपात सेवन करणं ही एक प्रभावी आणि सोपी पद्धत आहे. ज्युस, पुडिंग, दलिया आणि स्मूदीमध्ये सब्जाचा समावेश केला जाऊ शकतो. कित्येक रेसिपीमध्ये सब्जाचा उपयोग केला जातो, ज्यामुळे पाककृतीतील पोषण तत्त्व नैसर्गिक स्वरुपात वाढतात.

पण सब्जाचे कशा पद्धतीने आणि किती प्रमाणात सेवन करावे, याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक आहाराव्यतिरिक्त नियमित व्यायाम करणं देखील तितकेच आवश्यक आहे.

० सब्जाच्या बियांचे आरोग्यदायी फायदे

१) हृदयासाठी फायदेशीर –

Heart Care

हृदयाचं आरोग्य निरोगी राहणं अतिशय आवश्यक आहे. सब्जामध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिड, अल्फा-लिनोलेनिक अॅसिड जास्त प्रमाणात असतात. या घटकांमुळे आपल्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. तज्ज्ञांचे मार्गदर्शनानुसार पाण्यात सब्जा मिक्स करून या पेयाचे नियमित सेवन करावे. यातील औषधी गुणधर्मांमुळे हृदय विकार दूर राहण्यास मदत मिळते. (Chia Seeds Benefits)

२) निरोगी हाडे –

Bones

सब्जामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फॉस्फोरस हे घटक असतात, जे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. जे लोक कमी प्रमाणात प्रोटीनयुक्त आहाराचे सेवन करतात, त्यांनी आपल्या डाएटमध्ये सब्जाचा समावेश करावा.

३) मधुमेहींसाठी लाभदायी –

Diabetes

सब्जाच्या बियातील पोषक घटक रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित करतात. संशोधनातील माहितीनुसार, सब्जाच्या बियांचे सेवन केल्यानंतर रक्तातील शर्करेची पातळी संतुलित करण्यास मदत मिळू शकते. (Chia Seeds Benefits) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मधुमेहाने ग्रस्त असलेले रुग्ण आहारामध्ये सब्जाचा समावेश करू शकतात.

४) बद्धकोष्ठतेपासून आराम –

Stomach Pain

बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास सब्जा गुणकारी ठरतो. सब्जा शरीरातील डिटॉक्सिफिकेशनच्या प्रक्रियेत मदत करते आणि पोट, पचन क्रिया सुरळित करुन आतड्यांचे कार्य चांगले ठेवते. गरम पाण्यात सब्जा भिजवून रोज रोत्री दुधासोबत घेतल्याने फायदा होतो. सब्जामुळे गॅससंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते. पोटातील जळजळ, अॅसिडिटी कमी करण्यासही मदत होते.

५) वजनावर नियंत्रण –

Weight gain

सब्जा वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. सब्जामध्ये अल्फा-लिनोलेनिक अॅसिड असतं. यामुळे शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. सब्जामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

६) त्वचा विकारांवर मात –

Skin Allergy

(Chia Seeds Benefits) प्रदूषणामुळे त्वचेवर मोठा परिणाम होत असतो. परंतु सब्जा त्वचेला ठीक करण्यासाठी फायदेशीर ठरतो. नारळाच्या तेलात सब्जा भिजवून त्याने त्वचेवर मसाज करा. त्यामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.

७) केसांसाठी गुणकारी –

Beautiful Hairs

प्रदूषणामुळे केस निर्जीव होतात. सब्जात असणारी विटॅमिन, लोह, प्रोटिन अशी पोषक द्रव्ये केसांसाठी उपयोगी ठरतात. तेलात सब्जा भिजवून लावल्याने केस चमकदार होण्यास मदत होते.

८) अन्य आजार –

मानसिक समस्या म्हणजेच टेन्शन, डिप्रेशन, मायग्रेन यांसारख्या आजारांवर सब्जा फायदेशीर ठरतो. सब्जाच्या सेवनाने उत्साही वाटते. उन्हाळ्याच्या दिवसांत पोट थंड राहते. सब्जाच्या सेवन केल्याने खाल्यानंतर पोटात अॅसिडिसी कमी होते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. सब्जामुळे शरीरातील टॉक्सिन दूर होतात. त्यामुळे अनेक छोट्या-छोट्या समस्या कमी होतात. तसेच शरीराला एनर्जीही मिळते. (Chia Seeds Benefits)

‘हे’ पण वाचा :-

सब्जा खाणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर; कसे? ते जाणून घ्या

भाग 1: ड्रॅगन फ्रुट मुलांच्या विकासासाठी मदतयुक्त; कसे खायला द्यालं? जाणून घ्या

शरीरातील उष्णतेचा दोष कमी करण्यासाठीचे उपाय

व्हिटॅमिन A, B, C, D माहित आहे, पण F माहित नाही?; तर लगेच जाणून घ्या