10 Psychological Tips For Fitness
|

10 Psychological Tips For Fitness: व्यायाम करायचाय पण कंटाळा खूप येतो..? मानसशास्त्रात सांगितलेत उपाय; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन| 10 Psychological Tips For Fitness उत्तम जीवनशैली हाच उत्तच आरोग्याचा मार्ग आहे. पण उत्तम जीवनशैली म्हणजे नक्की काय..? वेळेवर खाणे, आवश्यक तितके पाणी पिणे, तणावापासून दूर राहणे हीच उत्तम जीवनशैली बरोबर ना..? तर मित्रांनो उत्तम जीवनशैलीची अशी ठरवलेली संज्ञा नाही. मात्र ज्या सवयी आपले आरोग्य राखतात त्यांना अंगिकारल्यास जगण्याची मजा काही औरच असते. यामध्ये प्रामुख्याने सकाळी व्यायाम करण्याची सवय सगळ्यात चांगली मानली जाते.

आता बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच पहा. वयाची चाळिशी उलटली पण अजूनही कशी फिट आणि फाईन आहे का नाही. याच कारण म्हणजे योगा आणि व्यायाम अभ्यास. (10 Psychological Tips For Fitness) आता व्यायाम करून कुणी शिल्पासारखी फिगर मिळवू शकत असेल तर व्यायाम करायची आवड आपोआपच निर्माण होईल.. पण सगळ्यांनाच कुठे व्यायाम करायला आवडतो.. तुम्हाला आवडतो का व्यायाम? तुम्ही करता का रोज व्यायाम..?

काही म्हणा पण सर्वेनुसार, १०० पैकी ६० लोकच व्यायाम जिद्दीने आणि आवडीने करतात. इतर लोक आळशी पणा करण्यात एक्सपर्ट आहेत. आळस माणसाचा मोठा शत्रू आहे हे कितीहीवेळा सांगितलं तरीही फरक कुठे पडतो..? रोजची धावपळ आणि दगदग यामुळे व्यायाम करण्यात फारसा कुणाला रस उरत नाही.

पण व्यायाम ही शरीराची गरज आहे आणि शरीराची गरज पूर्ण करणे आरोग्याची गरज. जर तुम्हालाही व्यायामाचा कंटाळा येत असेल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे बर का.कारण व्यायामाचा ज्यांना कंटाळा येतो त्यांच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आम्ही आलो आहोत. या टीप्स तुम्हाला व्यायाम करण्यासाठी स्फूर्ती देतील. (10 Psychological Tips For Fitness)

तसे तुम्हालाही व्यायाम न करण्याचे दुष्परिणाम १००% माहीत असतील. पण मै झुकेगा नहीं साला म्हणत ढकलगाडी चालूच आहे. हो की नाही..? पण आता अस करायची गरज नाही. उलट उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा असला तरीही तुम्ही व्यायाम कराल अशी योजना आमच्याकडे आहे. अनेकदा तर व्यायाम करायचा असतो, पण प्रत्यक्ष वेळ आली की टाळाटाळ केली जाते. अशा मानसिकतेसाठी मानसशास्त्रात (10 Psychological Tips For Fitness) काही उपाययोजना सिद्ध केल्या आहेत. त्याविषयी आपण आता जाणून घेणार आहोत.

व्यायामाचा कंटाळा येऊ नये म्हणून या टीप्स फॉलो करा (10 Psychological Tips For Fitness)

१. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम करण्याची मानसिकता आपण स्वतःच तयार करणे अत्यंत गरजेचे आहे. इतरांनी सांगितलं म्हणून व्यायाम करू नका. तर मानसिकता बनवा की व्यायाम आपल्याला गरजेचा आहे म्हणून आपण करतोय. कुणी सांगितलं म्हणून नाही. यामुळे तुमचं मन आणि मेंदू दोघेही व्यायाम करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित करतील.

२. तुम्ही रोज आणि योग्य वेळेनुसार व्यायाम करणे अपेक्षित आहे आणि यासाठी आपण व्यायाम का करतोय ते आधी आपल्याला माहीत असायला हवे. म्हणून एका कागदावर व्यायाम का करायचा ? याची कारणे लिहून डोळ्यासमोर ठेवून नियमित वाचा. असे केल्याने तुम्ही नेहमी व्यायामासाठी सज्ज राहाल शिवाय तुम्ही हे का आणि काय करत आहात याची तुम्हाला माहित असल्यामुळे करण्याचा पश्र्चाताप होत नाही.

वजन वाढणं, धाप लागणं, उर्जा कमी होणं, थकवा, अशक्तपणा, बीपी, शुगर, हार्ट प्रॉब्लेम असे काही ना काही तुम्हाला त्रास असतील तर तेही लिहा म्हणजे व्यायामाचे गांभीर्य तुमच्या लक्षात येईल. (10 Psychological Tips For Fitness)

३. व्यायाम करण्यासाठी सोबती शोधा. कुणी सवंगडी असेल तर कोणतीही गोष्ट करण्याची मजाच वेगळी असते. त्यामुळे व्यायामासाठी तुम्ही कोणताही पर्याय निवडा म्हणजे अगदी जीम, योगा क्लास, झुंबा क्लास काहीही… तर एक सोबती नक्की जोडा. मानसशास्त्रानुसार याचे कारण असे की, मित्र, कुटूंब यांच्यासोबत व्यायाम केल्यामुळे अंगात उत्साह येतो आणि कंटाळा दूर होतो. तसेच एकट्याने व्यायाम केला तर माणूस लवकर दमतो आणि मुख्य म्हणजे कंटाळतो.

४. व्यायाम करायचा म्हणून काहीही कपडे घालू नका.भले घामाने ते खराब होतील. एकवेळ ते चालेल. पण अस्वच्छ आणि मळकट कपडे घातले तर अंगात उत्साह राहणारच नाही. उलट कंटाळा आणि आळस वाढेल. त्यामुळे स्वत:साठी व्यायामाचे कपडे, शुज, जीम बॅग अशा काहीतरी ॲक्सेसरीज विकत घ्या. यामुळे व्यायाम करताना दररोज उपयोगी वस्तू तुमच्याजवळ असतील आणि त्या वस्तूंची आकर्षकता तुम्हाला व्यायामाकडे आकर्षित करेल. त्या वस्तूंची किंमत आणि आकर्षकता तुम्हाला रोज बजावून सांगा. मानसिकते नुसार थोडे पैसे खर्च केले असेल की माणूस आपोआपच गंभीर होतो. (10 Psychological Tips For Fitness)

५. व्यायामाची एक वेळ निश्चित करा. शिवाय ती वेळ चुकणार नाही याची काळजी घ्या. स्वतःला रात्रीच बजावून झोपा की यावेळेत व्यायाम करायचाच आहे असे केल्याने ती वेळ बरोबर फाॅलो केली जाईल. काहीही झालं तरी त्या वेळेला व्यायाम करणं टाळू नका. असं नियमित केल्याने अगदी १५ ते २० दिवसांतच तुमच्या शरीराला व्यायामाची सवय लागते. (10 Psychological Tips For Fitness) आता मानसशास्त्रानुसार बोलायचे झालेच तर व्यायामाची सवय लागण्यासाठी संध्याकाळपेक्षा सकाळची वेळ अधिक उपयुक्त ठरते. त्यामुळे सकाळीच लवकर उठा आणि व्यायाम करा.

६. खूप लवकर बदल व्हावा यासाठी मोठे आणि गंभीर व्यायामाचे प्रकार निवडू नका. यामुळे शरीर लवकर थकेल. शिवाय तुम्हाला अन्य कोणतेही त्रास असतील तर ते वाढतील . व्यायामाचा प्रकार चुकला आणि तो करण्याची पद्धतही चुकली तर शरीराला फायदा कमी आणि नुकसान जास्त होते.

म्हणून तुम्हाला जो व्यायाम आवडेल तो करा पण सुरुवात त्या हलक्या फुलक्या व्यायामानेच करा. सुरुवातीलाच अवघड व्यायाम करायला मुळीच जाऊ नका. यामुळे व्यायामाचा सगळा अगदी २ दिवसातच मरून जातो.

७. सगळ्यात महत्वाची गोष्ट व्यायाम सुरू करतेवेळी आणि पुढील काही दिवस व्यायामाची वेळ निश्चित केल्यानुसार पाळा. यात मुख्य सांगायचे म्हणजे वेळ कमी आणि मोजकी असेल यावर भर द्या. कारण सुरुवातीला व्यायामाची वेळ अगदी कमी असेल म्हणजे अगदीच ७ ते ८ मिनिटं तर व्यायामाची सवय होईपर्यंत व्यायाम आवडायलासुद्धा लागेल. शिवाय एकदा व्यायामाची सवय आणि आवड लागली की सोयीप्रमाणे वेळ वाढवा. (10 Psychological Tips For Fitness)

८. व्यायाम उत्साहात कारणे अत्यंत गरजेचे आहे आणि संगीत उत्साहाची उत्पती करतो. म्हणूनच व्यायाम करताना गाणी ऐकत व्यायाम करा.. अगदी जे तुम्हाला आवडेल ते गाणे ऐकत तुम्ही व्यायाम करा म्हणजे अगदी किती वेळ व्यायाम करत आहात हे देखील लक्षात येणार नाही. (10 Psychological Tips For Fitness) संगीतातील बिट्स तुमच्या शरीरात सुर आणि उत्साह दोन्ही आणतो. मग काय..? ताल आणि सुर एकत्र आले की सुरेल लय आपोआप तयार होते.

९. व्यायाम करतेवेळी एखादे ध्येय डोळ्यासमोर ठेवा. म्हणजे स्वत:ला काहीतरी करायचं आहे या उद्देशाने व्यायाम करा. एखादी तारिख वा दिवस निश्चित करा आणि की व्यायाम केला तर हे घेईन ते घेईन असे करेन तसे करेन असा काही एक पण घ्या. यामुळे व्यायाम करायचा उत्साह राहीलच. शिवाय गरजही वाटू लागेल.

१०. व्यायाम करताना कंटाळा पूर्णपणे झटका. एखाद्या दिवशी आज व्यायाम नको असे कितीही वाटले तरीही उठा आणि व्यायाम करा. आपली शरीर यष्ठीची आपल्या आवडत्या हिरोइनसोबत तुलना करा. यामुळे व्यायाम आपोआपच हवाहवासा वाटू लागेल. (10 Psychological Tips For Fitness)

‘हे’ पण वाचा :-

योगा केल्याने टळू शकतो हृदयविकाराचा धोका; जाणून घ्या

फक्त 2 व्यायामाचे प्रकार करतील झटपट वेट लॉससाठी मदत; जाणून घ्या

व्यायामानंतर शरीरात साचलेल्या चरबीचे काय होते..?; जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

हाय बीपीचा त्रास असेल तर ‘हे’ व्यायाम करणे टाळा; जाणून घ्या

गोबऱ्या गालांसाठी ‘हे’ व्यायाम करा आणि मिळवा आकर्षक गालं; जाणून घ्या