Health Benefits Of Jamun
|

Health Benefits of Jamun: गडद जांभळात दडलेत आरोग्यदायी फायदे; माहित नाहीत..? तर जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Health Benefits of Jamun काही फळं दिसायला जितकी आकर्षक चवीला तितकीच कमाल असतात. तर काही फळांमध्ये आकर्षकता नसली तरीही आरोग्यदायी फायद्यांची काहीच कमतरता नसते. तुम्ही जांभळाचे फळ खाल्ले असेलच. रंगाने काळे असले तरी आरोग्यासाठी एकापेक्षा एक भारी फायदे देणारे हे फळ आहे. मुख्य म्हणजे जांभळाचे नुसते फळ नाही तर जांभळाची बीदेखील अत्यंत फायदेशीर असते. हे फळ दिसायच्या बाबतीत बाकी फळांच्या तुलनेत थोडे डावे आहे. पण आरोग्यदायी फायद्याचं म्हणाल तर जांभळाची सर प्रत्येक फळाला येऊ शकत नाही.

मूळ दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियात जांभूळ हे फळ आढळते. या फळाचे शास्त्रीय नाव ‘सायझिजियम क्युमिनी’ असे आहे. पुरातन उपयुक्त वृक्ष आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातूनही जांभूळ फार महत्वाचे फळ आहे. जांभळाचे फळ रंगाचे अतिशय गडद असणारे आणि मधुमेहींसाठी १००% आरोग्यदायी फळ आहे. (Health Benefits of Jamun)

विशेष म्हणजे हे फळ जास्तीत जास्त उन्हाळ्याच्या दिवसात मिळते. जांभळाचे फळ हे आकाराने लहान पण चवीने अतिशय भन्नाट लागते. जांभळ्या रंगाच्या या फळाची चव गोड आणि काहीशी तुरट असते. ते म्हणतात मूर्ती लहान पण कीर्ती महान. तसे काहीसे या फळाचे तत्त्व आहे. कारण जांभळाने फळ आकाराने कितीही लहान असो आरोग्याच्या बाबतीत तसूभरही हयगय करीत नाही. (Health Benefits of Jamun )

इतकंच काय तर, जांभळाच्या बिया आणि त्याच्या झाडाची पानेसुद्धा आरोग्यदायी आहेत. जांभळाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, जांभळामध्ये रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी करण्याचे महत्त्वपूर्ण तत्त्व समाविष्ट आहे. यामुळे मधुमेहींसाठी हे फळ एखादं वरदान म्हणून काम करते. याशिवाय सुगंधी पाने आणि गुणकारी बीज, फळे, फुले असलेल्या या वृक्षाचा उपयोग प्राचीन काळात विविध औषधे आणि सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी केला जात असे. जांभळातील पोषक तत्त्व आपल्या शरीरातून हानिकारक केमिकल्स बाहेर टाकण्यासाठी मदत करतात.

jamun

(Health Benefits of Jamun ) जांभूळ या फळामध्ये उच्च प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म समाविष्ट असतात. महत्त्वाच म्हणजे जांभळामध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म देखील मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे ग्लूकोसाइड्स, जॅम्बोलिन आणि एलॅजिकसारख्या रसायनांचा जांभूळ हा एक उत्तम स्रोत म्हणून ओळखला जातो. चला तर जाणून घेऊया जांभूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे कोणते ते खालीलप्रमाणे:-

० जांभूळ खाण्याचे फायदे
(Health Benefits of Jamun)

१) निरोगी हृदय

Heart Care

आपले हृदय निरोगी असेल तर जगण्याची मजा काही औरच असते. त्यामुळे आपलं हृदय निरोगी ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील रहा. अनेकदा चुकीची जीवनशैली आणि चुकीचा आहार आपल्या हृदयाचे आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत असू शकते. दरम्यान जांभळाच्या सेवनाने हृदयाशी संबंधीत आजारांपासून रक्षण होते. यामुळे ह्रदय निरोगी राहते.

२) रक्त शुद्धीकरण आणि संचरण व्यवस्थित होते

Blood

जांभळाच्या फळामध्ये भरपूर लोह असते. यामुळे त्याचे सेवन केल्यास रक्त शुद्ध होण्यासाठी आणि शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघण्यासाठी मदत होते. याशिवाय जांभळाचे फळ शरीरातील रक्त वाढवण्यासाठी मदत करते. यामुळे संपूर्ण शरीरात रक्त संचरण होण्यापासून ते प्रत्येक भागापर्यंत व्यवस्थित पोहोचण्यासाठी जांभूळ फायदेशीर ठरते. (Health Benefits of Jamun)

३) रक्तदाबाचा त्रास कमी होतो

high BP

जर तुम्हाला रक्त दाबाचा त्रास असेल तर जांभळाचे फळ तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे. कारण जांभळाच्या गरासह त्याच्या बियांमध्ये समाविष्ट असलेले अनेक घटक रक्त दाबाच्या त्रासापासून मुक्ती देऊ शकतात. यामुळे रक्तदाबाचा त्रास कमी करायचा असेल तर आपल्या आहारात जांभूळ हे फळ असेल याची काळजी घ्या. निकषांनुसार, जांभळाच्या बियांचा रस किंवा अर्क नियमित घेतल्यास रक्तदाब ३४.६ % इतका कमी होतो.

४) मधुमेहावर नियंत्रण ठेवते

Diabetes

आजकाल अनेक लोक मधुमेहाच्या त्रासाने ग्रासलेले दिसून येतात. अशावेळी काय खावे..? किती खावे.? कसे खावे..? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. कारण मधुमेहाच्या रुग्णांना आहाराचे पथ्य पाळणे बंधनकारक आहे. अशावेळी जांभूळ खाणे मधुमेहींसाठी वरदान ठरते. कारण जांभळामध्ये अँटी डायबेटीक गुणधर्म असतात. (Health Benefits of Jamun) ज्यामुळे मधुमेह नियंत्रित करता येतो. यासाठी जांभळाच्या बिया सुकवून त्याची पावडर करा आणि दिवसातून ३ वेळा याचे सेवन करा. दूध वा पाण्यासोबत ही पावडर सकाळी रिकाम्या पोटी घेतल्याने अधिक लाभ मिळतील.

५) कर्करोगावर फायदेशीर भूमिका बजावते

जांभळाच्या फळात आपल्याला कर्करोगासारख्या आजारांपासून दूर ठेवण्याची क्षमता आहे. एका संशोधनानुसार, जांभळामध्ये कर्करोगाला आळा घालणारे घटक असतात. हे घटक शरीरातून फ्री रॅडिकल्स काढून टाकण्यासाठी मदत करतात. परिणामी कर्करोगासारख्या महाभयंकर आजारापासून आपले संरक्षण होते.

६) पोटाच्या विकारांवर प्रभावी ठरते

Stomach Pain

चुकीच्या वेळी चुकीचे पदार्थ खाणे किंवा पौष्टिक पेक्षा चमचमीत आहाराकडे कल असणे या दोन्ही गोष्टी त्रासदायी आहेत. यामुळे पोटाचे आरोग्य बिघडते. असे पदार्थ पचन संस्था खराब करतात आणि यामुळे विविध आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. अशावेळी आपले पोट स्वच्छ करण्यासाठी आणि पोटाचे विकार दूर करण्यासाठी जांभूळ उपयुक्त ठरते. यासाठी जांभूळ बियांचा अर्क जखम वा आतड्यातील अल्सर इन्फेकशन दूर करण्यास फायदेशीर ठरतो. (Health Benefits of Jamun)

७) वजनावर नियंत्रण ठेवते

Weight Loss

जांभूळ हे असे फळ आहे ज्याचे अनेक फायदे आहेत आणि यापैकी एक फायदा म्हणजे वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणे. जांभळाच्या फळामध्ये कॅलरीजचे प्रमाण अत्यंत कमी असते. यामुळे कोणत्याही प्रकारे वजन वाढायची चिंता नाही. शिवाय यातील फायबर बराच काळ भुक लागू देत नाही. त्यामुळे जांभूळ खाल्ल्याने वजनावर नियंत्रण ठेवणे सोप्पे जाते.

‘हे’ पण वाचा :-

Healthy Fruits : ‘हि’ फळे खालं तर, पोटाच्या तक्रारी राहतील दूर; जाणून घ्या

फळ एक आणि फायदे अनेक; जाणून घ्या या जादुई फळाबद्दल

Wood Apple Benefits : ‘दुर्मिळ होतंय कवठाचं फळ, खाई त्याला येई बळ’; जाणून घ्या फायदे

पांढरा शुभ्र मुळा खा आणि विविध आजारांपासून सुटका मिळवा; जाणून घ्या फायदे

उत्तम आरोग्यासाठी कोणती कडधान्ये खावी?; जाणून घ्या