Aamla Juice Benefits
|

Amla Juice Benefits: आवळा सरबत प्या आणि ‘या’ 5 आजारांपासून सुटका मिळवा

हॅलो आरोग्य ऑनलाईन| (Amla Juice Benefits) आपले आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर काही निरोगी सवयी आपल्या जीवनशैलीचा भाग असणे आवश्यक आहे. पण रोजची धावपळ, दगदग यात स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ कुठेय..? तुम्हीही असाच विचार करता ना..? तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपल्या आरोग्याची काळजी आपण घेणार नाही तर कोण घेणार बरं..? त्यामुळे वेळ नाही हे कारण देऊन काही फायदा नाही.

Amla Seeds

अनेक लोक आजारपण वाढल की नेमकं हेच कारण पुढे करतात. पण ही अशी कारणे किती दिवस देत राहणार. (Amla Juice Benefits) त्यापेक्षा सुनियोजित वेळेत आरोग्य आणि इतरत्र गोष्टींचे नियोजन राखा. म्हणजे तुमच्या रोजच्या जीवनशैलीतसुद्धा फारसा बदल होणार नाही आणि सोबत तुमचे आरोग्यही उत्तम राहील. यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी अगदी ओळखीतला सोप्पा आणि फायदेशीर उपाय घेऊन आलो आहोत.

० आवळा सरबताचे आरोग्यदायी फायदे
(Amla Juice Benefits)

०१) दमा –

दमा कुणालाही कोणत्याही वयात होऊ शकतो. मात्र शक्यतो याची सुरुवात लहानपणीच होते. पुन्हा पुन्हा श्वास अडकणे किंवा सतत दम लागणे अशा लक्षणातून प्रकटणार्‍या रोगाच्या त्रासाची वारंवारता आणि तीव्रता संबंधित व्यक्तीवर अवलंबून असते. (Amla Juice Benefits)

श्वसन मार्गामध्ये दाह झाल्याने श्वसन मार्गातील चेतातंतूचे ज्वलन होते. या प्रकारच्या दमाच्या त्रासादरम्यान श्वसनमार्गाच्या आतील त्वचा सुजल्यामुळे फुप्फुसात जाणार्‍या हवेचा प्रवाह कमी होतो. अशा परिस्थितीत आवळा ज्यूस आणि मध एकत्र करुन प्या. यामुळे दम्याचा प्रभाव कमी होतो.

०२) हृदय रोग –

Heart Care

हृदयरोग हि हृदयाशी संबंधित एक अतिशय भयानक समस्या आहे. जर एखाद्या व्यक्तीस हृदयाशी संबंधीत कोणताही आजार असेल तर त्याने कोलेस्ट्रॉलवर लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. (Amla Juice Benefits) यासाठी आवळा सरबत नियमित घ्या म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी होते.

०३) मधुमेह –

मधुमेह एक अशी समस्या आहे ज्यात रक्तामध्ये साखरेचा स्तर नियंत्रित राहत नाही. आपल्या शरीरात पेंक्रीयाझ नावाची एक ग्रंथी असते. यातून इन्सुलिन नामक हार्मोन तयार होतं. हेच इन्सुलिन शरीरातील रक्तात तयार होणाऱ्या ग्लुकोज वा साखरेची मात्रा नियंत्रित ठेवण्याचे काम करते.

पण शारीरिक बदलासह पेंक्रीयाझ इन्सुलिन तयार करू शकत नाही आणि यामुळे साखरेचा स्तर वाढतो. (Amla Juice Benefits) शेवटी ती व्यक्ती मधुमेहाला बळी पडते. अशावेळी आवळ्याचा ज्यूस प्या. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.

०४) अशुद्ध रक्त –

Blood Knot

चुकीची जीवनशैली आणि खानपानातील चुकीच्या पद्धती यामुळे आपल्या शरीरातील रक्त अशुद्धीकडे वळते. शिवाय मासिक पाळी अनियंत्रित असेल तर अशुद्ध रक्ताचा साठा शरीरात वाढतो. यामुळे नसा ब्लॉक होणे, रक्तात गुठळ्या होणे असे त्रास वाढतात. दरम्यान रक्त शुद्ध करण्यासाठी आवळा सरबत आणि मध खूप गुणकारी आहे. (Amla Juice Benefits)

०५) मेटाबॉलिज्म –

मेटाबॉलिज्म ही शरीरातील एक महत्त्वपूर्ण क्रिया आहे. यातून सेवन केलेला आहार ऊर्जेत बदलतो. शरीराला प्रत्येक कामासाठी ऊर्जेची गरज असते. आणखी सध्या शब्दात सांगायचं तर मेटाबॉलिज्ममूळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीरात वेगवेगळ्या पेशी तयार होतात.

Metabolism

मेटाबॉलिज्मची क्रिया आपल्या शरीरात २४ तास सुरु असते. त्यामुळे आराम करतानाही ही क्रिया सुरु असते. पण अशावेळी आवळा खा. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. कारण मेटाबॉलिज्म व्यवस्थित होऊन वजन कमी होते. (Amla Juice Benefits)

‘हे’ पण वाचा :-

आवळा खाण्याच्या ‘या’ आहेत खूप सोप्या पद्धती

केसांच्या नैसर्गिक मजबुतीसाठी ‘हि’ पोषक तत्त्वे महत्वाची; जाणून घ्या

काय सांगता ..? चमचमीत लोणचं खाल्ल्याने इम्युनिटी वाढते..?; लगेच जाणून घ्या

Without Peeling Fruits: ‘हि’ फळं सोलून खाताय..? तर लगेच थांबा; जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

Weight Loss Tips वेटलॉस करताना ‘या’ चुका कराल तर पोटाची ढेरी आणखीच वाढेल; जाणुन घ्या