Ashwagandha Benefits
|

Ashwagandha Benefits: पुरुषांच्या लैंगिक समस्यांवर गुणकारी ‘अश्वगंधा’; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। (Ashwagandha Benefits) आपल्या भारतीय परंपरेत आयुर्वेदाचे अत्यंत उच्च आणि मानाचे स्थान आहे. पूर्वीच्या काळात डॉक्टर आणि त्यांचे इंजेक्शन तसेच शस्त्रक्रिया नव्हत्या. तर ऋषीमुनी आणि त्यांचं आयुर्वेद होत. या आयुर्वेदाने मोठमोठे आजार अगदी गंभीर परिस्थितीपर्यंत गेलेले असतानाही लोकांना बरं केलं आहे. त्यामुळे आयुर्वेदाची परंपरा हि कालातीत आहे.

आज, उद्या आणि पुढे वर्षानुवर्षे जपावा असा हा खजिना आहे. आयुर्वेद हे चार वेदांपैकी एक महत्वपूर्ण वेद आहे. आयुर्वेदात अशा अनेक औषधी वनस्पतींचा उल्लेख आहे. ज्या वनस्पती आजही तितक्याच प्रभावीरीत्या विविध औषधे बनविण्यासाठी वापरल्या जातात.

(Ashwagandha Benefits) आयुर्वेद एक अशी परंपरा आहे जी औषधी स्वरूपात आपल्याला लाभली आहे. यामध्ये तुळस, मूलेठी, ब्राह्मी, कुंकुमादी, पुष्पराज आणि अश्वगंधा यांसारख्या वनस्पतींचा समावेश आहे. या वनस्पती प्रभावीरीत्या आजारांपासून सुटका मिळवून देतात. यांपैकी अश्वगंधा अशी वनस्पती आहे जिचा उपयोग पुरुषांच्या लैंगिक समस्या दूर करण्यासाठी होतो. त्यामुळे हि वनस्पती अत्यंत प्रसिद्ध आहे.

आजकालची जीवनशैली आणि धावपळीचं रुटीन यामुळे साहजिकच महिला असो वा पुरुष यांच्या आरोग्यावर परिणाम पडतो. लैंगिक समस्या एखाद्या जोडप्याच्या नात्यावर परिणाम करू शकतात. अशावेळी अश्वगंधा हि औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरते.

ashwagandha

अश्वगंधा हि आयुर्वेदातील एक प्रसिद्ध औषधी वनस्पती आहे. हि वनस्पती तिच्या अगणित फायद्यांमुळे संपूर्ण विश्वभरात प्रसिद्ध आहे. इतकेच नव्हे तर याचा वापर अनेक आजारांवरील उपायांसाठी केला जातो. अनेक शास्त्रज्ञ अश्वगंधाला एक गुणकारी आयुर्वेदिक औषध म्हणून वापरतात. (Ashwagandha Benefits) अश्वगंधा हि मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक आणि आवश्यक अशी वनस्पती आहे. व्यक्तीला निरोगी ठेवण्यासाठी हि वनस्पती १००% प्रभावी आहे. आज आपण अश्वगंधा नक्की काय आहे आणि ती कशी असते आणि तिचे फायदे काय..? अशा सामान्य प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ. यामुळे तुम्हीही लैंगिक समस्यांवर समाधान शोधत असाल तर अश्वगंधा ओळखताना तुम्हाला त्रास होणार नाही.

० अश्वगंधा नक्की काय आहे ?

मित्रांनो आयुर्वेदाबाबत फार जाण नसल्यामुळे अनेकदा औषधांबाबत आपली फसगत होऊ शकते. म्हणून आपण अश्वगंधा वनस्पतीची ओळख आणि स्वरूप जाणून घेणार आहोत. (Ashwagandha Benefits)


अश्वगंधा हि एक आयुर्वेदिक औषधांमधील प्रसिद्ध औषधी आहे. पुरातन काळापासून अश्वगंधा या औषधी वनस्पतीचा वापर ऋषीमुनी, वैद्य, हकीम हे आयुर्वेदिक जडीबुटीमद्ये करत आहेत. वेदातील एक वेद ‘अथर्ववेद’ यामध्ये अश्वगंधाचे अनेक उपयोग सांगण्यात आले आहे. कारण हि वनस्पती इतकी गुणकारी आहे. अश्वगंधामध्ये अनेक प्रकारचे अँटी ऑक्सीडेंट समाविष्ट आहेत. ज्यामुळे या औषधीचे सेवन केल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. परिणामी हृदयविकार होण्याची शक्यता कमी होते.

० अश्वगंधाचे स्वरूप

औषधी अश्वगंधाची झाडे हि उंचीने मोठी मात्र त्यांचे खोड अतिशय बारीक वा पातळ असते. (Ashwagandha Benefits) हे झाड सर्वसाधारणपणे बाग-बगीचे, शेत आणि डोंगर, पहाडी, जंगल अशा क्षेत्रांमध्ये आढळते. या झाडाची पाने हातावर चोळल्यास यातून घोड्याच्या लघवीसारखा गंध येतो. खरंतर हा गंध या वृक्षाची मूळ ओळख आहे. त्यामुळे अश्वगंधाचे झाड ओळखायचे असेल तर हि ओळख लक्षात ठेवा.

० अश्वगंधाचे फायदे
(Ashwagandha Benefits)

आयुर्वेद शास्त्रात ‘अश्वगंधा’ औषधीचा मोठ्या प्रमाणात उल्लेख केलेला आहे. शिवाय त्याचे काय आणि कसे उपयोग आहेत हे देखील सांगितलेले आहे. अश्वगंधाच्या पानांसह त्याचे चूर्ण अशा स्वरूपात औषध म्हणून वापरले जाते. (Ashwagandha Benefits) मुख्य म्हणजे आयुर्वेद तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, अश्वगंधाचे जेवढे फायदे आहेत तेव्हढेच तोटेदेखील आहेत. यामुळे अश्वगंधाचे सेवन करायचे असेल तर तज्ञांचे सल्ल्यानेच करा. चला तर जाणून घेऊया फायदे :-

१) रोग प्रतिकारक शक्तीत वाढ

कोणताही रोग किंवा आजार कधी होतो..? जेव्हा तुमच्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती हि कमी असते. त्यामुळे कोणताही विषाणू तुमच्या शरीरात प्रवेश करून तुमच्या आरोग्याची हानी करू नये यासाठी आपली रोग प्रतिकारक शक्‍ती चांगली असणे आवश्यक आहे. (Ashwagandha Benefits)

Immunity

तर औषधी अश्वगंधाच्या सेवनामुळे कोणत्याही व्यक्तीची रोग प्रतिकारक शक्ती वाढवता येऊ शकते. तज्ञांनी केलेल्या अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे कि, अश्वगंधा शरीरातील लाल रक्त पेशी वाढवण्याचे कार्य करते. परिणामी ऍनिमिया सारखे रोग दूर राहतात.

२) स्मरणशक्ती सुधार

अनेकदा आपल्याला लहान सहान गोष्टी आठवत नाहीत. आपल्याला हळूहळू विस्मरणाच्या आजार जडतो.

Memory Loss

एकदा पाहिलेल्या गोष्टी लक्षात राहत नसतील तर याचा अर्थ आपला मेंदू अकार्यक्षम होऊ लागला आहे. (Ashwagandha Benefits) अशावेळी अश्वगंधा उपयोगी ठरते. अश्वगंधाचे सेवन केल्याने मेंदूला आराम मिळतो. कारण या औषधीचे सेवन केल्याने झोप चांगली येते आणि विस्मरण होण्याची समस्या हळूहळू दूर होते.

३) थायरॉइडवर प्रभावी

hypothyroid

हायपो थायरॉईड सारख्या आजारांवर अश्वगंधा औषधींचा वापर अतिशय फायदेशीर ठरतो. कारण हि औषधी थायरॉईड ग्रंथीला उत्तेजित करते. दरम्यान अश्वगंधाच्या खोडांचा अर्क नियमित घेतल्याने थायरॉईड हार्मोनचे स्त्राव वाढवण्यात सहाय्य होते.

४) मजबूत हाडं

हाडांमधील ठिसूळपणा अत्यंत वाईट. यामुळे हाडांचे मोडणे, सरकणे अशा समस्या जाणवतात. ज्यामुळे माणूस कमकुवत होऊ लागतो. अश्वगंधा शरीराच्या स्नायूंना बळकट करते. (Ashwagandha Benefits)

Bones

अभ्यासानुसार, अश्वगंधाचे सेवन केलया शरीराच्या अवयवांची कार्यक्षमता वाढते. तसेच पुरुषांनी अश्वगंधाचे नियमित सेवन केल्यास त्यांचे स्नायू आधीपेक्षा अधिक बळकट होतात आणि शरीराची अनावश्‍यक चरबी कमी होऊ लागते. यामुळे हाडे निरोगी आणि मजबूत होतात.

५) लैंगिक क्षमतेत वाढ

लैंगिक समस्यांमुळे वैयक्तिक जीवनावर परीणाम होऊ शकतो. म्हणूनच अश्वगंधा एक असे शक्तिवर्धक आयुर्वेदिक औषध आहे ज्याचा वापर या समस्या दूर करते. हि औषधी पुरुषांची लैंगिक शक्ती वाढवण्याचे कार्य करते. अश्वगंधाच्या चूर्णाचे सेवन शरीरातील वीर्य वाढवण्यासाठी उपयोगी ठरते. (Ashwagandha Benefits)

० अश्वगंधाचे अधिक सेवन आरोग्यासाथ हानिकारक

ज्या लोकांच्या शरीरात आधीच खूप उष्णता आहे अशा व्यक्तीने अश्वगंधाचे सेवन करू नये. अन्यथा आरोग्याचे नुकसान होऊ शकते.

अश्वगंधाचे अधिक सेवन करणे देखील आरोग्यासाठी बाधक आहे. यामुळे उलटी येणे, पोट खराब होणे, डायरिया यासारख्या समस्या होतात. (Ashwagandha Benefits)

अनेकांना अश्वगंधा खाल्ल्याने अलर्जी देखील होऊ शकते. त्यामुळे आधी अतिशय कमी औषधीचे सेवन करून पहा आणि त्यानंतर त्रास जाणवल्यास सेवन करणे टाळा.

गर्भवती महिलांनी अश्वगंधाचे सेवन करू नये अन्यथा गर्भपात होण्याची शक्यता असते.

अश्वगंधाचे सेवन करण्याआधी मधुमेह, हाय बीपी, मानसिक तणाव अशा समस्यांची चाचणी करून घ्या. हे त्रास असल्यास याचे सेवन करू नका. (Ashwagandha Benefits)

‘हे’ पण वाचा :-

Bad Health Habits: उत्तम स्वास्थ्यासाठी ‘या’ 25 वाईट सवयींची संगत आत्ताच सोडा; जाणून घ्या

भाग 1 : आरोग्यासाठी लवंग फायदेशीर का मानली जाते?; जाणून घ्या काय सांगते आयुर्वेद

आयुर्वेद सांगते आजारपणाचे कारण; जाणून घ्या

अर्जुनाची शक्तिशाली आयुर्वेदिक पावडर हृदयाचे करते संरक्षण; जाणून घ्या फायदे