Bikini Waxing म्हणजे आजारपणाला आमंत्रण; जाणून घ्या काय सांगतात तज्ञ
हॅलो आरोग्य ऑनलाईन। Bikini Waxing गुप्तांगाविषयी बोलणे बहुतेकदा टाळले जाते. अनेकांना याविषयी उघड बोलणे जरा लाजिरवाणेच वाटते. पण शरीराच्या याच भागांची अधिक काळजी घेणे आवश्यक असते. शिवाय अशा भागांत कोणताही त्रास होत असेल तर तो उघड न बोलण्याच्या सवयीमुळे समस्या वाढू शकतात. तज्ञ आणि डॉक्टर वारंवार याबाबत लोकांना जागरूक करीत असतात. त्यामुळे गेल्या काही काळापासून याबाबतीत बरीच सुधारणा आली आहे. दरम्यान लोकांनी प्रायव्हेट पार्टच्या भागात असणाऱ्या केसांविषयी तक्रार केली आहे. या केसांमुळे त्रास होतो, खाज येते, पुरळ येते आणि सतत ओलं वाटत अशा तक्रारी प्रामुख्याने स्त्रियांनी व्यक्त केल्या आहेत.
मुख्य म्हणजे स्त्रियांचा पेहराव जितका आधुनिक तितकीच शरीराच्या भागांवर असलेल्या केसांची त्यांना अडचण वाटते. यामुळे स्त्रिया ब्युटी रुटीनमध्ये (Bikini Waxing) बिकिनी वॅक्सचा समावेश करतात. पण काय फायदा..? हे केस कायमस्वरूपी जाऊ शकत नाहीत. याचे कारण म्हणजे शरीराच्या भागांवर नको असलेले केस हे आपल्या मर्जीने वा सोयीने येत नाहीत. तर शरीरावर केसांची वाढ होणे हि नैसर्गिक प्रक्रिया आहे. आता यात तुमची आवड आहे का नाही हा भाग राहतच नाही.
शरीरावर येणाऱ्या केसांमागील मुख्य कारण म्हणजे प्रत्येक नैसर्गिक प्रक्रिया आणि या प्रक्रियेला नियमित स्वरूपात काही ना काही महत्त्व असतंच. सामान्यत: स्त्रियांना जघनाच्या भागात वाढणाऱ्या केसांबद्दल आपल्याला बऱ्यापैकी माहिती असते की, ते काढून टाकल्याने ती जागा स्वच्छ राहते. पण तुम्ही कधी त्या जागी असलेल्या केसांबद्दल सखोल आणि पूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहात का..? तर तुमच्यापैकी अनेकांचं उत्तर नाहीच असणार. म्हणूनच आजचा लेख अतिशय आवश्यक आहे. यातून तुम्हाला माहित नसलेली माहिती आणि वारंवार पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. (Bikini Waxing)
तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण प्रायव्हेट पार्टच्या केसांची लांबी हि तारुण्यात पदार्पण केल्यानंतर जघन भागात अधिक वेगाने वाढते. या केसांची वाढ मांडीच्या आतील बाजूपासून सुरू होते आणि नंतर वयानुसार ग्रोथ प्यूबिक बोनपर्यंत वाढते. या केसांबद्दल बोलताना तज्ञांनी सांगितले आहे कि, ज्या प्रकारे आयलॅश डोळ्यांसाठी फिल्टरचे काम करते त्याचप्रकारे गुप्तांगाजवळील केस कोणत्याही प्रकारची घाण आत जाण्यापासून रोखतात.
(Bikini Waxing) मुख्य म्हणजे हे केस डोक्यावरील केसांइतके लांब वाढत नाहीत. त्यांची लांबी हि निश्चित असते. एका मर्यादेनंतर हे केस पुढे वाढत नाहीत. म्हणूनच या केसांची निगा राखा त्यांना काढून टाकू नका. कारण गुप्तांगाजवळील केस हे सुरक्षा रक्षकाप्रमाणे काम करतात ते नसतील तर विषाणू तुमच्या शरीरात अगदी सहज प्रवेश करतील आणि आजारपण रोजचे होईल.
जाणून घ्या सतावणाऱ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे
० प्रायव्हेट पार्टचे केस आणि त्यांची स्वच्छता (Bikini Waxing)
प्रायव्हेट पार्टस जवळ येणारे केस हे आपण परिधान करीत असलेल्या कपड्यांवर घर्षण झाल्यामुळे अनेकदा जखमांचे कारण होऊ शकतात. शिवाय या भागातील ओलावा बुरशीजन्य बॅक्टेरियाला प्रोत्साहित करतो. परिणामी आजारपणाची शक्यता असते. त्यामुळे अनेक स्त्रियांचा असा विश्वास आहे की, आतील भाग स्वच्छ ठेवण्यासाठी जघन भागातील केस काढलेच पाहिजेत. पण या केसांमुळे गुप्तांगाच्या स्वच्छतेमध्ये कोणताही फरक पडत नाही. उलट या जागेवर केस असतील तर ते तुमच्या प्रायव्हेट पार्टसाठी अधिक सुरक्षित आहेत असे तज्ञ सांगतात. कारण हे केस फिल्टरप्रमाणे काम करतात आणि आत घाण जाऊ देत नाहीत.
केसांचे कपड्यांसोबत घर्षण होण्याची समस्या तेव्हाच होऊ शकते जेव्हा प्रमाणापेक्षा घट्ट आणि अस्वच्छ कपडे तुम्ही परिधान केले असतील. (Bikini Waxing) याशिवाय प्रायव्हेट पार्टमधील ओलावा हा केसांमुळे होत नाही. तर बाथरूमचा वापर केल्या नंतर आपण ती जागा पाण्याने स्वच्छ केल्यानंतर कोरडी न करण्याच्या सवयीमुळे हि समस्या होते. याशिवाय प्रायव्हेट पार्टची स्वच्छता करताना साबणाचा किंवा फोम सोपचा वापर केल्यास साबण व्यवस्थित स्वच्छ केला नाही तरीही हा त्रास होऊ शकतो. यामुळे प्रायव्हेट पार्टजवळील केस पूर्ण काढून टाकू नका. तर डोक्यावरील केसांप्रमाणे याही केसांची काळजी घ्या. स्वच्छतेच्या बाबतीत हेळसांड करू नका.
० गुप्तांगातील दुर्गंधीचे कारण केस आहेत का..?
तज्ञ सांगतात कि, गुप्तांगातील दुर्गंधीचे कारण केस असू शकत नाहीत. हे एक मिथक आहे. गुप्तांगाजवळील केसांमुळे कधीही दुर्गंधी येत नाही. (Bikini Waxing) प्यूबिक भागात केस असतील तर त्यांच्या उपस्थितीमुळे किंवा नसल्यामुळे वास येण्याचा कोणताही संबंध नाही.
तज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार आणि अभ्यासात सिद्ध झाल्याप्रमाणे ज्ञात आहे की, ज्याप्रमाणे शरीराच्या इतर भागांमध्ये घाम येतो अगदी त्याच प्रकारे या भागांमध्येही घाम येतो. या घामामुळे ही दुर्गंधी उद्भवते. याशिवाय गुप्तांग स्वच्छ केल्यानंतर ती जागा ओलसर राहिली तरीही हा त्रास होऊ शकतो. यासाठी गुप्तांगाची जागा कोरडी करणे गरजेचे आहे.
० ब्लेड वा रेझरचा वापर करून केस काढल्यामुळे त्यांची लांबी वाढते का.. ?
(Bikini Waxing) बहुतेक स्त्रियांमध्ये असा गैरसमज आहे की, ब्लेड वा रेझरचा वापर करून शेव्हिंग केल्यास तेथील केस जास्त वाढू लागतात. पण असे काहीही होत नाही. उलट हि नैसर्गिक प्रक्रिया असल्यामुळे केस शेव्ह केल्यानंतरही त्यांच्या मर्यादित लांबीनुसारच वाढतात.
० गुप्तांगात खाज येण्याची समस्या केसांमुळे होते का.. ?
जेव्हा तुम्ही प्यूबिक एरियावर वाढलेले केस रेझरच्या साहाय्याने काढता तेव्हा ते केस पुन्हा वाढताना खाज येऊ शकते. कारण रेझरच्या वापरामुळे हे केस अधिक कडक होतात आणि त्यामुळे ते टोचू लागतात. परिणामी खाज येऊ शकते.
० जघनाच्या भागात केस आयुष्यभर राहतात का..?
जघन भागावर केस आयुष्यभर राहतात का..? तर याचे उत्तर नाही असे आहे. कारण वयानुसार किंवा कोणत्याही आजारामुळे अंगावरील तसेच डोक्यावरील केस जसे पातळ होऊ लागतात वा गळू लागतात, अगदी तसेच जघन भागात वाढणारे केस हे कालांतराने पातळ होऊ लागतात किंवा गळू लागतात. यामुळे कोणत्याही प्रायव्हेट पार्टभोवताली असणारे केस हे आयुष्यभर टिकणारे नसतात. (Bikini Waxing)
‘हे’ पण वाचा :-
Private Parts Care: गुप्तांगांची काळजी घेतली नाही तर, होतील गंभीर आजार; जाणून घ्या
Mens Health Care: पुरुषांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 7 टिप्स फायदेशीर; जाणून घ्या
भाग 1: अंगाला सतत खाज येते?; जाणून घ्या कारणे आणि घ्यावयाची काळजी
Urinary Infection: स्त्रियांमध्ये युरीन इंफेक्शनचे प्रमाण जास्त का आहे?; जाणून घ्या