Mens Health Care
| |

Mens Health Care: पुरुषांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 7 टिप्स फायदेशीर; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Mens Health Care दिवसभर काम काम आणि काम करणाऱ्या व्यक्तीला थोडीशी उसंत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. जसे घरातल्या कर्त्या स्त्रीला कुटुंबातील प्रत्येकाच्या प्रत्येक बारीक गोष्टीची काळजी असते आणि ती स्वतःकडे दुर्लक्ष करून प्रत्येक जबाबदारी पार पाडते. अगदी तशीच घरातली पुरुष मंडळी सुद्धा असतात. थोडी आळशी असतात पण जबाबदाऱ्या पेलताना त्यांचे खांदे जराही झुकत नाहीत हे मात्र विशेष.

strong men

आता पहा ना..! क्षेत्र कोणतेही असो जितके पुरुष कणखर तितक्याच स्त्रियासुद्धा. यामुळे घरातल्या कर्त्या स्त्री आणि पुरुषाला स्वतःचे आरोग्य असे विशेष जपण्यासाठी वेळ मिळतोच कुठे..? स्त्रियांच्या शरीरातील काही खास बदल काही अंशी त्यांच्या आजारी असण्याचे संकेत देतात मात्र पुरुषांचे शरीर कमकुवत होण्याव्यतिरिक्त फार कमी लक्षणे बाहेरून दिसून येतात. (Mens Health Care) ज्यामुळे ते आजारी आहेत हे समजते. परिणामी पुरुषांच्या आरोग्याची होत असलेली हानी लवकर लक्षात येत नाही आणि हळूहळू त्यांचे शरीर त्यांची साथ सोडू लागते.

यामुळे तज्ञ सांगतात कि, वय कोणतेही असो जबाबदाऱ्या आयुष्यभर राहणार आहेत. पण मग आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना आरोग्याची जबाबदारी जाणीवपूर्वक फेटाळू नका. म्हणूनच कोणत्याही वयात स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घेणे महत्त्वाचे आहे असेही तज्ञ सांगतात.

कारण निरोगी सवयी विकसित करण्यास फार वेळ लागत नाही मात्र त्या आत्मसाद करणे गरजेचे आहे. त्यामुळे महिला असो वा पुरुषांन त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. नियमित डॉक्टरांना भेटून आपल्या शरीराची तपासणी करून घ्यावी. (Mens Health Care)

तुम्ही अनेकदा लेख, व्याख्याने यामध्ये स्त्रियांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे वाचले वा ऐकले असेल. पण पुरुषांविषयी फार बोलले जात नाही. म्हणूनच आज आपण पुरुषांबद्दल बोलणार आहोत. कारण घरासाठी जितकी स्त्री महत्वाची आहे तितकाच पुरुषही महत्वाचा आहे. यामुळे दोघांनीही आपल्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत सतर्क राहावे.

Mens Health Care

पुरुष मंडळीदेखील स्त्रियांइतकेच आरोग्याच्या बाबतीत निष्काळजी असतात. फार कमी लोक स्वतःकडे बारकाईने लक्ष देतात. त्यातही किमान एकतरी व्यसन यांना असतंच आणि यामध्ये दारू, सिगारेट इतकंच कामाचं व्यसन असण्याचाही समावेश आहे बरं का!

(Mens Health Care) यामुळे पुरुषांनी देखील आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. मुख्य म्हणजे पुरुषांमध्ये तणावाचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण तणावामुळेच बरेच आजार होण्याची शक्यता असते. याशिवाय पौष्टिक आहार निवडणे आणि शारीरिक हालचाली करणेदेखील आवश्यक आहे. तुमचे वय किंवा सामान्य आरोग्य विचारात न घेता आरोग्य जपा. चला तर जाणून घेऊ पुरुषांचे आरोग्य जपण्यासाठी आवश्यक ७ महत्वपूर्ण टिप्स.

० पुरुषांचे आरोग्य असे जपा
(Mens Health Care)

१. आनुवंशिक आजारांची माहिती घ्या आणि डॉक्टरांशी स्पष्ट बोला

जर तुमच्या कुटुंबात कुणालाही कोणताही आजार असेल जसे कि, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह किंवा इतर दीर्घकालीन आरोग्य परिस्थितीचा इतिहास अशा कोणत्याही समस्या असल्याचे आपल्या डॉक्टरांना याविषयी पूर्ण माहिती द्या. तसेच आनुवंशिक आजाराचे कोणतेही लक्षण आढळण्यास त्वरित उपचार करणे गरजेचे आहे.

२. नियमित आरोग्य तपासणी करा

Health Check Up

अनेकदा आपले आरोग्य व्यवस्थित आहे मला काहीच होत नाही याबाबत आपण अगदी ठाम सांगू शकतो. पण तरीही नियमित डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करणे गरजचे आहे. कारण पुरुषांनी त्यांच्या स्वत:च्या चांगल्या आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी हि पायरी महत्वाची आहे. यासाठी प्रत्येक वर्षी शारीरिक तपासणी करा. मुख्य म्हणजे यासाठी वयाची कोणतीही अट नाही. या तपासणीत कोलेस्टेरॉल, ग्लुकोज आणि रक्तदाब मूल्यांकनांचा समावेश असावा. (Mens Health Care)

३. शरीराला आराम घेऊ द्या

Relief

अनेकदा सुट्टीच्या दिवशीही काम करणे किंवा अख्खा दिवस टीव्हीसमोर घालवणे अशी दिनचर्या पुरुषांची असते. पण यापेक्षा एखाद छान पुस्तक वाचायचं, गाणी ऐकायची किंवा ऑडिओ बुक ऐकायचे, छान फिरायला जायचे असं काहीतरी करा. कुटुंबासोबत वेळ घालवा. यामुळे तुमचं माईंड फ्रेश होईल आणि मुख्य म्हणजे शरीरातील थकवा दूर होईल.

४. नियमित व्यायाम करा

Exercise

मित्रांनो व्यायाम करणे अत्यंत आदर्श आणि चांगल्या सवयींपैकी एक सवय आहे. यामुळे नियमित सकाळी किमान ३० मिनिटे व्यायाम कराच. पण जर तुम्हाला व्यायाम करताना कोणतीही अडचण जाणवत असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. शिवाय व्यायाम न जमल्यास २० मिनिटे वेगाने चालणे आणि योगाभ्यास करणे निवडा. (Mens Health Care)

५. अस्वस्थ वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

Doctor Says

(Mens Health Care) अनेकदा उगाचच अस्वस्थ झाल्यासारखे वाटते. बैचेन व्हायला होते. शरीर घामाने भिजत अशावेळी एकतर एका ठिकाणी शांत बसा आणि थोडेसे पाणी प्या. यानंतर पॅनिक न होता डॉक्टरांशी बोलून त्यांचा सल्ला घ्या. अनेकदा अचानक शरीरातील बदल लक्षात आल्याचेही अशी बैचेनी होते. लक्षात ठेवा की अनेक महत्त्वपूर्ण आरोग्य समस्या किरकोळ समस्यांपासून सुरू होतात. यात अस्वस्थता हि पहिली पायरी मानली जाते मानून यावर सल्ला आवश्यक आहे.

६. कर्करोगाची तपासणी जरूर करून घ्या

कर्करोग असा आजार आहे जो होण्यासाठी विशेष वय जरुरी नाही. हा आजार माणसाला पोखरतो आणि मृत्यूच्या दाढेत ओढतो. यामुळे तुमचे वय, कौटुंबिक इतिहास आणि जीवनशैलीच्या आधारावर डॉक्टर तुम्हाला कर्करोगाची तपासणी करण्याविषयी सांगतात. यात कोलन कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर किंवा फुफ्फुसाच्या कॅन्सरची तपासणी करण्याची शिफारस केली जाऊ शकते.

७. मद्यपान आणि धूम्रपान थांबवा

Alcohol

काही सवयी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. यात मद्यपान आणि धूम्रपान या सवयींचा समावेश आहे. वेळीच यावर रोख न मिळविल्यास अतिशय गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. यासाठी मार्गदर्शन घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. (Mens Health Care)

‘हे’ पण वाचा:-

Private Parts Care: गुप्तांगांची काळजी घेतली नाही तर, होतील गंभीर आजार; जाणून घ्या

Boiled Egg Benefits For Men : पुरुषांच्या समस्यांवर उकडलेले अंडे प्रभावी; जाणून घ्या महत्वाचे 5 फायदे

वयाच्या चाळिशीनंतर पुरुषांसाठी ‘या’ चाचण्या आवश्यक; जाणून घ्या

पुरुषांना पण असू शकतो का स्तनांचा कॅन्सर ?

पुरुषांनी सतत पॉवरफुल राहण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा ?