Private Parts Care
|

Private Parts Care: गुप्तांगांची काळजी घेतली नाही तर, होतील गंभीर आजार; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Private Parts Care गुप्तांगाविषयी बोलणे अनेकांना लाजेचे वाटते. पण जे नैसर्गिक आहे त्याबद्दल बोलायची लाज कशाला..? खरंतर लाजेपोटी गुप्तांगाविषयी असणाऱ्या आरोग्याच्या समस्या कुटुंबापासून आणि डॉक्टरांपासून लपवल्या जातात. याचा परिणाम असा होतो कि एखाद्या गंभीर आजाराला संबंधित व्यक्ती बळी पडते. म्हणूनच मित्रांनो गुप्तांगाविषयी कोणतीही गोष्ट राखून ठेवू नका. होणारा त्रास उघडपणे व्यक्त करा.

मित्रांनो.., तुम्ही अनेकदा पाहिले असाल कि तुमचा आवडता अभिनेता किंवा मग एखादी अभिनेत्री किती बिंदास गुप्तांगाविषयी बोलतात. याशिवाय कितीतरी कलाकार अंतर्वस्त्रांच्या जाहिराती करतात तेव्हा त्यांना वाटत नसेल का लाज..? अर्थातच यात लाज वाटण्याचे कारण नाही. कारण जो तो ज्याचं त्याच काम करत आहे आणि बोलण्याविषयी म्हणाल तर बोललात नाही तर समजणार कसं..? आता तुम्हीच विचार करा कि, जगातील किती लोक गुप्तांगाच्या समस्या उघड बोलतात आणि त्यावर निवारण मिळवतात..? कुणीच नाही. कारण समाज लज्जा. जिथे आरोग्याचा विषय असतो तिथे लज्जा या शब्दाची किंमत लहान होते. त्यामुळे आपल्या समस्या उघड बोला. (Private Parts Care)

या लाजेपोटी कितीतरी स्त्रिया, पुरुष आणि अगदी तरुण वयातील मुलेही आपल्या समस्या लपवितात. पुढे जाऊन या समस्या कधी आजाराचे रूप घेतात समजत सुद्धा नाही. हि लाज काही गंभीर समस्यादेखील अंगावर काढायला लावते. जे आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. कारण योग्यवेळी गुप्तांगाच्या समस्यांवर उपचार केले नाहीत तर ते गंभीर समस्यांचं कारण ठरू शकतात. (Private Parts Care) यासाठी वेळोवेळी तपासणी करणेदेखील आवश्यक असल्याचे तज्ञ सांगतात. अनेकदा टॉयलेटनंतर गुप्तांग स्वच्छ न करण्याच्या सवयींमुळे गंभीर समस्या निर्माण होतात. शिवाय चुकीचा टॉयलेट पेपर वा हायजिन संबंधित कोणतेही प्रोडक्ट चुकीच्या पद्धतीने वापरले तरीही गंभीर समस्या होऊ शकतात.

Private Parts Care

या अशा गोष्टींमुळे लघवीवाटे रक्तस्राव होणे, मूळव्याध होणे, पोटाच्या समस्या, व्हगिनल समस्या आणि लैंगिक समस्या होऊ शकतात. इतकेच नाही तर या समस्यांचे योग्य वेळी निवारण न झाल्यास कँसर आणि ट्युमरसारखेही रोग होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच आज आपण गुप्तांगाची काळजी कशी घ्यायची याविषयी काही महत्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत. (Private Parts Care)

काय सांगतात तज्ञ..?

गुप्तांगाची काळजी घेणे हा आपल्या आरोग्याचा अतिशय महत्वाचा भाग आहे. कारण गुप्तांगाच्या वाटा या बहुदा ओलसर असतात. त्यामुळे बुरशीजन्य विषाणू अशा भागांवर आपली पकड मजबूत करतो आणि आपल्या आरोग्याचे नुकसान करतो. म्हणून गुप्तांगाची काळजी घेणे आवश्यक आहे. (Private Parts Care) मुख्य म्हणजे गुप्तांगाचे आरोग्य खराब होत असेल तर याची काही लक्षणे दिसतात. फक्त ती योग्य वेळी समजली तर उपचार करणे सोप्पे जाते. चला तर जाणून घेऊया तज्ञांनी सांगितलेली लक्षणे.

गुप्तांगाच्या बिघडलेल्या आरोग्याची लक्षणे:-

  • योनीमार्गातून विचित्र चिकट असा पांढऱ्या रंगाचा द्रव उत्सर्जित होणे.
  • गुप्तांगातून घाण वास येणे.
  • लिंगावर फोड येणे.
  • लिंगावरील त्वचा निघणे.
  • लघवी करताना जळजळ होणे.
  • लघवीचा रंग बदलणे.
  • लघवी किंवा शौच करताना रक्त स्त्राव होणे.
  • शौचाची वाट सुजणे.
  • पोटदुखी.
  • छातीत जडपणा येणे.
  • सतत मळमळणे.

गुप्तांगाची काळजी घेण्यासाठी आवश्यक नियमांचे पालन करा (Private Parts Care)

१) योनी किंवा लिंगाची स्वच्छता करताना कधीही साबणाचा वापर करू नये. फक्त स्वच्छ पाण्याने गुप्तांग धुवा. कारण साबणासारख्या रासायनिक वस्तूंमध्ये अधिक प्रमाणात सोडा असतो. जे लैंगिक अवयवांसाठी घातक आहे.

२) कोणतेही मलम वा फेअरनेस क्रीमचा वापर गुप्तांगावर करू नये. असे केल्याने या भागांमध्ये कोरडेपणा येऊ शकतो. याऐवजी लैगिंक अवयवांच्या स्वच्छतेसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने एखादे आयुर्वेदिक मलम वा टॉनिक वापरावे. (Private Parts Care)

३) महिलांनी विशेष करून मासिक पाळीच्या वेळेस अधिक काळजी घ्यावी. अशा दिवसात चुकूनही खराब कापड गुप्तांग पुसण्यासाठी किंवा पॅड म्हणून वापरू नये. यामुळे संसर्ग होऊ शकतो. शिवाय दिवसातून किमान ३ वेळा पॅड बदलावे.

Couple

४) एकापेक्षा जास्त व्यक्तींशी लैंगिक संबंध ठेऊ नये. असे केल्याने त्या व्यक्तीला लैंगिक आजार होऊ शकतो. कारण ज्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवत असाल त्या व्यक्तीला कोणत्याही रोगाचा संसर्ग असेल तर तो तुम्हालाही होण्याचा अधिक धोका असतो.

५) (Private Parts Care) लैंगिक समस्यांवर उपचार घेण्यासाठी कधीही या आजारांमध्ये हकीम किंवा भगत यांच्याकडे जाऊ नये. विशेष डॉक्टर आणि संबंधित तज्ञांचा सल्लाच घेणे यासाठी योग्य आहे.

Lemon

६) पेट्रोल सोडा, लिंबू वापरून लैंगिक आजार बरे होतात. असा गैरसमज आहे. तेव्हा याचा वापर कदापि करू नये. याच्या वापराने आजाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

अत्यंत महत्वाचे

कोणत्याही लैंगिक समस्येवर थेट औषधांच्या दुकानांमधून औषधे घेऊ नका. यातील काही समस्या गंभीर आजारांची लक्षणे असू शकतात तर काही समस्या अन्य कारणांमुळेही असू शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्या. बाहेरील लक्षणे पूर्ण बरी झाली म्हणून डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचे डोस चुकवू नका. यात सगळ्यात महत्वाचे म्हणजे लैंगिक अवयवांच्या आजाराबाबत भीती किंवा लाज बाळगू नका. (Private Parts Care)

‘हे’ पण वाचा :-

Toilet Hygiene : निरोगी आरोग्यासाठी ‘टॉयलेट हायजिन’ महत्वाचे; जाणून घ्या

भाग 1: मासिक पाळीच्या काळात वजन का वाढतं..?; जाणून घ्या कारणे

हि 5 लक्षणे म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर असण्याची शक्यता; लगेच जाणून घ्या

टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसाल तर आयुष्य कमी होईल; जाणून घ्या

मासिकपाळीचे चक्र का बिघडते?; जाणून घ्या कारणे