Blood From Nose In Summer
|

Blood From Nose In Summer: उन्हामुळे नाकातून रक्त येत असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Blood From Nose In Summer सध्या उन्हाळा सरू लागला असला तरी वातावरणातील उष्णता कमी झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून हवामानातील बदल पाहता पावसाची दाट चिन्हे दिसून येत आहेत. मात्र काही भागांमध्ये अजूनही सूर्याचा ताप काही कमी होईना. अशा मिश्र वातावरणामुळे आरोग्याचे मोठे नुकसान होत असते. अनेकदा या दिवसात नाकातून अचानक रक्त येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे जर असे झालेच तर घाबरू नका. कारण हि समस्या फार गंभीरच असेल असे नाही. उष्णतेचा दाह सहन न झाल्यामुळे नाकातून रक्त येऊ शकते. अशावेळी काय कराल..? तर अगदी सोप्प्या भाषेत सांगायचं झालंच तर अशावेळी घरगुती उपायांचा अवलंब करा.

उन्हाळा असा ऋतू आहे जो वेगवेगळ्या आरोग्यदायक समस्यांना आमंत्रण देतोच यात काही शंकाच नाही. उन्हाळ्यात वातावरणातील दाह नाकातून रक्त येण्याची समस्या निर्माण करतो. पण अचानक नाकातून रक्त यायला लागले कि अनेकांची भंबेरी उडते. कितीतरी लोक घाबरून जातात. पण मित्रांनो, नाकातून रक्त येणे प्रत्येक वेळी आरोग्यासाठी घातक असेल किंवा एखाद्या मोठ्या आजाराचे लक्षण असेल असे नाही. त्यामुळे जर का उन्हाळ्याच्या दिवसात नाकातून रक्त आलंच तर घाबरून जाऊ नका. याउलट शांत राहा. संयम बाळगा आणि मुख्य म्हणजे अति हालचाल करणे टाळा. अशावेळी नक्की काय करावे किंवा नाकातून रक्त येण्याचे नेमके कारण काय याबाबत तज्ञांनी काही विशेष माहिती दिली आहे. ती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. (Blood From Nose In Summer)

Blood From Nose In Summer

० उन्हाळ्यात नाकातून रक्त का येते..?

उन्हाळ्याच्या दिवसात घराबाहेर जाणे देखील नकोसे वाटते. याचे कारण म्हणजे उन्हामुळे वातावरणातील हवेत उष्णता कायम असते. तिचा दाह हा सहन न होणारा असतो. मात्र तरीही कामानिमित्त घराबाहेर जावे लागले तर शरीराचे तापमान वाढू शकते. असे झाल्यास नाकातील छोट्या रक्तकोशिका कॅपिलरीज विस्तारित होऊन आपल्या नाकातून अचानक रक्तस्राव होऊ शकतो. (Blood From Nose In Summer) इतकेच नव्हे तर कोरडेपणा, नाक टोचणे, पडल्यामुळे नाकाला दुखापत होणे, ॲस्पिरिनसारख्या औषधांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर करणे, धुळीची ॲलर्जी, जंतू संसर्ग, उच्च रक्तदाब या सारख्या अनेक आयोग्यविषयक समस्यांमुळेदेखील उन्हाळ्यात नाकातून रक्तस्राव होतो.

० नाकातून रक्त येऊ नये म्हणून या टिप्स फॉलो करा

१) (Blood From Nose In Summer) नाकातून रक्त येऊ नये यासाठी तीव्र आणि कडक उन्हात जाणे टाळा.

Eating

२) उन्हात बाहेर पडत असाल तर कधीही उपाशीपोटी जाऊ नका. काहीतरी भरपेट हलका नाश्ता करून जा.

३) उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचे सेवन जास्तीत जास्त करावे. याशिवाय मुबलक प्रमाणात अन्य पेय पदार्थांचे सेवन करणे देखील फायदेशीर आहे.

४) सगळ्यात महत्वाचे म्हणजे उन्हाळी मोसमात ज्या फळांचे उत्पादन अधिक होते. त्या फळांचे सेवन करावे. (Blood From Nose In Summer)

Detox Water

५) उन्हाळ्याच्या दिवसात ऍसिडिटी आणि पित्त अधिक झाल्यासही नाकातून रक्त येऊ शकते. त्यामुळे कोणतेही तेलयुक्त आणि मसालेदार आहार टाळा.

६) नियमित घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी घाला म्हणजे डोक्याला थेट सूर्य किरणांचा मारा सहन करावा लागणार नाही.

७) उन्हात घराबाहेर पडणे गरजेचे असेल तर कान, नाक आणि डोळे सुती कपड्याने झाकून घ्या आणि मग बाहेर पडा.

Blood

० नाकातून अचानक रक्त आले तर काय कराल..?

(Blood From Nose In Summer) तज्ञ सांगतात कि, उन्हाळ्यात नाकातून रक्त येणे सामान्य बाब आहे. त्यामुळे जर अशी समस्या तुम्हालाही अचानक जाणवली तर घाबरून जाऊ नका. तर अशावेळी एखाद्या सावली असलेल्या जागेत शांतपणे खाली बसा. शिवाय नाकातील रक्त घशात जाऊ नये, यासाठी समोरच्या बाजूस थोडे वाका आणि नाक ओल्या कपड्याने दाबून धरावे. याशिवाय मन खाली करून डोक्यावर थंड पाणी ओता. या प्राथमिक उपायांच्या सहाय्याने नाकातून येणारे रक्त थांबविता येईल.

० नाकातून रक्त येण्यावर करावयाचे घरगुती उपाय (Blood From Nose In Summer)

1. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नाकातून अचानक रक्त आल्यास घाबरून जाऊ नका. दरम्यान थोडे डोके वाकवून डोक्यावर थंड पाणी टाका. असे केल्यास शरीराचे तापमान कमी होईल आणि नाकातून रक्त येणे हळू हळू कमी होईल.

2. नाकातून रक्त येत असेल तर कांद्याच्या रसाचे दोन थेंब नाकपुडीत टाका. याशिवाय दुर्वा स्वरसाचे दोन थेंब नाकात टाकल्यानेही फायदा होईल. यामुळे रक्तस्राव थांबेल.

3. नाकातून रक्त आल्यास बेलाच्या पानांचा रस पाण्यात मिसळून प्या यानेही फायदा होतो. (Blood From Nose In Summer)

4. एकाच नाकपुडीतून रक्तस्राव होत असल्यास ती नाकपुडी दाबून ठेवा. तसेच नाकातून रक्त येत असताना नाकाऐवजी तोंडाने श्वास घ्या. असे केल्यासही रक्तस्राव कमी होईल.

5. नाकातून रक्त येत असेल तर नाकाला बर्फ लावून धरा. असे केल्यास नाकातून होणार रक्तस्राव थांबेल.

6. जर नाकातील त्वचा ड्राय झाल्याने, सर्दीसाठी घेतलेल्या औषधांमुळे आणि हाय ब्लडप्रेशरमुळे नाकातून रक्त येत असेल तर आधी या समस्यांवर उपाय करावा. शिवाय नाकातील त्वचा कोरडी होऊ नये यासाठी नाकात निलगिरीच्या तेलाचे थेंब सोडा. यामुळे सर्दीही दूर होईल. (Blood From Nose In Summer)

‘हे’ पण वाचा:-

Health Tips: पाणी आणि दुधाचे ‘असे’ सेवन कराल तर 100% आजारी पडालं; जाणून घ्या

Bad Health Habits: उत्तम स्वास्थ्यासाठी ‘या’ 25 वाईट सवयींची संगत आत्ताच सोडा; जाणून घ्या

Sleeping On The Floor : जमिनीवर झोपण्याचे फायदे जाणालं तर गादी, बिछाने विसरून जालं; जाणून घ्या आश्चर्यकारक 10 फायदे

सर्दीमुळे चोंदलेलं नाक देतंय त्रास; जाणून घ्या घरगुती उपाय

सर्दी नाकात का साचली जाते ?