How To Eat Potatoes
|

How To Eat Potatoes – बटाटा खाल्ला की वजन वाढत..?; तज्ञ सांगतात खाण्याचा योग्य मार्ग

हॅलो आरोग्य ऑनलाईन| बटाटा ही एक अशी भाजी आहे जी महाराष्ट्रीयन आहाराचा एक अविभाज्य घटक आहे. (How To Eat Potatoes) शिवाय बटाटा मुळातच असा आहे जो कोणत्याही भाजीसोबत मिसळला तरीही चवीला उत्कृष्ट लागतो. यामुळे महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीमध्ये बटाट्याचा एक वेगळाच दर्जा आहे. शिवाय बटाटा खाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे.

कारण हि भाजी लोकप्रिय भाज्यांच्या यादीतील सर्वोत्तम नावांपैकी एक आहे. पण बटाटा खाण्यामुळे वजन वाढत अशी एक समजूत आहे. ज्यामुळे आजकाल बटाटा खाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे आज आपण खर्च बटाटा खाल्ल्यामुळे वाजत वाढत का..? हे जाणून घेणार आहोत. शिवाय बटाटा कसा खाल्ला म्हणजे आरोग्यदायी ठरतो. (How To Eat Potatoes)

Potato

कोणत्याही भाजीसोबत उत्तम चव देणारा बटाटा हा ‘भाज्यांचा राजा’ म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रात बटाट्याचे विविध पदार्थ, विविध पद्धतीच्या भाज्या आणि तळणीचे पदार्थ बनविले जातात. बटाट्याची भाजी, बटाट्याच्या काचऱ्या, बटाटा वडा, बटाट्याचा किस, बटाट्याचा हलवा, बटाट्याचे वेफर आणि अजून असे अनेक पदार्थ आहेत ज्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. शिवाय या पदार्थांची विक्रीदेखील मोठ्या स्केलवर होते. त्यामुळे बटाटा हा उद्योगवर्धक भाजी असल्याचे सिद्ध झाले आहे.

मॅक्डोनल्ड्स सारख्या फूड ब्रँडमध्ये आकर्षित करणारी टिक्की देखील बटाट्याची असते. एकंदरच बटाटा हा प्रत्येक खाद्य पदार्थात टेम्परिंग एजंट म्हणून काम करतो. (How To Eat Potatoes) परंतु, तरीही लोक बटाट्याला रोगाचं कारण म्हणतात. आता त्याला बोलता येत नाही म्हणून.. पण त्याच्याही भावना दुखावत असतील ना..? म्हणून आज आपण तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊ आणि मगच आहारात बटाट्याचा समावेश करू.

० बटाट्याचे गुणधर्म

विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांसाठी बटाटा घातक मानला जातो. मात्र तज्ञ सांगतात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा घातकच असतो. पण आधीच मर्यादा आखून घेतली तर याहून चांगले दुसरे काहीच नाही. बटाट्याबद्दल सांगताना तज्ञांनी बटाट्याच्या काही विशेष गुणधर्मांबद्दल सांगितले आहे. (How To Eat Potatoes)

तज्ञ सांगतात कि, बटाट्यामध्ये पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असत. शिवाय यामध्ये फायबरचे प्रमाणदेखील चांगले असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी बटाटा फायदेशीर आहे. इतकेच नव्हे तर बटाट्याचे सेवन केल्यामुळे पचनासाठीही फायदा होतो. तसेच यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. संशोधनानुसार, बटाट्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि कार्बोहायड्रेट्स मोठ्या मात्रेत आढळतात. हे घटक शरीरातील हायपोग्लायसेमिक इंडेक्स कमी करतात.

(How To Eat Potatoes) बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. यामध्ये फॅट, सोडियम किंवा कोलेस्टेरॉलचा समावेश नसतो. शिवाय, व्हिटॅमिन बी ६, फायबर, मॅग्नेशियम आणि अँटी ऑक्सिडंट्सचे चांगले प्रमाण बटाट्यामध्ये आढळते. विशेष म्हणजे केळ्यापेक्षा बटाट्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. शिवाय यात निम्मं व्हिटॅमिन सी असल्यामुळे फ्री रॅडिकल्सशी लढण्याची क्षमता वाढते. परिणामी हृदयरोग, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो.

Eating Potato Everyday

० तज्ञ सांगतात बटाटे खाण्याचा निरोगी मार्ग (How To Eat Potatoes)

मित्रांनो, बटाटा आरोग्यासाठी लाभदायी नाही हा समज अत्यंत चुकीचा आहे. खाण्याची पद्धत चुकली कि बटाटाच काय..? कोणताही पदार्थ हानिकारकच ठरतो. तर बटाटे खाण्याचा देखील एक निरोगी मार्ग आहे तो जाणून घेऊ.

तज्ज्ञ सांगतात, उकडलेले बटाटे आहारात समाविष्ट केले जाऊ शकतात. पण यासाठी बटाटे उकडल्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्या. यानंतर बटाट्याचे माध्यम आकाराचे तुकडे करा. आता उकडलेल्या बटाट्याची चव वाढवण्यासाठी त्यावर काळी मिरीचा वापर करा. असा बटाटा खाणे कधीही फायदेशीर. (How To Eat Potatoes)

शिवाय बटाटा दही किंवा ताकात मिसळून नाश्ता वा दुपारच्या जेवणात खाल्ल्यानेही फायदा होईल. कारण उकडलेल्या बटाट्याचं सेवन वजन नियंत्रित ठेवते वाढवत नाही.

याशिवाय उकडलेला बटाटा खाणे भूकेवर नियंत्रण आणते. ज्यामुळे उकडलेला बटाटा आहाराचं प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करतो

(How To Eat Potatoes) उकडलेले बटाटे खाल्ल्याने जास्त प्रमाणात आहार घेणे शक्यच होत नाही. बटाटा खाल्ल्याने पुन्हा पुन्हा भूक लागत नाही. कारण उकडलेले थंड बटाटे जास्त प्रमाणात प्रतिरोधक स्टार्च तयार करतात. जे चयापचय वाढवण्यास मदत करतात आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करतात.

उकडलेला बटाटा खाल्ल्याने वजन वाढत नाही. कारण उकडलेल्या बटाट्यांमध्ये रताळ्याइतक्याच कॅलरीज असतात.

० बटाटे आरोग्यदायी पद्धतीने शिजवा..

बटाटे शिजवण्याची पद्धत देखील त्यातील पोषक घटकांवर परिणाम करीत असते. त्यामुळे बटाटे आरोग्यदायी पद्धतीने शिजवा. याबाबत सांगताना तज्ञ सांगतात कि, बटाटे उकडण्यासाठी कमी पाणी वापरा. कारण शिजवलेल्या बटाट्यामध्ये पोषक तत्त्वं चांगल्या प्रमाणात असतात. त्याचे सेवन नेहमीच फायदेशीर आहे. (How To Eat Potatoes)

पण बटाटे उकडताना अधिक पाण्याचा वापर केल्या बटाट्यातील पोषक तत्व पाण्यात उतरतील आणि कमी होतील. म्हणून बटाटे शिजवताना कमी पाण्याचा वापर करणे योग्य आहे. तसेच बटाटे उकडलेलं पाणी जेवणात वापरण्याचा प्रयत्न करा. कारण या पाण्यात बटाट्यातील व्हिटॅमिन सी आणि बी सारखे पोषक घटक उतरलेले असतात. ते पाणी फेकून दिल्यास त्यातील घटक आपल्याला मिळत नाहीत.

० वजनाची चिंता असेल तर ‘या’ पदार्थांसोबत बटाटा खाणं टाळा

बटाटा खाल्ला कि वजन वाढत असा फार जुना समज आहे. पण बटाटा योग्य पद्धतीने खाल्ला तर नक्कीच वजन वाढत नाही असे तज्ञांनी सांगितले आहे. शिवाय बटाटा खाण्याचे प्रमाण हे मर्यादित असणे अत्यंत आवश्यक आहे. फक्त बटाट्याचे सेवन करताना बटाट्यासोबत तूप, तेल, लोणी, मलई, पनीर आणि आर्टिफिशियल फ्लेवर्सचा वापर करू नका. याउलट बटाटे शिजवण्यासाठी ऑलिव्ह ऑइलसारखं निरोगी तेल वापरा म्हणजे वजन वाढायची चिंता सतावणार नाही. (How To Eat Potatoes)

‘हे’ पण वाचा :-

Healthy Vegetables: औषधी रानभाजी तांदुळजा खा आणि स्वस्थ रहा; जाणून घ्या आरोग्यवर्धक फायदे

Skipping Dinner: रात्री उपाशी झोपण्याची सवय उडवेल कायमची झोप; जाणून घ्या दुष्परिणाम

7 Day Healthy Meal Plan: हेल्दी रहायचंय..? तर हेल्दी डाएट करा ना; जाणून घ्या आठवड्याचा मिल प्लॅन

Vegetarian Protein Sources : प्रथिनांची कमतरता भरून काढतील ‘हे’ 10 व्हेज पदार्थ; जाणून घ्या

Mens Health Care: पुरुषांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 7 टिप्स फायदेशीर; जाणून घ्या