Drumstick Juice Benefits
|

Drumstick Juice Benefits: डायबिटीसपासून ते वेटलॉसपर्यंत शेवग्याच्या पानांचे सरबत एकदम गुणकारी; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Drumstick Juice Benefits तुम्ही शेवग्याची भाजी खाल्लीच असेल. शेवग्याच्या शेंगांची भाजी, आमटी आणि अगदी सांबरदेखील अगदी भन्नाट चवीचे असते. त्यामुळे शेवग्याचे सेवन आवडीने करणारे खूप जण आहेत. पण शेवगा फक्त भाजीसाठी नाही तर इतरही गोष्टींसाठी फायदेशीर आहे. त्याची पाने आणि फुलेही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. शिवाय शेवग्याची पाने मधुमेहावर गुणकारी असल्याचे ही सिद्ध झाले आहे. पण या पानांचे सेवन कसे करायचे असा एक सामान्य प्रश्न पडणे साहजिक आहे. तर याचेच उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Drumstick

शेवग्याच्या शेंगेमध्ये जसे कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि पोटॅशियम सारखे अनेक पोषक द्रव्य असतात. तसेच पोषक पदार्थ शेवग्याच्या पानांमध्येही असतात. शेवग्याची पाने त्याच्या शेंगेइतकी नक्कीच चविष्ट नसतात. (Drumstick Juice Benefits) मात्र शेवग्याच्या पानांचे सरबत कोणत्याही आजारावर फायदेशीर आहे. शिवाय ते बनवणेही अगदी सोप्पे. त्यामुळे शेवग्याच्या पानांचे सरबत आरोग्यदायी फायद्यांसाठी एक नंबर उपाय आहे. पण हे सरबत बनवायचे कसे आणि त्याचे सेवन करण्याचे फायदे तरी काय..? हे जाणून घ्यायचे असेल तर हा लेख पूर्ण वाचा.

शेवग्याच्या विविध घटकांपैकी एक म्हणजे शेवग्याची पाने. यामध्ये मधुमेहविरोधी घटक समाविष्ट असतात. यामध्ये रक्तातील साखर नियंत्रित करण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंतचे अनेक गुणधर्म समाविष्ट असतात. शेवग्याची पाने भाजी, सांबर, चहा अशा पदार्थांच्या माध्यमातून खाता येतात. पण यांपैकी एक चविष्ट पर्याय म्हणजे शेवग्याच्या पानांचे सरबत. ते कसे बनवायचे ते जाणून घ्या. (Drumstick Juice Benefits)

शेवग्याच्या पानांचे सरबत

० साहित्य ०

१/२ कप शेवग्याची पाने किंवा १ टीस्पून शेवग्याच्या पानांची पावडर, १ चमचा आलं, १ चमचा लिंबाचा रस, १ ग्लास पाणी, १ चमचा मध, १/२ चमचा दालचिनी पावडर, ५ ते ७ कडीपत्त्याची पाने

Drumstick Juice

० कृती ०

मध सोडून सर्व जिन्नस एकत्र घेऊन मिक्सरच्या साहाय्याने बारीक करून घ्या. यानंतर हे मिश्रण गाळून घ्या. आता एका ग्लासात हे सरबत काढून घ्या आणि आवश्यकतेप्रमाणे थोडेसे मध मिसळून घ्या. तुमचं शेवग्याच्या पानांचं मस्त बहारदार आणि आरोग्यदायी सरबत तयार. हे चवीला थोडं पांचट असलं तरीही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. (Drumstick Juice Benefits)

० सेवन ०

या आरोग्यदायी सरबताचे सेवन तुम्ही सकाळी उपाशी पोटी करावे. याचा आरोग्यासाठी अधिक लाभ होतो.

शेवग्याच्या सरबताचे फायदे
(Drumstick Juice Benefits)

१) मधुमेहामध्ये वरदान –

Diabetes

तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे शेवग्याच्या पानांचा वापर मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर आहे. कारण शेवग्याच्या शेंगांप्रमाणेच शेवग्याच्या पानांमध्येही रक्तातील साखरेची पातळी कमी करणारे गूण समाविष्ट आहेत. अनेक अभ्यासांमध्ये केलेल्या दाव्यानुसार, ड्रमस्टिकच्या पानांमधील अँटि ऑक्सिडेंट क्लोरोजेनिक ऍसिड रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे जर तुम्ही मधुमेही असाल तर चहाऐवजी शेवग्याच्या पानांपासून बनवलेलं सरबत जरूर प्या.

२) मजबूत इम्युनिटी –

Immunity

शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी असते. हे रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी मदत करते. शिवाय शेवग्याच्या पानांमध्ये अँटि ऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे शरीरातील इंफ्लेमेशन आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. यामुळे आपल्या शरीराची इम्युनिटी स्ट्रॉंग होते आणि यासह त्वचा तसेच केसांची गुणवत्ता सुधारते. (Drumstick Juice Benefits)

३) रक्तदाब कमी होतो –

high BP

शेवग्याच्या कोवळ्या हिरव्या पानांच्या अर्कांमध्ये आयसोथियोसायनेट आणि नियाझिमिन असतात. हे असे संयुग आहे जे रक्तवाहिन्या सक्रिय होण्यास प्रतिबंध करते. ज्यामुळे रक्तदाबामध्येही याचा फायदा होतो. म्हणून शेवग्याच्या पानांचा अर्क सरबताप्रमाणे पिणे फायदेशीर आहे.

४) निरोगी पोट –

Happy Stomach

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणारी शेवग्याची पाने पोटाच्या आरोग्याचीही उत्तम काळजी घेतात. शेवग्यातील फायबर हे त्याच्या कोवळ्या आणि हिरव्या पानांमध्ये अधिक मात्रेत असते. ज्यामुळे पोट निरोगी राहण्यास मदत होते. (Drumstick Juice Benefits)

५) वजन कमी होते –

Weight gain

शेवग्याच्या पानांमध्ये डाईयूरेटिक गुणधर्म असतात. ज्यामुळे शरीरात सक्रिय असणाऱ्या मांसपेषींसह रक्त वाहिन्यांमध्ये असणारे अनावश्यक पाणी कमी होते. याचे दाहक- विरोधी गुणधर्म शरीरातील सूज कमी करतात. शिवाय शरीरात जमा झालेली अनावश्यक चरबी देखील कमी करतात. ज्यामुळे आपोआपच वजन कमी होते.

‘हे’ पण वाचा :-

शेवग्याची भाजी करेल हाय ब्लड प्रेशर कंट्रोल; कसे ते जाणून घ्या

शरीरात आयर्नची कमतरता आहे हे कसे ओळखालं?; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

Vegetarian Protein Sources : प्रथिनांची कमतरता भरून काढतील ‘हे’ 10 व्हेज पदार्थ; जाणून घ्या

कल्पवृक्ष शेवगा!!! शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच आणखी  ‘हे’ आहेत औषधी गुणधर्म

जुलाबाच्या त्रासावर अत्यंत प्रभावी उपाय; जाणून घ्या