Moth Bean Benefits
|

Moth Bean Benefits – पोषणदायी मठाची डाळ निरोगी जगण्याचा स्वस्त पर्याय; जाणुन घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन| (Moth Bean Benefits) आपल्या आहारात डाळींचा समावेश असणे फार गरजेचे असते. कारण डाळीतील पोषमूल्यं ही शारीरिक क्षमतेसाठी अत्यंत महत्वाची असतात. त्यामुळे आहारात आवर्जून विविध डाळी खाल्ल्या पाहिजेत असे आहार तज्ञ सांगतात. यामध्ये मूग डाळ, तूर डाळ, मसुरची डाळ, हरभरा डाळ अशा विविध डाळी आपण नियमित आहारात घेत असतो. यांमध्ये मठाची डाळ हा एक उच्च पोषण मात्रा असलेला डाळीचा प्रकार आहे.

मठाची डाळ एका प्रकारे सुपर फूड आहे. कारण ही डाळ उच्च पोषणदायी असली तरीही प्रत्येकाच्या खिशाला परवडणारी आहे. होय. अतिशय स्वस्त दरात निरोगी आरोग्य देणारा पर्याय म्हणून मठाच्या डाळीकडे पाहिले जाते. त्यामुळे ही डाळ अतिशय आरोग्यदायी मानली जाते.

Matki

पोषणात सर्व डाळीत अव्वल (Moth Bean Benefits) मठाच्या डाळीचा आहारात समावेश केल्यास आपल्या आरोग्याला विविध फायदे मिळतात. अगदी वजन कमी करण्यापासून ते बुद्धी तल्लख करण्यापर्यंत विविध पद्धतीने ही डाळ आरोग्यदायी असल्याचे सिद्ध करते. शरीराचं कार्य सुरळीत चालण्यासाठी मठाच्या डाळीतील ब जीवनसत्व मोठया प्रमाणात फायदेशीर लाभ देते. आहारात अनेक प्रकारे मठाच्या डाळीचा समावेश करता येतो. जसे की, फोडणीची डाळ, आमटी, सांबार, डाळ वडे अशा विविध पाककृती करून मठाची डाळ खाता येते.

० मठाची डाळ म्हणजे काय..?

(Moth Bean Benefits) मित्रांनो, आपण केव्हापासून मठाची डाळ किती पोषणदायी आहे हे जाणून घेत आहोत. मात्र अनेकांना असा प्रश्न पडला असेल की मठाची डाळ म्हणजे काय..? खरतर तुम्ही सारेच या डाळीचा प्रकार जाणता पण विविध भागात या डाळीची ओळख विविध नावाने प्रसिद्ध आहे. मठाची डाळ म्हणजेच मटकीची डाळ होय.

Moth Bean Benefits

० मठाच्या डाळीतील आरोग्यदायी गुणधर्म

आपल्या शरीराला आवश्यक पोषण देण्याची क्षमता मठाच्या डाळीत असते. कारण या डाळीमधून शरीराला विकासासाठी आवश्यक प्रथिनं, जीवनसत्वं, फोलेट, लोह, झिंक, मॅग्नेशियम असे महत्वपूर्ण घटक मिळतात. (Moth Bean Benefits) मठाची डाळ वरण, आमटी, भाजी, डोसे, खिचडी, पुलाव अशा विविध पदार्थांच्या माध्यमातून सेवन केली जाऊ शकते.

पण मठाची डाळ शिजवण्याची आणि खाण्याची आरोग्यदायी पद्धत वापरात असेल तरच हि डाळ पोषणदायी सिद्ध होते. म्हणूनच आज आपण मठाची डाळ कशी शिजवायची आणि कशी खायची ते जाणून घेणार आहोत. इतकेच नव्हे तर मठाची डाळ खाल्ल्याने काय फायदे होतात ते देखील आपण आज जाणून घेणार आहोत. (Moth Bean Benefits)

Sprouts

० मठाची डाळ कशी शिजवायची आणि कशी खायची ते जाणून घ्या

मठाची डाळ पोषणदायी पद्धतीने खाणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी योग्य पद्धतीने हि डाळ शिजवणे देखील तितकेच गरजेचे आहे.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे, मठाची डाळ हवाबंद डब्यात किंवा घट्ट झाकणाच्या बरणीत साठवून ठेवा. ज्यामुळे ती चांगली टिकेल. (Moth Bean Benefits)

मठाची डाळ शिजवण्याआधी स्वयंपाकात वापरताना ती आधी स्वच्छ करुन घ्या. त्यानंतर हि डाळ धुवून सदाहरण ५ ते ६ तास पाण्यात भिजवून ठेवा.

Matki

भिजवलेली मठाची डाळ आता शिजायला घालताना त्यात १ चमचा तूप किंवा तेल घाला.

उकडलेली डाळ हि साध्या वरणाप्रमाणे तूप, जिरे, हिंग, हळदीची फोडणी देऊन बनवा. याशिवाय कांदा, लसूण, कडीपत्ता, टोमॅटो घालूनदेखील हि डाळ भाजीसारखा खाता येईल. इतकेच नव्हे तर मठाच्या डाळीची गोड आंबट चवीची आमटीदेखील आहारात खाता येईल.

(Moth Bean Benefits) याशिवाय मठाची डाळ घालून खिचडी करा. यासाठी मठाची डाळ भिजवून मग तांदूळ स्वच्छ धुवून साधी लसणाची फोडणी देऊन खिचडी वा मसाला खिचडी बनवा.

Matki

नेहमीच्या वापरातील मठाची डाळ भिजवून घ्या आणि त्यानंतर ती वाटून त्यात मसाला घालून मठाच्या डाळीचे सारण बनवा. आता या सारणाचे पराठे किंवा पुऱ्या बनवा आणि आहारात समावेश करा.

मठाच्या डाळीचा पुलाव अतिशय चविष्ट लागतो. मात्र हा पुलाव बनविताना इतर आवडीच्या भाज्यांचाही यात समावेश करा.

मठाची डाळ थोडी भिजवून ती चांगली उकडून घ्या. आता त्यात वरुन तिखट मिरची पावडर, लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्या आणि नेहमीच्या डाएटमध्ये खा. (Moth Bean Benefits)

Matki

मठाची डाळ चंगली मोड काढून तव्यावर काळ्यामिठासोबत परतून खाल्ल्यासही फायदे मिळतात.

मठाच्या डाळीचे पौष्टिक सूपदेखील बनविता येते. या सूपमध्ये काळीमिरी पावडर घालून आणि विविध भाज्यांचा समावेश करून खाल्ल्यास ते चविष्ठ लागते आणि पोषकही होते.

० मठाची डाळ खाण्याचे फायदे (Moth Bean Benefits)

Immunity

१) इम्युनिटी मजबूत होते – ज्या लोकांची रोग प्रतिकारशक्ती कमी असते त्यांनी मठाची डाळ आपल्या नियमित आहारात खाणे आवश्यक आहे. यामुळे इम्युनिटी मजबूत होते आणि रोगांपासून संरक्षण मिळत. यासाठी १ वाटी मठाची डाळ नियमित खाणे फायदेशीर आहे. 

Cholesterol Control

२) कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते – वाढते कोलेस्ट्रॉल विविध आजारांना घेऊन येते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणे आवश्यक आहे. म्हणून कोलेस्टेराॅलचा स्तर कमी करण्यासाठी आणि नियंत्रित ठेवण्यासाठी मठाची डाळ नियमित खा.

high BP

३) उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून आराम मिळतो – (Moth Bean Benefits) मठाच्या डाळीत अनेक गुणधर्म असतात जे शरीरासाठी आवश्यक आहेत. मठाच्या डाळीतील हेच गुणधर्म उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्यासाठी वरदान ठरतात.

Digestion

४) पचनक्रिया सुधारते – मठाच्या डाळीत फायबर आणि झिंकचे प्रमाण भरपूर मात्रेत असते. यामुळे स्नायू मजबूत होतात. इतकेच नव्हे तर या गुणधर्मामुळे आणि मठाच्या डाळीतील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे वजन कमी करणे सोप्पे जाते.

Stomach Pain

५) पोटाच्या समस्या दूर होतात – शरीराचे सर्व कार्य सुरळीत चालण्यासाठी आपल्या शरीराला ब जीवनसत्वाची नितांत गरज असते. शिवाय या डाळीत ब जीवनसत्व भरपूर असतं. तसेच फायबरची मात्रा देखील मोठी असते. यामुळे मठाची डाळ आहारात असेल तर पोटाच्याही समस्या दूर होतात. (Moth Bean Benefits)

‘हे’ पण वाचा:-

Without Peeling Fruits: ‘हि’ फळं सोलून खाताय..? तर लगेच थांबा; जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

Healthy Fruits : ‘हि’ फळे खालं तर, पोटाच्या तक्रारी राहतील दूर; जाणून घ्या

Sleeping Pills Side Effect: झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेता..? सावधान! अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम; जाणून घ्या

How To Eat Potatoes – बटाटा खाल्ला की वजन वाढत..?; तज्ञ सांगतात खाण्याचा योग्य मार्ग

ईयरफोन / हेडफोन वर सारखे गाणे ऐकताय तर सावधान! ‘या’ कारणांमुळे येऊ शकतो बहिरेपणा