Leg Pain
|

Leg Pain : पायाचे दुखणे दुर्लक्षित करालं तर, अपंगत्व येण्यास वेळ लागणार नाही; जाणून घ्या 7 उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Leg Pain दिवसभर या ना त्या कारणामुळे सतत दगदग, धावपळ आणि नुसती पळापळ झाल्यानंतर रात्री अंग मोडून येतं. अशावेळी पायाच्या पोटऱ्या दुखणे आणि मांड्यांमध्ये जडपणा येणे या समस्या जणू रोजच्या जीवनशैलीचा भागच झाल्या आहेत. त्यामुळे अगदी सहजपणे या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते. पण मित्रांनो प्रत्येक दुखणं साधं असेलच असं नाही. त्यामुळे पायांचे दुखणे दुर्लक्षित करणे सोडून द्या.

अनेकदा पायाच्या नसा दुखावल्यास पायाचे दुखणे (Leg Pain) उदभवते आणि याकडे दुर्लक्ष केले तर अपंगत्व येऊ शकते. कितीही काळजी घेतली तरी काही समस्या अशा असतात ज्या पिच्छा सोडत नाहीत. त्यापैकी एक समस्या म्हणजे पाय दुखी. अनेकांमध्ये पूर्ण पाय नव्हे तर टाचांचे दुखणे फार असते. अशावेळी विविध घरगुती उपाय करून यापासून आराम मिळवला जातो.

Leg Pain

अनेकांचा असा समज आहे कि, सतत (Leg Pain) पायांमध्ये वेदना होण्याची समस्या हि वृद्ध लोकांमध्येच आढळते. पण आजकालच्या तरुणाईला जरा विचारा. या समस्येला कोणतेही वयाचे बंधन राहिलेले नाही. रोजची जीवनशैली पाहता असा त्रास होणे अतिशय सामान्य झाले आहे. कदाचित तुम्हालाही हा त्रास होत असेल आणि तुम्हीही याकडे दुर्लक्ष करत असाल तर आताच सावध व्हा! प्रत्येक वेदना दुर्लक्षित करायची नसते. त्यात जर हे पायांच दुखणं असेल तर हे इतर अनेक गंभीर आजारांचं दुखणं वा लक्षण असू शकतं हे लक्षात घ्या.

पाय दुखण्याची समस्या अशी असते कि दोन मिनिटं बसलं कि बसून राहावं वाटत. झोपेत असताना कुणीतरी पाय चेपून द्यावे असं सतत वाटत आणि वाटणार का नाही..? पायातील वेदना जर असह्य करणाऱ्या असतील तर अशी भावना निर्माण होणे साहजिक आहे. अनेकदा पाय दुखण्यामागे अनेक विविध कारणे असतात. यापैकी काही कारणांविषयी आपण जाणून घेऊ.

० पाय दुखण्यामागील कारणे (Leg Pain Causes)

१) शारीरिक हालचाल कमी असणे. (मुख्य करून पायांची हालचाल कमी असणे)
२) शरीरात पाण्याची कमतरता असणे.
३) स्नायूंमध्ये सूज असणे.
४) मुका मार लागणे.
५) खूप जुना अपघात
६) लठ्ठपणा
७) पित्ताचा त्रास
८) अपुरी झोप
९) अपुऱ्या पोषणाचा आहार
१०) चुकीची चप्पल वापरणे
११) हाडांची समस्या
१२) वाताचा त्रास

० पायाचे दुखणे दूर करण्यासाठी काही सोप्प्या टिप्स (Leg Pain)

१) पायाचे दुखणे थांबवायचे असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दैनंदिन जीवनात पायांची योग्य ती हालचाल ठेवा. कारण अचानक पायांची खूप हालचाल झाल्याने स्नायूंवर ताण येतो आणि पायदुखी उदभवते.

२) खूप चालणे किंवा धावणे अशी जीवनशैली असल्याचं नियमित रात्री पाय स्वच्छ धुवून पायाला तिळाच्या तेलाने मसाज करावा. यामुळे आराम मिळतो.

३) पित्त, आमवात अशा कोणत्याही त्रासातून जात असाल तर आहारावर संतुलन हवे. कधीही काहीही खाण्यामुळे शरीरातील या समस्या वाढतात आणि याचा परिणाम सर्व शारीरिक क्रियांवर होतो. यामुळे पायदुखी गंभीर स्वरूपाची होऊ शकते.

४) नियमित आणि मुख्यत्वे थंडीच्या दिवसात पायाचे काही व्यायाम करा. यामुळे पायातील शिरा मोकळ्या होतात.

Leg Pain

५) पाय जास्तच दुखत असतील तर एका भांड्यात पाणी गरम करून त्यात थोडे मीठ घाला. या पाण्यात साधारण २० ते २५ मिनिटांसाठी पाय घालून बसा. यामुळे आराम मिळेल.

६) पायांवर शरीराचे खूप वजन आल्यास स्नायूंसह हाडांवरही ताण येतो. त्यामुळे लठ्ठपणा नियंत्रित करा.

Vegetarian Protein Sources

७) आहारात प्रोटीनची मात्रा योग्य राखा. शिवाय आहार सकस आणि पौष्टिक असेल याकडे लक्ष द्या.

० पायाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष केल्यास काय होईल..? (Leg Pain)

पायाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष केल्यास काय होईल असा सवाल तुमच्या मनात उपस्थित झाला असेल. तर तज्ञ याबाबत सांगतात कि, पायाचे दुखणे अतिशय सामान्य आरोग्यविषयक समस्यांपैकी एक मानली जाते. पण हि समस्या नकळत गंभीर होऊ लागते. त्यामुळे आधीच पायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये. असे केल्यास स्नायूंची झीज वाढते शिवाय हाडेसुद्धा कमकुवत होतात.

त्यामुळे अशी पायदुखी दुर्लक्षित झाली तर व्हीलचेअरशिवाय पर्याय उरत नाही. म्हणून धावायचे असेल… पळायचे असेल.. अगदी पडायचे जरी असेल तरीही पायांचे दुखणे दुर्लक्षित न करण्याचा सल्ला तज्ञ देतात. (Leg Pain)

‘हे’ पण वाचा:-

पाय दुखणे म्हणजे हार्ट अटॅक असू शकतो का ?

Bad Health Habits: उत्तम स्वास्थ्यासाठी ‘या’ 25 वाईट सवयींची संगत आत्ताच सोडा; जाणून घ्या

Liver Damage Causes : यकृत निकामी होण्यामागे ‘हि’ 8 कारणे जबाबदार; जाणून घ्या

आपले यकृत आजारी आहे कसे ओळखालं?; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

श्वास घेताना त्रास होत असेल तर…?; जाणून घ्या घरगुती उपाय