Memory Loss
| |

Memory Loss: विसरभोळेपणा का विस्मरणाचा आजार..? तुम्हीही असाल त्रस्त तर जाणून घ्या उपचार

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Memory Loss तुमच्याबाबतीत कधी असं झालंय का.. कि तुम्ही एखादी गोष्ट केलात आणि नंतर तुम्हाला आठवलीच नाही. याशिवाय तुम्ही कुठेतरी गेलाय पण का गेलाय ते तुम्हाला आठवत नाही.. अगदी चहा पिऊन प्यायलो कि नाही माहित नाही.. ते मला काय करायचं होत..? हा प्रश्न पडण्याइतके तुम्ही विसरभोळे झालाय का..?

आता आपल्यातले काही जण सांगतील असं तर रोजच होत. मला विसरायची सवयच आहे. पण कधी तुम्ही या सवयीचा गंभीरपणे विचार केलाय का..? म्हणजे अगदीच हि सवय फक्त सवय आहे कि आजार..? असा प्रश्न तुम्हाला कधीच पडला नाही..? मग कठीण आहे बुवा! कारण विसरण्याची सवय अनेकदा विस्मरणाच्या आजाराचे संकेत देत असू शकते. सध्या सुध्या गोष्टी विसरण्यापासून गंभीर बाबी विसरण्यापर्यंतचा प्रवास तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. (Memory Loss)

तुम्ही बॉलिवूडचा गजनी चित्रपट पाहिलाय का..? त्यालाही काहीच आठवत नसत म्हणून तो अंगावर लिहून ठेवतो. हा आजार विविध कारणांमुळे होऊ शकतो. त्यामुळे परिस्थिती गजनीइतकी बिकट होण्याआधी समजून घ्या आणि त्यावर मात करा. पूर्वी मोबाईलसारखी यंत्रणा नव्हती. शिवाय आहारातही समतोल होता. ज्यामुळे लोकांची स्मरणशक्ती चांगली रहायची. (Memory Loss)

बघा ना.. आजही आज्जी आजोबांना ती नाती आठवत असतात जी आपण ऐकलेली नसतात. इतकेच काय तर पणजी आजही कोणता नातेवाईक कुठल्या पत्त्यावर राहतो हे तोंडपाठ सांगते. जुने दाखले, हिशोब, गणितं, संपर्क क्रमांक, पत्ते, नाती आणि अगदी जुने जुने ग्रंथ पुराणातील गोष्टी आणि कथासुद्धा या लोकांना अगदी तोंडपाठ असत.

पण आजकालच्या पिढीला १७ चा पाढा विचारला तर तो हि अर्धाच येत असतो. शिवाय कुणाचा नंबर विचारायची तर सोयच नाही. कारण हातात मोबाईल सारखे यंत्र असेल तर नंबर तोंडपाठ करण्याची गरजच उरत नाही. मग अशावेळी लहान सहान गोष्टी लक्षात ठेवणे टाळले जाते. (Memory Loss) याची मेंदूला सवय लागते आणि मेंदूची कार्यगती कमी होते. अशावेळी जर कधी तुमच्याकडे मोबाईल नसेल आणि बुद्धीवर जोर देऊन नंबर आठवावा लागला तर तुमची अवस्था जल बिन मछली सारखी होईल.

डोक्याला इजा होणे, गंभीर आजारपण आणि वाढते वय अशीही काही सामान्य करणे स्मरणशक्तीवर परिणाम करत असतात. म्हणूनच आज आपण अशा विस्मरणावर प्रभावी असणारे आणि स्मरशक्ती वाढविणारे आयुर्वेदिक उपचार जाणून घेणार आहोत. यासह विस्मरणाचा आजार होण्याची अन्य कारणेही जाणून घेणार आहोत.

० विस्मरणाचा आजार होण्याची कारणे (Memory Loss)

विस्मरणाचा आजार विविध कारणांमुळे होऊ शकतो. यामधील काही मुख्य कारणे जाणून घेऊ.
वाढते वय,
काळजी,
ताण तणाव,
औदासिन्य,
मेंदूला सुरळीत रक्तपुरवठा न होणे,
पार्किनसन्सचा आजार,
मद्यपान,
डोक्याला झालेली इजा,
अपुरी जीवनसत्वे,
थायरॉइड,
एपिलेप्सी,
औषधांचा दुष्परिणाम,
ट्यूमर,
इन्फेक्शन
इत्यादी कारणांमुळे स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो.

० स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपचार (Memory Loss)

१) ब्राम्ही – आयुर्वेदात ब्राम्ही या आयुर्वेदिक वनस्पतीला विशेष महत्व आहे. कारण या वनस्पतीचा वापर अनेक अशा औषधांमध्ये केला जातो जी औषधे विविध आणि गंभीर आजारांचा नायनाट करू शकतात. तसेच ब्राम्ही ही मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या नसांना शांत आणि सक्रिय ठेवण्याचे काम करते.

Brahmi

अनेकदा मन शांत होण्यासाठीदेखील ब्राम्ही घेण्याचा सल्ला दिला जातो. (Memory Loss) तसेच अल्झायमरसारख्या विस्मरणाच्या आजारांपासून ब्राम्ही आपल्याला दूर ठेवते. कारण मेंदूला चालना देण्याचे काम ब्राम्ही करत असते. यासाठी आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्यानेच ब्राम्हीचे सेवन करा.

२) शंखपुष्पी – आयुर्वेदात शंखपुष्पीचे विविध आजारांवरील विविध फायदे सांगितले आहेत. आपल्या तल्लख बुद्धीसाठी शंखपुष्पीचे मर्यादित प्रमाणात सेवन करणे अतिशय प्रभावी आणि उत्तम असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे.

शंखपुष्पीच्या सेवनामुळे मेंदूच्या नसा सक्रिय होतात. बुद्धी तल्लख राहते आणि यामुळे विस्मरणाचे आजार आपल्यापासून दूर राहतात.

३) अश्वगंधा – अश्वगंधा एक गुणकारी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अश्वगंधाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे अश्वगंधाचा विस्मरणाच्या आजारावर होणारा परिणाम हा वाखाणण्याजोग आहे.

ashwagandha

अश्वगंधाची मुळे औषधांप्रमाणे योग्य मात्रेत घेतल्याने विस्मरण होण्याची शक्यता कमी होते. अश्वगंधा औषधीचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास मेंदूला योग्य रक्तपुरवठा करण्याचे काम हे औषध करते. (Memory Loss)

४) गोटू कोला – गोटू कोला अनेक बाबतीत फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. अगदी त्वचेच्या समस्येपासून ते सेक्सपर्यंत त्याचे अनेक फायदे आहेत. पण तुमच्या मेंदुला चालना देण्यासाठीही गोटू कोला चांगले आहे.

Gotu Kola

गोटू कोला नावाची वनस्पती तुमच्या स्मरणशक्तीसाठी चांगली असून तुम्ही त्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. एका प्रयोगादरम्यान गोटू कोलाच्या वापरामुळे चांगले बदल झाल्याचे दिसून आले आहेत.

० खाण्या- पिण्याच्या सवयीदेखील स्मरणशक्तीवर परिणाम करतात

Eating Disorder

तज्ञ सांगतात कि, तुमच्या आहारातील खाद्यपदार्थांचा परिणाम थेट तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. जर तुमच्या आहारात जंक फूड वा असे काही पदार्थ असतील जे तुमच्या शारिरीक क्रिया मंदावू शकतात. तर याचे सेवन तुमच्या स्मरणशक्तीवर परिणाम करू शकते. त्यामुळे तुम्हाला आहारात योग्य पदार्थांची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे. (Memory Loss)

‘हे’ पण वाचा:-

अल्झायमर(स्मृतिभ्रंश) म्हणजे काय? ‘हि’ आहेत कारणे आणि लक्षणे (पूर्वार्ध)

‘हे’ पदार्थ खालं तर विस्मरणावर मात करालं; जाणून घ्या

वाचलेले काहीच लक्षात राहत नाही तर या टिप्स चा करा वापर

जर दिवसेंदिवस स्मरणशक्ती कमी होतेय तर….